मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धुन्दी - विडंबनाचा एक प्रयत्न

चेतन ·

विसोबा खेचर 26/03/2008 - 14:06
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन लसलसता लाव्हा धुन्दी डोक्यात गेल्यावर, मन झुलझुलता झुलवा वा! क्या बात है.. वरील ओळी आवडल्या..! आपला, (धुंद) तात्या. अवांतर - चेतनराव, आपला लॉगईन आयडी कृपया देवनागरीत करावा ही विनंती... आपला, (मराठी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चेतन 26/03/2008 - 14:17
धन्यवाद तात्या आपली सुचना अमलात आणली (धुंद पण न पिणारा) चेतन

प्रमोद देव 26/03/2008 - 15:23
विडंबनांचा महापूर आलाय इथे आणि त्या बहुसंख्य विडंबनांमध्ये "दारू" वरच भर आहे. तेव्हा आता मिसळपावचे नाव बदलून "मिसळपाव बार" असे ठेवावे म्हणतो. :))))) समस्त विडंबनकारांना हात जोडून प्रार्थना की त्यांनी जरा इतर विषयही हाताळावेत. अहो आमच्यासारख्या " न पित्यां"ना तुमच्या नुसत्या विडंबनांनीही "चढायला" लागलेय हो! तेव्हा जरा आमचीही काळजी घ्या म्हणतो मी! :))))

In reply to by प्रमोद देव

चतुरंग 26/03/2008 - 19:15
एकेका फॅशनची लाट असते ना तशी सध्या विडंबनांची आहे. फर्मास विडंबने वाचून सुरसुरी येतेच काही नवल नाही. पोट्ट्यांना प्रयत्न तरी करु दे ना. तुम्ही त्यांच्या उत्साहावर पाणी टाकू नये असे वाटते. आपसूक गाड्या वळणावर येतात हलकेच, थोडं सबुरीनं! चतुरंग

In reply to by प्रमोद देव

विडंबनांचा महापूर आलाय इथे आणि त्या बहुसंख्य विडंबनांमध्ये "दारू" वरच भर आहे. सहमत आहे, मिपावर वेगवेगळ्या साहित्याचा लाटा यायला पाहिजे. ते कधी कधी होत नाही. चारोळ्या तर चारोळ्याच येतील. विडंबने तर विडंबनेच येतील. मद्य तर मद्यच येईल.या विडंबनाच्या लाटांनी आमच्या भावनांचा, रसिकतेचा पार चोथा झाला आहे. :))))) ( अर्थात काही विडंबने दर्जेदारच असतात ) काही दिवस विडंबने आणि कविता/चारोळ्यांवर सरपंचानी बंदी घातली पाहिजे. किंवा नीलकांतला सांगून 'काव्य' दिसणार नाही, अशी सोय करुन घ्यावी म्हणतो !!!! :))) आपला प्रा.डॊ. दिलीप बिरुटे (शबनम मधे कवितेची वही घेऊन श्रोता शोधणारा )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चेतन 27/03/2008 - 11:42
गारवा ऐकता ऐकता लहर आली म्हणून हा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न केला. फर्मास विडंबन लिहायला मी केशवसुमार नाही, आम्ही ज्या वर्गात आहोत त्याचे ते हेडमास्टर आहेत. अर्थात मलाही दारूचा तिटकारा आहे पण हा साधा विषयही कोणाच्या घशाशी येत असेल याची कल्पना नव्हती. यापुढे जणीव राहील क्षमस्वः ( धुंदी उतरलेला) चेतन

बाटलिला कवटाळलेल्या, त्या अत्रुप्त घोलक्याचा धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी या त्रुप्त बेवड्यांचा मी चुकून (दारू नपिता) 'पोलक्याच्या' वाचले. आणि चक्रावलो. हे काय भलतेच? जरा बरोबर घोळक्याच्या लिहा राव. पण पहिल्या प्रयत्नात चांगले जमले. इतर विषयच निवडावेत. बाई बाटली नको. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

चेतन 28/03/2008 - 11:39
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद मी चुकून (दारू नपिता) 'पोलक्याच्या' वाचले. आणि चक्रावलो. हे काय भलतेच? "चोराच्या मनातं चांदणं" असो... या पुढे चूकं सुधारण्याचा प्रयत्न राहीलं... चेतन

लेखनविषय:
केशवसुमरांपासुन प्रेरणा घेवुन माझा हा एक विडंबनचा प्रयत्न मूळ लेखन : "पाउस पडुन गेल्यावर" (गारवा) पाउस ही संकल्पना बदलुन धुन्दि (अर्थात दारुची) ही संकल्पना धरुन हा विडंबनचा प्रयत्न धुन्दी डोक्यात गेल्यावर, तन हलके हलके झाले स्वर्गाच्या वाटेवरती, नभात तरंगत गेले बाटलिला कवटाळलेल्या, त्या अत्रुप्त घोलक्याचा धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी या त्रुप्त बेवड्यांचा धुन्दी डोक्यात गेल्यावर, हे विचार मस्त मोहाचे मेंदुला डावलून आल्या, त्या सुप्त अंनंत इच्छांचे सोडुन लाज सारी, पाउले ही लडखडति धुन्दी डोक्यात गेल्यावर, त्या ओजाड रस्त्यांवरती धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी भ्रांत चित्त हरपले

उघड "बार" देवा आता , उघड "बार" देवा

उदय सप्रे ·

क्या बात है! कदाचित दिल्लीवाले मिसळ्पाव वाचत असावेत. म्हणुन त्यांनी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2899850.cms हा निर्णय घेतला असावा. प्रशांत.

In reply to by प्रशांतकवळे

उदय सप्रे 27/03/2008 - 09:48
मनःपूर्वक लिहिलेल्या प्रतिक्रियांबध्दल आभार ! प्रशांत भाऊ, http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2899850.cms हा निर्णय घेतला असावा. म्हणजे काय्?काही कळाले नाही. प्राजु, कर्म धर्म संयोगानी आमच्या सौभाग्यवतींचे नाव पण प्राजक्ता आहे आणि तिला पण माझ्यासारखेच कुठल्याही व्यसनाविषयी भयंकर तिटकारा आहे, त्यामुळे मी तुमच्या भावना समजू शकतो.पण एखादी कलाकृती ही तटस्थपणे एन्जॉय करता आली पाहिजे-त्याविषयी लिहिता पण आले पाहिजे.माझे हे विडंबन पण त्याच पठडीतील आहे असे मला अतिशय प्रामाणिक्पणे वाटते, तरी पण यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व ! राहता राहिला प्रश्न या अभंगाचा - तर तुम्हाला सांगतो, "गीत रामायणातील 'गा बाळांनो गा रामायण' या भैरवीतील 'थोडे थोडे गात प्रतिदिनी' च्या ऐवजी 'थोळे थोळे' असे येईपर्यंत "गीत रामायण" म्हणून पै अन पै गोळा करत "वीर सावरकर" नावाचा अद्वितीय चित्रपट निर्माण करणार्‍या "बाबूजें" बध्दल माझ्या मनात "श्रध्दा आणि भक्ती" खेरीज काहिही नाही! - जो भंग पावत नाही तोच "अभंग", मग माझ्यासरखा एक यःकश्चित माणूस इतक्या सुंदर अभंगाचा अपमान करु शकतच नाही - ही "दारुड्या" लोकांवरची मल्लिनाथी आहे !-हा निव्वळ एक योगायोग आहे, मी मनात येईल त्या विषयावर लिहित असतो, त्यातलाच हा एक विषय्.उदाहरणार्थ आज मी एक "शिवरायांसी "८" वावे" असा एक लेख प्रसिध्द करणार आहे तो एकदम शास्त्रिय बैठकिचा आहे तो पण तुम्ही वाचालच. चतुरंग भाऊ, तुमचे म्हणणे एकदम रास्त आहे आणि "मीटर" वर तुम्ही सुचवलेले एकदम योग्य असेच आहे - पण "दारु" सारख्या विषयावरील गाणे हे "रांगडेच" वाटले पाहिजे म्हणून तुम्ही लिहिलेले शब्द आधी तिथे चपखल बसत असूनही मी ते शब्द काढून सध्ध्याचे शब्द टाकले आहेत, म्हणून पही - मीटर वर "फिट" नसतील शब्द, पण गाण्याचे रांगडेपण जपतात्-मला जरूर कळवा यावर तुम्हाल ते कसे वाटले ते ! मि.पा. वरील लोक खूप चोखंदळ आहेत हे बघून खूपच आनंद झाला. उदय गंगाधर सप्रे-ठाणे

In reply to by उदय सप्रे

उदय भाऊ, आजकाल मिपा वर दारु हा विषय जास्त येतोय.. म्हणुन तो दुवा दिला. दिल्ली सरकार आता दारु दुकानांचे जास्त परवाने देणार आहे. प्रशांत

चतुरंग 26/03/2008 - 19:06
चपखल शब्दयोजना! चालीत म्हणून बघितले काही ठिकाणी थोडे मीटर हुकल्यासारखे जाणवते तिथे दुरुस्ती करतोय, पटते का बघ? आर्त जणू गुत्त्यांवरची बोंब ही "टपोरी" एकएक "आपुली" वाटे पाजणारी पोरी "सुष्ट" सज्जनांच्या ओठी पडे कसा मेवां? उजेडात बाइल बघते अंधारात बाप कसे जावे यांच्या पोटी पेगाचे हे माप? अश्या "डोलकर्‍यांचा" कोणी तोल सावरावा? चतुरंग

प्राजु 27/03/2008 - 00:37
विडंबन चांगले आहे. आवांतर : मिपावर दारूशिवाय विडंबने होत नाहीत का? खरे तर इथे लिहिणारे अतिशय प्रतिभावान आहेत. मग दारू प्रत्येक विडंबनात यायला हवी हा अट्टाहास का? आणि देहाची तिजोरी या सुंदर अभंगाचे विडंबन.. दारू या विषयावर आहे हे वाचून थोडे वाईट वाटले. भीक नको पण कुत्रा आवर प्रमाणे विडंबने नको पण दारू आवर असे म्हणावेसे वाटू लागले आहे. - (व्यथित)प्राजु

In reply to by प्राजु

अघळ पघळ 27/03/2008 - 02:47
प्राजुताई कितीही चिड चिड करताय आजकाल! बरं नाहिये का? तुम्ही आपलं पुर्वीसारख्या त्या चारोळ्या पाडा बघू :) आम्हाला त्या खुप्प्प आवडतात.... - अघळ पघळ

In reply to by प्राजु

लवकरच आपल्या लाडक्या मिसळपावचे नामकरण मद्यमिसळपाव करावे लागेल. मी पण व्यथित. अजून एक. विडंबनासाठी गाणी किंवा कविता निवडताना जरा तरी तारतम्य बाळगायला काहीच हरकत नाही. आज "उघड दार देवा" हे हजारोंच्या श्रद्धेचा विषय आहे. सिगारेट खुशाल ओढा पण ती निरांजनावरच शिलगावून हा अट्टाहास का आणि कशासाठी? > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by सृष्टीलावण्या

बेसनलाडू 27/03/2008 - 11:07
आठवली; पटली तर पहा, नाहीतर सोडून द्या लावण्याताई - नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by सृष्टीलावण्या

उदय सप्रे 27/03/2008 - 13:00
एखादा विषय डोक्यात येताना ठरवून येत नाही, तो जसा येतो तसे लेखक / कवी लिहितात, कविता/लेख्/विडंबन लिहिणे म्हणजे एखाद्या विषयावर ठरवून टीका करण्यासरखे ठरवून नाहि न करता येत ताई? मी प्रतिक्रियांमधे लिहिलय ते पण सविस्तर वाचा ही विनंती ! राहता राहिला विषय "दारु" चा , तर कुठले विडंबन हे त्यावर "उपहासात्मक" लिहिले आहे हे वाचकांच्या लक्षात येतेच्.....मी स्वतः आजपर्यंत "दारु" दूरच, अजून "बियर" नाहि (हातात पण) घेतलेली ! सिगारेट्,विडी,काडी,जुगार वगैरे तर नावच नको..... त्यामुळे मूळ गाण्याला किठे तडा जातो वगैरे विचार मनातून काढून टाका, मूळ गाण्यापेक्षाही लक्ष पटीने "बाबूजी" हे माझ्याही श्रध्देचे कधीही न डळमळणारे स्थान आहे ! विडंबन पुन्हा एकदा वाचा - हा दारुड्या लोकांचा उपहास आहे - आयुष्य एन्जॉय करण्यासाठी "घोट" घेणे आणि दारुसाठी आपल्याच माणसांच्या नरडीचा घोट घेणे यातील अंतर फारच कमी लोकांना कळते , आणि हे विडंबन अट्टल "दारुड्या" लोकांसाठी आहे , शेवटचे कडवे याची साक्ष देईलच..... तरी पण, जाता जाता, अधिक उणे लिहिले असल्यास क्षमस्व ! उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

एखादा विषय डोक्यात येताना ठरवून येत नाही, तो जसा येतो तसे लेखक / कवी लिहितात, कविता/लेख्/विडंबन लिहिणे म्हणजे एखाद्या विषयावर ठरवून टीका करण्यासरखे ठरवून नाहि न करता येत ताई? मान्य आहे की विडंबन ठरवून करता येत नाही पण मग ते इथे छापलेच पाहिजे असे काही बंधन आहे का? खाजगीत लिहा आणि खाजगीतच त्याचा आस्वाद घ्या ना.. मी शाळेत असताना "पाऊले चालती संडासाची वाट" हे विडंबन तूफान प्रसिद्ध होते. आम्ही ते आवडीने गात सुद्धा असू. (अजूनही आठवले की हसू येते) पण मोठे झाल्यावर लक्षात आले की हे एका भक्तीगीताचे विडंबन आहे ज्या भक्तीगीताशी अनेक भाबड्या श्रद्धा जुळलेल्या आहेत. मग आम्ही ते जाहीर म्हणणे बंद केले. आपण मोठे कधी व्हाल? > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे 28/03/2008 - 00:48
मी शाळेत असताना "पाऊले चालती संडासाची वाट" हे विडंबन तूफान प्रसिद्ध होते. आम्ही ते आवडीने गात सुद्धा असू. पंढरीनाथा ऐकतोयस काय रे? पण मोठे झाल्यावर लक्षात आले की हे एका भक्तीगीताचे विडंबन आहे ज्या भक्तीगीताशी अनेक भाबड्या श्रद्धा जुळलेल्या आहेत. मग आम्ही ते जाहीर म्हणणे बंद केले. तरीही (अजूनही आठवले की हसू येते) ? :) नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला.. हे चालतं का? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by सृष्टीलावण्या

उदय सप्रे 28/03/2008 - 08:35
तुमच्या लिखाणावरून तुम्हाला मोठे व्हायला अजून बराच काळ जायचाय असे दिसते , तसेच खाली लिहिलेल्या ओळींवरून तरी वाटत नाही की काही "सभ्य्"पणा तुमच्याकडे असेल, इथे कुणी काय लिहावं आणि ते कुठे प्रसिध्द करावं हे सांगण्याएवढी स्वतःची योग्यता आहे का हे आधी तपासून पहा ! आणि लिमान आता तरी कुणालाही काहीही लिहिणे बंद करा.

प्राजु 27/03/2008 - 08:07
तुम्ही आपलं पुर्वीसारख्या त्या चारोळ्या पाडा बघू :) आम्हाला त्या खुप्प्प आवडतात.... अरे वा! कळतात वाटतं तुम्हांला चारोळ्या.... प्रगती आहे.. :))) - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by सुधीर कांदळकर

उदय सप्रे 28/03/2008 - 09:32
श्री.सुधीर कांदळकर, "सप्रे"म नमस्कार , इतर विषयांवर पण लिहिले आहे , अजुन एक विडंबन मि.पा.वर आहेच , कालच एक लेख "शिवरायांचे "८" वा वे रूप" मि.पा.वर दिलाय , या आधी "३ लेख आणि एक कविता" अश्या ४ लिन्क्स पण दिल्या आहेत मि.पा. वर , आपण जरूर वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा ! उदय "सप्रे"

धनंजय 28/03/2008 - 09:47
हे गीत एका कृष्णधवल चित्रपटात दूरदर्शनवर बघितल्याचे आठवते. प्रसिद्ध आहे, पण मला नाव आठवत नाही. कथा अशी काही : तीन चोर एका घरात पाहुणे म्हणून येतात. त्यांना तिजोरी फोडून चोरायची असते. (पण घरमालक खरा खूप गरीब आहे, हे त्यांना माहीत नसते.) चित्रपटातला प्रसंग असा की देवघरात घरातली सोज्ज्वळ मुलगी हे गाणे म्हणत असते, आणि ते तीन चोर तिजोरी फोडायचा प्रयत्न करत असतात. (त्यांचा प्रयत्न असफल होतो - गाण्यात "उघड दार देवा" शब्द असतात, आणि हे चोर तिजोरीचे दार उघडायचा प्रयत्न करत असतात, अशी दृश्ये आलटून-पालटून येतात.) त्यामुळे मुळातच एका प्रकारचे विडंबन/नर्मविनोद आहे. ते पूर्ण गाणे दृक्श्राव्य माध्यमात द्व्यर्थी आहे. त्याची आठवण होऊन येथेही व्यथित होऊ नये.

In reply to by धनंजय

प्रियाली 28/03/2008 - 22:38
असे या चित्रपटाचे नाव आहे बहुधा...यातील गावा म्हणजे आपले जन्मगाव, मातृभूमी इ. नसून तुरुंग आहे. बाकी, येथील एक एक प्रतिसाद पाहता एखाद्या शहाण्याला* "आम्ही जातो अमुच्या गावा" असे म्हणून रजा घेण्याची वेळ आली तर नवल वाटणार नाही. * माझी गणती शहाण्यांत होत असती तर हा प्रतिसाद न येता.

Taxonomy upgrade extras
देहाची तिजोरी.....मूळ गीताचे विडंबन्.....उदय सप्रे-ठाणे दे हाती तू थोडी शक्ती नाही देवां उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा पिते रोज डोळे मिटुनी जात बेवड्यांची तनी थरथराटापायी भिती सांडण्याची "सरावल्या" हातांनाही कंप का सुटांवा? उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा आर्त जणू गुत्त्यांवरची बोंब ही "टपोरी" "आपुलीच" प्रत्येक वाटे पाजणारी पोरी "सुष्ट" सज्जनांच्या ओठी का पडे हा मेवां? उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा उजेडात बायको बघते अंधारात बाप कसे जावे यांच्या पोटी एका पेग चे माप? अश्या "डोलकर्‍यांचा" कोणी तोल सावरावा? उघड "बार" देवा आता उघड "बार" देवा

नमस्कार हे अप्रकाशित आहे.

नीलकांत ·
नमस्कार नव्या अप्रकाशित साहित्याची ही चाचणी आहे , तुम्हा कुणालाही हे लिखान दिसत असेल तर कृपया खाली प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ४

विजुभाऊ ·

विसोबा खेचर 26/03/2008 - 12:03
वा विजूभाऊ, मस्त लिहिलंय! :) उदा: साहेब श्री दंताड वैदु सरदार दाढे सरकार यांच्या नरड्यात मझा आहे..सरदार सो! गाणे सोबत बजावणे ही उत्तम करतात सदाशीव्/शनिवार गोटाचे सर्मुखत्यार हसबनवीस सरदार साहेब श्री श्री श्री धमाल नाटके करतात विजुभाऊ येकपात्री करतात कविवर्य मेहेर्बान उले उलेमान केशवसुमार यांच्या विडंबनांची खुमारी सांगणे न लगे दश हजारी मनसाबदार सरदार चित्तर ह्यांचेही णरडे फक्कड गाते......... शायर ए मिपा गझल नवाझ अक्षरनवीस ॐकारखान हे गझला ऐशा नझाकतीने पेष करतात की तबियत खुष होते ऐसे नग आणि नरपुंगव मिपा च्या दरबारात हझेरी देत असतात्.... अरे वा! मिपावर बरीच कलाकार मंडळी आहेत की! :) डॉक्टर दाढेसाहेबांचं गाणं ऐकलं पाहिजे एकदा! असो, उत्तम वृत्तांत... छोटा डॉन आल्यावर पुढचा मिपाकट्टा ठरवा रे लवकरच! :) तात्या.

"मिसळ पाव चे पहिले वहिले संम्मेलन" चा वृतांत विजुभाऊनी मस्त लिहिला आहे. या मुळे नविन कलाकारांची ओळख झाली.. वेगळ्या पद्धतीने सादर केल्यामुळे खूप छान वाटले..

वा...वा...वा... मिपाच्या पहिल्या वहिल्या संम्मेलनाचा मान पुण्यास मिळाला. पहिलेच कार्य अगदी थाटामाटात (अणि कात्रज घाटात) पार पाडल्याबद्दल श्री. धमाल मुलगा आणि इतर संबंधित सरदारांचे कौतुक करावे तितके थोडेच. सर्वांचे अभिनंदन. काही वैयक्तिक मजबुरीमुळे हजर राहू शकलो नाही पण पुढच्या मेळाव्यात नक्कीच हजेरी लावण्याचा प्रयत्न करेन.

स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ ती...वानराची! (इती बोरटाके गुर्जी) तात्या तुम्ही स्वतः चा॑गले गाता व तुम्हाला हि॑दुस्थानी (अस्थानी नव्हे :)) शास्त्रीय स॑गिताची उत्तम जाण आहे मला ठाऊक आहे, ते॑व्हा तुमच्या पुढे मी गाण्याची वगैरे जुर्रत अजिबात करणार नाही. त्यादिवशी स॑मेलनात बरेच जण (बरीच) प्याले होते म्हणून माझे गाणे खपून गेले (ईर्षाद~ नाईलाज..:) मात्र चित्तर व छत्रपती ज्या फरमाईशी करीत होते व थोडे फार गातही होते त्यावरून त्या॑ची उच्च (कोण रे तो हुच्च म्हणतोय??) अभिरूची जाणवत होती. विजुभाऊ म्हणतात त्याप्रमाणे मिपा-करा॑च्या अ॑गी ना ना (नको त्या सुद्धा) कळा आहेत हे स॑मेलनात दिसून आले एव्हढे खरे.. आगामी मिपा-स॑मेलन बहुधा अ.भा. मराठी साहित्य स॑मेलनापेक्षा जास्त गाजणार अशी चिन्हे आत्ताच दिसो लागली आहेत्..म॑डळी तय्यार राहा

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

विसोबा खेचर 26/03/2008 - 23:34
मात्र चित्तर व छत्रपती ज्या फरमाईशी करीत होते व थोडे फार गातही होते त्यावरून त्या॑ची उच्च (कोण रे तो हुच्च म्हणतोय??) अभिरूची जाणवत होती. दाढेसाहेब, आमचा चित्तर अहे एक नंबरचा हलकट, परंतु भटसाहेबांची, दु:खाच्या वाटेवर गाव तुझे लागले थबकले न पाय जरी हृदय मात्र थांबले वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली, अन् माझी पायपीट डोळ्यातून सांडली! मग माझा जीव तुझ्या वाटेवर तळमळेल, अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल! मग माझा जीव तुझ्या वाटेवर तळमळेल! ही गझल मात्र चित्तर खूप छान गातो! चितरकडनं ही गझल ऐकायला खूप बरं वाटतं! साला, ह्या गझलेचे शब्द आणि अर्थ काळजाला हात घालतात! जरा ये अंतरा सुनीये, सहज कधी तू घरात, लावशील सांजवात माझेही मन तिथेच, ज्योतीसह थरथरेल, मग माझा जीव तुझ्या वाटेवर तळमळेल! !! क्या केहेने! दाढेसाहेब, घुसते हो साली ही गझल काळजात! बाय द वे दाढेसाहेब, ही गझल मी पण बरी गातो बरं का! अहो आमच्या यमन रागातली गझल आहे ही, सुधीर मोघेनी फार छान बांधली आहे!:) ऐकवीन केव्हातरी आपल्यालाही. अरे आप सुनो तो सही तात्या का गाना! :) आपला, (अण्णांचा मानसशिष्य) तात्या.

वरदा 26/03/2008 - 20:47
आज वेळ झाला तर सगळे व्रुत्तांत वाचुन काढले...सॉलिड आहेत्....बखर लिहिण्याची आयडीया कशी सुचली?...सहीच आहे एकदम्...सॉरी खूप उशीरा प्रतिक्रीया दिल्याबद्दल....

प्राजु 26/03/2008 - 22:50
विजुभाऊ.. एकदमच भारी... सगळा वृतांत वाचून... डोळ्यासमोरच घडते आहे सारे असे वाटले. आणि मिपाकरांच्या अंगात बर्‍याच कला (आणि कळाही) आहेत हे समजले. धन्य पावलो आम्ही. - (सर्वव्यापी)प्राजु

अघळ पघळ 27/03/2008 - 02:59
विजुभाऊ तुझी ही श्टाइल आवडली रे! सगळ्यांच्या गमती जमती सांगीतल्यास पण आमच्या इनोबाचे काय? तुझ्या सारखा गुजराथी माणुस आजकाल मराठी संकेतस्थळांचे कट्टे गाजवतो म्हणून सगळा वेळ तो नुसता त्या फोटोतल्या सारखा रागीट चेहरा करुन बसला होता का काय? ही ही ही..सर्वांनी ह.घ्या.रे

In reply to by अघळ पघळ

इनोबा म्हणे 27/03/2008 - 10:54
तरी म्हटलं बरेच दिवस दिसला का नाहीस.मुद्द्याची वाट पाहत बसला होतास की काय?(तिकडून निरोप आला वाटतं) :) बाकी काहीही म्हण तुझ्यासारखी (केवळ जन्माने)मराठी माणसं आणि विजुभाऊंसारखा दिलखूलास गुजराथी माणूस पाहील्यानंतर चांगलं आणि वाईट यातला फरक कळला हो! आमच्यातला फरक त्यांनाही जाणवलाच असावा,कारण आम्हीही त्यांना मनमूराद दाद दिली(तुझ्यासारखी खाज-खुजली नव्हे :) बाकी आमच्याकडून काही चूकलं असेल तर विजुभाऊ आम्हाला माफ करतीलच.काय विजुभाऊ! आमचा खुललेला चेहरा पाह्यला तुला कट्ट्यालाच यायला लागेल बरं का! पण त्यानंतर तूझा चेहरा कसा होईल ह्याची तूच कल्पना कर :) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विजुभाऊ 27/03/2008 - 12:55
रे बाबा अघळपघळ्या तुझ्या सारखा गुजराथी माणुस म्हणजे काय ? हे असे असणे चांगले की वाईट? ..................किंचीत गुजराथी विजुभाऊ बरे झाले तु सांगुन टाकले ते ....मला गुजराथी अस्खलीत लिहीता वाचता बोलता येते एवढेच.

कविवर्य मेहेर्बान उले उलेमान केशवसुमार यांच्या विडंबनांची खुमारी सांगणे न लगे दश हजारी मनसाबदार सरदार चित्तर ह्यांचेही णरडे फक्कड गाते......... हे झकासच. मज्जा आली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

In reply to by विजुभाऊ

सध्या अंथरुणावर खिळून असल्याने, मुद्दाम असे कुणाला भेटता येत नाही... त्यामूळे, जुने कट्ट्याचे धागे उपसून काढतो आणि फोटो रुपी तरी का होईना, पण मिपाकरांना भेटतो.

3

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ५)

चतुरंग ·

केशवसुमार 26/03/2008 - 08:35
रंगाशेठ, उत्तम चालू आहे..चालू द्या.. पेग भरायचा वेग जरा मंद झाला आहे का?!.... केशवसुमार

गूढ अर्थ आहे प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दात. मी आत्तापर्यंत त्याला मद्यगीतच समजत होते. बरे झाले तुम्ही मराठीत त्याचे भाषांतर केलेत (अभिजात हिंदीच काय सामान्य हिंदी पण माझी दांडी उडवते). हरिवंशरायांच्या काव्य प्रतिभेला आणि तुमच्या अनुवाद कौशल्याला शत शत नमन. असितगिरीसमं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रं... > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

धनंजय 26/03/2008 - 09:23
मस्त चालू आहे. हे अत्यंत कठिण काव्य आहे, तुम्हाला वेळ लागणे साहजिक आहे. लगे राहा. रुबाई क्र २३ चा भावानुवाद पटला नाही - कदाचित मी चुकीचा वाचत असेन. हिंदीतला अर्थ मला असा वाटतो : (पहिल्या दोन ओळी) जग प्याल्याला, मदिरेला, पीणार्‍याला नावे ठेवते (तिसरी ओळ) अर्थातच जगाची-मदिरेची जोडी जमणारच नाही (चौथी ओळ) कारण जग जरासन्न आहे, तर मधुशाला नित्यतरुण आहे तुमची तिसरी ओळ आहे की : "मद्यपी-वारुणीची जोडी मनास येत नाही", बाकी ओळी साधारणपणे हिंदीतल्यासारख्याच. "मद्यपी-वारुणीची जोडी मनास न ये" चा काय संदर्भ लावावा? रुबाई २४ : "मधुशाला" हे यमक पहिल्या ओळीत घेतले हे मुळीच रुचले नाही. या काव्यात "मधुशाला" हा शब्द गझलेच्या काफियासारखा महत्त्वाचा आहे. (पहिला शेर सोडला तर) गझलेच्या बाकी कुठल्याही शेरात काफिया पहिल्या ओळीत चुकून योजला तर ज्या प्रकारचा रसभंग होईल, त्याच प्रकारचा रसभंग येथे होत आहे. तो टाळावा. "द्रोहि आणि त्या दासांमधुनी..." येथे "त्या" शब्द केवळ वृत्तपूर्तीसाठी घातल्यासारखा वाटतो. तो खटकतो. दास "ते" पण द्रोही "ते" का नाहीत? मुळात दास-द्रोही सामासिक शब्द आहे, दोन्ही समसमान वजनाचे आहेत. "द्रोही आणिक दासांमधुनी..." असे करूनही मात्रा भरतात. रुबाई २५ : "दिवाळी" वापरायची कल्पना मस्तच. (बहुतेक मराठी वाचकांना मुसलमानी सण/शोकप्रसंग जड जातील असे वाटते का? पण काही असो, दिवाळी पटते खास.)

In reply to by धनंजय

चतुरंग 26/03/2008 - 19:58
एक वेगळे परिंमाण लाभते आहे त्याबद्दल प्रथम धन्यवाद. रुबाई २३ - पटे कहाँ से, मधु औ' जग की जोड़ी ठीक नहीं, (तिसरी ओळ) अर्थातच जगाची-मदिरेची जोडी जमणारच नाही तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे कारण पहिल्या आणि चौथ्या ओळीतही जगाचाच संदर्भ दिलेला आहे. तेव्हा मद्यपि-वारुणी हे तितकसं ठीक नाहीये. मी त्यात बदल करेन. रुबाई २४ - बरोबर अगदी बरोबर - इथे संपूर्ण चार ओळीचा तोल काहीसा ढळल्यासारखा जाणवत होता, तो पहिल्या ओळीच्या शेवटी आलेल्या 'मधुशाले' मुळे! माझा 'रुबाई' ह्या प्रकाराचा अभ्यास नसल्यामुळे असेल, मला ते लक्षात आले नाही. तुम्ही अगदी नेमकी पकडलीत त्रुटी, कौतुक आहे! हे सुध्दा बदलावे लागेल. (अवांतर - मधुशालेमुळे तोल जावा ह्यात नवल नाही पण त्याचा अनुवाद करताना जाऊ द्यायचा नाही हे महाकठिण, काय विरोध आहे!) "द्रोही आणिक दासांमधुनी..." - काय योगायोग? अहो इथेही सुरुवातीला मी अगदी हेच शब्द वापरले होते पण नंतर संपादना दरम्यान मी त्यात बदल केला. कारण मला "द्रोही आणि त्या.." असे जास्त गेय वाटले - पण त्या बदलाबदलीत सामासिक शब्दाचा कासोटा सुटला!;) रुबाई २५ - 'दिवाळी' वापरण्यामागचा उद्देश म्हणजे आपला हिंदी सण आहे हा तर आहेच. शिवाय 'होळी' चा ज्वालेशी संबंध येतो आणि दिवाळीचाही. होळीत अभद्राचा नाश आहे तर दिवाळीत तेजाचा उत्सव त्या अर्थानेही हा बदल मला चपखल वाटला. चतुरंग

जुना अभिजित 26/03/2008 - 10:02
चतुरंग.. मीही जेव्हा प्रथम मधुशाला वाचलं होतं तेव्हा असाच भारावून गेलो होतो. रुबायांमधल्या कल्पनांची झेप थक्क करुन टाकणारी आहे. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्राजु 26/03/2008 - 22:16
निर्जन होती जागा सगळ्या, कधीतरी ज्या गजबजल्या, जळत राहि ते स्मशान आणिक, असेल जागी मधुशाला ||२२|| क्या बात है... - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 27/03/2008 - 07:13
राज्य खालसा होउन जाई, भाग्य जाय ते दिगंतरा, असेच जमतिल मदिराप्रेमी, राहिल जागत मधुशाला ||२१|| निर्जन होती जागा सगळ्या, कधीतरी ज्या गजबजल्या, जळत राहि ते स्मशान आणिक, असेल जागी मधुशाला ||२२|| द्रोही आणिक दासांमधुनी विजय मद्य अन प्यालाचा जगज्जेति ही होउन आली, आता माझी मधुशाला ||२४|| राहि भरुनि जरि हे मदिरालय, जग ते देखे दुष्काळा, बुडते जग ते तमात सारे, येथ होळीची ती ज्वाला, दु:ख न ठावे कसे तिला, जी स्वर्गातुन उतरे मदिरा, असता शोकाकुल जग सारे, करे दिवाळी मधुशाला ||२५|| वा रंगा! नेहमीप्रमाणेच अप्रतीम! अगदी भरून पावलो..! तुझी मधुशाला आता अगदी छान रंगू लागली आहे! तात्या.

गंमत

सचिन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला असेच आलेले ढकल निरोप ... तुम्हांपैकी कित्येकांनी वाचलेही असतील...आणि काहींनी नसतीलही ... १. आयुष्यात आपण कधी ना कधी हे प्रश्न स्वतःला विचारलेच पाहिजेत : आपण कोण आहोत ? कोठून आलो आहोत ? कोठे निघलो आहोत ? आणि जेंव्हा तिठे पोहोचू, तेंव्हा ...तिथले... बार उघडे असतील का ...? २. जो एकटा पितो तो नरकलोकात जातो जो दोस्तांबरोबर पितो तो स्वर्गलोकात जातो आणि...जो पीतच नाही तो...तो..."जसलोकात" जातो...! ३.

दिवस जुने ते स्मरायचे

केशवसुमार ·

विसोबा खेचर 26/03/2008 - 01:11
माझ्या तू घरच्यापाशी थांबव गाडी जराशी पायर्‍या चुकून पडायचे हम्म! केश्या, लेका तू काही सुधारायचा नाहीस! :) अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :) असो, चालू द्या. पुढील विडंबनाची वाट पाहतो आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे 26/03/2008 - 01:38
अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :) बाकी इडंबन फर्मास... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

बेसनलाडू 26/03/2008 - 01:32
वाटेत शोध बेदाणे भरारे ग्लास हे पार वाटावा सुरे चा भार घोटात रिकामे करायचे यातील सहजपणा विशेष भावला. बाकीचे तेच. (वाचक)बेसनलाडू

प्राजु 26/03/2008 - 03:09
फर्मास विडंबन... रस्त्यात हिंडत जाणे वाटेत शोध बे दाणे चकण्यास दाणे ते असायचे हे एकदम भारी... - (सर्वव्यापी)प्राजु

उदय सप्रे 26/03/2008 - 09:17
प्रिय केशवराव, तुमच्या सगळ्याच विडंबन कविता एकदम झकास आणि सहज असतात, तुमची भाषा सम्पत्ती खूपच प्रगल्भ आहे ! घरी आला असतात आणि निवांतपणे भेट झाली असती तर आणखीनच बरे वाटले असते, असो, पुढल्या वेळी नक्की ! तुमच्या "नसतेस घरी" विडंबन वरून स्फूर्ती घेवून मी पण एक विडंबन केले आहे, बघा वाचून..... उदय सप्रे

केशवसुमार 26/03/2008 - 17:19
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

वेलणकरशेठनी केलेले सुंदर विडंबन झोप आल्यावाचून लोळायचे वाचून आमची झोप उडाली (वेलणकरशेठ, तुम्ही सुद्धा !!) मग जालावरून मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम रचना दिवस तुझे हे फुलायचे शोधणे आले आणि मग पुढचं सगळे नेहमीचेच..गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता..
दिवस जुने ते स्मरायचे
आठवणी काढून हसायचे

रस्त्यात हिंडत जाणे
वाटेत शोध बे दाणे
चकण्यास दाणे ते असायचे

गाठावी मित्राची खोली
जमावी पारटी ओली

पुणेरी पाट्या

ठणठणपाळ ·

प्राजु 26/03/2008 - 02:23
इथे कोणतेही साहित्य प्रकाशित करताना ते आधी मिपा वर प्रकाशित केले आहे की नाही याची खात्री करावी. पुणेरी पाट्या या विषयावर इथे चर्चा-चर्वण आणि बरेच काही झाले आहे या आधी. आपण आधीचे लेखन पाहून मगच इथे प्रकाशित करावे अथवा दुवा द्यावा ही विनंती. सरपंच, जरा लक्ष घालावे.. ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

अहो पुण्याच्या पाट्या हा जागतिक जिव्हाळ्याचा विषय आहे... त्यामुळे चालायचच तो विषय परत परत येणे.. पुण्याचे पेशवे

In reply to by मदनबाण

चतुरंग 28/03/2008 - 07:20
आणि हा 'उघड्यावर शौचालयास बसणे' काय प्रकार आहे? फक्त 'शौचास बसणे' पुरेसे आहे, 'लयास' कशाला जायला हवे?:)!!! आणि सकाळी सकाळी लोक काय शोधत हिंडणार कोण कुठे बसला आहे का ते बघत?!! चतुरंग

In reply to by विसोबा खेचर

सुशील 28/03/2008 - 09:28
(हागरा!) तात्या. तात्या प्लीज असले विनोद जास्त येउ देउ नका नाहीतर तो बाळासाहेब चौगुले सारखा प्रकार पुन्हा व्हायचा.

In reply to by विसोबा खेचर

सुशील 28/03/2008 - 09:39
तात्या काय हे? मी तुम्हाला मानतो राव प्लिज माझी असली चेष्टा करु नका

मदनबाण 28/03/2008 - 08:24
जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले तर मात्र बसणार्‍यांची संख्या मात्र कमी होईल याची मला खत्री वाटते !!!!! (संत गाडगेबाबा प्रेमी) मदनबाण

In reply to by मदनबाण

जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले 'बसणार्‍यांना' २०१ रु. दिले जाणार नाहिएत. त्यांना दंड होणार आहे. नाहीतर सगळेच जणं नोकरी-धंदा सोडून तिथेच 'बसायला' धावतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 30/03/2008 - 13:10
पेठकर साहेब गल्ल्त नको, बसणार्‍यास= २०१ दंड दाखवुन देणार्‍यास = ५१ बक्षिस नविन निविदा :-- दाखवुन देणार्‍यास =२०१ बक्षिस

In reply to by मदनबाण

गल्लत माझी नाही आपली झाल्यासारखी वाटते आहे. जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास ह्याचा अर्थ बसणार्‍यास २०१ रु. देण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. द्यावेत. इथे असे म्हणायला हवे होते की बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 30/03/2008 - 14:12
बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे. मलाही हेच म्हणायचे होते,पण ते माला योग्य शब्दात मांडता आले नाही.

मनापासुन 28/03/2008 - 19:33
कोण म्हणते की सरकार बेरोज्गारांसाठी काहीच करत नाही .बघा सरकारने रोजगार निर्मिती केली की नाही. रोजगार निर्मीती करणार्‍या सरकारला मनापसुन धन्यवाद.

मित्रहो! वेळात वेळ काढून खालील वेब्साईट पहा. http://www.busybeescorp.com/puneripatya/thumbnails.asp पुणेरी पाट्यांचे अनेक नमुने बघायला मिळतील.

सरकारी परवानगीचे महत्व किती?

देवदत्त ·

चतुरंग 25/03/2008 - 22:07
कोणतीही जमीन परत मिळवण्याचा हक्क सरकारला असतो आणि त्यात राहती घरे, वसाहती सुध्दा अंतर्भूत असतात. उदा. रस्तारुंदीसाठी जमीन ताब्यात घेणे, धरणासाठी घेणे इ. आता प्रश्न असे की ह्यातले कायदेशीर काय? ते कोण ठरविणार? त्यात न्याय संस्थेचे अधिकार व वर्चस्व किती? आणि त्यात भ्रष्टाचार असला तर ह्या सगळाचे काय होणार? त्या विशिष्ठ जागेच्या बाजारातील किमतीशी तिथे भ्रष्टाचार होण्याची शक्यता समप्रमाणात असते एवढेच आत्ता तरी वाटते! चतुरंग

अनिकेत 25/03/2008 - 23:05
Right to property भारतीय संविधानाच्या article 19(1)(f) आणि article 31 मध्ये मूलभूत अधिकारांमध्ये(fundamental rights) होता, परंतु नंतर (बहुधा ७८ साली article 31, १९(१)(फ) माहित नाही) काढून टाकण्यात आला. So, the right to proprty is no longer the fundamental right of the citizens of India. अर्थात, जर सरकार सबळ कारण देऊ शकले (जे ते देईलच), तर ते तुम्हाला राहत्या घरातूनही हुसकून लावू शकते. कुठेतरी ढेकणाच्या **त पर्यायी जागा देईल कदाचित. अनिकेत

प्राजु 26/03/2008 - 02:27
आता प्रश्न असे की ह्यातले कायदेशीर काय? ते कोण ठरविणार? त्यात न्याय संस्थेचे अधिकार व वर्चस्व किती? आणि त्यात भ्रष्टाचार असला तर ह्या सगळाचे काय होणार? त्या विशिष्ठ जागेच्या बाजारातील किमतीशी तिथे भ्रष्टाचार होण्याची शक्यता समप्रमाणात असते एवढेच आत्ता तरी वाटते! चतुरंग यांच्याशी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

वनखात्याने आक्षेप घेऊन, न्यायालयाने बांधकामास बंदी घातल्यानंतरही काही बिल्डर्सनी आपापल्या इमारती पूर्ण केल्या. त्यांच्या पाठीशी निश्चितच नगरसेवकांचा, आमदारांचा आणि मंत्र्यांचा 'अर्थ'पूर्ण वरदहस्त असणारच. त्याशिवाय हे कसे शक्य आहे? सामान्य जनतेला ह्या सर्वाची कल्पना नसते. काही जुजबी चौकशा करून, त्यावर समाधान मानून, तो जन्मभराची पुंजी पणास लावत असतो. असे होऊ न देता त्या - त्या क्षेत्रातील नगरसेवक, प्रशासकिय अधिकारी ह्यांना जबाबदार धरून योग्य ती कारवाई केली पाहिजे. त्या शिवाय भ्रष्टाचाराच्या रक्तास चटावलेल्या ह्या हिंस्त्र श्वापदांना वचक बसणार नाही.

देवदत्त 30/03/2008 - 13:15
वेळेअभावी प्रतिक्रियेला उशीर झाला. माहितीबद्दल धन्यवाद. ह्यात योग्य त्या कारणासाठी जागा परत मिळविणे (त्यात रस्ता रूंदीकरणात थोडी जागा जाणे, पर्यायी जागा मिळणे हे आले) हे थोडेफार पटते. परंतू ह्यात नेहमीच समाधानकारक पर्याय मिळतात असे नाही असे ऐकले आहे. ह्याठिकाणी माझा मुद्दा होता की जर वनखात्याची जागा होती तर सरकारने परवानगी का दिली, काही कारणास्तव सरकारला हक्क मिळाला असेल तर मग आता सरकारी परवानगी रद्दबातल ठरविणे कितपत योग्य आहे? कारण ह्यात आता गरजेकरीता जागा परत घेणे हे दिसत नाही पण सरकारचा निष्काळजीपणा दिसतो. इथे सरकारी अधिकार्‍यांचा दोष लक्षात घेतला जात नाही आहे. त्यातल्या त्यात सरकारी वकीलांचा युक्तिवाद मला तरी हास्यास्पद वाटला. पण न्यायालयाने तो मंजूर केला त्यामुळेच मी म्हटले की सरकारी परवानगीला काही महत्वच राहिले नाही आहे. मग अनधिकृत झोपडपट्ट्या अधिकृत करण्यामागच्या सरकारी पावलांवर न्यायालय का वेसण घालत नाही असे वाटते.

परवानगी देणारे वनखात्याचे, कलेक्टर ऑफिसमधले तसेच महापालिकेतील्/ग्रामपंचायतीतील विविध सरकारी/नइमसरकारी अधिकारी, जागा विकणारे बिल्डर यांचा गुन्हा नाही काय? असेल तर काय कारवाई त्यांच्याविरूद्ध झाली? जागा विकत घेणा-यांना नुकसानभरपाई कोण देणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

मदनबाण 30/03/2008 - 18:06
प्रत्येक ठिकाणी नवे उल्हासनगर बनत राहणार आणि वनसंपदा अशीच नष्ट होत राहणार.टेबला खालुन पैसे दिले जाणार आणि इललीगल काम लगेच लीगल होत जाणार..... भुखंडा चे श्रिखंड सर्व मिळुन खाणार आणि नंदलाल सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी मात्र जेल यात्रा करत राहणारा..... (वनप्रेमी ठाणेकर) मदनबाण

काल ऐकले होते,आज वृत्तपत्रात वाचले की, बोरिवली, घोडबंदर रोड, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, नाहूर आदी परिसरातील सुमारे १०० एकर जमीन 'खासगी वनजमीन' म्हणून घोषित केली गेली आहे. त्यामुळे तिथे राहणायांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. खरेच आहे, गेले अनेक वर्षे स्वत:चे ,कर्जाचे पैसे घेऊन घर विकत घेतल्यावर ह्या निर्णयाने धक्का बसणारच. २ वर्षांपूर्वी दिल्लीमध्येही हेच झाले होते.

मी नाही अभ्यास केला

देवदत्त ·

विसोबा खेचर 25/03/2008 - 21:30
दुपारचे वाजले चार _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले चार आईन दिला मार मार खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले दहा _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले दहा बाबांचं थोबाड पहा थोबाड पाहण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले अकरा _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीचे वाजले अकरा बाबांनी कापला बकरा मटण खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला :) तात्या.

देवदत्त 25/03/2008 - 21:34
धन्यवाद तात्या, ह्यातील 'बकरा' आणि 'थोबाड पहा' हे शब्द असल्यासारखे वाटत होते. कडवी पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.

ठणठणपाळ 25/03/2008 - 22:24
>रात्रीचे वाजले अकरा बाबांनी कापला बकरा मटण खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बाबांनी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? मी असं ऐकलं आहे, रात्रीचे वाजले दहा झोप आली पहा डुलक्या घेण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला ठणठणपाळ

In reply to by ठणठणपाळ

विसोबा खेचर 26/03/2008 - 08:46
रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बाबांनी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? हो खाल्ला आहे. काय म्हणणं आहे तुमचं?!:) बाय द वे, रात्रीच्या अकरा वाजता कधी तुमच्या बानं तरी बकरा कापून खाल्लाय का हो, तात्या? असं ठसक्यात तर तुम्हाला विचारायचं नव्हतं ना?:) ठणठणपाळराव, 'बानं' ऐवजी 'बाबांनी' हा शब्द वापरल्यामुळे तुमच्या प्रश्नातली सगळी मजाच निघून गेली! :) असो... धन्यवाद ठणठणपाळराव, या निमित्ताने आम्हाला आमच्या बा ची आठवण झाली! १९९७ साली वारला बिचारा! खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! असो.. आपला, ('बा' च्या आठवणीने अचानक हळवा झालेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ठणठणपाळ 26/03/2008 - 21:51
>खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! वाचून वाईट वाटलं. यालाच जीवन ऐसे नाव..आणखी काय! ठणठणपाळ

In reply to by विसोबा खेचर

या निमित्ताने आम्हाला आमच्या बा ची आठवण झाली! १९९७ साली वारला बिचारा! खूप मारायचा मला, परंतु प्रेमही तेवढंच करायचा! पण ते त्याला कधी दाखवता आलं नाही! अपघाती मृत्यु आला त्याला, परंतु मरता मरता माझंच नांव त्याच्या तोंडी होतं असं पोलिसांनी सांगितलं मला! तात्या, डोळे भरून आले. फार वाईट प्रसंग. असो. ईश्वरेच्छा, दूसरे काय म्हणणार आपण.

प्रमोद देव 26/03/2008 - 08:55
दुपारचे वाजले चार _ _ _ _ _ _ _ _ _ _ एक तास गेला मी नाही अभ्यास केला दुपारचे वाजले चार आईने दिला मार रड रड रडण्यात वेळ गेला मी नाही अभ्यास केला

yogeshpatil 20/09/2008 - 02:23
रात्रीचे वाजले बारा आकाशात दिसला तारा तारा पाहण्यात एक तास गेला पण मी नाही अभ्यास केला

In reply to by yogeshpatil

हे माझ्यासाठी असणार पहा कसं ते: ;-) रात्रीचे वाजले बारा आकाशात दिसला तारा तारा पाहण्यात एक तास गेला बघा मी अभ्यास केला! ("तारका") अदिती

http://vipravani.wordpress.com/ मला कविता येत नाही. नाही तर ह्या कवितेत आधुनिकपणा आणला असता. बा लोक बाप असतात. ते काय पण करु शकतात. वि.प्र.

लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी. (नवीन काही असल्यासही चालेल.