Skip to main content

आयुष्य....."सप्टेंबर २००५" ला लिहिलेली एक कविता

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 28/03/2008 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य तेंव्हा "सायरा बानो" सारखं असतं इकडून तिकडे हिंडण्याचं चकाट्या पिटत फिरण्याचं .....जेंव्हा आपलं वय "एक ते चार" असतं ! आयुष्य मग "गीता बाली" सारखं होतं पुष्कळ वेळ बागडण्याचं, मग पुस्तकांशी झगडण्याचं .....जेंव्हा आपलं वय "पाच ते आठ" असतं ! आयुष्य डोलणार्‍या "वहिदा" सारखं होतं क्षणात गिरकी घेण्याचं , बर्‍याचदां फिरकी घेण्याचं .....जेंव्हा आपलं वय " नऊ ते बारा " असतं ! आयुष्य आता "नूतन" सारखं होतं प्रसंग कित्येक हसण्याचे, अपुर्‍या प्रयत्नांनी फसण्याचे .....जेंव्हा आपलं वय " तेरा ते सोळा " असतं ! आयुष्य रसाळ , "शर्मिला" सारखं होतं क्षण अन क्षण आवडण्याचं, कशाचीही भुरळ पडण्याचं .....जेंव्हा आपलं वय " सतरा ते वीस " असतं ! आयुष्य आता "विद्या सिन्हा" सारखं होतं प्रत्येक गोष्टीत गुरफटण्याचं , कुठेतरी टिकयला धडपडण्याचं .....जेंव्हा आपलं वय " एकवीस ते पंचवीस " असतं ! यानंतरचं आयुष्य "मधुबाला" सारखं होतं कधी अवखळ , कधी शांत , कधी "काय होईल?" याची भ्रांत कधी हौसे मौजेनं मुरडण्याचं - तर कधी हौस गरजेपायी खुरडण्याचं .....जेंव्हा आपलं वय "सहवीस ते कितीही" असतं !
लेखनविषय:

वाचने 2270
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

कविता छान आहे. पण सप्टेंबर २००५ ला लिहिली आहे, हे लिहिण्यात काय हेतु आहे ते कळाले नाही. बाकी कविता उत्तम.

In reply to by स्वाती राजेश

स्वाती राजेश, माझी आणखीन एक कविता याच नावाने आहे (जी सध्ध्या मिळत नाहिये!) त्यामुळे संग्रही मी तशी नोंद केली होती.शिवाय कवितेवर तारीख - साढारण कालावधी लिहिण्याची जुनी सवय पण आहे. जमल्यास "शिवरायांचे "८" वा वे रूप" हा मि.पा. वरील लेख पण वाचावा ही विनंती. उदय सप्रे

आहे....कधी अवखळ , कधी शांत , कधी "काय होईल?" याची भ्रांत ह्म्म्म्म.......ते खरं म्हणा....