ह्रुदयी तव ठेवुनी माथा,हलकेच मी विसावता
भिनली ही नीज नयनी,शांत झाली आर्तता !
अवचित मग जाग येता,तुझ्या ह्रुदय्-स्पन्दनी
मिटले नेत्र जाणती रे,व्यथा ज्या तुझ्या मनी !
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी
जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !
वाटे साद घाली, मज रातराणीचा सुगंध
की सुवास हा तव तनुचा,नशीला अन मंद-धुंद !
बघ कसे बिलगुनी जाती,मोरपंखी लुब्ध वारे
की श्वास हे तुझेच सखया,केसांतुन मम सळसळणारे !
राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध
मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द !
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला
पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !
~ पल्लवी ~
वाट लागली!!
हे ब्येष्ट की देवा.
:)))))))))))))))))))))))
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे ?
खल्लास !
मस्त रे रंगा.. ;)
:)
बतावणी आवडली
एका हातात सुरेचा प्याला असावा, समोर सुंदरशा अप्सरांचे नृत्य चालू असावे, गंधर्वांचे वीणावादन चालू असावे, आमची भाग्यलक्ष्मी आमचे चरणकमल तिच्या नाजूक करकमलांनी हलके हलके चुरुन देत असावी, समोर कल्पवृक्षाच्या पानावर क्षीरसागरातल्या लुसलुशीत कालवांचे कालवण. बस्स. अहो तेच आत्मज्ञान!
एकदम मस्त !!! आम्हाला प्रिय असलेला 'बतावणी' लेखन प्रकार हाताळल्याबद्दलही आपले अभिनंदन !!!
सह्ह्ह्ही...
हा हा हा
हे आवडलं
"नारायण! नारायण!"
बतावणी!
फु...ट....लो !!!!
मस्त...
भक्तांनी ईकडे विषेश लक्ष देऊ नये.
ही ही हि