तू येशील आणिक जाशील
काही देशील ,काही घेशील
पहाटेच्या साखरस्वप्नांना
गुलाबी बनवून जाशील!
भरती-ओहोटीचा खेळ होईल
किनारा परत एकटा राहील
तेव्हा जपलेल्या खुणांना
सांग नातं कधी देशील?
अर्थ, संदर्भ गोठून जातील
जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील
पण एकटं असताना
तेच तर माझी साथ देतील!
मग अशीच तू वेळ ठरवशील
भेटण्यासाठी इथं येशील
घड्याळातल्या काट्यांना
सांग तेव्हा तू कसं बांधशील?
वेळ संपली, आता तू निघशील
पण आता एक करशील?
पुन्हा आपण भेटताना
निदान ह्या नात्याचं नाव सांगशील?
काही देशील ,काही घेशील
पहाटेच्या साखरस्वप्नांना
गुलाबी बनवून जाशील!
भरती-ओहोटीचा खेळ होईल
किनारा परत एकटा राहील
तेव्हा जपलेल्या खुणांना
सांग नातं कधी देशील?
अर्थ, संदर्भ गोठून जातील
जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील
पण एकटं असताना
तेच तर माझी साथ देतील!
मग अशीच तू वेळ ठरवशील
भेटण्यासाठी इथं येशील
घड्याळातल्या काट्यांना
सांग तेव्हा तू कसं बांधशील?
वेळ संपली, आता तू निघशील
पण आता एक करशील?
पुन्हा आपण भेटताना
निदान ह्या नात्याचं नाव सांगशील?
--- मी अश्विनी
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6739
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप छान आहे...
याचा अर्थ
किनारा कधी एकटा होउ शकतो का ?
In reply to याचा अर्थ by आनंदयात्री
हो किनारा एकटा होउ शकतो
In reply to किनारा कधी एकटा होउ शकतो का ? by मी अश्विनी
अरल / असहमत
In reply to हो किनारा एकटा होउ शकतो by विजुभाऊ
किनारा
In reply to अरल / असहमत by आनंदयात्री
अरे ए...
In reply to किनारा by मनस्वी
यकट्या
In reply to अरे ए... by धमाल मुलगा
वाचला होता
In reply to यकट्या by आनंदयात्री
>>वाचला
In reply to वाचला होता by धमाल मुलगा
ह्यो गावला
In reply to >>वाचला by आनंदयात्री
:)))))
In reply to ह्यो गावला by धमाल मुलगा
आवडली.
अर्थ,
एकदम मस्त.
झकास
धन्यवाद.....