हम्म.....
बेष्ट...भूकच लागली ना राव!
च्यामारी, वडापावच॑ आत्मवृत्त वाचून दिल्लीतले दिवस आठवले.
वडापाव खाण्यासाठी इतका व्याकूळ झालो होतो की "दिल्ली हट" मध्ये जाऊन आख्खे ३५ रुपये टेकवून २ वडे आणि पाव खाल्लेले आठवल॑. खर्रय बॉ...वडापाव तो वडापाव!
स्वत:च्या स्वभावात चवदार, चविष्ट, खमंगपणा आणा आणि दुसर्याला पण तसंच अगदी मस्त मजेत चवीचवीने जगायला शिकवा! अहो तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे, एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला? साली दोन घटकांची जिंदगी आपली!
तात्या एकदम पटल :-- मस्त मजेत चवीचवीने जगायलाच पाहिजे.....
(कुंजविहार आणि राजमाता येथील वडापाव चाखणारा --ठाणेकर)
मदनबाण
वा ! तात्या! लई ब्येस लिवलंया! खान्याच्या वस्तु बगून जास्त काय बलावं ते सुधरत नाय बा!
आरं पन त्ये खायची गोष्ट हाय! नुस्ता लिवून ने फोटू बगून आम्चा पॉट कसा भरनार?
पोटाची बी काय तरी सोय करा. त्वांडाला पानी सुटलं की आमच्या.
बाकी काही म्हणा वडापाव तो वडापाव्...........मग तो पुणेरी जोशांचा असुदे किंवा जम्बो किंग चा वडा पाव मस्त सोलापुरी चटणी आ हा हा................स्स्स्स्स्स्स्स्स्स्स :
देशी बर्गर.......पण बाहेरच्या सारखे जाड सालीचे वडे कसे बनवायचे ते कोणी सांगाल का?
घरचे वडे पावात कोंबले की ते पार वेगळेच लागतात
अहो तात्या तात्या काय मस्त विषय घेतलाय...
फोटो बघुनच मन तृप्त झाले.
इडलीचटणी - हा तर एकदम वीक पॉईंट... अगदी बरोब्बर सांबारापेक्षा चटणीची मजा काही औरच!
स्वत: उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब!
मस्त!
पण सिंधी माणसाचं डोसकंच लै अवली बघा! त्यानं प्रथम मला पावात भरला आणि 'वडापाव' हे नांवा रातोरात फेमस झालं!
नाही तात्या... आपल्या मराठमोळ्या पदार्थाचे श्रेय सिंध्यांच्या गळ्यात घालू नका... काहीही असो... वडापाव मराठी होता मराठी आहे मराठी राहील!
आपली छत्रचामरं दुसर्यांना का बरे काढून द्या?
अवांतर : ऑफिसमध्ये बसल्याबसल्या असे वाचले की खूप उचंबळून येते.. ७ कधी वाजतात असे होते.
(वाडेश्वरची इडलीचटणीप्रेमी आणि चौकातल्या हातगाडीवरील वडापावभक्त) मनस्वी
नाही तात्या... आपल्या मराठमोळ्या पदार्थाचे श्रेय सिंध्यांच्या गळ्यात घालू नका... काहीही असो... वडापाव मराठी होता मराठी आहे मराठी राहील!
कबूल! शब्द मागे घेतो, परंतु तेवढ्यावरून आता इथे वाद सुरू होऊ नये असे वाटते!
आपला,
(उदास!) तात्या.
सुरेख कल्पना आहे. मिसळ पहिल्याच भागात शोधत होतो, पण पुढच्या भागात येतेय हे वाचून हायसं वाटलं. बाकी इडली-बटाटावडा आणि शिरा-मिसळ म्हणजे सात्विक-तामसी जोड्याच!.
आणि तुझ्याच 'माझा परजातप्रवेश' मध्ये ज्याबद्दल लिहिलंय ती खानदानी, नबाबी दम गोश्त बिर्याणी ; पंजाबी तगडी लस्सी; ऐसपैस पण हिशोबी खमण-ढोकळा अशी अनेक मंडळी रांगेने उभी आहेत:)
लिहिलय की :)
आवडल.
बटाटावड्याच आत्म चरित्र झ्याक वाटल.
साला दोन घटकांची जिंदगी हेच अंतिम सत्य.
इडली तर मला नेहमी चटणी सोबतच आवडते.
ते देखील छान जमलय.
इडलीच आत्मचरित्र वाचुन एक नाजुक साजुक छान दिसणारी सभ्य अशी साउथ इंडियन मुलगी आली नजरेसमोर :)
तुमची ही पहिली दोन 'पदार्थचित्रे' खासच भावली!
अहो कालच गरमागरम इडल्यांचा आस्वाद घेतलाय ना! (आमच्या सौ. फारच भारी करतात हो इडल्या, त्याबाबतीत आपण भाग्यवान आहोत!)
स्वत: उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब!
क्या बात है तात्या! अहो हे असं व्यक्तिरुप देताय ना तुम्ही त्यामुळे पुढच्या वेळी वडापाव खाताना उगीचच अपराधी वाटेल की काय अशी भीती वाटतेय!;)
चतुरंग
आपल्या मिपावर शोभेल असा. झकास जमला आहे. पोटात आग पडली. तमिळनाडूत 'सरवान' मध्ये इडलीबरोबर तीन वेगवेगळ्या चटण्या मिळतात बरे का.
आता खातोच काहीतरी. वा. नशीब. जेवण तयार आहे. मिरच्या तळायचीच ऑर्डर देतो.
धन्यवाद.
चिंचेची, खोब-याची व टोमॅटोची.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
गरमगरम इडल्या मिळाल्या, अगदी हलक्या आणि चवीला छान होत्या!' असं माझं वर्णन बर्याचदा केलं जातं
सकाळी सकाळी कित्येक लोकं न्याहरी म्हणून माझ्याच गरमागरम चवीला प्राधान्य देतात.
सांबारापेक्षा छानशी दक्षिण भारतीय पद्धतीची चटणी, ही माझी अतिशय प्रिय मैत्रिण!
मार डाला! विशेषत: सक्काळी सक्काळी, धारवाडच्या दक्षिणेला कुठेही, केळीच्या पानावर वाढलेली गरमागरम वाफा येणारी इडली एखाद्या टपरी हाटेलात खावी. चंदनी अगरबत्तीच्या सुगंधात न्हाऊन! आणि काउंटरवरच्या इडलीइतकेच शुभ्र शर्ट-लुंगी नेसलेल्या अण्णा-अप्पाला "अय्योय्यो! स्वामी, तुम्हारे जैसा इडली और किसीको जमताइच नही" म्हणून दाद द्यावी!
आपण साला एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व आहे बघा साहेब! आपल्याच मस्तीत जगणारा! आपलं नांव पण एकदम लै भारी आहे.."
आयला, दचकलोच! मला एकदम वाटलं की हा तात्या माझंच व्यक्तिचित्र लिहितोय की काय? :))
स्वत: उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब!
वा, जवाब नही!!!
तुमी तुमचं ते व्यक्तिचित्र की आत्मचरित्र का काय म्हणतात ते सांगा म्हणाले म्हणून एवढा वेळ तुमच्याशी बोललो साहेब! पण आता आपल्याजवळ तुमच्याशी बोलायला जादा टाईम नाय!
नायतर काय! डेक्कन एक्सप्रेस यायची वेळ झाली नाय काय!!:))
तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे, एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला? साली दोन घटकांची जिंदगी आपली!
खरंय बाबा, आपली सगळ्यांचीच जिंदगी साली दोन घटकांची!!
काल रात्री भाईकाका स्वप्नात आले होते आणि मला म्हणाले,
साला, तुझ्या बरे भाईकाका स्वप्नात येतात! आमच्या स्वप्नात साला प्रयत्न करकरून सुद्धा येत नाहीत!! आमच्या स्वप्नात सदानकदा फक्त मुकुंद टाकसाळे!!:)))
असो. मस्त लिहिलंयस तात्या, आता पुढील भागांच्या प्रतिक्षेत!!
-पिवळा डांबिस बटाटेवडा
मी लगेच आधी जाऊन इडलीसाठी डाळ भिजत टाकली आणि कोलेस्टेरोल ला गोळी मारुन लगेच पुढच्या आठवड्यात वडे करायचं ठरवलं....
सोपे आणि नेहेमीचे पदार्थ आम्हाला नाही बुवा असं काही सुचत ते पाहुन्..आम्ही खायला टपलेले असतो...कसं सुचतं तुम्हाला इतकं छान लिहायला.....
मस्तच आहे....आता जाते खूप भूक लागली...पण पोळि खावी लागणार्..तीही आधी स्वतः लाटली की मगच मिळेल....
पोळीचंही आत्मचरित्र लिहा एकदा...माझ्या घरची पोळी म्हणेल्..रोज ही बाई किती कंटाळून बनवते मला पण खाताना अगदी पटापट जाते की मी पोटात.....
रोज ही बाई किती कंटाळून बनवते मला पण खाताना अगदी पटापट जाते की मी पोटात.....
अरे वा वरदा! पोळीचं आत्मचरित्रं तूच लिहायचा प्रयत्न कर की. नक्की जमेल तुला! वरील वाक्यानेच सुरवात कर! तुझ्या घरची पोळी थोडी तुझ्याचसारखी गोष्टीवेल्हाळ वाटते आहे, तिच्या मनात काही नाही! :)
ती बापडी पटकन तव्यावर पडते आणि तिथून छानशी फुगून ताजी, गरमागरम होऊन तुझ्या पानात पडते!
तव्यावरून डायरेक्ट पानात गरमागरम पडलेल्या पोळी इतकं दुसरं या जगात काहीही शुभ नाही, काहीही सुंदर नाही!
खरं की नाही वरदा? असो..!
पोळीच्या आत्मचरित्राची कल्पना सुरेख आहे. ते लिहायचा तू जरूर प्रयत्न कर! तुलाही जमेल!
तात्या.
परंतु अद्याप मूड लागत नाही. परंतु आता मात्र सर्व लेखन पूर्ण झाल्यानंतरच रौशनीला घेऊन मिपावर येईन. म्हणजे उगाच पब्लिकला वाट पाहायला लागायला नको..
तात्या.
भन्नाट कल्पना आहे..
तात्या काय मस्त कल्पनाशक्ती आहे तुमची. मस्त लिहिले आहे
हे पदार्थ करत असताना ते काय बोलत असतील? याची कल्पना सुद्धा किती छान..
मला नेहमी परोपरी समजावून सांगत असते की, 'बाई गं, हल्लीच्या जगात एवढा शांतपणा, सात्विकपणा उपयोगाचा नाही, तू थोडी माझ्यासारखी झणझणीत, चटपटीत हो!'
जाण्यापूर्वी एकच सांगतो, की मस्त मजेत जगा, स्वत:च्या स्वभावात चवदार, चविष्ट, खमंगपणा आणा आणि दुसर्याला पण तसंच अगदी मस्त मजेत चवीचवीने जगायला शिकवा! अहो तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे, एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला? साली दोन घटकांची जिंदगी आपली!
ही वाक्ये नेहमी वरील पदार्थ करताना आठवतील...
पोळीच्या आत्मचरित्राची कल्पना सुरेख आहे. ते लिहायचा तू जरूर प्रयत्न कर! तुलाही जमेल!
मी लिहीणार म्हणजे झालच कल्याण..लोक पळून जातील हो इथून...तुम्ही मस्त लिहीताय...येऊदेत मिसळ आणि साजुक तुपाचा शिरा....
तव्यावरून डायरेक्ट पानात गरमागरम पडलेल्या पोळी इतकं दुसरं या जगात काहीही शुभ नाही, काहीही सुंदर नाही!
हे अगदी खरं ती पोळी मऊ मुलायम टमाटम फुगलेली असावी आणि त्यावर मस्त तुपाची धार सोडावी..आणि ती आईने प्रेमानं वाढावी आणि जग तिथेच थांबून रहावं....नॉस्टॅल्जीक वाट्टय आता जाम....:((((
वा वा वा वा वा तात्या,
किती सुंदर लिहिले आहेस तू? अप्रतिम. इतके वर्ष जे पदार्थ रोज भेटत आहेत त्यांना तू बोलके केलेस. झकास लेखन.
कसं काय सुचतं बुवा तुम्हांला अशा वैविध्यपूर्ण गोष्टींवर लिहायला?
आपला,
(प्रभावित) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
प्रतिसाद देणार्या सर्व मंडळींचे मनापासून आभार..!
ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट, असा कोणताच प्रतिसाद देण्याच्याही लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार..! :)
तात्या.
मस्त एकदम. सकाळी मी मेदूवडा सांबारच खायचो नाश्त्याला. आता बटाटेवडा सांबार खातो :)
तात्या ते बटाटेवड्याचे फोटो पाहून लगेच वास दरवळला इथे. भूकही वाढली. :)
उंची प्लेटी नकोत आणि ते काटेचमचे नकोत, की काय पण नको आपल्याला. ४-५ रुपायात आम पब्लिक रस्त्यावरच्या गाडीवर वडापाव खातो आणि समाधान पावतो! अहो गरीबाच्या पोटाची थोडा वेळ तरी आग शमते! काय, खरं की नाय?
खरं एकदम.
अरे हो, आता शिव वडा ही मिळणार आहे ना काही दिवसांत. आणि आपल्याकरता आहेच हो कुंजविहार इथे
=P~ =P~ =P~
तात्या तुम्ही माझ्या खादाडीच्या अगदी विक पॉईन्ट वरच लेख लिहिला आहात, काय बोलु आता.
आता वाट पहाणे शक्य नाही बेत लगेच तयारीला लागते, त्या शिवाय जिवाला शात॑ता नाही लागायची.
अगदी मस्त लिखाण, आता इथुन पुढे इडली आणि बटाटे वड्याला विचारूनच त्या॑ना पोटात ढकलणार.
इडली , बटाटावडा ...मस्त अगदी .
तात्या , छान लिहीलत. मजा आली वाचताना. धन्यवाद.
उंची प्लेटी नकोत आणि ते काटेचमचे नकोत, की काय पण नको आपल्याला. ४-५ रुपायात आम पब्लिक रस्त्यावरच्या गाडीवर वडापाव खातो आणि समाधान पावतो
-- एकदम सही
मिसळीचे व्यक्तीचित्र तुम्ही छान रेखाटाल . मिसळी बद्दल तुमच्या शैलीत लिहीलेले वाचायला खूप आवडेल.
(पुढील पदार्थांच्या आत्मकथनाच्या प्रतिक्षेत ) ईश्वरी
प्रतिक्रिया
वा
कल्पना
अरे वा!
वा..
हम्म..... बेष
साली दोन घटकांची जिंदगी आपली!
परसन्न सैली!
देशी बर्गर.......
अतिशय स्वादिष्ट लेखनप्रपंच!
कबूल..
:-||
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
झकास
मस्त तात्या, मस्त!
बटाटावडा जास्त चवदार व झणझणीत ..........
एकदम फक्कड!
:)
जबर्या
तात्या
:)
रोशनी....
लिहितो लवकरच..
भन्नाट
तात्या
वा वा वा वा वा वा वा
आभार..
मिसळ
मस्तच
मस्त एकदम.
मस्त.
छान लिहीलत
चविष्ट लेखन!
प्रसादाचा शिरा