ज्याचे करावे भले..
मी आजवर अनेकजणांना आर्थिक आणि इतरही मदत केली आहे. मला बऱ्याच वेळा यश आले पण जास्त वेळा वाईट अनुभव आले. त्यातले नमुन्यादाखल अगदी थोडे किस्से सांगावेसे वाटतात.
माझ्या घरच्या प्रत्येक कामवालीचे मी बॅंकेत खाते काढून दिले.
त्यांच्या पगाराची काही रक्कम त्यांच्या अनुमतीने त्यांच्या खात्यात जमा केली. बचतीची सवय व्हावी हा उद्देश. माझ्या एकुलत्या एक मुलाला सोबत म्हणून कायम एखादा गरजू मुलगा किंवा मुलगी घरी सांभाळली. तिला/त्याला शाळेत घातलं.
कपडालत्ता, वह्या पुस्तकं, फी याची काळजी घेतली. मुलींच्या लग्नासाठी खर्चात मदत केली. भांडीकुंडी दिली. इतर कितीतरी मुलांचे क्लासेसचे पैसे भरले.
हिरव्या टमाटरची चटणी
आमच्या अहोंच अस काम आहे ,भाजीपाला आणायला सांगितला तर हमखास तीन चार हिरवे टमाटर आणतात.आता हे कधी पिकणार ? या विचारात न पडता ,मैत्रिणीच्या डब्यात असणारी सगळी माझ्याच वाट्याची असणारी टमाटर हिरवी चटणी आणि तिचा स्वाद जिभेवर रेंगाळतो. साधारण ३-४ वेळा प्रयत्न करून ही अंतिम केलेली पाककृती लिहिते.
हिरव्या टमाटरची चटणी:
साहित्य:
१.तीन हिरवे टमाटर
२. १/२ वाटी तीळ +शेंगादाणे(प्रमाण वाढवू नका.नाहीतर हेच वरचढ होतात.)
३.तीन हिरव्या मिरच्या(तुमच्या मिरच्या किती तिखट आहेत त्यावरून ठरवू शकता किती घ्यायच्या ते )
४.
प्राणप्रिये
प्राणप्रिये,
सात फेरे घेऊन जीवनात माझ्या आलीस ,
अन अंगणातील तुळस झालीस तू.
हसून खेळून सुखी संसाराची स्वप्ने रंगवतेस,
अन मला समाधानाचा गारवा देतेस तू.
प्राणप्रिये,
अंधाराच्या जाळ्यामध्ये ही प्रकाशाची फुंकर घालतेस,
अन प्रितीच्या वाऱ्यावर झोका झुलवतेस तू.
जिद्दीने उंच उंच भरारी घेण्यास शिकवतेस,
अन मनाच्या गाभऱ्याचे दरवाजे उघडतेस तू.
प्राणप्रिये,
सहजीवनात आधार देऊन साथ निभावलीस,
अन माझ्या घरची परसबाग झालीस तू.
सुख दुःखाच्या प्रत्येक गोष्टीत भागीदारी केलीस,
अन जीवन माझे रोशन केलेस तू.
प्राणप्रिये,
अमाप प्रेम करून वर्षोनुवर्षे संगत
काव्यरस
कथा एअरकंडिशनिंगची ः एका अनुभवाचा सारांश
मी एका ठिकाणी ग्रंथालय व माहिती केंद्रात काम करीत होतो. तेथे असलेल्या वातानुकूलन यंत्र बिघडलेले होते. थोड्या दुरुस्तीनंतर ते यंत्र पुन्हा सुरु होत असे व पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. नव्या यंत्राची निकड होती. नवीन यंत्र घ्यावे किंवा केंद्राची पूर्ण खोलीच वातानुकूलित करावी असे दोन पर्याय समोर येत होते.
मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख माझे साहेब होते. त्यांना आपण अ म्हणू या. त्यांच्यासमोर विषय मांडला. त्यांनी तो वीज व ऊर्जा विभागाच्या प्रमुखांना पाठवला. या प्रमुखांनी सांगितले की, संपूर्ण जागा वातानुकूलित करणे खर्चिक आहे. त्यापेक्षा आकाराने लहान असलेला एक हॉल बांधू.
कोव्हीड आणि फसवणूक
कोव्हीड आणि फसवणूक
तीन दिवसापूर्वी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब करोना विषाणूच्या आजारातून मुक्त झालो. या वेळी सामाजिक विलगीकरणामुळे माझी डोमिनार मोटार सायकल २१ दिवस बंद होती. ती सुरु करण्याच्या प्रयत्न केला असता त्याची बॅटरी उतरली असल्याचे लक्षात आले.
डोमिनार या ४०० सीसी ३४ हॉर्स पॉवर च्या मोटार सायकलला किक नाहीच. त्यामुळे बॅटरी नसेल तर ती चालू होतच नाही. यासाठी मी मुलुंड पूर्व ९० फूट रस्ता येथे असलेल्या बजाजच्या सर्व्हिस सेंटर मध्यें फोन केला त्यांनी आपला एक माणूस पाठवला आणि माझ्या मोटर सायकलमधली बॅटरी काढून चार्जिंग साठी नेली.
घात (कथा)
घात (कथा)
एक चांगला माणूस बनणे, यापेक्षा जगात दुसरी कोणती मोठी गोष्ट असू शकते? मी तर म्हणेन चांगला माणूस बनणे हीच जगातील सर्वात कठीण गोष्ट असेल. तशी ती कठीण गोष्ट साध्य केल्याचा मला मोठा अभिमान आहे. आणि अभिमान असायलाही हवा. एकदम वाईट प्रवृत्तीचा माणूस जेव्हा, पूर्णपणे चांगला बनतो तेव्हा, त्याच्या त्या परिवर्तनाचा अभिमान वाटायलाच हवा. आणि मला तसा वाटतोही.
मी गुरुदत्त. एक चांगला माणूस. आधी नव्हतो. पण आता आहे. पाच वर्षांपूर्वी, एकदम टोकाचा वाईट प्रवृत्तीचा माणूस, आज चांगला कसा झाला? याचे खुद्द मलाच आश्चर्य वाटते.
अचूम् आणि समुद्र (भाग २)
अचुम् आणि समुद्र (भाग १)
मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे.
मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला:
“अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे,
शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे.
ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे,
तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.”
मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात.
यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता.
असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:
मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:
शिवप्रतापाची झुंज ( भाग १)
आषाढाच्या सरी थांबायचे नाव घेत नव्हत्या. तरी अश्या पर्जन्यकाळात कान्होजी जेधे लगबगीने राजगडाच्या पायर्या चढत होते. पाली दरवाज्याने आत येउन त्यांनी तातडीने सदर गाठली आणि आत सांगावा दिला. पहारेकर्याच्या वर्दीनंतर कान्होजी अंग पुसून आत गेले आणि राजांना मुजरा घालून सदरेवर टेकले.
"इतक्या तातडीने येणे केलेत कान्होजी काका ! काही विशेष ?" राजांनी पृच्छा केली.
"वखुतच तसा आलाय राजं. तुम्हास्नी जावळीचा समदा पेच म्हायतीच आहे. जावळीचा ह्यो तिढा सोडवायला ईजापुरास्न अफझुलखान वाईला येउन बसलाय. आपण यशवंतरावास जावळीचा चंद्रराव नामजद केला, ते या ईजापुर दरबाराला खटकलयं.
म्हारे हिवडा में नाचे मोर...!
राम राम मंडळी, मंडळी आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी आपल्यासाठी आपल्या वेळेचं एक मूल्य आहे. कधी तरी वेळ काढून एखादं आवडीचं गाणं ऐकत बसणे, काही वेळासाठी तल्लीन होऊन जाणे. एखाद्या पुस्तकाच्या पानात रमणे, मित्राशी फोनवर गप्पा मारत खदखदत हसणे. निसर्गचित्रात रमणे, एखादा तलाव, नदी, समूद्र त्याच्याकडे पाहात त्या सौंदर्यात, समुद्रगाजेत रमणे. मॉर्निंग वॉकला जातांना येतांना प्राजक्ताची फूले-चाफ्यांची फुले वेचत बसणे. असे आपलं सामान्य मानसाचं आयुष्य एका रेषेत सरळ चाललेलं असतं. पण मोठ्या माणसांचं कसं असेल.
मिसळपाव