मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही आत्मचरित्रं! काही व्यक्तिचित्रं! :)

विसोबा खेचर ·

आनंदयात्री 28/03/2008 - 16:34
आज संध्याकाळी वडापाव अन उद्याच्या न्याहरीला इडली.. मेन्यु फिक्स. धन्यवाद भाईकाका !!

In reply to by आनंदयात्री

प्राजु 28/03/2008 - 18:51
मस्त... अगदीच वाफाळलेली आणि चमचमित. हा प्रकार लेखन प्रकार नविन आहे. आणि खरं हॉटेलात (मिसळ पाव मध्ये) आल्यासारखं वाटलं. - (सर्वव्यापी)प्राजु

मस्तच. खाद्यपदार्थांच्या आत्मचरित्राची कल्पना ढासू आहे एकदम. त्वाडा जबाब नही.. > > शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय?

वा वा..मस्तच! पण इथे ना वडापावची गाडी ना उडप्याची हाटेलं..चित्रं पाहून जीभ खवळली,त्यामुळे आता स्वतः च वडा आणि इडली करणे आले :( स्वाती

धमाल मुलगा 28/03/2008 - 16:50
हम्म..... बेष्ट...भूकच लागली ना राव! च्यामारी, वडापावच॑ आत्मवृत्त वाचून दिल्लीतले दिवस आठवले. वडापाव खाण्यासाठी इतका व्याकूळ झालो होतो की "दिल्ली हट" मध्ये जाऊन आख्खे ३५ रुपये टेकवून २ वडे आणि पाव खाल्लेले आठवल॑. खर्रय बॉ...वडापाव तो वडापाव!

मदनबाण 28/03/2008 - 16:51
स्वत:च्या स्वभावात चवदार, चविष्ट, खमंगपणा आणा आणि दुसर्‍याला पण तसंच अगदी मस्त मजेत चवीचवीने जगायला शिकवा! अहो तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे, एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला? साली दोन घटकांची जिंदगी आपली! तात्या एकदम पटल :-- मस्त मजेत चवीचवीने जगायलाच पाहिजे..... (कुंजविहार आणि राजमाता येथील वडापाव चाखणारा --ठाणेकर) मदनबाण

प्रमोद देव 28/03/2008 - 16:52
वा ! तात्या! लई ब्येस लिवलंया! खान्याच्या वस्तु बगून जास्त काय बलावं ते सुधरत नाय बा! आरं पन त्ये खायची गोष्ट हाय! नुस्ता लिवून ने फोटू बगून आम्चा पॉट कसा भरनार? पोटाची बी काय तरी सोय करा. त्वांडाला पानी सुटलं की आमच्या.

मनापासुन 28/03/2008 - 17:00
बाकी काही म्हणा वडापाव तो वडापाव्...........मग तो पुणेरी जोशांचा असुदे किंवा जम्बो किंग चा वडा पाव मस्त सोलापुरी चटणी आ हा हा................स्स्स्स्स्स्स्स्स्स्स : देशी बर्गर.......पण बाहेरच्या सारखे जाड सालीचे वडे कसे बनवायचे ते कोणी सांगाल का? घरचे वडे पावात कोंबले की ते पार वेगळेच लागतात

मनस्वी 28/03/2008 - 17:03
अहो तात्या तात्या काय मस्त विषय घेतलाय... फोटो बघुनच मन तृप्त झाले. इडलीचटणी - हा तर एकदम वीक पॉईंट... अगदी बरोब्बर सांबारापेक्षा चटणीची मजा काही औरच!
स्वत: उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब!
मस्त!
पण सिंधी माणसाचं डोसकंच लै अवली बघा! त्यानं प्रथम मला पावात भरला आणि 'वडापाव' हे नांवा रातोरात फेमस झालं!
नाही तात्या... आपल्या मराठमोळ्या पदार्थाचे श्रेय सिंध्यांच्या गळ्यात घालू नका... काहीही असो... वडापाव मराठी होता मराठी आहे मराठी राहील! आपली छत्रचामरं दुसर्‍यांना का बरे काढून द्या? अवांतर : ऑफिसमध्ये बसल्याबसल्या असे वाचले की खूप उचंबळून येते.. ७ कधी वाजतात असे होते. (वाडेश्वरची इडलीचटणीप्रेमी आणि चौकातल्या हातगाडीवरील वडापावभक्त) मनस्वी

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 28/03/2008 - 17:06
नाही तात्या... आपल्या मराठमोळ्या पदार्थाचे श्रेय सिंध्यांच्या गळ्यात घालू नका... काहीही असो... वडापाव मराठी होता मराठी आहे मराठी राहील! कबूल! शब्द मागे घेतो, परंतु तेवढ्यावरून आता इथे वाद सुरू होऊ नये असे वाटते! आपला, (उदास!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी 28/03/2008 - 17:10
आता मला उदास करू नका... वाद होउच नये... कोणी तशी प्रतिक्रिया दिल्यास तिला कोणीच उत्तर देउ नये... (अतिउदास) मनस्वी

नंदन 28/03/2008 - 18:14
सुरेख कल्पना आहे. मिसळ पहिल्याच भागात शोधत होतो, पण पुढच्या भागात येतेय हे वाचून हायसं वाटलं. बाकी इडली-बटाटावडा आणि शिरा-मिसळ म्हणजे सात्विक-तामसी जोड्याच!. आणि तुझ्याच 'माझा परजातप्रवेश' मध्ये ज्याबद्दल लिहिलंय ती खानदानी, नबाबी दम गोश्त बिर्याणी ; पंजाबी तगडी लस्सी; ऐसपैस पण हिशोबी खमण-ढोकळा अशी अनेक मंडळी रांगेने उभी आहेत:)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

झकासराव 28/03/2008 - 19:03
लिहिलय की :) आवडल. बटाटावड्याच आत्म चरित्र झ्याक वाटल. साला दोन घटकांची जिंदगी हेच अंतिम सत्य. इडली तर मला नेहमी चटणी सोबतच आवडते. ते देखील छान जमलय. इडलीच आत्मचरित्र वाचुन एक नाजुक साजुक छान दिसणारी सभ्य अशी साउथ इंडियन मुलगी आली नजरेसमोर :)

चतुरंग 28/03/2008 - 20:13
तुमची ही पहिली दोन 'पदार्थचित्रे' खासच भावली! अहो कालच गरमागरम इडल्यांचा आस्वाद घेतलाय ना! (आमच्या सौ. फारच भारी करतात हो इडल्या, त्याबाबतीत आपण भाग्यवान आहोत!) स्वत: उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब! क्या बात है तात्या! अहो हे असं व्यक्तिरुप देताय ना तुम्ही त्यामुळे पुढच्या वेळी वडापाव खाताना उगीचच अपराधी वाटेल की काय अशी भीती वाटतेय!;) चतुरंग

आपल्या मिपावर शोभेल असा. झकास जमला आहे. पोटात आग पडली. तमिळनाडूत 'सरवान' मध्ये इडलीबरोबर तीन वेगवेगळ्या चटण्या मिळतात बरे का. आता खातोच काहीतरी. वा. नशीब. जेवण तयार आहे. मिरच्या तळायचीच ऑर्डर देतो. धन्यवाद. चिंचेची, खोब-याची व टोमॅटोची. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

गरमगरम इडल्या मिळाल्या, अगदी हलक्या आणि चवीला छान होत्या!' असं माझं वर्णन बर्‍याचदा केलं जातं सकाळी सकाळी कित्येक लोकं न्याहरी म्हणून माझ्याच गरमागरम चवीला प्राधान्य देतात. सांबारापेक्षा छानशी दक्षिण भारतीय पद्धतीची चटणी, ही माझी अतिशय प्रिय मैत्रिण! मार डाला! विशेषत: सक्काळी सक्काळी, धारवाडच्या दक्षिणेला कुठेही, केळीच्या पानावर वाढलेली गरमागरम वाफा येणारी इडली एखाद्या टपरी हाटेलात खावी. चंदनी अगरबत्तीच्या सुगंधात न्हाऊन! आणि काउंटरवरच्या इडलीइतकेच शुभ्र शर्ट-लुंगी नेसलेल्या अण्णा-अप्पाला "अय्योय्यो! स्वामी, तुम्हारे जैसा इडली और किसीको जमताइच नही" म्हणून दाद द्यावी! आपण साला एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व आहे बघा साहेब! आपल्याच मस्तीत जगणारा! आपलं नांव पण एकदम लै भारी आहे.." आयला, दचकलोच! मला एकदम वाटलं की हा तात्या माझंच व्यक्तिचित्र लिहितोय की काय? :)) स्वत: उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब! वा, जवाब नही!!! तुमी तुमचं ते व्यक्तिचित्र की आत्मचरित्र का काय म्हणतात ते सांगा म्हणाले म्हणून एवढा वेळ तुमच्याशी बोललो साहेब! पण आता आपल्याजवळ तुमच्याशी बोलायला जादा टाईम नाय! नायतर काय! डेक्कन एक्सप्रेस यायची वेळ झाली नाय काय!!:)) तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे, एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला? साली दोन घटकांची जिंदगी आपली! खरंय बाबा, आपली सगळ्यांचीच जिंदगी साली दोन घटकांची!! काल रात्री भाईकाका स्वप्नात आले होते आणि मला म्हणाले, साला, तुझ्या बरे भाईकाका स्वप्नात येतात! आमच्या स्वप्नात साला प्रयत्न करकरून सुद्धा येत नाहीत!! आमच्या स्वप्नात सदानकदा फक्त मुकुंद टाकसाळे!!:))) असो. मस्त लिहिलंयस तात्या, आता पुढील भागांच्या प्रतिक्षेत!! -पिवळा डांबिस बटाटेवडा

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 28/03/2008 - 23:44
आमच्या स्वप्नात सदानकदा फक्त मुकुंद टाकसाळे!!:))) हा हा हा! हे बाकी मस्त! :) बाय द वे, मुकुंदाही छान लिहितो. मला आवडतं त्याचं लेखन..! तात्या.

बेसनलाडू 29/03/2008 - 05:08
बटाटावडा जबर्‍या. इडलीही मस्त! वाचून मौज वाटली (आणि चित्रे पाहून भूकही लागली :) ) (खादाड)बेसनलाडू

वरदा 29/03/2008 - 05:34
मी लगेच आधी जाऊन इडलीसाठी डाळ भिजत टाकली आणि कोलेस्टेरोल ला गोळी मारुन लगेच पुढच्या आठवड्यात वडे करायचं ठरवलं.... सोपे आणि नेहेमीचे पदार्थ आम्हाला नाही बुवा असं काही सुचत ते पाहुन्..आम्ही खायला टपलेले असतो...कसं सुचतं तुम्हाला इतकं छान लिहायला..... मस्तच आहे....आता जाते खूप भूक लागली...पण पोळि खावी लागणार्..तीही आधी स्वतः लाटली की मगच मिळेल.... पोळीचंही आत्मचरित्र लिहा एकदा...माझ्या घरची पोळी म्हणेल्..रोज ही बाई किती कंटाळून बनवते मला पण खाताना अगदी पटापट जाते की मी पोटात.....

In reply to by वरदा

विसोबा खेचर 29/03/2008 - 07:12
रोज ही बाई किती कंटाळून बनवते मला पण खाताना अगदी पटापट जाते की मी पोटात..... अरे वा वरदा! पोळीचं आत्मचरित्रं तूच लिहायचा प्रयत्न कर की. नक्की जमेल तुला! वरील वाक्यानेच सुरवात कर! तुझ्या घरची पोळी थोडी तुझ्याचसारखी गोष्टीवेल्हाळ वाटते आहे, तिच्या मनात काही नाही! :) ती बापडी पटकन तव्यावर पडते आणि तिथून छानशी फुगून ताजी, गरमागरम होऊन तुझ्या पानात पडते! तव्यावरून डायरेक्ट पानात गरमागरम पडलेल्या पोळी इतकं दुसरं या जगात काहीही शुभ नाही, काहीही सुंदर नाही! खरं की नाही वरदा? असो..! पोळीच्या आत्मचरित्राची कल्पना सुरेख आहे. ते लिहायचा तू जरूर प्रयत्न कर! तुलाही जमेल! तात्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 29/03/2008 - 16:48
परंतु अद्याप मूड लागत नाही. परंतु आता मात्र सर्व लेखन पूर्ण झाल्यानंतरच रौशनीला घेऊन मिपावर येईन. म्हणजे उगाच पब्लिकला वाट पाहायला लागायला नको.. तात्या.

भन्नाट कल्पना आहे.. तात्या काय मस्त कल्पनाशक्ती आहे तुमची. मस्त लिहिले आहे हे पदार्थ करत असताना ते काय बोलत असतील? याची कल्पना सुद्धा किती छान.. मला नेहमी परोपरी समजावून सांगत असते की, 'बाई गं, हल्लीच्या जगात एवढा शांतपणा, सात्विकपणा उपयोगाचा नाही, तू थोडी माझ्यासारखी झणझणीत, चटपटीत हो!' जाण्यापूर्वी एकच सांगतो, की मस्त मजेत जगा, स्वत:च्या स्वभावात चवदार, चविष्ट, खमंगपणा आणा आणि दुसर्‍याला पण तसंच अगदी मस्त मजेत चवीचवीने जगायला शिकवा! अहो तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे, एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला? साली दोन घटकांची जिंदगी आपली! ही वाक्ये नेहमी वरील पदार्थ करताना आठवतील...

वरदा 31/03/2008 - 00:05
पोळीच्या आत्मचरित्राची कल्पना सुरेख आहे. ते लिहायचा तू जरूर प्रयत्न कर! तुलाही जमेल! मी लिहीणार म्हणजे झालच कल्याण..लोक पळून जातील हो इथून...तुम्ही मस्त लिहीताय...येऊदेत मिसळ आणि साजुक तुपाचा शिरा.... तव्यावरून डायरेक्ट पानात गरमागरम पडलेल्या पोळी इतकं दुसरं या जगात काहीही शुभ नाही, काहीही सुंदर नाही! हे अगदी खरं ती पोळी मऊ मुलायम टमाटम फुगलेली असावी आणि त्यावर मस्त तुपाची धार सोडावी..आणि ती आईने प्रेमानं वाढावी आणि जग तिथेच थांबून रहावं....नॉस्टॅल्जीक वाट्टय आता जाम....:((((

धोंडोपंत 31/03/2008 - 08:00
वा वा वा वा वा तात्या, किती सुंदर लिहिले आहेस तू? अप्रतिम. इतके वर्ष जे पदार्थ रोज भेटत आहेत त्यांना तू बोलके केलेस. झकास लेखन. कसं काय सुचतं बुवा तुम्हांला अशा वैविध्यपूर्ण गोष्टींवर लिहायला? आपला, (प्रभावित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर 01/04/2008 - 01:34
प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार..! ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट, असा कोणताच प्रतिसाद देण्याच्याही लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार..! :) तात्या.

भोचक 01/04/2008 - 15:22
तात्या मजा आणली. आता मिसळीचं येऊ द्या. (मिसळप्रेमी) भोचक

देवदत्त 16/05/2008 - 21:42
मस्त एकदम. सकाळी मी मेदूवडा सांबारच खायचो नाश्त्याला. आता बटाटेवडा सांबार खातो :) तात्या ते बटाटेवड्याचे फोटो पाहून लगेच वास दरवळला इथे. भूकही वाढली. :) उंची प्लेटी नकोत आणि ते काटेचमचे नकोत, की काय पण नको आपल्याला. ४-५ रुपायात आम पब्लिक रस्त्यावरच्या गाडीवर वडापाव खातो आणि समाधान पावतो! अहो गरीबाच्या पोटाची थोडा वेळ तरी आग शमते! काय, खरं की नाय? खरं एकदम. अरे हो, आता शिव वडा ही मिळणार आहे ना काही दिवसांत. आणि आपल्याकरता आहेच हो कुंजविहार इथे =P~ =P~ =P~

शितल 16/05/2008 - 22:25
तात्या तुम्ही माझ्या खादाडीच्या अगदी विक पॉईन्ट वरच लेख लिहिला आहात, काय बोलु आता. आता वाट पहाणे शक्य नाही बेत लगेच तयारीला लागते, त्या शिवाय जिवाला शात॑ता नाही लागायची. अगदी मस्त लिखाण, आता इथुन पुढे इडली आणि बटाटे वड्याला विचारूनच त्या॑ना पोटात ढकलणार.

ईश्वरी 17/05/2008 - 00:14
इडली , बटाटावडा ...मस्त अगदी . तात्या , छान लिहीलत. मजा आली वाचताना. धन्यवाद. उंची प्लेटी नकोत आणि ते काटेचमचे नकोत, की काय पण नको आपल्याला. ४-५ रुपायात आम पब्लिक रस्त्यावरच्या गाडीवर वडापाव खातो आणि समाधान पावतो -- एकदम सही मिसळीचे व्यक्तीचित्र तुम्ही छान रेखाटाल . मिसळी बद्दल तुमच्या शैलीत लिहीलेले वाचायला खूप आवडेल. (पुढील पदार्थांच्या आत्मकथनाच्या प्रतिक्षेत ) ईश्वरी

प्रगती 17/05/2008 - 12:52
एवढया छान छान प्रति़क्रिया आल्यावर आम्ही आणखी काय वेगळं सांगणार. लवकर प्रसादाच्या शिर्‍याबद्द्ल लिहा. शिराप्रेमी प्रगती.

लेखनप्रकार
3

एक आवडती आणि एक नावडती

मनस्वी ·

विसोबा खेचर 28/03/2008 - 14:49
नावडती : काहीवेळा प्रतिसाद आणि प्रकाशनांचा वेग अतिशय मंदावतो. मनस्वी, हे हे हे! कसा पचका केला तुझा! वेगात प्रतिसाद देऊन तुझं वरील वाक्य काही प्रमाणात खोटं ठरवलं की नाही? :) आणि प्रकाशनाचं म्हणशील तर लोकांनी इथे जास्तीत जास्त वेगवेगळ्या विषयावर लिहावं असंच वाटतं! माझ्या परिने आजच मी एक लेख प्रकाशित करतोय! वाचून कसा वाटला ते सांग! उगाच नसते वादाचे विषय घेऊन काही मंडळी मिपाचं वातावरण उगीचंच गढूळ करू पाहतात तेव्हा तात्या अभ्यंकरांना एखादा लेख लिहून मैदानात उतरावं लागतं आणि मिपाची गाडी पुन्हा लायनीवर आणावी लागते! उतना भरोसा है हमे अपने आप पर! :) आमच्या भिडे सरांनी इंग्रजीचा धडा शिकविताना एक म्हण सांगितलेली. ती आवडती-नावडती शब्द ऐकल्यावर नेहेमी आठवते - नावडतीचं मीठ आळणी आणि आवडतीचा शें@@ गोड! चलो कोई बात नही! तूर्तास तरी मिपा हे तुझं आवडतं संस्थळ आहे असं धरून चालतो! एखादा मिठाचा खडा लागायचाच! चलता है.. :) आपला, (मिपावरचा खुशालचेंडू!) तात्या.

आनंदयात्री 28/03/2008 - 14:50
>>नावडतीचं मीठ आळणी आणि आवडतीचा शें@@ गोड! भारीच !!! -(शेंबडा) आनंदयात्री

मनस्वी 28/03/2008 - 15:11
दुसर्‍याच्या प्रतिसादांवर टीका-टिप्पणी कराच.... पण स्वतःची आवडती आणि नावडती गोष्ट टाकायला विसरू नका.. ही नम्र विनंती.

धमाल मुलगा 28/03/2008 - 15:31
अरे ! तीने बिचारीने गढुळलेल॑ वातावरण जरा शा॑त होईल म्हणून काहीतरी चालू कराव॑ म्हणून हे टाकल॑ आणि त्याच॑ पर्यवसान पुन्हा वादातच झाल॑. च्च...सावळा गो॑धळच चाललाय सगळा. मनस्वी, मनाला लाऊन नको घेऊस! चालायच॑च!

प्राजु 29/03/2008 - 03:24
आवडती : केशवसुमारची खुमासदार विडंबने, चतुरंग यांची मधुशाला, स्वातीचा स्वयंपाक... नावडती : दारूवरच्या विडंबनांची आलेली लाट... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

वरदा 29/03/2008 - 05:44
आवडती : केशवसुमारची खुमासदार विडंबने, चतुरंग यांची मधुशाला, स्वातीचा स्वयंपाक आणि प्राजुच्या चारोळ्या आणि कविता, धमु, पि.डां. काका आणि टिंगी च्या प्रतिक्रिया, विजुभाऊंची बखर, तात्यांची व्यक्तीचित्र आणि रोशनी, सर्वसाक्षी आणि खूप जणांनी काढलेले सुंदर फोटो, काम सोडून टाईमपास करायला भेटणारेमित्र मैत्रीणी असं खूप काही आणि इथे असलेलं मोकळं वातावरण.... नावडती: ज्यांना इथे आवडत नाही अशांचा इथं येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न्..अरे नाही आवडत तर नका ना येऊ इतरांना कशाला पकवता?

In reply to by वरदा

विसोबा खेचर 29/03/2008 - 06:34
आवडती आणि नावडतीच्या बाबतीत वरदाशी सहमत... आवडतीमध्ये वरदाने माझ्यासारख्या कडमड्या लेखकाची याद ठेवली त्या बद्दल धन्यवाद.. :) नावडती: ज्यांना इथे आवडत नाही अशांचा इथं येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न्..अरे नाही आवडत तर नका ना येऊ इतरांना कशाला पकवता? अगं वरदा चालायचंच! येऊ दे त्यांनाही इथे! त्यांना देखील मिपाशिवाय चैन पडत नाही असंच आपण म्हणूया! इथे येऊन पकवू देत त्यांना काय पकवायचंय ते, त्यांनी प्रेमाने आपल्याकरता पकवलेलं आपण खाऊ आणि ढेकर देऊन मोकळे होऊ! :) तात्या.

आवडती: इथला मनमोकळेपणा, थट्टामस्करी व दिलदारी नावडती: वरती वरदाने म्हटलंय तेच, अगदी डिट्टो!

धमाल मुलगा 02/04/2008 - 12:20
आवडती: मैत्रीपूर्ण वातावरण, मस्त लेख - कविता, दिलखुलास तात्या, गुरुवर्य प्रमोद्रोणाचार्य, आमचे लाडके डा॑बिसकाका, आणि इथ॑ येऊन जुळलेले सूर (काही काही॑च्या बाबतीत "धूर"..क्काय चित्तोबा?), मिळालेले समस्त जि॑दादील मित्र-मैत्रिणी, जाज्वल्य म्हराठमोळा इन्या, डॉन्या, आ॑द्या,विजुभाऊ,डॉक्टरसाहेब...... हुश्श्य....यादी स॑पणार नाही बॉ! नावडती: १.विघ्नस॑तोषी जमातीमधले उठवळ अमिबा (आम्ही डोकेबाज नाही आहोत त्यामुळे शाब्दीक वादात जि॑कू शकणार नाही कदाचित. पण हे विघ्नस॑तोषी प्राणी जर...जर व्यक्तिशः भेटलेच तर त्या॑ना उभ्या जन्माची अद्दल घडवण्याची जबाबदारी ह्या देशमुखा॑च्या छाव्याची!!!) २.धमाल मुलगा ह्या तद्दन मुर्ख व्यक्तीच्या "उथळ आणि बटबटीत" प्रतिसादा॑चा पाउस! (अरे! पण वरदाताई तर म्हणतेय की तिला माझ्या प्रतिक्रिया आवडतात! नो प्रोब्लेम...म्हणजे त्या प्रतिक्रिया नक्कीच टाकाऊ नाहिय्येत :-)) ) वरदाताई, आमच्यासारख्या यत्कि॑चित माणसाच्या प्रतिक्रिया॑बद्दल आपली आवड आवर्जून नो॑दवल्याबद्दल "तहेदिलसे" आभारी आहे :-)

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 02/04/2008 - 12:43
पण हे विघ्नस॑तोषी प्राणी जर...जर व्यक्तिशः भेटलेच तर त्या॑ना उभ्या जन्माची अद्दल घडवण्याची जबाबदारी ह्या देशमुखा॑च्या छाव्याची!!!) वा धमाल्या, क्या ब्बात है, जियो रे मेरे शेर...! बाय द वे, मिपाच्या काही विघ्नसंतोषीची लोकांची नावं तुला 'पोष्ट'कार्ड टाकून कळवू का? :) जय जय रघुवीर समर्थ! सॉरी, चुकलो चुकलो, ज्ञानेश्वर महाराज की जय! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा 02/04/2008 - 14:02
बाय द वे, मिपाच्या काही विघ्नसंतोषीची लोकांची नावं तुला 'पोष्ट'कार्ड टाकून कळवू का? :) बिनधास्त द्या हो! भेटूदे तर, सा॑गतो एकेकाला. शाळा-कॉलेजातले हाणामारीचे दिवस काही फार जुने नाहीत झालेले! आणि हो, फोटोमध्ये बघून आपल्या अ॑गकाठीवर जाऊ नका. आपण हत्यारब॑द असतो. जय जय रघुवीर समर्थ! -धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 02/04/2008 - 14:12
आपण हत्यारब॑द असतो. नको रे बाबा! उगाच खूनबिन नको पाडूस कुणाचे! अरे विघ्नसंतोषी असले तरी शेवटी आपण सगळी आंतरजालावरची मराठी माणसं आहोत हे विसरता कामा नये! हं, आता काही माणसं साला मिपावरच येऊन मिपाची बदनामी करतात आणि यापेक्षा अधिक चांगली संस्थळं आहेत हे सुचवतात त्यांना फार फार तर हाग्या दम दे! :) तात्या.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 03/04/2008 - 01:02
बाय द वे, मिपाच्या काही विघ्नसंतोषीची लोकांची नावं तुला 'पोष्ट'कार्ड टाकून कळवू का? :) माझ्याकडे द्या,तिच्यायला मी बघतो एकेकाडे :) बिनधास्त द्या हो! भेटूदे तर, सा॑गतो एकेकाला. शाळा-कॉलेजातले हाणामारीचे दिवस काही फार जुने नाहीत झालेले! आमचे तर अजूनही चालू आहेत. कधी हाता-पायांनी तर कधी शब्दांनी(नेटवर) आणि हो, फोटोमध्ये बघून आपल्या अ॑गकाठीवर जाऊ नका. आपण हत्यारब॑द असतो. हाण तिच्यायला. आपूण तर घरात बी कट्टा ठेवून असतो. पायजे तवा फोन टाक भौ. :) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 02/04/2008 - 13:39
"बाय द वे, मिपाच्या काही विघ्नसंतोषीची लोकांची नावं तुला 'पोष्ट'कार्ड टाकून कळवू का? :)" तात्याबा, कळवाच तुम्ही. आम्ही बघू त्यांच्याकडे ... कब खोपचेमे लेके खर्चापानी दिया ये पता भी नही चलेगा ... बाकी सविस्तर सवडीने , तसे बाकिच्यांनी मांडलेले मुद्दे मान्य ... सुपारीकिंग छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

शरुबाबा 02/04/2008 - 13:24
आवडती : मिसळपाववर सर्व प्रकारचे नमुने आहेत काम सोडून टाईमपास करायला भेटणारेमित्र मैत्रीणी

विजुभाऊ 02/04/2008 - 14:09
अ॑गकाठी हा शब्द ज्या कोणी मराठीत आणला त्याला धन्यवाद. डॉन्या सुपारीचे व्यसन वाईट बर का बाबा. लो.टिळक खात होते...त्यांच्या विचारांचे अनुकरण करा..सुपारी चे नको. फार वाटले तर आवळा सुपारी घे पोटाला बरी असते... ..........आवळासुपारी किंग्.विजुभौ

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 02/04/2008 - 14:50
आम्हाला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही .... फक्त "सिगारेट" पिल्यावर तोंडाचा वास जाण्यासाठी चिमुटभर सुगंधी सुपारी तोंडात टाकतो, सिगारेट पण नेहमी पित नाही पण जेव्हा ४ मित्रांबरोबर "प्यायला" बसतो तेव्हा लागतेच. ह्याचा अर्थ मी नेहमी पितो असा नाही, जेव्हा त्याच ४ मित्रांबरोबर "३ पत्ती" खेळायला बसतो तेव्हा कोरडे बसूने म्हणून उगीच आपली "उष्टावल्यासारखी" घेतो , ३ पत्ती पण नेहमी खेळत नाही पण जेव्हा घोड्यावर लावलेले पैसे जेव्हा घूसतात तेव्हा बॅलन्स करण्यासाठी थोडे खेळावं लागतं .... तर थोडक्यात काय की, आम्हाला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा 03/04/2008 - 10:49
घ्या तिच्याआयला !!!!!
बाय द वे, मिपाच्या काही विघ्नसंतोषीची लोकांची नावं तुला 'पोष्ट'कार्ड टाकून कळवू का? :) माझ्याकडे द्या,तिच्यायला मी बघतो एकेकाडे :) ...भेटूदे तर, सा॑गतो एकेकाला. शाळा-कॉलेजातले हाणामारीचे दिवस काही फार जुने नाहीत झालेले! आमचे तर अजूनही चालू आहेत. कधी हाता-पायांनी तर कधी शब्दांनी(नेटवर).....हाण तिच्यायला. आपूण तर घरात बी कट्टा ठेवून असतो. पायजे तवा फोन टाक भौ. :) -इनोबा म्हणे तात्याबा, कळवाच तुम्ही. आम्ही बघू त्यांच्याकडे ... कब खोपचेमे लेके खर्चापानी दिया ये पता भी नही चलेगा ... सुपारीकिंग छोटा डॉन
ह्याला म्हणतात जि॑दादिली...आणि दोस्ती. एक आवाज टाकला तर अशी आपली माणस॑ उभी राहतायत! शाब्बास र॑ माज्या वाघा॑नो !!! >>आपूण तर घरात बी कट्टा ठेवून असतो. पायजे तवा फोन टाक भौ. :) बास का भाऊ! आयला, तू भेटलास लै झाल॑ आपल्यासाठी! पाती आन् कट्टे काय आपली खेळणीच हैत की :-)) - (दोस्ता॑चा जानी दोस्त, दुश्मना॑चा जानी दुश्मन) समशेरबहाद्दर ध मा ल.

जरा हलकेफुलके : मिसळपाव या आपल्या आवडीच्या संकेतस्थळाबद्दल आपली एक आवडती आणि एक नावडती गोष्ट लिहावी. माझ्यापासूनच सुरुवात करते. आवडती : मिसळपाववर सर्व प्रकारचे नमुने आहेत (म्हणजे लेखक, कवि, गायक, वादक, अन्नपुर्णा, बल्लवाचार्य, विडंबक, मजेशीर, विनोदी, रागीष्ट, चिडके, खुशालचेंडू, उद्योगी, रिकामटेकडे, भांडकुदळ, प्रेमळ, चतुर, अभ्यासू, साहित्यिक, डॉक्टर, आयटीवाले, शेअरबाजारवाले, ज्योतिषी, देशस्थ, परदेशस्थ, लहान, थोर....) आणि या सर्वांना मराठीबद्दल अस्मिता आणि अभिमान आहे.

आयुष्य....."सप्टेंबर २००५" ला लिहिलेली एक कविता

उदय सप्रे ·

कविता छान आहे. पण सप्टेंबर २००५ ला लिहिली आहे, हे लिहिण्यात काय हेतु आहे ते कळाले नाही. बाकी कविता उत्तम.

In reply to by स्वाती राजेश

उदय सप्रे 31/03/2008 - 09:21
स्वाती राजेश, माझी आणखीन एक कविता याच नावाने आहे (जी सध्ध्या मिळत नाहिये!) त्यामुळे संग्रही मी तशी नोंद केली होती.शिवाय कवितेवर तारीख - साढारण कालावधी लिहिण्याची जुनी सवय पण आहे. जमल्यास "शिवरायांचे "८" वा वे रूप" हा मि.पा. वरील लेख पण वाचावा ही विनंती. उदय सप्रे

वरदा 30/03/2008 - 00:27
आहे....कधी अवखळ , कधी शांत , कधी "काय होईल?" याची भ्रांत ह्म्म्म्म.......ते खरं म्हणा....

लेखनविषय:
आयुष्य तेंव्हा "सायरा बानो" सारखं असतं इकडून तिकडे हिंडण्याचं चकाट्या पिटत फिरण्याचं .....जेंव्हा आपलं वय "एक ते चार" असतं ! आयुष्य मग "गीता बाली" सारखं होतं पुष्कळ वेळ बागडण्याचं, मग पुस्तकांशी झगडण्याचं .....जेंव्हा आपलं वय "पाच ते आठ" असतं ! आयुष्य डोलणार्‍या "वहिदा" सारखं होतं क्षणात गिरकी घेण्याचं , बर्‍याचदां फिरकी घेण्याचं .....जेंव्हा आपलं वय " नऊ ते बारा " असतं ! आयुष्य आता "नूतन" सारखं होतं प्रसंग कित्येक हसण्याचे, अपुर्‍या प्रयत्ना

विडंबन्....एकही शब्द बदलता

विजुभाऊ ·

विजुभाऊ 28/03/2008 - 12:27
मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही.......मी हे गंमत म्हणुन लिहीले आहे इतकेच.... कोणाच्या भावना दुखवणार असतील / वाद होणार असतील तर हा धागा पुसुन टाकुया.

केशवसुमार 28/03/2008 - 12:28
असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा.. अस काही तरी उत्तर येईल आता.. ह.घ्या.हे.सा.न.ल. (समर्थ)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

सर्किट 28/03/2008 - 21:39
असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा.. पुढे ?? -सर्किट ठोसर

विडंबन हे एकही शब्द / शब्द रचना न बदलतासुद्धा होउ शकते उदा: एखाद्या तरुणीकडे पाहुन कोणी सदासर्वदा योग तुझा घडावा.....तुझे कारणी देह माझा पडावा..... हा मनाचा श्लोक म्हंटला तर ते काय मानायचे?

गुरुविण कोण दाखविल वाट ?

संजीव नाईक ·

प्राजु 28/03/2008 - 08:27
गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु गुरूर्देवो महेश्वरः। गुरू: साक्षात परःब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ - (सर्वव्यापी)प्राजु

संजिव साहेब, आयुष्याच्या वाटेवर प्रवास करतांना मार्गदर्शकाची गरज असते. आपण म्हणता त्या प्रमाणे जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेशी त्याचा निकटचा संबध असु शकतो नव्हे, असतोच. शिक्षक व गुरु याच्यात फरक असतो. शिक्षक पोट भरण्याची कला शिकवतो. तर गुरु हात धरुन जीवनाच्या अंगणात घेऊन जातो व जीवन जगणयाची कला शिकवतो. गुरुकुलातील जीवन केवढे अद्भुत असेल. आपल्या लेखनाने आम्हाला गुरु सांदिपनि आणि त्याचा शिष्य श्रीकृष्णाची आठवण झाली. असो, भाग लहान झाला आहे, असे वाटले. गुरु कोण ? गुरुचे वैशिष्टे ? गुरु करणे ? असेही चिंतन आले असते तर, या लेखनाची उंची अधिक वाढली असती असे वाटते. पुढील लेखनास शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 28/03/2008 - 08:39
संजिवराव, आपला छोटेखानी लेख चांगला आहे! गुरुशिश्य परंपरा आम्हीही खूप मानतो. आम्ही वैयक्तिरित्या काही व्यक्तिंना आमचे गुरू मानले आहे आणि आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खूप काही मिळालेले आहे.. परंतु.. आपल्या वैभवशाली गुरुशिष्य परंपरेमध्ये एक गोष्ट मात्र (अर्थात, ती खरी असेल तर!) खूप खटकते. ती म्हणजे ज्या एकल्व्याने द्रोणाचार्याला मनोमन गुरू मानले आणि साधना केली त्याच हलकट द्रोणाचार्याने एकलव्याकडे धनुष्यबाण चालवण्याकरता ज्याची अत्यंत गरज असते असा आंगठाच कापून मागितला! आता बोला..! अवांतर - व्यास हा जगत्गुरू आहे अश्या अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे. मी मात्र व्यक्तिश: त्या आठ आठ दिवस साधी अंघोळही न करणार्‍या गोसावड्याला माझा गुरू मानत नाही! :) धन्यवाद, आपला, (अण्णा, बाबूजी आणि भाईकाकांचा मानसशिष्य) तात्या.

सन्जोप राव 28/03/2008 - 08:46
मध्ये एका मराठी संकेतस्थळावर एका महिलेने (किंवा महिलेच्या नावाने लिहिणार्‍याने) दारुबंदी, दारुची दुकाने फोडणे, व्यसनमुक्ती अशा विषयांवरील लेखांची बरसात केली होती. तंतोतंत त्याची आठवण झाली. लेख फारच आवडला. आपण अशाच जोशाने लिहीत रहाल अशी आशा आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! (तेवढं ते 'संजिव' मधलं 'जी' दीर्घ करता येतं का पहा. एक शैली म्हणून असेल तर ठीक आहे. विषय जरा घरचा आहे.) सन्जोप राव

आर्य 28/03/2008 - 09:41
गुरु हा फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही..................मग विविध क्षेत्रात /वेगवेगळ्या प्रयोजना करीता अनेक गुरु असू शकतात नही का?...........मग तुमच्या निष्ठेचे कय ? गुरु या शब्दा खरा अर्थ जणुन घेण्याची गरज आहे ....................सद्य स्थितीत हा अर्थ /व्यप्ती फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित आहे. तुम्ही दिलेले दखले हि हेच सांगतायत........ ध्येयप्राप्ती दृष्टिपथात येऊ शकेल...........ध्येय कोण ठरवणार ? गुरु की शिष्य ? मार्गदर्शनाची आवश्यकता - गुरु-शिष्यांचे नाते - प्रेम व भक्ति - श्रध्दा बसते- आत्म-विश्वास आणि मग गुरुला ओव्हरटेक........तदानुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत जातो.........न पटण्या जोगा सिद्धांत आहे. श्रध्दा नसेल तर भक्ति करणे फार कठिण आहे. नात्यातून प्रेम / स्नेह ठिक आहे पण तुम्ही ती थेट भक्तीच केलीत. आणि हा फार मोठा टप्पा जो कि आपण ऐका दमात गठलाय...........काय हा आपला अनूभव आहे? कि ग्रंथ हे गुरु.... पण हे मान्य कि गुरु ची ऊंची हि शिष्या वरुन ठरवतात ............पण गुरुची विद्या गुरुला फळली तर ??? आपल्या मागील लेखातील "गुरुविण कोण लाविल वाट " या माझ्या प्रश्ण आद्याप अनुत्तरीत आहे ?

मनापासुन 28/03/2008 - 21:20
गुरुवीण कोण लावील वाट ...........हे पटले.... "पुर्ष्या शिंच्या.......ती शीडी आडवी का काढलीस् " बघताँय ह मी बघताँय तो डुक्कर त्या गाढवाच्या कानात काय सांगतोय ते बघताँय मी " मनापसुन पटले

गुरुविण कोण दाखविल वाट ? संवेदनाशील व्यक्तिमत्वच चाकोरीबाहेरील जीवनाचा विचार करु शकते. प्राप्त जीवनात काहीतरी करायचे आहे या ध्येयवादाने पछाडले गेलेले असे व्यक्तिमत्व मग गुरुच्या शोधास लागते. एकदा खात्री झाली की आपणाला याच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की मग नकळत गुरु-शिष्यांचे नाते निर्माण होते. प्रेम व भक्ति जागृत होते. श्रध्दा बसते. श्रध्देमध्ये जबरदस्त शक्ति असते. आत्म-विश्वास निर्माण होतो. आणि नकळत शिष्याची मजल गुरुच्याही पुढे जाते. गुरुपासून ज्ञानप्राप्ती करुन घेत असता शिष्याची अभ्यासू वृत्ती वृध्दिंगत होते. पर्यायाने इच्छित ज्ञानाबरोबरच तदानुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत जातो.

आमचा निर्णय...

केशवसुमार ·

प्राजु 28/03/2008 - 02:22
अहो विडंबन करण्यावर बंदी नाही.. तर विडंबन कोणत्या गाण्याचे आहे त्यावर अवलंबून आहे. आज देहाची तिजोरी वर दारू चे विडंबन.. उद्या पसायदानावर जर विडंबन झाले तर अवघड होईल.. तुमचि विडंबने खूप आवडतात आम्हाला.. पण दारू सोडून इतर भरपूर विषयावर विडंबन करावे ही विनंती.. मी आपली शिष्या आहे . हे नका विसरू.. :) - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सर्किट 28/03/2008 - 02:26
पसायदानाचे विडंबन करायला घेतले आहे. लवकरच प्रकाअशित करू. त्याने अच्वघड काय होईल, ते जरा विस्ताराने कळवावे. - सर्किट विठ्ठलपंत कुलकर्णी

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 28/03/2008 - 02:35
पसायदानाचे विडंबन करायला घेतले आहे. लवकरच प्रकाअशित करू. ते कदाचित अप्रकाशितही होऊ शकेल हे जाणून इथे प्रकाशित करायचे किंवा नाही ते पहावे! तात्या.

चतुरंग 28/03/2008 - 02:37
पसायदानातच "जो जे वांछील तो ते लाहो" म्हणून ठेवलेलं आहे माउलीने तेव्हा तुमच्या विटंबनेने त्याचे काही बिघडणार नाही पण लोकांचे जोडे पडले तर तयार रहा! चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 28/03/2008 - 02:47
मुळात विडंबनाने मूळ कवीचे काही "बिघडते" असे म्हणणे चुकीचे आहे. आणि जोड्यांचे म्हणाल, तर जिहादी लोकांचे जोडे पुष्पगुच्छांसारखे आजवर झेलले आहेत, त्यात नवीन काय ? - सर्किट

चतुरंग 28/03/2008 - 02:50
तुम्हीच म्हणाला होतात ना संकेतस्थळावर वावरताना 'गेंड्याची कातडी' लागते म्हणून? मग तुम्हाला काहीही अशक्य नाही! चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 28/03/2008 - 03:10
परित्राणाय जालानाम विनाशायच प्रशासकां! मराठी संकेतस्थलार्थाय 'मिसळपाव' युगेयुगे!! हे आपलेच ना ? ह्यामुळे कुणाचे बिघडले ? व्यासांचे की कृष्णाचे ? - सर्किट वसुदेव यादव

चतुरंग 28/03/2008 - 03:23
ह्याने आमचेच बिघडले आहे बाकी कुणाचे असो वा नसो आणि म्हणूनच मी अशा प्रकारचे विडंबन न करण्याचा निर्णय घेतला आहे! चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 28/03/2008 - 03:36
अहो, पण आम्हाला आपले हे विडंबन खूपच आवडले आहे !!! (आणि इतर अनेकांना पण !) आणि तुमचे काय बुवा बिघडले ? उलट विडंबनकार म्हणून आदरच निर्माण झाला सर्वांना तुमच्याबद्दल. - सर्किट

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 28/03/2008 - 02:32
अहो विडंबन करण्यावर बंदी नाही.. तर विडंबन कोणत्या गाण्याचे आहे त्यावर अवलंबून आहे. आज देहाची तिजोरी वर दारू चे विडंबन.. उद्या पसायदानावर जर विडंबन झाले तर अवघड होईल.. प्राजूशी सहमत! मला वाटतं केशवाने सारासार विचार करून पुन्हा एकदा आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा...! अर्थात, केशव जो निर्णय घेईल/किंवा त्याने घेतला आहे तो त्याने पूर्णपणे त्याच्या सद्सतविवेकबुद्धीला स्मरूनच घेतला आहे/असावा, असे मी तूर्तास तरी मानायला तयार नाही! पुढे मर्जी केशवाची! अजून काय लिहू? आपला, (दु:खी) तात्या.

In reply to by प्राजु

सुशील 28/03/2008 - 08:21
प्राजुताईशी सहमत आहे. दारू सोडून इतर भरपूर विषयावर विडंबन करावे तरच वाचायला मजा येते अन्यथा केशवने थोडा ब्रेक घेतलेलाच बरा.

विसोबा खेचर 28/03/2008 - 02:23
चला बरं झालं, आता रंगाच्या बरोबरीनेच आमचा केशवही उतरला आहे मैदानात! अब मजा आयेगा खेल का! :) बाय द वे केशवा, तुझी विडंबने बहुत करून इतर स्थळांवर किंवा मिपावर प्रकाशित झालेल्या कविता/गझलांवर असतात, प्रासंगिक असतात, तसेच ती विडंबने खमंगही असतात! त्यामुळे तुला इथे विडंबनं लिहायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं! सबब, तू तुझ्या निर्णयाचा फेरविचार करावास ही माझी वैयक्तिक विनंती! शेवटी मर्जी तुझी!... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवा, तुझी विडंबने बहुत करून इतर स्थळांवर किंवा मिपावर प्रकाशित झालेल्या कविता/गझलांवर असतात, प्रासंगिक असतात, तसेच ती विडंबने खमंगही असतात! मी सुद्धा तुमच्या लिखाणाचा पंखा आहे. तुमच्या एका विडंबनाने माझे पुढील ३-४ दिवस मस्त जातात. ठोस चे तुम्ही ढोस केले की धम्माल वाटते. मी एकच म्हणेन की देवभक्तीच काय इतर कुठल्याही प्रसिद्ध कवींचे गीत सुद्धा विडंबन करायला काहीच हरकत नाही पण देवभक्ती गाण्याचे अगदी मदिरा, सुरा इ.इ. हीन पातळीवर नको (जे तुम्ही तसे पण कधीच करत नाही) . आपल्या काव्य प्रतिभा कौशल्याचा गरगरणारा पंखा, सृला. (आणि हो, तुम्हाला एकदा केशवकाका म्हटल्याबद्दल माफ करा. मी तुम्हाला केस पांढरे होऊ लागलेला मध्यमवयीन माणूस समजत होते पण पुणे कट्ट्याचे फोटो पाहिले आणि चूक लक्षात आली.) > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

सर्किट 28/03/2008 - 02:24
केशवसुमार, मिसळपावावरील एक दु:खद घटना असे आपल्या निर्णयाचे वर्णन करावे लागेल. आपल्या विडंबनांना प्रतिसाद (बहुतेकवेळा) न देणार्‍यांमध्ये आम्ही होतो. आता प्रतिसाद न दिल्याबद्दल आमचे आभार कोण मानणार ? - सर्किट (कृपया आपल्या अनुदिनीचा दुवा द्यावा. आम्ही तेथे येऊन वाचत जाऊ.)

इनोबा म्हणे 28/03/2008 - 02:33
निर्णय चूकीचा वाटतो. एक वाचक(आणि 'केश्या'चा पंखा) म्हणून फेरविचार करावा एवढीच इच्छा! बाकी मर्जी आपली. ('केश्या'चा पंखा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

बेसनलाडू 28/03/2008 - 02:41
विषायातील वैविध्य साधण्यासाठी, योग्य रचनांची निवड करण्याचे भान येण्यासाठी काही काळ ब्रेक घेणे इष्ट. त्यामुळे लेखन थांबवणे काही ठराविक काळासाठी असेल, तर निर्णय स्वागतार्ह वाटतो; पण कायमचे विडंबन करणे आणि/अथवा येथे प्रकाशित करणे थांबविणे, हा निर्णय आततायीपणाचा/घाईघाईत घेतल्यासारखा वाटल्याने पुनर्विचार करण्याची विनंती . (समजूतदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 28/03/2008 - 02:50
नाही, कल्पना तशी बरी आहे. उदा तात्यांना संगीतापासून आणि व्यक्तिचित्रांपासून ब्रेक.. प्राजुला चारोळ्यांपासून आणि "मन" ह्या विषायापासून ब्रेक.. इनोबांना "मराठी अस्मिता" पासून ब्रेक.. अनेक डॉन लोकांना दारू पासून ब्रेक.. प्रियालीला इतिहासापासून ब्रेक.. चित्तर ला गझलांपासून ब्रेक.. असे झाले, तर आम्हालाही मिसळपावापासून ब्रेक घेणे आवश्यक ठरेल. अर्थात वाईट काअहीच नाही म्हणा त्यात. - सर्किट

इनोबा म्हणे 28/03/2008 - 02:57
असे झाले, तर आम्हालाही मिसळपावापासून ब्रेक घेणे आवश्यक ठरेल. बरं मग,कधी घेताय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

सर्किट 28/03/2008 - 02:58
बरं मग,कधी घेताय? अर्थातच, "असे झाले तर".. आता असे म्हणजे काय हे विचारू नका बुवा ! कारण ते वरच लिहिले आहे. - सर्किट

सचिन 28/03/2008 - 02:55
मला वाटते केशवसुमारांना योग्य वाटेल तो निर्णय ते घेतीलच. परंतु, एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते. येथे कोणत्याही आभिजात साहित्यिकांना व वाचकांना पोटशूळ उठला आहे असे मला वाटत नाही. विडंबनांचा सध्या अतिरेक झाला होता आणि विषयांमधेही अत्यंत एकसुरीपणा (दारू..) आला होता, हे त्यांनाही मान्य करावेच लागेल. उत्तमोत्तम आणि लोकप्रिय कविता / गाण्यांचे विडंबन त्यांनी "क्षमा मागून" केले असले तरी, त्या मूळ कविता / गाण्यांच्या चाहत्यांना ते आवडेलच असे नाही, हे सत्य मान्य करायला हवे. त्या भावनांचा आदर करण्याऐवजी, त्याला पोटशूळ म्हणू नये, ही विनंती.

मुक्तसुनीत 28/03/2008 - 03:33
...इतकेच म्हणतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. विडंबन हे आनंदाचे एक हलकेफुलके साधन आहे. भावनेच्या भरात , तिरीमिरीमधे अशा छोट्या छोट्या आनंदाला आपण पारखे होऊ नये आणि इतरानाही करू नये. मधुशालेसारखी महाकाव्ये मद्यावर निर्माण झाली आहेत, उर्दु काव्यात मद्य , प्रेयसीवर आधारित एक स्वयंपूर्ण असा प्रतिमांचा/रूपकांचा/उपमांचा कोषच निर्माण झाला आहे. काव्यात परमेश्वर , प्रेम, नशा , प्रेयसी, या इतर असंख्य अशा कुठल्याच विचाराना बंदी कधी नव्हती आणि नाही. सांगण्याचा उद्देश इतकाच की, इथे येण्याचा उद्देशच मूळी आनंदाच्या देवाणघेवाणीकरता आहे. ही जी मूळ दिशा आहे ती हरवली नाही तरच इथला प्रवास सुखकर होईल. माझी अशी खात्री आहे की केशवसुमार यावर नीट विचार करतील आणि आपल्याला पुन्हा त्यांच्या गमतीशीर कविता वाचायला मिळतील.

धोंडोपंत 28/03/2008 - 07:51
केशवसुमार, आम्ही आपल्या लेखन बंद करण्याच्या मताशी असहमत आहोत. हा निर्णय धक्कादायक आहे. तुमचे मनोधैर्य खचविण्याच्या उद्देशाने कुणीतरी केलेल्या वायफळ टीकेमुळे तुम्ही जर लेखन बंद करण्याचा निर्णय घेण्याइतपत पुढे जात असाल तर ते धक्कादायक आहे. निंदकाचे घर| असावे शेजारी|| या ओळी लक्षात ठेवा आणि लेखनाला प्रवृत्त व्हा. कुणाच्यातरी आरोप आक्षेपाला बळी पडून तुम्ही लेखन बंद करणार असाल तर याचा अर्थ तुमच्या चाहत्यांपेक्षा टीकाकारांना तुम्ही जास्त महत्व देता असा होतो. तसे करू नये. मराठी समीक्षेची पातळी एवढी चांगली नाही की ती इतक्या गांभीर्याने घ्यावी. यावर विचार करावा. एखाद्याच्या लेखनावरील जळफळाट व्यक्त करण्यासाठी मराठीत समीक्षा एक माध्यम वरून वापरली जाते असे आमचे निरीक्षण आहे. आपला, (चाहता) धोंडोपंत अवांतरः- आम्ही तुमची कुंडली अत्यंत सखोलपणे पाहिली आहे. तुमच्या लेखनाच्या उत्कृष्ट दर्जाला कोणते ग्रह कारणीभूत आहेत, हे आम्ही आपल्याला विस्तृतपणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे तुम्ही विडंबनेच का करता? आणि करावीत? याची कारणेही आम्ही आपल्याला सांगितली आहेत. आपल्या लेखनाला रसिकमान्यता मिळेल आणि ती कशामुळे मिळेल , तुमचे क्षेत्र विडंबनच का? हे ही आम्ही आपणास तुमच्या कुंडलीतील बुध शुक्राचे कारकत्व समजावून देतांना सांगितलेले आहे. इतक्या चांगल्या ग्रहस्थितीचा फायदा तुम्ही घेतला नाहीत तर कठीण आहे. म्हणजे आम्ही पुढे काही बोलूच शकत नाही. ज्या गोष्टी आम्ही तुम्हांला सांगितलेल्या आहेत त्यावर विचार करा आणि लिहिते व्हा. आपला, (ज्योतिषभास्कर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सर्किट 28/03/2008 - 08:45
मराठी समीक्षेची पातळी एवढी चांगली नाही की ती इतक्या गांभीर्याने घ्यावी. यावर विचार करावा. एखाद्याच्या लेखनावरील जळफळाट व्यक्त करण्यासाठी मराठीत समीक्षा एक माध्यम वरून वापरली जाते असे आमचे निरीक्षण आहे. अगदी अचूक !! त्रिवार सहमत !!!!! सहमत ! सहमत !! सहमत !!! ह्यातील काही जळफळाटी समीक्षक तिरपे तिरपे प्रतिसाद देण्यात माहीर आहेत. असे आमचे निरीक्षण आहे. - सर्किट

विसोबा खेचर 28/03/2008 - 08:00
तुला एकदा नीट, इमानदरीत, शांतपणे, सांगून झालेलं आहे, तरीही जर तू ऐकलं नाहीस तर मात्र तुला धरून फटकावावा लागेल! :) तेवढा अधिकार मला आहे, परंतु तो वापरायला लावू नकोस आणि पुन्हा चुपचाप विडंबने लिहिणे सुरू कर! :) अर्थात, तुला काही दिवसांकरता ब्रेक घ्यायचा असेल, किंवा थोडा कुलिंग ऑफ कालावधी हवा असेल तर जरूर घे. आमचं काहीच म्हणणं नाही. वाटल्यास तोपर्यंत आजूबाजूला दिसलेला कच्चा माल हेरून ठेव! :) परंतु तुला पुन्हा विडंबने ही लिहावीच लागतील एवढं मात्र लक्षात ठेव! नायतर तात्याच्या मैत्रीला मुकशील एवढंच सांगतो! :) आता निर्णय तुझाच आहे... तात्या.

सन्जोप राव 28/03/2008 - 08:53
जाहीरपणे लिहिण्याचे प्रयोजन कळाले नाही. असे न करताही शांतपणे विडंबन करणे थांबवता आले असते. काही काकदृष्टीच्या लोकांना हा 'पब्लिसिटी स्टंट' ही वाटू शकतो. एरवी आपल्या अनुदिनीवर आपल्याला हवे ते लिहीत रहाणे हा मला उत्तम मार्ग वाटतो. वाचणारे तिथे येऊन वाचतीलच. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सर्किट 28/03/2008 - 08:55
काही काकदृष्टीच्या लोकांना हा 'पब्लिसिटी स्टंट' ही वाटू शकतो. चुकून "काकादृष्टीच्या लोकांना" असे वाचले. सॉरी ! काही काकांनी अजाणतेपणे तुमचे मिसळपावावरून मन उडवले होते, असे ऐकिवात आहे, म्हणून.. - सर्किट

विसोबा खेचर 28/03/2008 - 09:07
काही काकांनी अजाणतेपणे तुमचे मिसळपावावरून मन उडवले होते, असे ऐकिवात आहे, म्हणून.. चालायचंच! :) ते काका बगलेत ज्ञानेश्वरी घेऊन असेच धंदे करत मराठी आंतरजालावर नेहमीच फिरत असतात! बाय द वे, आमच्या एका मैत्रिणींने अलिकडेच आमच्याशी केलेल्या लेखनव्यवहारात त्यांचा 'काकाबा महाराज 'असा उल्लेख केला तो मात्र आम्हाला अनवट व अभिनव वाटला आणि आवडला! :) बाकी संजोपकाकांबद्दल म्हणाल तर शेवटी तेही एक माणूसच आहेत आणि एखाद्या गोष्टीवरून माणसाचं मन तात्पुरतं उडू शकतं! परंतु मूलत: त्यांचं मिपावर आणि मिपाच्या मालकावर मनापासून प्रेम आहे त्यामुळे मिपावरून त्यांचं मन कायमस्वरुपी कधीच उडणार नाही याची आम्हाला खात्री आहे! टेंपरवारी उडाल्यास आम्ही त्यांची समजूत घालू! :) असो... तात्या.

In reply to by सन्जोप राव

सुशील 28/03/2008 - 08:59
सहमत आहे. मलातरी स्टंत वाटत नसला तरी शक्तिप्रदर्शन वाटले. म्हणजे आता तात्या, धोंडोपंत, सर्किट मागे लागले आहेत लिही लिही म्हणून. आता हळूच ते लिहायला सुरू करतील हे नक्की.

In reply to by सुशील

केशवसुमार 28/03/2008 - 10:09
शक्तिप्रदर्शन .... हा हा हा.. वा सुशिलशेठ बर्‍याच दिवसांनी आपण इथे लिहते झालत बर वाटल.. चलू द्या..चालू द्या.. (शक्तीमान्)केशवसुमार

विजुभाऊ 28/03/2008 - 10:35
विडंबानाशिवाय केशव म्हणजे नुसतेच शव "के" हे त्याच्या बुद्धीचे नाव.... केशवसुमार्.....तुमचे हे असे शव होउ देउ नका जोरदार होउ द्या तुमचा एक सध्या गरगर फिरणारा पंखा.....विजुभाऊ

ऋषिकेश 28/03/2008 - 11:26
विडंबने लिहिणे आणि मिपावर प्रकाशित करणे बंद करु नयेत ही कळकळीची विनंती.. ज्यांना आवडत नसतील त्यांनी वाचु नयेत. मिपावर विडंबने टाकु नयेत हे का सांगवे हे कळले नाही. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सुवर्णमयी 28/03/2008 - 17:41
केशवसुमार, कोण काय म्हणत या पेक्षा तुम्हाला काय करावेसे वाटते याला तुम्ही महत्त्व अधिक दिले असेल आणि हा निर्णय घेतला असेल असे समजते. लिहिणे आणि प्रकाशित करणे दोन्ही बंद करू नका असे म्हणेन. निदान आपण सध्या विडंबने अप्रकाशित ठेऊन ती कालांतराने पुस्तकरूपाने प्रकाशित करावी अशी विनंती. लेट्स होप फॉर द बेस्ट. लेखनास शुभेच्छा. सोनाली

प्रियाली 28/03/2008 - 18:05
केशवसुमार, काल रात्रीची थोडी...... म्हणून हा निर्णय का काय? अहो, लिहा बिनधास्त. ज्यांना नाही वाचायचं ते नाही वाचणार. ज्यांना नाही प्रकाशित करायचं ते नाही करणार. विडंबनात तुम्ही आक्षेपार्ह किंवा उगीच कागाळ्या प्रसवत नाही ना मग झालं तर? त्यातून तुम्हाला स्वतःलाच तोच तोचपणा वाटत असेल तर तात्पुरते थांबवा! बरं, तुमची विडंबने कधी पुस्तकरूपाने प्रकाशित केलीत तर पिशाच दिसे बाई पिशाच दिसे हे पहिल्या पानावर टाका. ;-)

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 28/03/2008 - 18:12
विडंबनात तुम्ही आक्षेपार्ह किंवा उगीच कागाळ्या प्रसवत नाही ना मग झालं तर? हा हा हा! :) प्रियाली, तुम नही सुधरोगी! :) तात्या.

In reply to by प्रियाली

मनापासुन 28/03/2008 - 18:15
बरे झाले तुम्ही हे लिहिलेत ते....आता लेखन थांबवणार नाही अस पण करावा लागेल नाहीतरी तुम्ही विडंबने लोकाना अनन्द यावा म्हणुनच लिहित होतात ना

केशवसुमार,
विडंबने  लिहिण्याचे थांबवू नये. अहो, आपल्या विडंबनाने आयुष्याच्या रहाटगाड्यातील दोन क्षण आनंदात जातात.
लिहा बिनधास्त. ज्यांना नाही वाचायचं ते नाही वाचणार.  आम्ही आपले नेहमीप्रमाणे आपल्या  आवडलेल्या विडंबनाला दाद देत राहू !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ 28/03/2008 - 19:36
आपली अनेक विडंबने चांगली असतात. लिहित रहावे ही विनंती. --लिखाळ. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो करील तयाचे -पुल.

बंदिस्त होऊ नये ही सदिच्छा. टीव्हीचा रिमोट जसा आपल्या हातात असतो तसेच विडंबन न आवडणारे वाचक डोळे बंद करून घेतील. तरीही कृपया देवाधर्मादि संवेदनाशील विषयावर लिहू नये ही केशवसुमारांचे चरणीं प्रार्थना. धर्ममार्तंडांनी सॉक्रेटिसाला,गॅलिलिओला सोडले नाही. तर तुम्हाला सोडतील? सगळेच धर्म आणि धर्मिष्ट, हिंदु देखील असहिष्णु आहेत. गाढवाच्या मागे उभे कधी राहू नये राव. चांगल्या विडंबनासाठी अनेक शुभेच्छा. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

सर्वसाक्षी 29/03/2008 - 00:14
महाराज, निर्णय घेतलाच आहात तर एक विनंती. कृपया आपले विडंबन आपल्या जालनिशीवर वा अन्यत्र लिहित रहा/ प्रकाशित करत रहा. (माझ्यासारखे) ते ज्यांना आवडते त्यांना वाचता येईल. न पेक्षा व्यनि ने पाठवा. बाकी हा महिना संपूदे एकदाचा. आपण प्रत्यक्ष भेटुन एक मस्तपैकी 'विडंबन विशेष' संमेलन करू. पुढील विडंबनांसाठी शुभेच्छा.

विसोबा खेचर 29/03/2008 - 00:28
इतक्या लोकांनी एवढं प्रेमाने समजावूनदेखील त्याला केशवाची साधी एका ओळीची पोच नाही, उत्तर नाही, ऍक्नॉलेजमेन्ट नाही याचा खरंच अचंबा वाटतो! त्याने इतक्या सार्‍या मंडळींचा प्रेमळ आग्रह डावलला आहे आणि डावलला आहे तो आहे, वर शिवाय साधी दोन ओळींची पोचही/उत्तरही तो देत नाही हे पाहून मला व्यक्तिश: खरंच खूप दु:ख वाटले! मी देखील माझ्या आयुष्यात खूप मोठी माणसे अगदी जवळून पाहिली आहेत, परंतु ती देखील केशवाएवढी मोठी नव्हती असंच आता म्हणायला हवं!! असो, त्याच्या निर्णंयाचा मी आदर करतो आणि त्याला त्याच्या पुढील वाटचालीकरता मन:पूर्वक शुभेच्छा देतो! (अर्थात, त्याला त्याची गरज नाही, हा भाग वेगळा!) तात्या.

अनेक समीक्षक स्वतः एकही ओळ न लिहिता साहित्यिकांना व त्यातल्या त्यात लोकप्रिय साहित्यिकांना व त्यांच्या साहित्याला तुच्छ लेखतात.परंतु कै.म.वा.धोंड(जे नुकतेच वयाच्या ९३व्या वर्षी वारले)याला अपवाद होते.ते लेखकाच्या कलाकृतीला आपल्या समीक्षेपेक्षा मोठे समजत.आपली समीक्षा परिपूर्ण नाही ह्याचे भान ठेवतांना त्यांनी आपल्या समीक्षा पुस्तकाला नाव ठेवले "जाळ्यातील चंद्र". या नावाचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी ज्ञानेश्वरीतील पुढील ओवी दिली आहे. "जे जालं जली पांगिले|तेथ प्रतिबिंब दिसे कीरू आतुडले| मग थडिये काढूनि झाडिले|तेव्हलि बिंब के सांघै ||" (अर्थात,कोणतेही व्यक्तिमत्त्व किंवा काव्य स्वतःच्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समुद्रात जाळे पांगून त्यात आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पकडण्याचा प्रयास करणे.जाळे पांगलेले असेपर्यंत त्यात प्रतिबिंब अडकल्याचा भास होतो.परंतु किना~यावर आणून ते झटकले की त्यातून ते निसटल्याचे आढळून येते.

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न. पहा. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2591450425237531522&na=4

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा आणखी एक छोटासा प्रयत्न. पहा.http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2591452877663857538

आमच्या विडंबन करण्या मुळे मराठी साहित्याची होणारी हनी आणि आभिजात साहित्यिकांना व वाचकांना उठणारा पोटशूळ लक्षात घेता आज पासून आम्ही विडंबने प्रसिद्ध करणे थांबत आहोत..आज पर्यंत ज्या वाचकांनी प्रतिसाद/ दाद/ प्रेत्साहन दिले त्या सगळ्यांचे मनापासून आभार. केशवसुमार

मन आंब्याचा मोहोर....!

प्राजु ·

विसोबा खेचर 28/03/2008 - 02:11
वा प्राजू, केवळ अप्रतीम कविता...! मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... या ओळी सर्वात जास्त भावल्या! आपला, (मनवेल्हाळ!) तात्या.

इनोबा म्हणे 28/03/2008 - 02:19
प्राजु....जबरा कविता बरं का! मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं... या ओळी विशेष आवडल्या... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चकली 28/03/2008 - 02:28
प्राजु....मस्त कविता पण मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही.. सांगशील का चकली http://chakali.blogspot.com

In reply to by चकली

इनोबा म्हणे 28/03/2008 - 02:45
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही.. आपल्याला नातवंडांवर प्रेम करणारी आजी माहीतीय का हो! खेडेगावात म्हातार्‍या माणसाला 'वाळली काठी' किंवा 'वाकली काठी' असे म्हणतात.(जून्या मराठी पिक्चरमधे ऐकले नाही का?"मी काय बाबा! वाळली काठी,कधी कटकन मोडेन सांगता येत नाय") :) आम्हाला जे समजले ते आम्ही सांगीतले,तरीही समजले नसेल तर प्राजुलाच विचारा. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चतुरंग 28/03/2008 - 02:41
किती बरं वाटलं म्हणून सांगू!फारच छान काव्य, सर्व ओळी आवडल्या! बहुधा विडंबनावरच्या वेदनेतून जन्माला आले असावे!:) चतुरंग

सचिन 28/03/2008 - 03:12
प्राजु, अतिशय उत्तम कविता ! मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. ... हे म्हणजे एकदम उच्च !! कसं काय सुचतं बुवा !!!

मीनल 28/03/2008 - 03:41
माझं मन हिला कसं काय कळ्ळल? माझं एकटीच ?की तुमचं ही ? आपल्या सर्वांच????? मन वढाय वढाय ,नाही कधी समजले.. मन माझं अन तुझं,तेच प्राजुने लिहिले.

प्राजु 28/03/2008 - 05:25
तात्या, इनोबा, सचिन, धन्यवाद. चकली ताई, इनोबांनी सांगितलेला अर्थ बरोबर आहे. चतुरंग, धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं.. मिनल, एकदम भारीच... धन्यवाद प्रतिसादासाठी. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चकली 28/03/2008 - 21:42
धन्यवाद! मला अंदाज होता पण कुतुहूल होते कि तुम्हाला काय म्हणायचे आहे..बाकी छान. आवड्ली. चकली http://chakali.blogspot.com

वरदा 28/03/2008 - 08:47
प्राजु शब्दच नाहीत मस्तच आहे मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. किती छान लिहिलयस्....खूप अर्थपूर्ण...

बेसनलाडू 28/03/2008 - 08:49
छान. कविता आवडली. मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं... हे विशेष आवडले. अवांतर - टिपूर चे टंकताना चुकून 'ठिपूर' झाले आहे का? मला 'पिठूर' सुचले (पिठूर चांदणे). असो. (वाचक)बेसनलाडू

प्राजु 28/03/2008 - 08:57
बे.ला. , ते ठिपूर चुकुन झाले आहे.. पण संपादन कसे करणार? आणि पिठूरही छान आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव 28/03/2008 - 09:40
प्राजु इतक्या सुंदर कवितेबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... ह्या ओळी तर खासच आहेत.

चेतन 28/03/2008 - 11:28
मस्तचं... मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... अप्रतीम! लयं भारी... प्राजु ताई थोडे माझेही शब्दं मनं नाठाळं हे घोडं, भावनांच्या प्रांगणातं मनं थांबेल का थोडं, स्वप्नांच्या आननातं... मनं मलाही तुलाही, का नाही एकंसारखं मनं माझेही तुझेही, मुक्तं चारोळ्यांसारखं... आपला पंखा (मनस्वी) चेतन

प्राजु कविता मस्त आहे गं... मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी ही पहिलीच ओळ खास आहे..

सुवर्णमयी 28/03/2008 - 17:11
प्राजु कविता आवडली. मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मस्तच!

शैलेश 28/03/2008 - 21:46
कविता खूपच सुंदर झाली आहे. सहज ओघ आणि आशयघन, एकमद मस्त! शैलेश

विसोबा खेचर 29/03/2008 - 00:17
हजारांच्या संख्येत सभासद असलेल्या काही संस्थळावर एवढ्या सुंदर कवितेला अवघे ५-६ प्रतिसाद मिळावेत आणि अवघ्या सातशेच्या घरात सभासद असलेल्या आमच्या मिपावर चांगले १७ ते १८ दिलखुलास दाद देणारे प्रतिसाद मिळावेत ही मी मिपाची रसिकता मानतो आणि तिला दाद देतो! आपला, (कट्टर मिपाकर!) तात्या.

मीनल 29/03/2008 - 04:04
आधी लिहायच राहून गेले.म्हणून अजून भर घालते आहे.---- ओळीचा पुर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा उत्तम मेळ आहे. तसेच आधीची ओळ आणि त्या नंतरची ओळ यात ही संबंध आहे. ते संबंध मग मनाशी जोडलेले आहे. तेच आपल्या मनाला भिडतात. वाचकाला विचार करायला लावतात या ओळी. म्हणजे मन हे आकाशातल्या अंगणातली बगळ्यांची माळ कशी? मन हे प्रतिबिंब कसे? मग फूल कसे ,थेंब कसे ,पात कसे ? वगैरे वगैरे. वाचक आपला अर्थ लावतो.तो `मना`ला जोडतो . अर्थ उलगडत जातात.कविता अधिकाधिक अर्थपूर्ण,खरी,वास्तव होत जाते. कवयित्रीने सरळ सरळ काहीच सांगितले नाही मनाबद्दल. मन `हे` `ते`च आहे असे म्हणते. दोन गोष्टींचे साम्य दाखवते आहे.पण `सारखे ,जसे ,तसे ,या प्रमाणे``या शब्दांचा वापर केलेला नाही. Simile नाही .तर Metaphor आहे. यामुळे ते विचार करायला लावते. दोहोंमधले साम्य शोधायला लावते. कधी सोपे आहे .कधी आडवळणाचे! यमक ही ओढून ताणून जुळवलेले नाही. बहिणा बाईंच्या `मन वढाय वढाय ` या अष्टाक्षरी सारखे आसल्यामुळे मी ही कविता त्या चालीवर गायली. अधिक गोड वाटते. भूपाळी ,समयी ,समई,कुंकू ,सुहासिनी याशब्दांअधून सोज्ज्वळता दिसते आहे.`परंपरे`चा पुसटसा स्पर्श आहे. तळ ,कोकिळा ,मोती ,चांदण यातून वातावरणात साधेपणा उभा केला आहे .मनाला भावतो तो. खरी कवयित्री जाणून बूजून काही करत नाही.फक्त छान छान ओळी लिहित जाते. प्राजूचे ही `साम्याचा शोध घ्यायला लावणे` ,`Metaphor मुद्दाम वापरणे` असे हेतूपूर्वक केलेले नाही हे स्पष्ट आहे. मीच विचार केला कवितेचा ,ती का आवडली ?याचा.ही उत्तर मिळाली मला. ती लिहून काढली इथे मिपावर. म॑ला वाटायला लागले आहे की प्राजूने ही इतका विचार केला नसेल `मन` लिहिताना. म्हणजे मनाचा केला असेल (कारण त्या शिवाय इतके सुंदर कसं लिहायला जमेल?) पण कवितेचा नाही. अजून खूप आहे लिहिण्यासारख.नाही का? ते तुम्ही लिहा.

In reply to by मीनल

प्राजु 29/03/2008 - 06:17
मिनल, अगं मी ही नव्हता इतका विचार केला माझ्याच या कवितेचा. पण तुझं रसग्रहण वाचून खूप बरं वाटलं. तू हि कविता किती वेळा वाचलीस आणि इतका सुंदर अर्थ लावलास? ही कविता तुझ्याच नावावर करून टाकावी असे वाटते आहे मला.. :)) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

कारकुन 29/03/2008 - 04:15
प्रयत्न चांगल आहे पण बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर .. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...असल्या चोथा झालेल्या कविकल्पना गोळा करुन त्यावर मन, प्रेम, जीवन, आत्मा असलं काहीही लिहुन पाडता येणार्‍या कविता आम्हालातरी आवडत नाहीत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! -कारकुन

वरदा 29/03/2008 - 05:26
तुम्हाला काहीच नाही बुवा आवडत्..लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला नाही आवडत्..इतक्या सुंदर ओळीतला अर्थ नाही भावत असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा .......

In reply to by वरदा

प्राजु 29/03/2008 - 06:19
अगं सोडून दे ना.... असतात काही माणसं अरसिक आणि माणूसघाणी... काय करणार त्याला आपण? :)) पण जगन्मित्र तात्यांच्या मिपावर अशी माणसेही प्रेमळ आणि रसिक होतील अशी आशा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by प्राजु

कारकुन 29/03/2008 - 07:23
प्राजुताई तुमची कविता टूकार वाटली म्हणून कोणीही माणूसघाणी आणि अरसिक बनत नसतं. तुमच्या अश्या व्यक्तिगत पातळीवर उतरण्याने लोक तुम्हाला फक्त 'वा वा' म्हणत राहतील पण तुम्हाला तुमचे कच्चे दुवे कधीच कळणार नाहीत. तुम्हीच तुमची कविता प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघा. असो! पुढच्यावेळेस काहीतरी सकस लिहा. आणि जरा वृत्त/छंद ह्याकडॅ पण बघा काव्यात गेयता देखिल असवी (अरसिक) कारकुन

In reply to by कारकुन

मीनल 29/03/2008 - 07:42
तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघीतली. खरे आहे तुमचे म्हणणे. पण असे आधिच लिहिले असते तर मला वाटत अधिक पटले असते. कविता गेय आहे .मन वढाय वढाय ची साधीशी चाल जमते आहे . प्रत्येक कविता गेय नसते. कविता `पाडणे `हे जरा दुखवणारे होते असे मला वाटते. प्रतिक्रिया देताना जरा संभाळून शब्दाचा वापर केल्यास तो जास्त परिणाम कारक असतो असा माझा अनुभव आहे. हे कुठेही लागू होते नाही का ? लहान मुलीने काढलेले चित्र कितिही बेकार असल तरी ते कसे चांगले करता येईल हे सांगणे अधिक परिणाम दखवेल. That`s it ! End of topic from my side .

In reply to by वरदा

विसोबा खेचर 29/03/2008 - 06:39
असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा ....... हे मस्त! :) अगं जाऊ दे वरदा, तू उगाच अशी भडकू नकोस. त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन 29/03/2008 - 07:12
त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे... धन्यवाद तात्या! तुझ्याकडून हेच अपेक्षीत होतं. नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही. 'माणुसघाणा' 'अरसिक' असल्या उपाध्या घेउन वैयक्तिक हल्ले होणार!!

In reply to by कारकुन

विसोबा खेचर 29/03/2008 - 07:18
नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही. ती कविता सुमार होती हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :) एकंदरीत मिपावर अगदी विरुद्ध आवडीनिवडीची मंडळी आहेत हे चांगलंच आहे. मीनलसारखी कुणी या कवितेचं सुंदर रसग्रहण करते, तर तुझ्यासारख्या कुणाला ती सुमार वाटते. चलता है..! असो, संपवुया हा विषया आता इथेच... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन 29/03/2008 - 07:25
हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :) अर्थातच तात्या.माझ्यासाठी देखिल विषय संपला.

मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... हे विशेष आवडलं. मन प्रसन्न झालं

मीनल 29/03/2008 - 07:27
प्राजु ,वरदा , तात्या म्हणतात ते बरोबर आहे. कारकून साहेबांनी त्याचे मत सांगितले .त्याचा आदर करावा. `सगळ्यांना आपले लिखाण आवडावे `ही अपेक्षा रास्त वाटत असली तरी नेहमी शक्य नाही. तिसरं माणूस होऊन त्रयस्त नजरेने पाहिल तर -- करकून साहेबांनी लिहिल्या प्रमाणे बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर .. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...या विषयांवर अनेकांनी लिखाण केले आहे हे खरे की नाही? त्याचा चोथा झाला की मुरंबा हा मुद्दा वादाचा आहे. कारकुनांच्या मते चोथा झाला. पाण तोच `चोथा वापरून तू काही लिहून पाडलेस. माझ्या आणि अजून काहींच्या मते रुचकर मुरंबा केलास! मला तरी चोथ्या पासून काही नविन करता येणार नाही.एक वाक्य ही नाही.कविता `पाडायचं`तर दूरच! पण मला वाटत की स्वतःच्या मत प्रदर्शनाला मिपावर मोकळिक असावी. दु.म्.--कारकून साहेबांचा विषयाशी आक्षेप दिसतो आहे. तुझ्या लेखन शैलीशी नसावा. कारकून साहेब , कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो? तसले(चकलीच्या साच्यासारखे) साचे कुठे मिळतात? मी पण एक घेऊन ठेवावा म्हणते.कधीतरी सणावारात,सभा ,समारंभात उपयोगी होईल हो . तुम्ही पाडल्या आहेत का कविता?एखादी तरी? आम्हाला वाचायला आवडतील.

In reply to by मीनल

सर्किट 29/03/2008 - 07:39
कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो? हा हा हा ! खूपच सोपी आहे, थोदे मन, थोडी मैत्री, थोडे चोथे.. की झाली कविता... जसे, थोडी दारू, अर्धांगिनी, तिचा बाप, की झाले विडंबन.. - सर्किट

सर्किट 29/03/2008 - 07:37
असो. माझे मत कार्कुनासारखेच आहे.. तोच तोच चोथा, पुन्हा त्याच मनाच्या शेपटीच्या बोडख्याला तूप लावले आहे. काय तरी नवीन टाका बॉ ! प्राजू, कविता तशी वाईट नाहीये. पण अगं ह्या सगळ्या उपमा, रूपके ह्यांची इतकी चवून चावून माती झालीये (सगळ्या पचनेंद्रियांमधून जाऊन) की उगाच वा वा म्हणण्यात काय अर्थ आहे ? सुमार म्हणण्यासारखी नाही नक्कीच.. पण एक लक्षात घे , की दिल ह्या शब्दाने सुरू होणार्‍या आणि संवादात किमान ३०% वेळा दिल असणारे चित्रपट आपण खरंच मनावर घेतो का ? मी ह्या तुझ्या कवितेचे विडंबन करायला घेणार होतो.. हिंदी-मराठी मिश्रीत.. प्रत्येक मन ह्या शब्दाच्या ठिकाणी दिल टाकायचे, आणि मग मजाच मजा.. उदा: दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा.. किंवा असेच काही तरी.. तुझ्या प्रत्येक दोन ओळीत अशींच डिस्कनेक्ट आहे ग ! उगाच वाकलेल्या शरीराचा आणि काठीचा उल्लेख करून माझ्या सारख्या सर्व सामन्य रसिकांना रडायला येत नाही ! तुझी मैत्रिण असतो, तर मीही रसग्रहण वगैरे लिहिले असते. पण मी चीनच्या प्रेमातही नाही, आणि तुझी मैत्रिणही नाही, मग काय करू सांग. दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मीनल 29/03/2008 - 07:50
चीनच्या प्रेमाच काय कनेक्षन ? डिस्कनेक्टेड आहे ते इथे! आता पुठिल रसग्रहण सर्किटच्या लेखानाचं बर का? कारण तो माझा मित्र ना?मग काय करू ?सांगा बरे? रसग्रहण आणि मैत्री हे तेवढ कनेक्टेड .कसं????????

In reply to by मीनल

सर्किट 29/03/2008 - 07:58
ये पुठिल पुठिल क्या है ? मीनलताई, आपले गद्यच इतके डिस्कनेक्टेड आहे ना, की पद्य किती असेल, ह्या गंभीर विचारात मी आहे ! - (आपला मित्र) सर्किट

डॉ. सर्कीट,

दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल
दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा..

या पेक्षा.......

दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका
दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!

या ओळींना मी दाद देईन !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर 29/03/2008 - 09:45
दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!
दिलीप नाव सार्थकी लागले. आजपासून आम्ही तुम्हाला 'दिलवाले दिलीप बिरुटे' म्हणून ओळखू :))

विसोबा खेचर 29/03/2008 - 07:47
प्राजूच्या कवितेइतकीच मी मीनलच्या प्रतिसादांनाही दाद देईन! खूपच बॅलन्स माईंडेड प्रतिसाद...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मीनल 29/03/2008 - 07:58
आभार तात्या. आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी . आता फक्त वाचन करणार या विषयाचे. किती काथ्याकूट करणार हो एखाद्या विषयाचा? कंटाळा येतो .चोथा होतो त्या विषयाचा. . . . . हे पहा पुन्हा `चोथा`!! बस !! पुरे झाल आता.

In reply to by मीनल

सर्किट 29/03/2008 - 08:02
आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी . धन्यवाद !!!! जियो !! जसे येथील धर्ममार्तंडांनी (सॉरी धर्ममार्तंडकाकांनी) दारू हा विषय विडंबनकारांसाठी रद्द ठरवला आहे, तसेच सर्व कवींनी, ह्या धर्ममार्तंडांची तक्रार येण्याआधी "मन" हा विषय संपवला, तरच इष्ट होईल. - (दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा) सर्किट

कोलबेर 30/03/2008 - 00:18
दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा
मन स्कॉचचा हो पेग.. सोडा नाही त्यात सांभाळावा वेग मन मिलिट्रीची रम.. भरपूर सोडा, पाणी त्यात कम (मनकवडा) कोलबेर डिस्क्लेमर : हे लिखाण विडंबन (म्हणण्याच्या लायकीचे) नाही.. समस्त धर्ममार्तंड काकांनी नोंद घ्यावी :))

वरदा 30/03/2008 - 00:07
मलाही कविता मनापासुन आवडली..अगं हेच सगळे शब्द आम्हीही ऐकलेत आणि वाचलेत पण सगळ्यांना जमतय का चार ओळी तरी लिहायला... निदान मला तरी नाही... माझा नुसता कविता वाईट म्हणण्यावर आक्षेप नव्हता पण कविता त्याच झाल्यात...वाढदिवस शुभेच्छा देणं नेहेमीच झालंय्..हा सूर चुकीचा आहे....अशा कितीतरी गोष्टी नेहेमीच्या असतात तरीही त्या पुन्हा पहायला ऐकायला मजा येते.....म्हणून सारखा हा रडका सूर लावू नये......तुम्हाला नसेल करायचं विश कुणाला तर नका करु काय बोर आहे हे कशाला?

Taxonomy upgrade extras
मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी.. मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी.. मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... मन विद्युल्ल्ता पात,धरेवर कोपणारा.. मन बरसता मेघ,जलामृत सांडणारा.. मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं टिपूर, जणू नक्षत्रां

विडंबनासंबंधी निवेदन

चतुरंग ·

सर्किट 28/03/2008 - 01:22
प्रत्येकाची श्रद्धा अभंगात किंवा देवाच्या गाण्यात असेलच असे नाही. माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो. तेव्हा स्वतःवर बंधनेच घालून घेणार असाल, तर आमच्या भावनांची देखील पर्वा करावी, ही विनंती. तोवर आम्ही "घालून लोटांगण वर करी ढुं**" म्हणतो, चालीत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग 28/03/2008 - 01:38
पण ते उत्तम असेल तर मला वर्ज्य नाही कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो. बाकी तुमचं ते "घालून लोटांगण वर करी ढुं**" चालू दे!! चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 28/03/2008 - 01:48
कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो. हम्म! हे मात्र पटले...! इव्हन, उद्या कुणी उठून जर बाबूजींच्या, 'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगति पुत्र मनवाचा' या अत्यंत उच्च दर्जा असलेल्या गाण्याचे जर काही वायफळ विडंबन करू लागला तर मलाही ते सहन होणार नाही! असो, गेल्या काही दिवसांपासून मिपावरील विडंबनाचं गळू खूप सुजलं होतं. या चर्चाप्रस्तावाच्या निमित्ताने रंगाने त्या गळवाला सुई लावलीन हे एका अर्थी बरंच झालं! आता मिपावरील मंडळींचे याला काय नी कसे प्रतिसाद येतात, त्या प्रतिसादांतील एकंदरीत सूर कसा आहे हे पाहून मिपावर केले गेलेले विडंबन तसेच ठेवायचे की अप्रकाशित करायचे यावर जनरल डायर काय तो निर्णय घेतीलच! अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 28/03/2008 - 01:50
एकसाथ पेले भरता, दोष ना कुणाचा सुराधीन आहे जगती, पुत्रमानवाचा पण हे गाणे गदिमांनी लिहिलेले आहे. आता अपमान त्यांचा झाला की बाबूजींचा ? - सर्किट

बेसनलाडू 28/03/2008 - 02:00
हे वाचून गदिमांनी हा विषय, पेले भरणे, ढोसणे, सुराधीनता इ. इ. त्यांच्या रचनांमधून/विडंबनांतून किती वेळा चघळले आहे, याची सांख्यिकीय तपासणी करायचा मोह झाला. (संख्याशास्त्री)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 28/03/2008 - 02:04
मुळात गदिमांनी विडंबने केली आहेत का ? माझ्या तरी वाचण्यात नाहीत. तुमचे सांख्यिकीचे अर्धे काम तर निपटले. - सर्किट

विसोबा खेचर 28/03/2008 - 02:07
कान्ट से! त्याकरता मला विडंबन पूर्ण वाचावं लागेल. शिवाय मूळ गाणंही गदिमांचंच आहे तेव्हा त्यांना त्याच गाण्याच्या विडंबनाचाही अधिकार आहे असं मला वाटतं! आणि मुळात त्याकरता, जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात, दु:खमुक्त जगला कुणी जीवनात वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा! यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती! तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं, परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच! आणि मी बाबूजींचा अपमान होतो आहे असं कुठेही म्हटलेलं नाही! आपण कृपया माझे प्रतिसाद नीट वाचत जावे ही विनंती... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 28/03/2008 - 02:13
यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती! हेच तर म्हणतो. विडंबनकाराची ताकद असती तर त्याने विडंबने का केली असती ? अशा ताकदवान ओळीच लिहिल्या असत्या की ! तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं म्हणजे, फक्त स्वतःच्याच कवितांचे/गझलांचे/अभंगांचे विडंबन करावे, असे तुमचे म्हणणे आहे का ? परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच! केशवसुतांच्या "आम्ही कोण म्हणूनी.." चे अत्र्यांनी केलेले विडंबनही तुम्हाला वायफळ वाटते का ? की फक्त अत्रे इतरही काही लिहायचे, म्हणून ते विडंबन चांगले ? - सर्किट

In reply to by चतुरंग

प्राजु 28/03/2008 - 02:05
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. अगदी खरे बोललात... मलाही असेच झाले आहे. आणि आपल्या निर्णयाचा मी आदर करते. - (सर्वव्यापी)प्राजु

आम्हाला आपल्या भावनांची कदर आहे. पण मग तुम्ही पण भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची विडंबने करू आणि वाचू नका. वाचलात तर प्रतिसाद देऊ नका. तोपर्यंत आम्ही पण "भिजूनी पाण्यात सार्‍या बो* माझा कोरडा" असे म्हणतो चालीत. पुण्याचे पेशवे

सन्जोप राव 28/03/2008 - 08:32
माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो. हे पटले. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सर्किट 28/03/2008 - 08:51
संजू, तुला पटणारच ! वेगळे काहीतरी असेल तर सांग ! - सर्किट

In reply to by चतुरंग

बेसनलाडू 28/03/2008 - 01:57
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. --- सहमत आहे. येथे कोणीतरी समदु:खी भेटल्याचे/ने बरे वाटले. तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. --- हे वाचूनही बरे वाटले. म्हणूनच एकूण निवेदन वाचून ((प्राप्त परिस्थिती कशीही असली तरी) जरा तरी)बरे वाटले, असे म्हटले. (स्पष्टीकारक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग 28/03/2008 - 02:02
आधीच्या प्रतिसादातल्या 'जर तरी' मधे तो 'जरा तरी' होता हे मला समजले नाही आणि म्हणून विचारले. धन्यवाद!! चतुरंग

विसोबा खेचर 28/03/2008 - 01:36
की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. मी ही हेच म्हणू पाहतो! परंतु अद्याप नक्की नाही! :) बाकी, रंगाचं निवेदन पाहून थोडासा विचारात पडलो आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन 29/03/2008 - 04:21
तात्या काय हे? विडंबना सारखा आमच्या जीव्हाळ्याच्या विषयावर चक्क तुम्ही बंदी आणायची भाषा करता आहात? (व्यथित) कारकुन

चतुरंग 28/03/2008 - 02:14
योग्य विडंबनांनाही इतके पटापट प्रतिसाद येत नाहीत पण इथे चर्चा मात्र कशी घसरवत न्यायची त्याला फाटे कसे फोडायचे बघण्यासारखे आहे! का कोण जाणे पण वैफल्यग्रस्त मनोवृत्तीचे निदर्शक आहे की काय असे वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 28/03/2008 - 02:16
अहो, चर्चा म्हटले की हे होणारच. स्वानुभवावरून सांगतो ! असे वाईट नका वाटून घेऊ बुवा. सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी गेंड्याची कातडी लागते. :-) - सर्किट

सचिन 28/03/2008 - 02:33
या विषयाला हात घातल्याबद्दल चतुरंगांचे आभार. मी मिपाचा नव्यातला सदस्य आहे..आणि कवितांमधे जास्त स्वारस्य असलेला. परंतु, गेले काही दिवस विडंबनाच्या अतिरेकामुळे अक्षरशः उबग आला आहे. (उबग येण्याच्या पुढच्या परिस्थितीला काय म्हणतात ते माहीत नाही..). कशाचे आणि कसे विडंबन करावे यावर कोणी काही बंधने (स्वतःवर अथवा दुसर्‍यावर) - घालोत वा न घालोत, पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे. कविता वाईटच आहेत असे मी म्हणत नाही, मीही काही कविता आवडल्याचे प्रतिसाद दिले आहेत, पण अशा कवितांचा अतिरेक मात्र निश्चितच झाला आहे, आणि "जे न देखे..." मधले वैविध्य नष्ट झाले आहे. (वि.सू. : कोणत्याही विडंबनकारास दुखावण्याचा हेतू नाही..)

In reply to by सचिन

सर्किट 28/03/2008 - 02:54
पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे. हा अगदी अचूक निर्णय. कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. - सर्किट

कोलबेर 28/03/2008 - 03:02
अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल!
डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल. (बिल्ला क्र. २१) कोलबेर

मिपा वर आणि लेखननियंत्रण? मला वाटत होतं की मिपा चा जन्मच मुळी अशा प्रकारच्या नियंत्रणांविरुद्ध बंडखोरी म्हणून झाला होता... कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. संपूर्ण सहमत! डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल. भावनांशी सहमत, पण त्याची जरूर आहे असे वाटत नाही!! अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल! संपादकांनी वरील वाक्य म्हटल्यामुळेच आम्ही आमचे विचार इथे मांडत आहोत (नाहीतर या साठमारीत शिरण्याची आमची छाती नाही!!!!:)) विडंबन हा एक मान्यताप्राप्त साहित्यप्रकार आहे. कवीने कोणत्या काव्याचे विडंबन करावे आणि कोणत्या नाही हे ठरवण्याचा वाचकांना अधिकार आहे असे मला वाटत नाही. वाचकांना असे लिखाण न वाचण्याचा वा त्या लिखाणावर त्यांची अनुकूल/ प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा जरूर अधिकार आहे. व्यक्तिगत टीका किंवा भांडणे चालू असतील तर संपादक मंडळाने जरूर हस्तक्षेप करावा. कोणी जर संकेतस्थळाच्या नियमांचे उल्लंघन करीत असेल (कॉपीराईट वगैरे) तर जरूर लेखकाला समज द्यावी पण विषयाच्या/ लेखनाच्या प्रकाराच्या निवडीत हस्तक्षेप करू नये असे मला वाटते. जर विषय वा केलेले लिखाण फालतू असेल तर त्याचा प्रतिक्रियेतून समाचार घ्यायला सभासद समर्थ आहेतच की!! :))) मिपा चा सभासदवर्ग हा विस्तृत आहे त्यामुळे इथे वेगवेगळ्या विचारांची/ स्वभावांची माणसे येणार हे सहाजिकच आहे. सर्वांना सर्वच विषय/ लेखनप्रकार आवडतील असे मुळीच नाही. तेंव्हा आपल्याला जे रुचते ते वाचावे/ लिहावे, त्यावर प्रतिक्रिया द्यावी हे उत्तम!! आम्हाला खादाडी करायला आवडते पण पाककलेतील काही शष्प कळत नाही. तरीसुद्धा मामलेदाराच्या मिसळीची अचूक रेसेपी मिळाल्याबद्दल त्या लेखकांचे (स्वाती राजेश आणि पेठकरबुवा) आम्ही अनंत आभारी आहोत. मन जरा मोकळं ठेवलं की असे अनेक अनाहूत लाभ होतात... मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार! आता सेन्सेटिव्ह व्यक्ती त्यामुळे नाराज होण्याची शक्यता आम्ही नाकारीत नाही, पण त्यांच्यापुढे अशा प्रकारचे लेखन न वाचण्याचा पर्याय असतो. आणि ही सेंन्सिटिव्हिटी कालानुरूप बदलत असते. "आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेतही न वाली" हे काव्य रविकिरणमंडळाच्या काळात अनेकांना धक्का देउन गेलेच असते... असो. मिपा बद्दल आमच्या मनात आत्मियता व कौतुक आहे ते त्याने केलेल्या प्रस्थापितांविरुद्धच्या बंडखोरीबद्दल आणि येथील अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल! त्यामुळे आम्ही इतर कुठेही न लिहिता फक्त मिपावर लिहितो. म्हणून रहावले नाही आणि चार शब्द लिहिले. बाकी सर्व संपादकमंडळाच्या आणि मालकांच्या हाती! अधिकउणे लिहिले गेले असेल तर क्षमा असावी. -पिवळा डांबिस

सुशील 28/03/2008 - 08:24
सर्कीट साहेब आणी सर्व विडंबन समर्थक, त्या जोनी लिव्हर नावाच्या आचरट माकडान मागे एकदा राष्त्रगितावर नृत्य केले होते त्याविशयी आपले मत काय? उद्या इथे कोणि जन गण मन चे विडंबन केलेतर तुम्ही त्याचे स्वागतच करनार का? उत्तराचि वाट पहात आहे.

In reply to by सुशील

सर्किट 28/03/2008 - 08:40
नक्कीच. तो त्याचा अधिकार आहे ! (आता, जन गण मन चे विडंबन प्रकाशित करणार, नक्कीच. सर्व माकडांनी आपापल्या शेपट्या आवश्यक ठिकाणी घालाव्यात, ही विनंती.) - सर्किट

बेसनलाडू 28/03/2008 - 08:44
ते विडंबन प्रकाशित करू देणार का/मिपावर राहू देणार का, याची उत्सुकता राहील. त्यावरून मिपाचे विडंबनविषयक धोरणही (हळूहळू)स्पष्ट होईल(च!) (उत्सुक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 28/03/2008 - 08:49
आपले तिरके प्रतिसाद कितीही आले, तरी आम्ही ते इथे टाकणारच, बेला ! आमच्या नावाखाली टाकणार, इतरांच्या नव्हे ! त्याची पूर्ण जबाबदारीही आमचीच, इतरांच्या टोपणनावाखाली नाही ते आम्ही ढकलणार. शेपट्या घालणारे माउली भक्त आम्ही नाही ! - सर्किट

बेसनलाडू 28/03/2008 - 08:52
आम्ही फक्त काय होईल, काय नाही याबद्दल जास्त उत्सुक. धोरणांबद्दल उत्सुक. विडंबनाबद्दल कमी किंवा नल्. कुणी सांगावे, कदाचित एखादे जबरा टाकालही, जेणेकरून आपल्या पुढच्या कलाकृतींची उत्सुकता वाढेल. आपल्या हातचे असे काही वाचले नाही ना अजून! बाकी चालू द्यात तुमचे. (उत्सुक)बेसनलाडू

व्यंकट 28/03/2008 - 11:56
आमच्या मताला फारशी किंमत नाही हे आम्ही जाणून आहोत म्हणून आमच्या पुढील संभाव्यतः प्रक्षोभक वाक्यावरून गदारोळ होवू नये. जन, गण, मन हेच विडंबन आहे असे आमचे मत आहे. व्यंकट

In reply to by व्यंकट

धमाल मुलगा 28/03/2008 - 12:15
व्य॑कोबा, आपल्याशी सहमत. राजा जॉर्ज च्या स्तुतीप्रित्यर्थ हे गायले (भारतभाग्यविधाता) अस॑ वाचल्याच॑ स्मरत॑. असो, पुन्हा ह्यावर वाद होतील. सध्या वातावरण बिघडल॑ आहे ! आपला, -(सहमत) ध मा ल.

प्रमोद देव 28/03/2008 - 08:28
मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार! डांबीसरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे. मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! रंगरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे. ह्यातला विटंबनसत्र हा शब्द महत्वाचा. आता माझे मतः विडंबन कुणी करावे,का करावे,कशाचे करावे आणि कसे करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यात एक किमान दर्जा असावा अशी अपेक्षा मी एक वाचक म्हणून करतो. तसेच घेतले एखादे गीत,कविता,अभंग वगैरे वगैर आणि पँटमध्ये शर्ट खोचावा त्या पद्धतीने त्यात बाई,बाटली(हे फारच वाढलंय हल्ली) आणि तत्सम शब्द अधून मधून पेरले की झाले विडंबन.... असे बर्‍याच जणांना वाटते. क्षणभर एक गंमत म्हणून ते चालूनही जाते. पण माझ्या मते ते विडंबन नसून विटंबन(ना) असते. हातात कुंचला आणि काळ्या रंगाचा डबा आहे आणि दिसेल तिथे तो रंग फासायचा... अशा तर्‍हेचा अट्टाहास वाटतो त्यामागे. तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका. इथल्या समस्त विडंबनकारांनी हे आव्हान ताकतीने पेलावे असे मी त्यांना आवाहन करतो.

प्राजु 28/03/2008 - 08:55
तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका. प्रमोदकाका, हे म्हणणे तुमचे एकदम पटले... पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुशील 28/03/2008 - 09:05
पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. प्राजुताई तुम्ही काही बोलु नका. मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना. प्रामाणीकपणे सांगतो आहे कृपया राग मानु नका.

In reply to by सुशील

प्राजु 28/03/2008 - 09:14
प्राजुताई तुम्ही काही बोलु नका. मी बोलायचं की नाही हे तुम्ही नका ठरवू. तुम्हांला जे जमतं ते करा. मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना. माफ करा.. पण मी त्या एकटिने नव्हत्या टाकल्या, मिपावरचे बरेच लोक होते इथे आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये एकच विषय नव्हता. तेव्हा सगळ्यांनी टिका केली असे कोणी सांगितले तुम्हाला? तेव्हा काय झाले हे माहिती नसेल तर तुम्हांला बोलण्याचा अधिकार नाही. आणि जमल्यास तो धागा काढून वाचा आणि तुम्ही लिहिलेल्या चारोळ्या आणि त्या धाग्यातील चारोळ्या यांचि तुलना करा.. म्हणजे तुम्ही कुठे आहात हे तुम्हालाच समजेल. आणि तुमच्या चारोळ्या जर चांगल्या असत्या तर त्याला नक्की प्रतिसाद मिळाला असता.. यावरूनच तुम्हि लक्षात घ्या काय ते. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुशील 28/03/2008 - 09:22
माफ करा प्राजुताई मी राग मानु नका म्हणुन पण तुम्ही रागावलात. पण मला सांगा चारोळ्या टाकणारे अनेकजण असले तरी विडंबन टाकणारेपण अनेकच आहेत. आणि त्यामध्ये बहुतेक वेळा प्रेम वगैरे असा एकच विषय पण होता. तसेच माझ्या चारोळीना आलेले प्रतिसाद पुन्हा बघा. प्रतिसाद आणि वाचने मिळाले होते. मि कुठे आहे ते मला माहित आहे पण तुम्ही अशी माझी जागा दाखवुन तुम्ही कुठे आहेत ते दाखवले. यापुढे मला तुमच्याशी बोलायचे नाहि.

In reply to by सुशील

प्राजु 28/03/2008 - 18:35
तुमच्या या निर्णयाचा तुमच्या पेक्षा मलाच जास्ती आनंद झाला.... कीप इट अप. - (सर्वव्यापी)प्राजु

तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. मात्र चांगला/वाइट प्रतिसाद लिहिण्याचे शहाणपण सुदैवाने येथील वाचकाजवळ आहे, ज्याचा त्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावा. आम्ही आम्हाला आवडणार्‍या विडंबनांना विषय कोणतेही असले तरी दाद देत राहू . कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. सहमत आहे. मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट 28/03/2008 - 09:02
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे. आपण प्राडॉ डायर आहात का ? - (अचंभित) सर्किट

आपण प्राडॉ डायर आहात का ? नाही, आम्ही येथे आपल्यासारखेच एक वाचक आहोत. वाचक म्हणुन अशा लेखनावर बंदी किंवा असे लेखन अप्रकाशित होऊ नये असे वाटते. ( आपण कामात असता त्याचा आम्हाला आनंद असतो. आपण हे असे रिकामे झाले की आम्हाला आपल्याला प्रत्येक शब्दा शब्दाचे स्पष्टीकरण द्यावे लागते. )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुशील 28/03/2008 - 09:25
सर मी पण तुम्हाला संपादक समजत होतो तुम्ही जर फक्त वाचक आहे म्हणता आहात तर इतक्या ठोसपणे हे कसे म्हणालात? मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 28/03/2008 - 09:06
सर, कोणत्याही प्रकारच्या लेखनावर बंदी येणार नाही म्हणालात; पण आध्यात्मिक लेखन किंवा त्याच्या माध्यमातून पसरवले जाणारे (गैर)समज, (अंध)श्रद्धा, चमत्कार याबाबत अंतिम निर्णय डायर साहेबांचा असेल, असे जाहीर झाले आहे ना इकडेच? काय वाचावे, काय वाचू नये हे ठरवायचा वाचकांना अधिकार आहे, तर आध्यात्मिक गुरूंना बापड्यांन लिहऊ देत की. त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना? (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 28/03/2008 - 09:13
त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना? आणीबाणीसदृष परिस्थितीत प्रश्न विचारायचे नसतात अशी आमची माहिती आहे! बाय द वे, जनरल डायर आत्ता या क्षणी काल रात्री चिक्कार उसाचा रस प्यायल्यामुळे गाढ झोपले आहेत! :) ते उठल्यावर तुमचे हे प्रश्न इथे शिल्लक राहतील किंवा नाही या बाबत आम्ही साशंक आहोत! :) बाकी चालू द्या! :) तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सन्जोप राव 28/03/2008 - 11:28
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे. मिसळपावाच्या मालकांविषयी वैयक्तिक टिप्प्णी करणारा एक तुकडा इथे वाचला होता. तो आता दिसत नाही, हे कसे काय ,प्राध्यापक डॉक्टरसाहेब? सन्जोप राव

आनंदयात्री 28/03/2008 - 10:58
खरे तर अजिबात तोंड घालायची इच्छा नव्हती; कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. या अशा कविता पडल्या पडल्या दुसर्‍या मिनिटाला होणार्‍या विडंबनांची तुलना मी रेल्वे स्टेशन वर मिळनार्‍या पिवळ्या पुस्तंकाशी मी करतो; रद्दी; दुर्लक्ष करण्याजोगी. चला पण वरिल चर्चेत अनेकांचा दुटप्पीपणा दिसुन आला, एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" वैगेरे वैगेरे प्रतिसाद देणारे लोक आता वेगळी वेगळी मते मांडतांना दिसत आहेत.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 28/03/2008 - 11:22
एकिकडे आपण, कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. असं म्हणता, व लगेच एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" विडंबनांना कुणाचे काय प्रतिसाद येतात हेही आपल्याला ठाऊक आहे याचे राहून राहून नवल वाटले! गंमतच आहे बॉ!:) यावरून विडंबनांचे आपले वाचन कुठपर्यंत सुरू होते आणि नेमकी कुठून आपण विडंबने वाचायची सोडून दिलीत हा एक अवांतर प्रश्न आम्हाला पडला आहे! :) असो, आपलाच, तात्या.

शेखर 28/03/2008 - 12:57
आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. - शेखर

In reply to by शेखर

धमाल मुलगा 28/03/2008 - 13:27
शेखरशेठ, आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. अगदी लाख बोललात ! हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! -(व्यथित) ध मा ल.

लिखाळ 28/03/2008 - 19:34
विडंबने कशी असावित, असावित का? इत्यादी मते वैयक्तिक आहेत. वाचकांनी चांगले वाईट प्रतिसाद द्यावेत. त्यातून जे राहिल ते इथल्यांना आवडते असे समजले जाईल. बंदी वगैरे आणावी असे वाटत नाही. चतुरंग यांनी सुद्धा असे काही सुचवले नाही हे चांगलेच. --लिखाळ. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो करील तयाचे - पुल.

वरदा 29/03/2008 - 05:13
काय चाल्लंय्...चारोळ्याही आपण सगळ्यांनी एन्जॉय केल्या आणि बरीचशी विडंबनंही आपल्याला आवडली...थोडी अतिशयोक्ति झाली असेल तर होईल कमी आपोआप कुणी प्रतिसाद दिले नाहीत तर्..जी छान विडंबन असतील ती वाचूया बाकीची सोडून देऊ....सुशील तुम्हालाही आवडत होतं चारोळ्या लिहायला आणि तिथे लिहावसं वाटत नव्हतं तर वेगळा धागा उघडायचा माझ्या वेगळ्या चारोळ्या म्हणून....उगाच कशाला बोलता... आम्ही तर मस्त एन्जॉय केलं.... हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! धमु १००% सहमत.... अरे तुम्ही सगळे एप्रिल फुल नाही ना करत? कालपर्यंत तर आपण सगळे धमाल करायचो मधेच काय झालं काय? सारखी ऑफिस आणि घरची टेन्शन्स असह्य झाली की आपण इथे येतॉ जरावेळ मजा करतो कीती बरं वाट्टं..इथेही तसच असेल तर कसं वाटेल यावसं?

In reply to by वरदा

विसोबा खेचर 29/03/2008 - 07:52
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) स्वभावातला अवखळपणा, निरागसपणा असाच राहू दे! जप त्याला नेहमी... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 29/03/2008 - 08:05
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) सांभाळून राहा हो ! अशा प्रतिसादांमुळे "तेराव्या चौदावीतल्या" मुलींना किती धोका आहे, हे सहज लक्षात येते ! - (खट्याळ) सर्किट

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न. पहा. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2591450425237531522&... »

प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.)

प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.) » श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) यांच्या मताशी सहमत. चांगले/वाईट साहित्य असा भेद असूनही "माझ्या आवडीचे/नावडीचे" असाहि भेद नक्कीच असू शकतो.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

विसोबा खेचर 30/03/2008 - 12:51
श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) अहो पण 'प्रभाकर पेठकर' हे नांव तरी खरंखुरं कशावरून? त्यांचं खरं नांव 'धुरंधर भाटवडेकर' असंही एखादं असू शकतं! :)) आपला, तात्याभैय्या देवासकर.

मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. चतुरंग

मोबाइल उचलला

प्रा सुरेश खेडकर ·

सुशील 28/03/2008 - 08:27
तात्या काय हे? इतके होउनही ज्ञनेश्वरांचे विडंबन इथे आहे. मलातर हा मुद्दाम केलेला वात्रटपणा वाटतो आहे.

सुशील 28/03/2008 - 08:27
तात्या काय हे? इतके होउनही ज्ञनेश्वरांचे विडंबन इथे आहे. मलातर हा मुद्दाम केलेला वात्रटपणा वाटतो आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मोबाइल उचलला, कानी लावियला संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून , वेगळ्या विषयावरचे ( म्हणजे लठ्ठ बाई व दारू या व्यतिरिक्त)स्वरचित विडंबन गीत. मोबाइल उचलला, कानी लावियला पैसे वेचिता बहुल, सर्वा हाती आला. इवलेसे पोर,मिरविते भारी. तयाचा बिलू,गेला गगनावरी. शेजारचा बंटी, असाच वाया गेला, बाप त्याचा आईवरी,उगाचाच डाफरला. मोबाइल उचलला, कानी लावियला पैसे वेचिता बहुल, सर्वा हाती आला. प्रा.सुरेश खेडकर ,नागपूर. पाईक, "झेंडूची फुले परंपरा"