दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो.

संजीव नाईक's picture
संजीव नाईक in जनातलं, मनातलं
25 Mar 2008 - 9:55 am

|| ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ||
दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो.

श्रीगणेशायनमः|| ॐ अस्य श्रीॠणमोचन महागणपतिस्त्रोत्र मंत्रस्य भगवान् शुक्राचार्याॠषि: ॠणमोचनगणपतिर्देवता ॠणमोचनार्थे जपे विनियोगः ॐ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलं || महाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणमुक्तये ||१||

महागणपतिं देवं महासत्यं महाबलं || महाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणामुक्तये ||२|| एकाक्षरं एकदंतं एकब्रह्मसनातनं || एकमेवारव्दितीयं च नममि ॠणामुक्तये ||३|| रक्तांबरं रक्तवर्णं रक्तंगधानुलेपनं || रक्तपुष्पै: पूजामानं नमामि ॠणामुक्तये ||४||

कृष्णांबरं कृष्णवर्णं कृष्णगंधानुलेपनं || कृष्णपुष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||५|| पीतांबरं पीतवर्णं पीतगंधानुलेपनं || पीतपुष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||६|| धूम्रांबारं धूम्रवर्णं धूम्रगंधानुलेपनं || धूम्रपष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||७||

सर्वांबरं सर्ववर्णं सर्वगंधानुलेपनं || सर्वपुष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||८|| भद्रजातं च रुपं च पाशांकुशधरं शुभं || सर्वविघ्नहरं देवं नमामि ॠणमुक्तये ||९||

यः पठेत् ॠणहरस्तोत्रं प्रातःकाले शुचिर्नरः || षण्मासाभ्यंतरे चैव ॠणच्छेदो भविष्यति ||१०|| इति श्रीब्रह्मांडपुराणे ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रं संपूर्णम् |

अंगारकी योगानिमित्त मिसळपाव च्या समुदायास सप्रेम भेट
गणेश भक्त संजिव

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

25 Mar 2008 - 10:08 am | सृष्टीलावण्या

अनुभूती घ्यायलाच हवी. पण कर्ज कुठून आणायचे कमी करण्यासाठी?

*<|:-)}
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

आपण आम्हाला दिलेल्या या ॠणमोचनमहागणपतिस्तोत्राच्या ॠणातून मुक्त व्हायला तरी हे म्हणायलाच हवे.
! मंगालमुर्ती मोरया !

(गणेश भक्त) आर्य

पण कर्ज कुठून आणायचे - हे मात्र मान्य

हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का?
या असल्या स्तोत्रांचे आणि कर्मकांडांचे स्तोम माजले त्यामुळे भारत रसातळाला गेला.
असली स्तोत्रे म्हणत आपला क्रियाशील वेळ वाया घलवणार्‍या दहा तरुणांपेक्षा मैदानावर फूट्बॉल खेळून शरीर घडवीणारा एक तरूण शंभर पटीने चांगला.... हे विचार स्वामी विवेकानंदांचे आहेत .
क्रुपया असल्या भाकड अंधश्रद्धांचे प्रसार करु नका. ( हे त्या साईबाबा मिरॅकल्...अग्रप्रेषीतासारखेच .**** पणा आहे) अन त्यासाठी मिपा सदस्यांचा वापर तर मुळीच नको.
मेहनत करुन कर्ज मुक्त व्हायचे की स्तोत्रे म्हणुन......हे आपणच ठरवायचे.........
मला तर कष्ट करुन ( हो आय टी वाले ही बौद्धीक कष्ट करतात) आयुष्य मनसोक्त जगायला आवडेल
.............विजुभाऊ

सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी रुपये वाचले असते...
विदर्भातल्या कर्जाखाली पिचून आत्महत्या करणार्‍या शेतकरी बांधवाना सरकारने हे स्तोत्र शिकवण्यासाठी सरकरने स्तोत्र पाठशाळा काढाव्या....अशी शिफारस आपण करुया का?

भारत सरकारचे ६०,००० कोटी रुपये . असे म्हणायचे असावे.
असो. तर असे अंधश्रद्धा वाढवणारे लेखन आपल्या या संकेत स्थळावर प्रकाशित होवू नये याची काळजी घ्या !

- तळेकर

धमाल मुलगा's picture

25 Mar 2008 - 10:21 am | धमाल मुलगा

वा स॑जिव गुरुजी...

इथ॑ मिपावर बाकी सगळे प्रकार स्वच्छ॑दीपणे चालू होतेच. त्यात आपण आध्यात्मासारख्या घनग॑भीर विषयाला हाताळून एक वेगळेच वजन निर्माण केले आहे अस॑ मला वाटत॑. :-)

आपल्या इतर लेखा॑च॑ थोड॑ वाचन केल॑ही (झेपेल इतपत)...कि॑तु अजुन तरी आमची 'क॑फर्ट लेव्हल' (मराठी?) तिथेपर्य॑त न पोहोचल्याने प्रतिसाद देण्याचे टाळले.
असो.

अंगारकी योगानिमित्त मिसळपाव च्या समुदायास सप्रेम भेट
गणेश भक्त संजिव

धन्यवाद.

गणपती बाप्पा मोरया !!!

आनंद's picture

25 Mar 2008 - 1:50 pm | आनंद

कर्ज आपण घ्यायच आणि त्रास मात्र बाप्पाला द्यायचा!!!

अनिकेत's picture

25 Mar 2008 - 1:54 pm | अनिकेत

मी तर कर्जबाजारी आहे...
बघतो करून, कुणी सांगावं, सरकार एखादी कर्जमाफी योजना जाहीर करेल.

जाता जाता...हे स्तोत्र कर्जमुक्ती कशी देणार? सावकर्‍याला सद्बुध्धी देणार की मला घबाड? आणि आता कुणाला उधारी द्यायला नको.

अनिकेत

नीलकांत's picture

25 Mar 2008 - 2:21 pm | नीलकांत

मी सहजच विचारतोय...

काहीही न करता मी हे स्त्रोत्र एक वर्ष म्हटले तर सगळंच कर्ज फीटेल का? नाही आता विदर्भात कोरडवाहूच्या पाच एकरावरच्या अनेक शेतकर्‍यांना हे सांगू शकतो.

नीलकांत

विसोबा खेचर's picture

25 Mar 2008 - 8:18 pm | विसोबा खेचर

मिपावर काहीही वर्ज्य नाही...परंतु याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही उगीचंच अंधश्रद्धा पसरवणारे लेख लिहावेत!

गणेशस्तोत्र म्हटल्याने तुमचे कर्ज कमी झालेही असेल कदाचित, परंतु तो तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. परंतु म्हणून सगळ्यांनाच असा अनुभव येईल अशी उगाच भाबडी समजूत पसरवू नका प्लीज!

मिपावर तुम्हाला पुराणातलं, अध्यात्मातलं, काय लिहायचं ते लिहा, परंतु कृपया कोणतेही अंधश्रद्धा पसरवणारे लेख किंवा स्वामी समर्थांचे, साईबाबांचे चमत्कार सांगणारे लेख इथे लिहू नका. अन्यथा ते अप्रकशित केले जातील असं विनम्रपणे सांगू इच्छितो!

स्वामींचे, साईबाबांचे चमत्कार आणि त्यांचा अनुभव हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असू शकतो हे मी नाकारत नाही, परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती...

आपल्याला वैयक्तिकरित्या जर काही स्वामींचे अथवा साईबाबांचे अथवा गणपतीचे अनुभव आले असतील तर ते मला आलेले अनुभव असा स्पष्ट उल्लेख करून अवश्य लिहा, त्याला मिपाची कधीही ना नाही!

परंतु 'अमूक स्तोत्र म्हटल्याने अमूक होतं, तमूक देवाला नमस्कार केल्याने तमूक होतं' अशी कोणतीही जनरलाईज विधाने कृपया करू नका आणि अंधश्रद्धा पसरवू नका, ही नम्र परंतु शेवटची विनंती!

आपला,
स्नेहांकित,
(लालबागच्या राजाचा कट्टर परंतु डोळस भक्त!) तात्या.

असेल बुवा...
प्रेषक सृष्टीलावण्या ( मंगळ, 03/25/2008 - 10:08) .
अनुभूती घ्यायलाच हवी. पण कर्ज कुठून आणायचे कमी करण्यासाठी?
मना बोलणे नीच........
आपण दैनदिनी जिवनात कर्ज ( पैसा नव्हे ) घेत असतो. आपले उत्तर शेवटी बघा..........

" अनुभूती घ्यायलाच हवी. "
प्रेषक आर्य ( मंगळ, 03/25/2008 - 10:16) .
आपण आम्हाला दिलेल्या या ॠणमोचनमहागणपतिस्तोत्राच्या ॠणातून मुक्त ! मंगालमुर्ती मोरया !
आपले उत्तर शेवटी बघा..........

प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) .
हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का?
हे विचार स्वामी विवेकानंदाचे ग्रंथ आपण वाचले आहेत का?

तर सरकारचे ६०,०००कोटी रुपये वाचले असते......
प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) .
सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी

आपण व आपल्या मित्रानी योग्य नेता निवडु दिला होता का? असल्यास त्याला जाब विचारा?

प्रेषक धमाल मुलगा ( मंगळ, 03/25/2008 - 10:21) .
इथ॑ मिपावर बाकी सगळे प्रकार स्वच्छ॑दीपणे चालू होतेच. त्यात आपण....

याचे सर्व श्रेय श्री.. १) तत्या २) प्रदिप काका ३) प्रा. डॉ. प्र. बिरुटे ४) पेशवे ह्याना जाते.

प्रेषक आनंद ( मंगळ, 03/25/2008 - 13:50) .
कर्ज आपण घ्यायच आणि त्रास मात्र बाप्पाला द्यायचा!!!
सफ चुक.. उत्तर खाली बघा....

प्रेषक अनिकेत ( मंगळ, 03/25/2008 - 13:54) .
मी तर कर्जबाजारी आहे... बघतो करून, कुणी सांगावं, सरकार एखादी कर्जमाफी

परिश्रम करता वाळुतुन तेल ही निघे..........

प्रेषक नीलकांत ( मंगळ, 03/25/2008 - 14:21) .
मी सहजच विचारतोय... काहीही न करता मी हे स्त्रोत्र एक वर्ष म्हटले तर सगळंच कर्ज फीटेल का? »

उत्तर खाली बघा..........

प्रेषक विसोबा खेचर ( मंगळ, 03/25/2008 - 20:18) .
मिपावर काहीही वर्ज्य नाही...परंतु याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही उगीचंच अंधश्रद्धा पसरवणारे लेख लिहावेत!

गणेशस्तोत्र म्हटल्याने तुमचे कर्ज कमी झालेही असेल कदाचित, परंतु तो तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. परंतु म्हणून सगळ्यांनाच असा अनुभव येईल अशी उगाच भाबडी समजूत पसरवू नका प्लीज!

मिपावर तुम्हाला पुराणातलं, अध्यात्मातलं, काय लिहायचं ते लिहा, परंतु कृपया कोणतेही अंधश्रद्धा पसरवणारे लेख किंवा स्वामी समर्थांचे, साईबाबांचे चमत्कार सांगणारे लेख इथे लिहू नका. अन्यथा ते अप्रकशित केले जातील असं विनम्रपणे सांगू इच्छितो!

स्वामींचे, साईबाबांचे चमत्कार आणि त्यांचा अनुभव हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असू शकतो हे मी नाकारत नाही, परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती...

आपल्याला वैयक्तिकरित्या जर काही स्वामींचे अथवा साईबाबांचे अथवा गणपतीचे अनुभव आले असतील तर ते मला आलेले अनुभव असा स्पष्ट उल्लेख करून अवश्य लिहा, त्याला मिपाची कधीही ना नाही!

परंतु 'अमूक स्तोत्र म्हटल्याने अमूक होतं, तमूक देवाला नमस्कार केल्याने तमूक होतं' अशी कोणतीही जनरलाईज विधाने कृपया करू नका आणि अंधश्रद्धा पसरवू नका, ही नम्र परंतु शेवटची विनंती!

आपला,
स्नेहांकित,
(लालबागच्या राजाचा कट्टर परंतु डोळस भक्त!) तात्या.

माझ्या सर्व मिपा वरिल .टिपणीकार

आपन फसलात आहात ........... असो माझे सद्गरुच्या शोधात भाग १,२,३, प्रकशित झाले. पदे, स्तोत्रे, अभंग, गाणी ह्यातील छंद, स्वर, ताल, लय मनातिल चेतना जागृत करण्यास मदत करते. स्वामी विवेकानंद ह्यांनी सुध्दा विविध स्तोत्रे जगकल्याना करता म्हटली आहेत. तसेच शंकराच्यार्याणि सुद्धा क्रांती घडवण्यासाठी स्तोत्राचा उपयोग केला आहे.

श्री गणपत्ती स्तोत्र किवा पदे, अभंग, गाणी तालात सुरात लयबद्द गतिने म्हट्ल्यास शरीरातिल चेतना जागृत होऊन आपण योग्यतो निर्णय घेऊन शकतो. ह्याचाच उपयोग पुर्वीच्या संतानी केला आहे.

पण आताचे संत आपले श्रेष्टत्व स्थापन करण्यास निघालेले आहेत. माझ्या लेखाचा मुळ उद्देश अंधश्रद्धा पसरण्या संता पासुन समाज्यास रोखण्याचा आहे. ह्याची नोंद घ्यावी.

गुरु कसा असावा .......... तर त्यांनि स्वपरिश्रमाने मठ स्थापन करावा पण त्याचा उपभोग घेउनये. ह्या गोष्टी वर माझ्या लेखाची मुळ संल्कपना आहे. लेखातिल काही पदे, स्तोत्रे, भजने ह्यागोष्टी चा सर्दभ मी सन १९२० च्या अगोदर प्रकाशीत झालेल्या संर्दभातुन घेतला आहे.
आपणास म्हाहीत असेल की संगितात केवढी ताकत आहे. की जे मनातील दु:ख कमी करुन योग्य रागत योग स्वरलाउन भाषण, पद, कविता, स्तोत्र, गाणे म्हटल्यास शरिलाला जी चेतना मिळते ती कशातही मिळत नाही. ( काय? तात्या संगितात आपण तज्ञ आहात......)

असो आपण जर पुढील लेख वाचण्याची इच्छा असेल तर तसे कळवा प्रसिध्द करण्या अगोदर माननी मिपा यांची परवागी घेईन.

क्षमस्व
संजिव

अनिकेत's picture

25 Mar 2008 - 11:55 pm | अनिकेत

श्री गणपत्ती स्तोत्र किवा पदे, अभंग, गाणी तालात सुरात लयबद्द गतिने म्हट्ल्यास शरीरातिल चेतना जागृत होऊन आपण योग्यतो निर्णय घेऊन शकतो

आपणास म्हाहीत असेल की संगितात केवढी ताकत आहे. की जे मनातील दु:ख कमी करुन योग्य रागत योग स्वरलाउन भाषण, पद, कविता, स्तोत्र, गाणे म्हटल्यास शरिलाला जी चेतना मिळते ती कशातही मिळत नाही. ( काय? तात्या संगितात आपण तज्ञ आहात......)

साहेब पन तुमी तर म्हनत व्हता की करज माप हुईल...
ही कोन ती चेतना बया कुठनं आली मधचं?

अनिकेत

प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) .
हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का?
हे विचार स्वामी विवेकानंदाचे ग्रंथ आपण वाचले आहेत का?
हो वाचले आहेत्.अमलात ही आणतो आहे.....विवेकानन्द /सावरकराना हिंदुवादी मानायचे पण त्यांचे विचार वाचायचे नाहीत अमलात आणणे तर दूरच ही असली भोंदु आणि आपमतलबी विचारसरणी असणारी माणसेच लोकाना निष्क्रिय बनवतात.

तर सरकारचे ६०,०००कोटी रुपये वाचले असते......
प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) .
सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी

आपण व आपल्या मित्रानी योग्य नेता निवडु दिला होता का? असल्यास त्याला जाब विचारा?
तुमचे म्हणणे असे आहे का; की निवडुन द्यायच्या अगोदर नेत्याला लोकानी हे स्तोत्र पाठ आहे का तरच मत देइन असे विचारावयास हवे होते. पक्षाच्या जाहीर नाम्यात आमचे अर्थमन्त्री हे स्तोत्र पाठ दररोज रेडिओ/टी व्ही वरुन म्हणुन दाखवतील..असे लिहीणार्‍या पक्षालाच मत द्यायचे?

स्तोत्र म्हणणे आणि सरकार चालवणे यात काही संबंध असतो असे मला तरी वाटत नाही...अन्यथा कट्टर धर्माधिष्ठीत तालिबान सरकार उध्वस्त झाले नसते...अफगाणीस्तान मध्ये हरीत क्रान्ती झाली असती.

एक's picture

25 Mar 2008 - 10:58 pm | एक

"निष्क्रिय रहा आणि फक्त हा जप करा म्हणजे तुमचं कर्ज फिटेल" असं जर संजीव म्हणत असेल तर ते नक्कीच चूक आहे.
पण ते एक बिनपैशाचा उपाय सांगत आहेत असं दिसतं. या जपाने कुणाचंही एका पैशाचही नुकसान होणार नाही आहे. मग या अंधश्रद्धाविरोध्यांचा प्रॉब्लेम काय आहे?

तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल. असं जर सुचवलं जात असेल तर या अंधश्रद्धाविरोध्यांची इथे लुडबूड का?

शेतकर्‍यांनी मंत्र्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणं ही पण एक अंधश्रद्धा नाही का? वारंवार कर्जमाफी देवून शेतकरी सुद्धा निष्क्रिय नाही का होणार? म्हणून तर शरद पवारांना सांगावं लागलं की "आता कर्जफेडायची सवय पण लावून घ्या.
वर शेतकर्‍यांच्या कर्जाविषयी कोणीतरी उल्लेख केला म्हणून हे लिहिलं अन्यथा याचा या स्तोत्राशी काही संबंध नाही..

"..., परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती..."
हे वाक्य वाचल्यावर असं वाटतं की या वाक्याच्या विरोधात जाणारे अशी अनेक विधानं मिपावर वाचली..
उदा. "अमुक एक सिनेमा फार उत्तम आहे सगळ्यांनी बघा." किंवा " ही गायिका अतिशय उत्कृष्ट आहे" किंवा " हा दिग्दर्शक सर्वश्रेष्ठ आहे"..
ही जनरलाईज स्टेटमेंट नाहीत का? फारफारतर ऐकणार्‍याचं/बघणार्‍याचं हे वैयक्तिक मत असु शकेल्..(अर्थात असं वैयक्तिक मत असणारे अनेक आहेत म्हणूनच ते कलाकार लोकप्रिय आहेत पण मग साईबाबा आणि गजानन महाराज यांचे अनुभव असलेले पण अनेक आहेत..) थोडक्यात "जनरलाईज स्टेटमेंट" आपण सगळेच करतो. मग केवळ याच विषयाला आक्षेप का?

उत्तर नाही मिळालं तरी हरकत नाही कारण मिपावर कुठला विषय असावा किंवा नसावा हे ठरवायला मी काही मालक नाही.
मालकांच्या मर्जीपुढे आपले काय चालणार? पण मला हा पॉईंट रेझ करावा असं वाटलं म्हणून लिहिलं.

नो हार्ड फिलिंग्ज...
- एक अंधश्रद्ध..

विसोबा खेचर's picture

25 Mar 2008 - 11:30 pm | विसोबा खेचर

एकराव,

दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो.

आपण संजिवरावांचं वरील वाक्य नीट वाचलेलं दिसत नाही! सदर स्तोत्र म्हणणारा साधक हा अवघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो किंवा मुक्त होतो असा चक्क निर्वाळा ते देत आहेत! एवढंच नव्हे, तर या कर्जमुक्तिकरता जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या कालावधीही ते छातीठोकपणे देत आहेत! Am I right??

तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल. असं जर सुचवलं जात असेल तर या अंधश्रद्धाविरोध्यांची इथे लुडबूड का?

हा हा हा! एकराव,

संजिवरावांच्या,

दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो.

या वाक्यावरून जर तुम्ही,

तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल.

असा अर्थ काढत असाल तर आपलं बोलणंच खुंटलं! आपण तुमच्या रिडिंग बिट्वीन द लाईनस ला दाद देतो!! :)

बाय द वे, देवाचं अधिष्ठान असून देऊन तुम्ही तुमचे प्रयत्नही चालू ठेवल्यास, कर्जमुक्त होण्यास/किंवा काही प्रमाणात सावरण्यास अवघ्या (!) सहा महिन्यांचा कालावधीही पुरेसा आहे हे वाचून गंमत वाटली! :)

चला बरं झालं! ज्या मंडळींनी १० वर्षांकरता, २० वर्षांकरता जागेसाठी वगैरे बँकांची कर्जे काढली आहेत त्यांची तर मज्जाच आहे बुवा! दहा दहा वर्ष, वीस वीस वर्ष बँकांचे हप्ते फेडत बसायला नको! साला, सहा महिन्यात कर्जमुक्त! द्या टाळी एकराव!:)

हां, आता संजिवरावांनी 'काही प्रमाणात कर्जातून सावरतो' असंही म्हटलेलं आहे ते मात्र खरं आहे! कारण सहा महिन्यात बॅकेच्या कर्जाचे किमान सहा हप्ते तरी निश्चितच भरून होतील आणि माणूस संजिवराव म्हणतात त्याप्रमाणे काही प्रमाणात (६ हप्ते!!) कर्जातून सावरेल! :)

बोला, गणपती बाप्पा मोरया!! :)

मालकांच्या मर्जीपुढे आपले काय चालणार?

हम्म! खरं आहे तुमचं! :)

पण मला हा पॉईंट रेझ करावा असं वाटलं म्हणून लिहिलं.

अगदी बरं केलंत. मिपा हे संकेतस्थळ मनमोकळेपणाने लिहिणार्‍यांसाठीच आहे...:)

तात्या.

एक's picture

25 Mar 2008 - 11:45 pm | एक

ठिक आहे..
संजीवलाच खुलासा करू दे..जर तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे..

माझा रोख "स्तोत्र, जप" शब्द ऐकल्यावर "अंधश्रद्धा अंधश्रद्धा " म्हणून हिणवणार्‍यांवर होता.

बाकी ..
"..चला बरं झालं! ज्या मंडळींनी १० वर्षांकरता, २० वर्षांकरता जागेसाठी वगैरे बँकांची कर्जे काढली आहेत त्यांची तर मज्जाच आहे बुवा! दहा दहा वर्ष, वीस वीस वर्ष बँकांचे हप्ते फेडत बसायला नको! साला, सहा महिन्यात कर्जमुक्त! द्या टाळी एकराव!:)

हां, आता संजिवरावांनी 'काही प्रमाणात कर्जातून सावरतो' असंही म्हटलेलं आहे ते मात्र खरं आहे! कारण सहा महिन्यात बॅकेच्या कर्जाचे किमान सहा हप्ते तरी निश्चितच भरून होतील आणि माणूस संजिवराव म्हणतात त्याप्रमाणे काही प्रमाणात (६ हप्ते!!) कर्जातून सावरेल! :)..."

नो कॉमेन्टस.. चेष्टाच करायची झाली तर कुठल्याही विषयाची होवू शकते.. :-)

विसोबा खेचर's picture

26 Mar 2008 - 12:14 am | विसोबा खेचर

एकराव,

संजीवलाच खुलासा करू दे..जर तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे..

एकराव, पुन्हा आपला काहीतरी गोंधळ होतो आहे!

निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे..

असं संजिव म्हणत नाहीये! तो,

दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो.

असं म्हणतोय!! Am I right?

संजिव जे म्हणत नाहीये, ते उगाच त्याच्या तोंडी घालू नका, आणि तो जे म्हणतोय त्याकडे कृपया दुर्लक्ष करू नका. कृपया संजीवने एक्झॅट कुठले शब्द वापरले आहेत हे वाटल्यास पुन्हा पुन्हा तपासून पाहा, ही विनंती'..

आणि शिवाय,

"तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.."

असं संजिव म्हणतोय असं मीही म्हटलेलं नाही!

दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो.

संजिवच्या या वाक्याला माझी पूर्ण असहमती आहे! माझ्या मते हे अत्यंत चुकीचं, बेजबाबदार व अंधश्रद्धा पसरवणारं विधान आहे! एकराव, संजीवच्या वरील वाक्यावर तुमचं काय मत आहे, हे मला जाणून घ्यायला आवडेल!

माझा रोख "स्तोत्र, जप" शब्द ऐकल्यावर "अंधश्रद्धा अंधश्रद्धा " म्हणून हिणवणार्‍यांवर होता.

आपण संजिवरावांना दिलेला माझा पहिला प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाहीये! त्यात मी स्तोत्रं व जप या गोष्टींना कुठेही सरसकट अंधश्रद्धा असं म्हटलेलं नाही!

नो कॉमेन्टस.. चेष्टाच करायची झाली तर कुठल्याही विषयाची होवू शकते.. :-)

अहो चेष्टा कुठे करतोय?? संजिवरावच अवघ्या (!) सहा महिन्यांचा दाखला देत आहेत. मग मी त्यावर 'चला, जागेच्या कर्जवाल्यांकरता बरं झालं!' असं म्हटलं तर ती चेष्टा कशी काय होऊ शकते??

उलटपक्षी,

जी मंडळी थोडी हिंमत करून दहा वर्षाच्या म्हणा, वीस वर्षांच्या म्हणा, मुदतीवर बँकांची रीतसर कर्जे घेऊन मोठी जागा घेत आहेत, अहोरात्र कष्ट करून त्या कर्जाचे रीतसर हप्ते वेळच्यावेळी फेडत आहेत, त्यांना

अमूक अमूक स्तोत्र म्हणा, म्हणजे सहा महिन्यात कर्जमुक्त व्हाल असं छातीठोकपणे सांगणे ही चेष्टा नव्हे काय??

संजिवराव एखादे स्तोत्र म्हटल्याने कर्जमुक्त होण्याकरता अवघ्या सहा महिन्यांचा कालवधी निश्चित करत आहेत हे तर तुम्हाला मान्य आहे ना एकराव? कारण खुद्द संजिवरावांनीच तसं आपल्या लेखाच्या सुरवातीलाच लिहून ठेवलं आहे!

असो.. माझ्यापुरता हा विषय संपला आहे! धन्यवाद....

तात्या.

सर्किट's picture

27 Mar 2008 - 8:14 am | सर्किट (not verified)

अरे वा!

खूपच छान उपाय सांगितलात.

आमचाही एक उपाय आहे सहा महिन्यात कर्जमुक्तीचा.

मर मर मरून कष्ट करायचे, आणि पैसे कमवायचे, आणि कर्ज चुकवायचे.

ते जमले नाही, तर आमचाही एक मंत्र आहे:

घेई छंद मकरंद
प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद
स्वच्छंद हा धुंद

हे गाणे रोज १०८ वेळा म्हणायचे.

दोन्ही प्रयत्न सध्या चालू आहेत. बघुया काय होतं ते. उगाच देवावर आमचा भार आता टाकावासा वाटत नाही. बिचारा देव तुमच्या सेवेतून उगाच आमच्याकडे लक्ष द्यायचा, आणि तुमची काशी व्हायची !

- सर्किट

प्रकाश घाटपांडे's picture

27 Mar 2008 - 9:53 am | प्रकाश घाटपांडे

अजुन एक मंत्र
"कर्ज बुडवा म्हणजे आपण तराल"
"कर्ज कसे बुडवावे?" असे गजानन बुक डेपोत अजुन कसे पुस्तक आले नाही? स्वाहाकार खात्यातील अनुभवी लोकांनी "कर्ज बुडवण्याचे दशसोपान मार्ग" असे पुस्तक काढल तर त्यांना कर्जमाफी होईल. कारण २% लोक कर्ज बुडवतात म्हणुन उरलेल्या ९८% लोकांना कर्ज द्यायचे नाही का? या तत्वाला बाधा येईल.
ऋणं कृत्वा घृतं पिबेत| असा चार्वाकाचा तेवढाच सोयिस्कर अर्थ काढून कर्ज काढणार्‍यांना दिलासा मिळेल.
निर्लज्जं सदा सुखी या मंत्राबद्दल कुणी कस बोलल नाहि अजुन?
प्रकाश घाटपांडे