मोघमपणे बोलायचे झाले तर एप्रिल महीना भारतिय कालगणने नुसार चैत्रा चा महीना .वर्षाचा पहीला महीना. नवे वर्ष तुम्हाला आरोग्याचे जावो असे केवळ म्हणुन निसर्ग थांबत नाही तर त्याच्या खजिन्यातली एकसे एक बढकर रत्ने तुम्हाला पेष करतो. नवीन कोवळी पालवी फुटली झाडे , फुलानी बहरलेले गुलमोहोर , जॅकरन्डा , बहावा, बकुळ , शिरिष , मोगरा ,बोगन वेल , लॅबर्नम , लाल ,केशरी , निळा, सोनेरी , हिरवट पांढरा रंगांची , गंधांची रेलचेल असते.
रस्त्याने जाताना गुलमोहराचे सडे पाहुन आपले वर्ष खरेच आनन्दाचे जाणार याची खात्रीच पटते.
असेच रमत गमत जात असलो तर मधेच एखादे फलांचे दुकान लक्ष्य वेधुन घेते.
:)