मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बतावणी

चतुरंग ·

झालं? आपल्या नादाने चतुरंगही बिघडला रे, तात्या!! आता लागली का वाट? साक्षात श्रीविष्णुंची टायली करतो! आता कसला स्वर्ग मिळतो याला!!:)) आता बस म्हणावं नरकात आमच्याबरोबर! एकही थेंब न पिता पूर्ण शुद्धीवर राहून कोणी कसले आणि किती प्याले घेतले त्याची मोजदाद करीत!! आम्हालाही नाहीतरी एक भरवशाचा "डेसिग्नेटेड ड्रायव्हर" हवाच होता!!! चिअर्स!! :)))

विजुभाऊ 18/04/2008 - 08:40
(डिसक्लेमर - ह्यातील घटनांशी दुसर्‍या कोणत्या लोकांत साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!) हे ब्येष्ट की देवा. अहो साधी गोष्ट आहे, एका हातात सुरेचा प्याला असावा, समोर सुंदरशा अप्सरांचे नृत्य चालू असावे, गंधर्वांचे वीणावादन चालू असावे, आमची भाग्यलक्ष्मी आमचे चरणकमल तिच्या नाजूक करकमलांनी हलके हलके चुरुन देत असावी, समोर कल्पवृक्षाच्या पानावर क्षीरसागरातल्या लुसलुशीत कालवांचे कालवण. बस्स. अहो तेच आत्मज्ञान! बाकी दुसरं तिसरं काही नसतं विष्णुनी उमरख्याम च्या रुबाया पुराणाचे वाचन चालु केले असावे. बस्स और क्या चाहीये दिल बहेलाने के लिये. आता जरा क्लासमधल्या नोट्स वाचुन लिहितो. लेख तसा पसरट आहे अधुन मधुन आत्मा उपनिषद असे जड जाड शब्द वापरुन लेखाला घनता आणण्याचा प्रयत्न बरा आहे. दोस्तोवस्की आणि उसनेवस्की चे द ना शब्द रेषे ने लिहिलेले मी आणि दोस्तोवस्कींचे शौच कूप या लेखाची आठवण होते. मुनिवरांना जरा सोमरस पाजा, आणि हो सिंगलमाल्टवालाच यालाच भारतिय आणि पाश्चात्य संस्कृतीचे फ्युजन म्हणता येइल.सध्या हे फ्याड जरा बोकाळले आहे. तरी पण या ला तो लीअरी जबरावस्की आणि सार्त्र ज्यां पोळ यांचे लिखाणचा जबरदस्त पगडा असल्याशिवाय असे लिखाण होणे आवघड आहे. कोठे कोठे लेखाची उन्ची खालावते आणि लेखकाची जाडी रुन्दावते आहे असे भासते. पण थूत्..तुमच्या ते..रां**नो!!" या वर्णाने तानाजी मालुसर्‍याच्या भावाचे सूर्याजी चे दोर कापतानाचे उद्गार" थूत तुमच्या जिनगानीवर " यांची सरमिसळ मिपा नगरातल्या एका लेखाकाच्या बाकी उद्गारांशी केली आहे. परन्तु या मुळे लेख वास्ताविक भासतो. धूसर वर्णानातुन पात्राना प्राचीन आर्य नावेदेउन आनार्य पणे वागायला लावणे हे त्यातल्या त्यात बरे जमले आहे.अक्षरे बरोर्बर एकामागोमाग आली आहेत हे गोष्ट स्तुत्य. प्रस्तुत लेखकाने मिपा कट्ट्याला वरचेवर ( सोमरसामुळे विमान वर गेल्यावर नव्हे. वरचे वर म्हणजे पुन्हापुन्हा संदर्भ : अमराठींसाठीचा मराठी शब्द कोष आव्रुत्ती ३७ पान ३७५ ओळ वरुन २२ वी) (सदर ग्रन्थ विकत घेउन वाचावा.) भेट दीली तर लेखात मिपा सदस्यानी सांगितलेल्या बहूमूल्य ( जहबहरा , फुटलो , रद्दी , जिंकले हो तुम्ही जिंकले ; फहडतूस ) अशा सूचना वजा प्रतिसादानी लेखन कौशल्यात भर पडेल. अक्षर शुद्ध होईल. सुधारणेला बर्राच वाव आहे. .....क्लास मधे अजुनतरी येवढेच शिकवले आहे भडकमकर सरानी. ( त्यानी शुद्धलेखन शिकवताना शब्दांचे पाय मोडताना प्रत्येक तासाला तीनदा खडू मोडला) ::::भडकमकार क्लासचा एक गरीब आणि होतकरु विद्यार्थी :विजुभाऊ आता जे काही खरे ते .... मजा आला

विजुभाऊ 18/04/2008 - 08:45
:)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))) ))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे? प्रतिसाद द्यायला योग्य प्राणवायु मिळाला नाही की काय?

विसोबा खेचर 18/04/2008 - 09:10
समोर कल्पवृक्षाच्या पानावर क्षीरसागरातल्या लुसलुशीत कालवांचे कालवण. आणि हो सिंगलमाल्टवालाच द्या उगीच भलतासलता नको!" तेव्हा सरळ ठाण्याला जा. मालवणी हॉटेलात पोहोचा. तिथे काही संतपदाला पोचलेली मंडळी सिंगलमाल्ट सोमरस घेताना दिसतील त्यांच्यासमवेत बसा, ऐसपैस गप्पा करुन समोर आलेल्या सुरमईचा यथेच्च समाचार घेत आत्मज्ञान घ्या, कसें!!" हा हा हा! लै भारी रे रंगा... :) आपला, (इहलोकातच विष्णूपदाला पोहोचलेला आत्मज्ञानी!) तात्या. -- म्हणे कठोपनिषद आणि नचिकेत! आणि त्याला म्हणे आत्मज्ञान मिळालं! ............धत् रांडिच्यांनो! ;)) छ्या! या उपनिषदातल्या नचिकेतासारख्या भुक्कड कथांपेक्षा आमच्या द मा मिरासदारांच्या 'व्यंकूची शिकवणी' सारख्या कथा कितीतरी अधिक उत्तम आणि उजव्या आहेत! त्या नचिकेताला नाही अक्कल! घरासमोर राहणार्‍या एखाद्या जीवघेण्या पोरीला पटवायचं सोडून फोकलिचा आत्मज्ञान मिळवायला निघाला आहे!!! छ्या.........! ;)

एका हातात सुरेचा प्याला असावा, समोर सुंदरशा अप्सरांचे नृत्य चालू असावे, गंधर्वांचे वीणावादन चालू असावे, आमची भाग्यलक्ष्मी आमचे चरणकमल तिच्या नाजूक करकमलांनी हलके हलके चुरुन देत असावी, समोर कल्पवृक्षाच्या पानावर क्षीरसागरातल्या लुसलुशीत कालवांचे कालवण. बस्स. अहो तेच आत्मज्ञान!

एकदम मस्त !!! आम्हाला प्रिय असलेला 'बतावणी' लेखन प्रकार हाताळल्याबद्दलही आपले अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु 18/04/2008 - 09:40
चतुरंग, एकदम दमदार. मात्र आता तुम्हांला स्वर्ग लोकांत जागा नाही :)))))) विष्णू कोपले ना..! आवडला लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री 18/04/2008 - 10:50
वाटले काय लिहिले आहे बॉ ? पण हे नारद : " असं असं. आता पहा, तीन रात्रींपूर्वी मला स्वप्न पडले की माझे सर्व ज्ञान मी विसरुन गेलोय अगदी आत्मज्ञानासकट! वाचल्याक्षणी रम्मी झाली, धमाल लेख ... अरे अरे .. सारी सारी .. नारद लेख ;)

मदनबाण 18/04/2008 - 11:18
नारद : "तेव्हा असं ठरवतोय की यमलोकात जाऊन यमालाच भेटेन म्हणतो. तोच देऊ शकेल ना आत्म्याचे ज्ञान?" यमाच काही खर दिसत नाही,,,,,त्या नचिकेता मागोमाग आता नारदमुनी सुद्दा !!!!! (नारदमुनींना विशेष सुचना :--वेळ निश्चित करुन जा,,,,,मागल्या खेपेस नचिकेता यमराजांची वाट बघत दाराशीच तीन दिवस आणि तीन रात्री बसून राहिला होता.) (कैवल्य मुर्ति भव दु:ख हारी) असे म्हणणारा.....महादेव भक्त..... मदनबाण

धमाल मुलगा 18/04/2008 - 11:56
चतुरंगराव, सकाळ एकदम अप्रतिम झाली. मजा आली बॉ!
विष्णू : "कोण तो होय? अहो मी ही परवाच भेट देऊन आलो ना ठाण्याला, तेव्हा मालवणीमधून एक अख्खी सुरमईची टोपलीच उचलून आणलीन त्याने.
आँ??? साक्षात भगवन् विष्णू आले होते? मला कसे नाही दिसले? कोण्त्या टेबलावर होते हो? (भगवन् , ह.घ्या.!)
आम्हालाही नाहीतरी एक भरवशाचा "डेसिग्नेटेड ड्रायव्हर" हवाच होता!!!
खी:खी:खी: डांबिसकाकांशी आपण फुल्टू...हे आपलं....आत्मानंदाने सहमत!
विष्णुनी उमरख्याम च्या रुबाया पुराणाचे वाचन चालु केले असावे.
विजुभाऊ, चहावर माष्टरी करता करता लैच 'चहा'टाळ झालात की! त्यो बघतोय वरनं...सोडेल का आता तुम्हाला? हाय तुम्ही पण आमच्यासंग रौरवात !!!!
(इहलोकातच विष्णूपदाला पोहोचलेला आत्मज्ञानी!) तात्या.
ज ह ब ह र्‍ह्या !!!!!
वाचल्याक्षणी रम्मी झाली, धमाल लेख ... अरे अरे .. सारी सारी .. नारद लेख ;)
असं का? असं का? तू भेटच आता टोणग्या...बघतो तुझ्याकडे!!!!
(नारदमुनींना विशेष सुचना :--वेळ निश्चित करुन जा,,,,,मागल्या खेपेस नचिकेता यमराजांची वाट बघत दाराशीच तीन दिवस आणि तीन रात्री बसून राहिला होता.)
मदन दा, चिंता नको! नारदमुनी मालवणी आश्रमाला भेट देऊन मगच यमाकडे जातील. तिथे आपण त्यांना स्वयंभूशेठची "३ लार्ज" ही कविता ऐकवू... मरणाच्या दारावरही दारु आठवली यमाला म्हटलं बसुया का त्याचीही कळी खुलली क्काय? पटतंय का? - (मन आत्मरंगी रंगले...रे..चतुरंग) ध मा ल.

आर्य 18/04/2008 - 14:59
आम्ही असे काहीसे आत्मज्ञान शिकले ! रुप पाहती लोचनी । जावे दारुच्या दुकानी ॥ ते हा विठ्ठल बरवा । ऐक बाटली मागवा ॥ बहुत सुकृतांची जोडी । धेऊ आता थोडी थोडी ॥ सर्व सुखांचे आगार । फिरु आता दारो दार ॥ (डिसक्लेमर - या डिसक्लेमरचा तसेच ह्या रचनेचा दुसर्‍या कोणत्याही रचनांशी / संत वाञमयाशी साम्य आढळल्यास तो
निव्वळ योगायोग
समजावा........)

लेखनविषय:
लेखनप्रकार
स्थळ - विष्णुलोक नारद (क्षीरसागरात प्रवेश करत) : "नारायण! नारायण! देवा, आहात का?" विष्णू (शेषशय्ये वरुन गडबडीने उठत) - "अरे वा! आज रविवारी सकाळी सकाळी इकडे कुठे चरणस्पर्श मुनिवर?" नारद : "समस्याच मोठी बिकट आहे बघा देवा!" विष्णू : "समस्या? बिकट? आणि ती ही तुम्हाला? अहो तुमचा तर त्रिखंडात हिंडण्याचा उद्योग (स्वतःशीच - कळ लावत)! " नारद (चमकून) : "काय म्हणालात?" विष्णू :" नाही, तुम्हाला कशी आली समस्या? म्हणालो मी" नारद : " असं असं. आता पहा, तीन रात्रींपूर्वी मला स्वप्न पडले की माझे सर्व ज्ञान मी विसरुन गेलोय अगदी आत्मज्ञानासकट! आणि दुसर्‍या दिवशी उठतो तर काय खरेच मला काही स्मरणच होईना!

साहेबलोक !

संदीप चित्रे ·

अभय 18/04/2008 - 04:50
लालुजींच्या क्लिप्स फारच छान!. या माणसाने तोट्यात चाललेली रेल्वे फायद्यात करुन दाखवली!! ही एक फार मोठे अदभुत कथा आहे! अभय

विजुभाऊ 18/04/2008 - 05:26
सहज अभ्यास म्हणुन" इन द वंडरलॅन्ड ऑफ इन्डियन मॅनॅजर्स" हे शरु रांगणेकरांचे पुस्तक जरुर वाचा. त्यात आणखी काही नमुने ( दोन्ही अर्थानी) मिळतील

अभय, स्वाती, मुक्तसुनीत, स्वाती दिनेशः धन्यवाद ! विजुभाऊ: शरू रांगणेकरांचं पुस्तक मिळवायचा नक्की प्रयत्न करेन. धन्स.

चतुरंग 18/04/2008 - 22:06
म्यानीजर साहेबाच्या सर्व 'जाती' आवडल्या;) लालूच्या क्लिप्स खासच. (अवांतर - 'प्ले बॉय' चा बराच अभ्यास दिसतोय आपला;००) नाही, हेफनर साहेबाचा उल्लेख वाचून मनात आले म्हणून विचारले:) ह.घ्यालच! चतुरंग

विदेश 19/04/2008 - 14:40
आपल्या लेखाच्या शोभादर्शकातून साहेबलोकाची शोभायात्रा मस्त पहायला मिळाली.

पोटासाठी दाही दिशा, फिरवीशी तू जगदीशा! नोकरीठेप भोगत, देश-विदेश फिरताना, तरतर्‍हेचे मॅनेजर भेटतात / दिसतात. कधी आपले मॅनेजर म्हणून, कधी दुसर्‍या टीमचे मॅनेजर म्हणून, कधी आपल्या मित्र/मैत्रिणींचे मॅनेजर म्हणून तर कधी टी.व्ही, वृत्तपत्रे अशा मिडीयांतील बातम्यांमधून! आपल्या सुदैवाने बरेचजण चांगले असतात पण काही नमुनेही भेटतात !! काहीजण तर नमुनेदार असले तरी मॅनेजर म्हणून चांगले असतात ! तर, ही आहे साहेबलोकांची एक मिष्किल झलक ! थोडं हसायचं आणि सोडून द्यायचं ! गंभीरराव आपण interview देतानाच अंदाज येतो. ह्यांचा चेहरा अतिशय गंभीर आणि आपल्यावर डोळे रोखून बघायची सवय.

एप्रिल फळ (७)

विजुभाऊ ·

एकदम भारतात जाऊन वेगवेगळी फळं खातोय असं वाटलं. मुंबई - डहाणू भागात मिळणारे लाडके जाम आणि ताटगोळे, डोंगरातली करवंदं असती तर अजून मजा आली असती :) आता जूनच्या सुमारास 'पेरू'ची वाट पाहतो :)

विजुभाऊ 18/04/2008 - 08:46
मुंबई - डहाणू भागात मिळणारे लाडके जाम आणि ताटगोळे, डोंगरातली करवंदं असती तर अजून मजा आली असती :) सन्दीप भौ ती फळे एप्रिल मध्ये कशी मिळणार. मे जून मध्ये येतील तेंव्हा बघु या. तोवर एप्रिल फळ मजेत चाखा.

पाचुच्या तबकात एखदे माणीक चमकावे तसे हिरव्या पांढर्‍या जाड सालीच्या आत तो लाल भडक खजिना चमकत असतो. वावा... जादुई चव ,गर्भरेशमी गाभा ,राजवर्खी हापुस क्या बात है! वसंतातल्या फळांचा वैभवोत्सव चैत्रगौरीपुढे मांडल्यासारखा वाटतो आहे.

इनोबा म्हणे 18/04/2008 - 19:33
नेहमीसारखाच रसाळ भाग झाला बरं का. मस्त पैकी केशरी पिवळा दिसणारा राजवर्खी हापुस घ्यावा... हे वर्णन तर झकासच. या कानापासुन त्या कानापर्यन्त पसरलेली आख्खी फोड खाताना लहान मुले तर नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट गोजिरवाणी वाटतात . कलिंगड खायची खरी मजा यातच असते विजुभाऊ. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विजुभाऊ, आम्हाला वाटलं होतं की तुम्ही कडवे आंबाभक्त आहांत! आता बघतो तर तुम्ही इतर फळांचीही वकिली करताय! हे म्हणजे घरांत भटणीला आणि बाजारात भाविणीला एकदम डोळा मारण्यापैकी आहे!!:) काय हे! शिव, शिव, शिव!!!!

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 21/04/2008 - 18:53
हे म्हणजे घरांत भटणीला आणि बाजारात भाविणीला एकदम डोळा मारण्यापैकी आहे!!:) तदमाताय ! :))))बेष्ट च की . पात्रओ बरे असा मु . तु अच्च गोयंकार दिस्ताव. सुशेगाद राव रे गोयंचे पात्राओ. तु होड जातलो पुता. डांबिस काका याचे क्लासेस घेणार का? दोन दिवस मी थोडा जालापासुन बाजुला गेलो होतो. त्यामुळे प्रतिक्रिया देउ शकलो नाही ( स्ट्रॉबेरी चे दहा भाग कोठे आहेत?:))

कोलबेर 19/04/2008 - 10:10
वा! विजुभाऊ तुमचे सगळे लेख आज वाचून काढले. मस्त लिहिले आहेत.
या कानापासुन त्या कानापर्यन्त पसरलेली आख्खी फोड खाताना लहान मुले तर नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट गोजिरवाणी वाटतात .
ह्या सारखे चित्रदर्शी वर्णन सुरेख जमले आहे. खूप आवडले

आर्य 21/04/2008 - 14:13
हापुस आंब्याची साल पूर्ण काढुन टाकावी, एकेक तुकडा तोंडात घोळवत खाऊन टाकावा. अंतरात्म्यालाही तृप्तीचा साक्षात्कार होतो. - हीच खरी पद्धत आहे, (हापुस प्रिय) आर्य

छान लेख आहे. चिक्कु हे तसे फारसे मिजास नसलेले केळ्यानन्तर चे गरीब फळ. खरे वाटते. रंग, वास नसला तरी चवीला मात्र खडीसाखरेसारखे..... कोल्हापुरमधे रस्त्यावर हातगाडयावर चिकू विकतात. विकणारे खडीसाखर चिकू,खडीसाखर चिकू असे म्हणून गिर्‍हाईकांना आकर्षित करतात.

मदनबाण 21/04/2008 - 18:59
जपानी लोक या कलिंगडाच्या आकाराने वैतागले,,,,, का तर ते त्यांच्या फ्रीज मधे नीट ठेवता येत नाही..... पण गप्प बसतील तर ते जापानी लोक कसले? त्यानी चौकोनी आकाराचा पोकळ लाकडाचा खोका बनवला,,,,,(पोकळ पण मजबुत) जेव्हा कलिंगडाचे फळ लहान असते तेव्हाच त्याला या लाकडी खोक्यात घातले जाते.....मग जेव्हा ते फळ मोठे होते तेव्हा सहाजीकच चैकोनी आकार प्राप्त होतो !!!!! आता फ्रीज मधे ते आरामात ठेवता येते..... हीच कमाल आपल्या बिरबलाने मडक्यात कलिंगड बनवुन केली होती!!!!! (चाट मसाला टाकुन कलिंगड खाणारा) मदनबाण चौकोन

शक्तिमान 14/03/2009 - 13:08
एक म्हणजे कलिंगड थोडे कापुन म्हणजे चिर पाडुन आणायचे.फळवाला जणु खजिन्याच्या खोलीचे दार किलकिले करुन दाखवावे तसे आतला लाल खजिना हळुच दाखवतो.दुसरी पद्धत म्हणजे फळवाला कलिंगडाचा पिरॅमीड सारखा तुकडा कापतो तुम्हाला लाल भाग दाखवतो आणि जिग सॉ पझल असावे त्याप्रमाणे पुन्हा तो तुकडा जागेवर परफेक्ट बसवतो्आ तुकडा जे कापेल त्याला मिळायचा .तीसरी पद्धत म्हणजे आख्खे कलिंगड आणायचे न फोडता. फळवाल्या बागवानाकडुन माठ वाजवतो तसे वाजवुन आणयचे.
मस्त वर्णन आणि अचूक निरीक्षण!

द्राक्षे खाण्याची आणखी एक गंमत आहे. त्या घडातला एखादा सुट्टा मणी जो थोडासा मऊ झालेला असतो. एखादा जर्रा वाळलेला असतो. तोंडात टाकला की त्याला अशी जादुई चव आलेली असते सांगताच येत नाही. गोड आणि आंबट एकामागोमाग चव येतच रहाते. द्राक्षाची ही तर्‍हा तर कलिंगडाची तर्‍हा आणखी वेगळीच . काही लोक त्याला टरबूज म्हणतात. म्हणु देत बिचारे पण कलिंगडाला टरबूज म्हणुन आपण त्याची बूज राखत नाही . खरबूज , टरबूज , साखर काकडी, चिबूड हे सगळे एकाच वर्गातले विद्यार्थी. प्रत्येकाचे काही वेगळे वैशिष्ठ्य. खरबूज कसे वाळूच्या सागरातुन थेट उचलून आणले आहे असे दिसते.खरबूजा चा मातकट सोनेरी रंग पटकन डोळ्यात भरत नाही.

मौनखेळ

पल्लवी ·

प्राजु 18/04/2008 - 09:34
पल्लवी, राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !, कविता अतिशय सुंदर आहे. हे खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 18/04/2008 - 09:57
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! ओहोहो खल्लास..! राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! क्या बात है.... चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! वा! सुरेख कविता.. पल्लवी, औरभी लिख्खो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी
जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !

राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध
मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द !

चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला
पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला !

एकापेक्षा एक सुंदर ओळी आहेत !!! कविता आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनस्वी 18/04/2008 - 10:21
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी !
सुंदर!

आनंदयात्री 18/04/2008 - 10:24
मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! व्वा उस्ताद वा !

पल्लवी 18/04/2008 - 15:58
त्रिवार धन्यवाद !!! इरसाल मराठमोळ्या चकाट्या आणि त्या पिटणारे त्याहुनही इरसाल वल्ली प्रचंड भावल्या ! एक नंबर कट्टा !! तर कट्टेकरी लोकहो, कवितेसाठीच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ठेंक्यु !!! तात्या, प्रत्येक शेरास दाद दिलीत,खूप ध्न्यवाद ! :)

शितल 18/04/2008 - 17:27
मस्तच काव्य रचना झाली आहे, आता आणखी आम्ही काय बोलु कविते बद्दल, मौनच बाळ्गतो.

सुवर्णमयी 18/04/2008 - 18:27
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! सुरेख कविता आवडली.

जयवी 19/04/2008 - 12:41
चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! क्या बात है....... पल्लवी , खूप आवडली कविता. अगदी हळुवार भिनत जाताहेत ओळी.

उत्खनक 28/03/2013 - 17:39
खूप नितळ कविता! खूप आवडली. मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी या ओळी अगदी खास..

ह्रुदयी तव ठेवुनी माथा,हलकेच मी विसावता भिनली ही नीज नयनी,शांत झाली आर्तता ! अवचित मग जाग येता,तुझ्या ह्रुदय्-स्पन्दनी मिटले नेत्र जाणती रे,व्यथा ज्या तुझ्या मनी ! मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! वाटे साद घाली, मज रातराणीचा सुगंध की सुवास हा तव तनुचा,नशीला अन मंद-धुंद ! बघ कसे बिलगुनी जाती,मोरपंखी लुब्ध वारे की श्वास हे तुझेच सखया,केसांतुन मम सळसळणारे ! राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! ~ पल्लवी ~

सारे तुझ्यात आहे.....एक स्वप्नवत् प्रवास (३)

जयवी ·

मनस्वी 17/04/2008 - 18:03
छानच वाटलं तुझा स्वप्नवत प्रवास वाचून. तुझ्या अल्बमला अनेक शुभेच्छा :)

शितल 17/04/2008 - 18:04
हे सर्व ३ ही भाग एकदम मस्तच, एक भाग वाचुन झाल्यावर पुढचा वाचायची ओढ, आणि प्रस्॑ग डोळ्यासमोरच उभे राहतात, तुमच्या आन॑दात सहभागी करून आम्हालाही आन॑द दिलात. तुम्हाला पुढील लेखनासाठी ही शुभेच्छा !

सहज 18/04/2008 - 10:13
तुमचे अनुभव वाचायला छान वाटले. पुढील गीतसंचासाठी अनेक शुभेच्छा!!

आपला राजमार्गावरील प्रवास वाचला. अगदी सहजपणे आमच्यासमोर सर्व प्रसंग तरळले. आपल्या कवितेच्या प्रवासाचे एका संगीत अल्बम मधे रुपांतर झाले, तो झालेला आनंद आम्हाला शब्दा-शब्दात दिसला. त्याच बरोबर मोठ्या संगीतकारांच्या , गायकांच्या गराड्यात आपली अस्वस्थता सुंदर व्यक्त झालीय. पुढील गीतसंचासाठी आणि अनुभव असेच शब्दबद्ध व्हावेत यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु 18/04/2008 - 13:23
जयूताई, प्रवास खरोखरच स्वप्नवत आहे. असेच तुझे आणखीही अल्बम येऊदेत्... हीच त्या विधात्याच्या चरणी प्रार्थना. आणि तुला शुभेच्छा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयवी 18/04/2008 - 22:14
मित्रांनो....... तुमच्या भरभरुन देलेल्या शुभेच्छा पोचल्यात....... मनापासून आभार !! अजून पुढे बरंच काही आहे...वाचायचा कंटाळा तर येणार नाही ना.... ;)

अतिशय वाचनिय अनुभव, हेवा वाटावा असा. छायाचित्रेही मस्त आहेत. अनेक शुभेच्छा.......! वैशाली सामंत ह्या डेडिकेटेड गायिकेला मस्कतच्या कार्यक्रमाच्या तालिमींमध्ये पाहिले होत. अंगात भयंकर ताप असतानाही त्या तालिमीला आल्या होत्या आणि मन लावून गायिल्या. हॅट्स ऑफ टू हर...!

3

ह्या गांधींचं करायचं काय ???

छोटा डॉन ·

आनंदयात्री 17/04/2008 - 20:18
डानराव, छान लेख, तुम्ही उगाच मनाला लाउन घेउ नका राव. गांधींचे तुम्ही काहीही करु शकत नाही, कारण तुम्ही (म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या विचारसरणीचे लोक) मतदान करत नाही, केलं तरी त्याचा काही उपयोग नाही, कारण एक भिंगरी अन एक साडी या जोरावर मतदान करणारे हजारो लाख्खो आहेत, अहो तुमच्या मताला विचारतय कोण ? परिणामी गांधी अन त्यांचे भाटच येनकेनप्रकारे निवडुन येणार अन तुम्ही परत हात चोळत बसणार. चोट्ट्या भामट्यांचा धंदा आहे हो, एका रात्रित शिश्टीम बदलते ती फक्त पिक्चरात !

विदेश 17/04/2008 - 18:39
आपण काही करू शकत नाही. ग़ेले दोन दिवस झाले मी ह्या घटनेचा विचार करत आहे. फक्त विचारच करण्याखेरीज आपल्याला(-च असलेल्या मेंदूला)पर्याय नाही. "सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही" खुलाशाचा अर्थ-"नाही"च्या जागी "आहे"असा घेणारेच आहेत. तसे असेल तर बंद करा ही लोकशाहीची नाटकं जग ही रंगभूमी आहे आणि पक्षपल्टू /होत्याचे नव्हते कलाकार राजकीय रंगभूमीवर अगणितच! मला माहित आहे की असे लिहून काही उपयोग नाही, कारण "हम नही बदलेंगे" असे त्यांनी ठरवले आहे. आपण जर हे वाचून काही करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी त्यात माझे थोडेसे समाधान मानतो व पुढे आपण अगदीच परिस्थीती हाताबाहेर जाउ देणार नाही अशी आशा बाळगतो. भ्रष्टाचारी परिस्थिती पहात राहणे व क्रांतीकारक स्थितीसाठी आशाळभूत होऊन राहणे इतकेच आपल्या नशिबात; बरे का छोटा (-पण विचाराने मोठा) डॉन!

शितल 17/04/2008 - 19:03
आपल्या देशात, देशा पेक्षा पक्ष मोठा कसा होईल हेच पाहिले जाते, आणि कॉग्रेस पक्षा एवढा जातीचे राजकारण करून निवड्णुक लढवणारा दुसरा पक्ष नसेल.

In reply to by शितल

मनस्वी 17/04/2008 - 19:07
पक्ष-बिक्ष सारे छू. आपण आणि आपले खिसे कसे मोठे होतील हे पाहिले जाते. त्यासाठी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात. आज त्याचा निषेध - उद्या त्यालाच पाठिंबा.

मनस्वी 17/04/2008 - 19:08
एका रात्रित शिश्टीम बदलते ती फक्त पिक्चरात !
भ्रष्टाचारी परिस्थिती पहात राहणे व क्रांतीकारक स्थितीसाठी आशाळभूत होऊन राहणे इतकेच आपल्या नशिबात;
सहमत.

In reply to by मनस्वी

छोटा डॉन 17/04/2008 - 19:12
"भ्रष्टाचारी परिस्थिती पहात राहणे व क्रांतीकारक स्थितीसाठी आशाळभूत होऊन राहणे इतकेच आपल्या नशिबा"" असं बिलकूल नाही, परिस्थीती खरच बदलू शकते ... आत्ता लगेच का ? कदाचित याचे उत्तर नाही असे आहे ... कोण बदलणार ? प्रत्येकाने शक्य तेवढे प्रतत्न करावेत .... शेवटी " शिवाजी जन्माला यावा पण माझ्या घरी नको" ही मनोवॄत्ती कोठेतरी सोडावी लागेल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

पटले डानराव तुमचे नाहीतर आम्ही म्हणत बसलो आहोत 'शिवाजी व्हावा शेजारच्या घरात, मावळा त्याच्या पलीकडच्या घरात, मग तुम्ही?? आम्ही मात्र राहणार स्वराज्यात." ;) अहो हे आजचे नाही हे तर फार पूर्वीचेच आहे. शांत राहून संधीची वाट पहाणे हे उत्तम. पुण्याचे पेशवे

मानस 17/04/2008 - 20:12
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली तेव्हा ते सोळा वर्षांचे होते, त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते ४७ वर्षांचे होते. साधारणपणे तुमच्या मते कुठल्या वर्षी एखाद्याने पंतप्रधान व्हावे? जगातला सगळ्यात लहान पंतप्रधान ३४ वर्षांचा होता (२००४ साली). ह्यात मी राहुल गांधीची बाजू घेत आहे असे नाही, पण सध्या ह्या जगात "युवा" ह्या एका शक्तिची फार मोठी गरज आहे. हेच उद्याचे प्रतिनिधी आहेत,आशास्थानं आहेत. मी तर म्हणेन, वयाच्या ६५ वर्षानतंर निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे. निदान राहुल गांधी इतर राजकीय पुढार्‍यांच्या मुलांसारखा "व्यसनाधीन" तरी नाही. काँग्रेस काय, भाजप काय सगळे एका माळेचे मणी. तरीसुद्धा फक्त वय लहान आहे म्हणजे देश चालवता येत नाही, हे काही खरं नाही.

विजुभाऊ 17/04/2008 - 21:06
डॉनकाका मी असहमत आहे या विचारांशी. राजकारणाचे जाउद्या / चॅनेल वाल्यांचे पण जाउद्या. ते पोटासाठी कोणालाही कसेही प्रोजेक्ट करतात . सबसे तेज म्हणत अमरसिंगना महात्मा बनवतात आणि राज ठाकरेना व्हीलन बनवतात. पण मला खरे सांगा की राजीव गांधी सारखा पंतप्रधा आपल्याला मिळाला नसता तर? कल्पना करा की ईन्दीरा गांधी नन्तर जर सिताराम केसरी अथवा चन्द्रशेखर जर पन्त प्रधान पदी आले असते तर? गेला बाजार मुल्ला मुलायम सिंग आले असते तर? आपण अजुनही प्रीमियर पद्मिनी मध्येच फिरत असतो. भारतात औद्यगिक क्रान्ती. आय टी क्रान्ती झाली असती का? एका विश्वनाथ प्रतापाने काय प्रताप केले ते तुम्ही जाणताच.त्यांच्या एका निर्णयानी भरातात केव्हढी दुफळी माजली. आडवाणी तेंव्हा रथ यात्रा काढत भारताला एक करायचा प्रयत्न करत होते. बाबरी मशीदीचा मुद्दा त्याना केवळ लोकाना चघळायला देण्यासाठी हवा होता हे लपुन राहीले नाही. भारत आणि इराण किंवा पाकिस्तान यांच्यात फारसा फरक राहीला नसता. राहुल गांधी बद्दल आज जे बोलले जात आहे तेच राजीव गांधींबद्दल बोलले गेले होते. तसेच इन्दीरा गान्धींबद्दल बोलले गेले होते. त्यांची तर " गुंगी गुडीया" अशी हेटाळणी केली गेली होती. एक स्टॉप गॅप ऍरेन्जमेन्ट अशीच त्यांची छबी बनली होती. देशाला जर दिशा द्यायची असेल तर नव्या विचारांची व्यक्तीच पंतप्रधानपदी असावी लागते. कसाही असला तरी हिटलरने जर्मनी ला नवी दिशा दीली. सद्दाम ने इराक उभा केला.सद्दाम असेपर्यन्त इराक मध्ये कोणतीही जातीयवादी शक्ती नव्हती. इराक एक सार्वभौम आणि पुढारलेले राष्ट्र होते. दुर्दैवाने आपल्या देशाला काही काळ देवेगौडांसारखे महान पन्त्प्रधान मिळाले होते ज्यानी काहीही केले नाही. तिसरी आघाडी कोणत्या आणि कसल्या लोकानी बांधली आहे ते सर्वच जाणतात. नव्याअ रक्ताला वाव मिळाला पाहीजे हे नुसते बोलायचे आणि वेळ आली की त्यांच्यावर टीका करायची. राहुल गांधी सुशिक्षीत आहेत. एक व्यक्ती म्हणुनही त्यांची प्रतिमा उजळ आहे.नादान ,उर्मट, गुंड , ही बिरुदे त्याना अजुन त्याना कोणी लावु शकले नाही. त्यांच्या कडे नव्या कल्पना असु शकतील. त्या ते आमलात आणु शकतील मला एवढेच म्हणाय्चे आहे की सध्यातरी राहूलची या पदाचे स्वप्न सुध्धा बघायची लायकी नसताना त्याला मारून मुटकून फौजदार बनवायचा हा प्रयत्न कशासाठी? पंतप्रधान होण्याची राहुल गांधी यांची लायकी आहे की नाही हे कोण ठरविणार? राहुल महाजन? की त्याला "वो अभी जवान है" असे म्हणणारे दुड्ढाचार्य? की केवळ आंबेडकरांचे पुतळे उभारणार्‍या मायावती नी की गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणार्‍या अमानुश खाटीकाना अभय देत हिन्दुत्वाची ग्वाही देणार्‍या मोदीनी?बाकी जाउ देत; अजीतदादा पवार याना तुम्ही तरी पंतप्रदान म्हणुन प्रोजेक्ट कराल का? गांधी घराण्याचे वारस असता तर मला सांगा तुम्ही स्वतः काय केले असते? राहुल गांधी हे एक संयमी व्यक्तीमत्व आहे हे तरी मान्य करा. ते कदाचीत त्यांच्या शिक्षणा नुसार भारताला राजीव गांधी नी जशी नवी दिशा दिली तसेच काहीतरी करुन दाखवतील अशी आशा करायला नक्कीच वाव आहे. गांधी घराण्याची पार्श्वभुमी त्याना लोकांचा पाठींबा मिळवुन देइल.हा त्यांचा ऍडीशनल यु एस पी असु शकतो.

In reply to by विजुभाऊ

मानस 17/04/2008 - 21:41
विजुभाऊ ... तुमच्या सर्व मतांशी मी सहमत आहे. कुठलाही राजकारणाचा अनुभव नसताना राजीव गांधींनी देशाला एक वेगळी दिशा मिळवून दिली. आज आपण "टेलीकम्युनिकेशन्स" क्षेत्रात तसेच "ईंटरनेट" द्वारे जे काही करतो आहे, त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधान झाल्यानंतर कधीही असे वाटले नाही की त्यांना राजकारणाचा अनुभव नाही. खरंतर राहुल गांधी सारखे तरुण, तडफदार व्यक्तिमत्वाची माणसं ह्या देशाला हवी आहेत.

In reply to by मानस

आम्हालाही समजू दे. आमच्याकडे इन्टरनेट येण्यामध्ये राजीवचे काय नक्की महान कर्तृत्व होते बरे? आपल्या म्हणण्याप्रमाणे राजीव नसता तर आज भारतात इन्टरनेट नसते? जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग? की राजीवनेच गुपचुपपणे जाऊन वायरी जोडल्या?

In reply to by ऐश्वर्या राय

विजुभाऊ 17/04/2008 - 22:57
जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग? जगात भारता इतके सॉफ्ट वेयर तज्ञ कोणत्या देशात आहेत ते सांगा ना? भारतातली वाहन क्रान्ती त्यांच्यामुळे झाली. हे तरी खुल्या दिलाने मान्य करा.

In reply to by ऐश्वर्या राय

देवदत्त 17/04/2008 - 23:25
इंटरनेट आले असते की नाही ते नक्की सांगता येत नाही. परंतु जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग? की राजीवनेच गुपचुपपणे जाऊन वायरी जोडल्या? ह्याचा अर्थ पूर्ण जगात फक्त राजीव गांधींनीच हे कार्य केले असा काढायचा आहे का? हे काम भारतात राजीव गांधींमुळे झाले असे त्यांचे म्हणणे असेल.

In reply to by नीलकांत

एकमेकाचे कौतुक करू अवघे होऊ खूष. 'मिसळपावी'परंपराच आहे ना? इथले सारे 'कंपू' सभासद एकमेकांची थोपटण्यात (पाठ हो! तुम्हाला काय मी तात्या वाटले का वाह्यात लिहायला?) अगदी तत्पर असतात. अहो रुपम् अहो ध्वनी!

In reply to by ऐश्वर्या राय

नीलकांत 17/04/2008 - 23:11
ह्या प्रतिक्रियेला मनापासून उत्तर एवढेच की शक्य असल्यास कुठल्याही विषयावर उत्तर देताना लेखक विसरा आणि स्वतःच मत द्या, असं असावं, असं वाटतं. बाकी तुम्हासारख्या मिसळपावच्या परंपरा कोळून प्यायलेल्यांना मी पामर ते काय सांगणार? एवढंच म्हणू शकतो की एवढ्यात मिसळपावच्या परंपरेबद्दल लेख येत असेल तर तो विनोदी वगैरे आहे का अशी शंका येते. :-) बाकी तुम्ही ही काही लिहा की राव, त्याला आमच्या भाषेत 'नेट' लागतो असं म्हणतात, कुठं ते विचारू नका. ;-) नीलकांत

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 18/04/2008 - 12:48
विजूभाउ, प्रथम मी सांगतो की मला ह्या मिडीयाबद्दल काहीही बोलायचे नाही, आजचा मिडीया त्या योग्यतेचा राहिलेला नाही त्यामुळे तो कुण्ला हिरो ठरवतो आनि कुणाला व्हिलन ह्या गोष्टी सध्या बाजूला राहूदेत ... "पण मला खरे सांगा की राजीव गांधी सारखा पंतप्रधा आपल्याला मिळाला नसता तर? कल्पना करा की ईन्दीरा गांधी नन्तर जर सिताराम केसरी अथवा चन्द्रशेखर जर पन्त प्रधान पदी आले असते तर? गेला बाजार मुल्ला मुलायम सिंग आले असते तर? आपण अजुनही प्रीमियर पद्मिनी मध्येच फिरत असतो. भारतात औद्यगिक क्रान्ती. आय टी क्रान्ती झाली असती का?' हा मुद्दा मला अमान्य. कुठला नेता म्हनाला म्हनून देशात नव्या गोष्टी, वने तंत्रज्ञान आले हे पण अमान्य. नेता नवी दिशा देतो हे मान्य पन सर्व प्रगतींच्या योजनांची आखणी व अंमलबजावणी ही आपल्या "नोकरशाह" वर्गाकडून केली जाते हे खरे सत्य आहे. आता तुम्ही म्हणाल की लालूजींनी रेल्वे फायद्यात आणली, मी म्हणेन की रेल्वे खात्यात काम करणार्‍या नोकरशाह वर्गाने म्हणजेच "आय ए एस" अधिकार्‍यांनी हे सर्व केले. लालूंनी फक्त "मम" म्हणायचे काम केले. एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी कुढल्या चाम्गल्या योजनेत आडकाढी घातली नाही. त्यामुळे कुणामुळे रेल्वे सुधारली, नेट आले, भारी गाड्या आल्या हे झूट.... फरक असा की ते फक्त त्यावेळी सत्तेत होते.... "राहुल गांधी सुशिक्षीत आहेत. एक व्यक्ती म्हणुनही त्यांची प्रतिमा उजळ आहे.नादान ,उर्मट, गुंड , ही बिरुदे त्याना अजुन त्याना कोणी लावु शकले नाही." एवढा मुद्दा पुरेसा होऊ शकत नाही त्यासाठी. आणि बाकी बिरूदांचे म्हणाल तर मला नाही वाटत की गांधी घराण्यावर असे आरोप करण्याची कुणाची छाती आहे. अहो खुद्द "संजय गांधी " एवढा नादान, गुंड, उर्मट होता तरी सगळे मुग गिळून शांत होते. आज तर "राहूल" युवराज आहे. मला असे नाही म्हणायचे की राहूलचे कॅरेक्टर चांगले नाही पण तो मुद्दा ठरू शकत नाही. "पंतप्रधान होण्याची राहुल गांधी यांची लायकी आहे की नाही हे कोण ठरविणार? राहुल महाजन? की त्याला "वो अभी जवान है" असे म्हणणारे दुड्ढाचार्य? की केवळ आंबेडकरांचे पुतळे उभारणार्‍या मायावती नी की गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणार्‍या अमानुश खाटीकाना अभय देत हिन्दुत्वाची ग्वाही देणार्‍या मोदीनी?बाकी जाउ देत; अजीतदादा पवार याना तुम्ही तरी पंतप्रदान म्हणुन प्रोजेक्ट कराल ?" हम्म. मुद्दा मान्य पण माझे वैयक्तीक मोदींबद्दल असे मत नाही ... मायावती तर दखल न घेण्याच्या लायकीची ... "गांधी घराण्याचे वारस असता तर मला सांगा तुम्ही स्वतः काय केले असते?"' मुद्दा विचार करन्याजोगा नक्कीच आहे. मी पण पुण्याई वापरली असती पण सध्या जी नाटके चालू आहेत ती चालू दिली नसती. अर्जून्सिंगासारख्या "हुजर्‍यांनी" नक्कीच फटकारले असते... बाकी राहूलने जरूर पंतप्रधान व्हावे, ह्यात चिडचिड व त्रागा करण्यासारखे काही नाही व करूनही काही उपयोग नाही. पण कमीत कमी त्याआधी त्याने स्वतला सिद्ध करावे ... दुसरे घोड्यावर बसवतात म्हणून लगेच गुडघ्याला बाशिंग बांधू नये एवढीच अपेक्षा... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 18/04/2008 - 13:27
नोकरशाह वर्गाने म्हणजेच "आय ए एस" अधिकार्‍यांनी हे सर्व केले. लालूंनी फक्त "मम" म्हणायचे काम केले. एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी कुढल्या चाम्गल्या योजनेत आडकाढी घातली नाही. त्यामुळे कुणामुळे रेल्वे सुधारली बिनतोड मुद्दा, पटले. पण असेही वाटले की "दगडापेक्षा वीट मउ" एटलिष्ट मम म्हणाले हे ही नसे थोडके !

सगळॅ तसेच ... बळासाहेब उद्ध्व ला प्रोजेक्ट करतात ... पवार सहेब पोरिला ... मग ही घराणे शाही नाही का .... काहीही म्हणा .. कोन्ग्रेस ला पर्याय नाही ...म्हण जे "गान्धी" ला पर्याय नाही ... तसेही कोणत्याही शाळ्कर्री मुलाला विचरा ... "गान्धी" कोण ... उत्तर मिळेल .. "सोनिया गान्धी" :) देशाची सुन .. ;)

विजुभाऊ 17/04/2008 - 21:37
पान्डोबा बाकी काही जमले नाही तरी जरा कलफलक वापरायला शिका. किती दिवस त्याच त्याच चुका करत रहाणार तुम्ही.

नीलकांत 17/04/2008 - 21:46
पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याचे वफादार व आजच्या राजकारणातील एक अडगळ असे "अर्जूनसिंगांनी" भारताच्या पंतप्रधानपदासाठी सर्वश्री "राहूल गांधींचे " नाव पुढे करणे, अपेक्षेप्रमाने त्यावर राहूलने कोणतीही प्रतिक्रीया न देणे, त्यावर कॉग्रेस पक्षातर्फे "सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही" असा खूलासा करणे व शेवटी सोनिया व अर्जूनसिंगाची गुप्त बैठक [ ह्यात म्हणे त्यांना ठोकले , मी तर म्हणतो पाठ थोपटली असेल]. ह्या बद्दल म्हणाल तर ही कॉंग्रेसची परंपराच आहे. आपली घराणेनिष्ठा सिध्द करा आणि पुढच्या वेळी संभाव्य उमेदवारांमध्ये अग्रमान मिळवा. सोनीयाच्या घरी जाऊन त्यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी मन वळवणार्‍यांमध्ये आपले पवार साहेब सुध्दा होते की, मॅडमवर निष्ठा दाखवल्याचे फळ सुशिलकुमारांना नेहमीच भेटलेले आहे, चाकुरकर पाटलांना गृहमंत्रीपदाचा मान या निष्ठेपायीच आहे हो. आता एकदा कबड्डी खेळायचं म्हटल्यावर हाफपॅन्ट घालत नाही म्हणून कसं चालेल? त्यामुळे हे असं चालायचंच , याचा पुढे फायदा होतो असं कॉग्रेसचा इतिहास सांगतो. दुसरी घटना तर पहिल्यापेक्षा भयानक व निंदनीय. क़ाय तर म्हणे, प्रियंका गांधींनी म्हणे तिच्या पित्याचे मारेकरी नलिनी ची भेट घेतली, का तर की तिला ह्यामागचा हेतू जाणून घ्यायचा होता ही घटना घडल्यानंतर एका महिण्यानंतर प्रसारमाध्यमांना याची माहिती झाली. एक महिना जूनी का होईना, प्रसारमाध्यमांना याची दखल घ्यावीशी वाटली. त्या आधी प्रियंका एका लक्ष्मी-नारायणाच्या मंदीरात पुजा करायला गेल्या याचा मात्र उल्लेख नव्हता. तर आपल्या पित्याच्या मारेकरीला भेटायला जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गोडसे परिवाराशी सुध्दा गांधी परिवाराशी संबंध होता. त्यांच्या भेटी झालेल्या आहेत. येथे एका गोष्टीकडे लक्ष वेधता येईल, की राहूलच्या आधी प्रियंकानेच आपल्या आईसाठी प्रचार केला आहे. त्यावेळी तिचं नाव प्रियंका गांधी असंच कॉग्रेसवाले सांगत होते. तीने मात्र आवर्जून आपलं नाव वढेरा असल्याचं सांगीतलं. मग त्यातून पळवाटा काढल्या की, प्रियंका गांधी - वढेरा किंवा नुस्तंच प्रियंका म्हणावं. राहूल पंतप्रधान बनावेत का नाही? - भारताच्या घटनेनुसार वय वर्षे २५ पुर्ण झालेला भारतीय नागरीक पंतप्रधान बनु शकतो. त्यामुळे राहूल गांधी पंतप्रधान बनण्यास पात्र आहेत. त्यांची सर्वात मोठी आणि सर्वात प्राथमिक पात्रता म्हणजे ते 'गांधी' आहेत हीच आहे, हे मला, तुम्हाला आणि खुद्द राहूलला सुध्दा मान्य आहे. पंतप्रधान पदी या पुर्वी खुप मोठी माणसं बसली आहेत हे खरं आहे. सध्याच्या परिस्थितीत एवढ्या अल्पमतात राहूल पंतप्रधान होणं पसंत सुध्दा करणार नाहीत. मात्र येत्या नाही तर त्या पुढच्या वेळीतरी आपली प्रतिमा पंतप्रधान पदासाठी तयार करण्याची ही सुरूवात आहे. माझं वैयक्तीक मत मात्र राहूलने बहूमतात येऊन पंतप्रधान बनावं असंच आहे. कारण नवीन रक्त आहे, जग आणि तत्रज्ञान आदींशी ओळख आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पदाला पक्षांतर्गत आव्हाने नसतील. म्हणजेच निश्चींतपणे आणि कणखरपणे निर्णय घेता येतील. राहीलं अनुभवाचं तर त्यासाठी अनेक महत्वाची लोकं आजंच त्यांच्या भोवताली आहेत की ! आणि शेवटी कोण पंतप्रधान व्हावं हे आपली सार्वभौम जनता ठरवेल. एक मात्र सांगता येईल की, 'राहूल पंतप्रधान व्हावेत.' हे वाक्य एवढं साधं नाही महाराजा ! अहो बाकी सोडा, आमच्या बारामतीकर सायबांनीसुद्धा हाच घोष लावलाय. आता कुणाची बिशाद आहे या वाकयाचं व्याकरण चालवायची? नीलकांत

In reply to by नीलकांत

अहो तेच ना ते, विदेशी महिला पंतप्रधान नको म्हणून वेगळा पक्ष काढणारे? परवा त्यांनीच तर त्याच विदेशी बाईला पंतप्रधानपदासाठी पाठींबा जाहीर केला की हो. वाक्याचे व्याकरण बरोबर आहे पण शुध्द्लेखन नाही. आणि अर्थ मात्र भयंकर आहे..पंतप्रधान असा शब्द आहे..जर चुकून कधी अचूक लिहायची इच्छा झालीच तर असूदे माहिती म्हणून लिहिले. आता तात्या परत कसे भडकतात त्याची मज्जा ;-)

मैत्र 17/04/2008 - 22:21
याचा अर्थ असा होतो कि पर्याय नाही म्हणून त्यातल्या त्यात बरा कोण त्याला पंतप्रधान पद द्या... लायक आहे म्हणून किंवा खरंच तोच पाहिजे म्हणून नाही... दगडापेक्षा वीट मऊ... दोन्ही लागणारच ना ? घराणेशाही .. ती महाभारता पासुन आहे... आणि काँग्रेस च्या उघड घराणे शाही ला विरोध करणार्‍यांनी स्वतः सुद्धा केली आहे (पक्षी: शिवसेना आणि बारामती)... पण राजपुत्र राजा होण्याची तयारी केली जात होती... आता फक्त ती राज कारण म्हणजे मतांचं राजकारण कसं करायचं आणि सोयीस्कर युत्या कशा करायच्या यापुरतं च मर्यादित आहे... कोणत्याही लोक प्रतिनिधीला काही शिक्षण ज्ञान किंवा किमान खात्याची माहिती सुद्धा नसते हा सामान्य आणि गृहीत अनुभव आहे .. आनंदयात्री यांची पहिली प्रतिक्रियाच बरोबर... बाकी आपल्या चर्चा पु लं च्या चपराशाच्या अणु युद्ध टाळण्याच्या उपाया सारख्याच...

नीलकांत 17/04/2008 - 22:43
आनंदयात्री यांची पहिली प्रतिक्रियाच बरोबर... बाकी आपल्या चर्चा पु लं च्या चपराशाच्या अणु युद्ध टाळण्याच्या उपाया सारख्याच... हे मात्र एकदम सही रे सही. नीलकांत

पं नेहरू समर्थक व विरोधक दोघांनी वाचावे असे पुस्तक An explosive book which must be read both by admirers & critisizers of Pandit Nehru ( First Prime Minister of India)पं. नेहरू यांचे समर्थक व विरोधक दोघांनी जरूर वाचावे असे आश्चर्याचे धक्के देणारे एक नवे पुस्तक. http://www.orkut.com/AlbumZoom.aspx?uid=44441327930350077&pid=1207574261477&aid=1207212398 खुलासा: ही माहिती मी एक जागरूक वाचक ह्या नात्याने देत आहे व माझा लेखक/प्रकाशक यांच्याशी कुठलाच संबंध नाही व त्यांनी मला नेमलेलेही नाही.लेखकाच्या सर्वच मताशी मी सहमत असेनच असे नाही.दिनांक ६ एप्रिल रोजी नागपूरला पुस्तकावर जाहिर चर्चा झाली.त्यात सर्वश्री मुज़फ्फर हुसेन(पद्मश्री),डॉ. वि.स.जोग,डॉ.कुमार शास्त्री व डॉ.किशोर महाबळ यांनी विचार मांडले.शेवटी लेखक डॉ. नि.र.व~हाडपांडे यांनी शंका समाधान केले. वृत्तांत ७ एप्रिलच्या सकाळ व इतर वर्तमानपत्रांत आला आहे.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

नीलकांत 18/04/2008 - 10:42
देशावर उपकार करण्याची क्षमता कुणातच नाही. फार फार ह्या लोकांच्या हातात त्याकाळी देशाची सत्ता होती आणि त्यावेळी यांनी चुकांपेक्षा चांगली कामे जास्त केली. म्हणून त्यांचं देशाच्या पायाभरणीत योगदान मान्य करावं. पण स्वातंत्र्यानंतर यांनीच देशाला दिशा दिली... सोबत पुढंचं वाक्य जर का असं असेल की... हे नसते तर देश इथवर आलाच नसता, तर हे मात्र चुक. देश इथवर आला असताच. देश प्रगती करतो याला जेवढे नेते जवाबदार असतात त्याही पेक्षा देशाची जनता जवाबदार असते. याचा प्रत्यय आपल्या शेजारी देशांकडे पाहून यावा. आमच्या नेत्यांच्या धोरणाला जनतेने उत्तम साथ दिली म्हणून आपण इथवर आलो. नेहरूंच्या काळीसुध्दा नेहरूंना उत्तम पर्याय उपलब्ध होते. मात्र आता या जर तर ला अर्थ नाही. नेहरुंनी देश निर्माणासाठी खुप कष्ट घेतले हे जसं मान्य करावं तसंच त्यांनी खुप घोडचुका केल्या आहेत हे सुध्दा मान्य करावं. आज गांधी-नेहरूंना उगाच विरोध किंवा उगाच अनुनय करण्यात राजकिय सोडला तर अन्य कसलाच फायदा नाही. ते होते त्यांनी त्यांचं योगदान दिलं, त्यांच्या पंचवार्षीक योजने दरम्यान उभारलेल्या बहुद्देशीय प्रकल्पांचा लाभ आजही होतो आहे, त्यांनी देशाला नवी दिशा दिली. मात्र त्याच वेळी त्यांच्या स्वप्नाळू भुमिकेमुळे काश्मिर प्रश्न रेंगाळला आहे, चीनचं आक्रमण आणि पराभव यांचं श्रेय सुध्दा त्यांचंच. याच शल्यात ते गेले. असे अनेकानेक मुद्दे येथे देता येतील. विषयांतर होईल म्हणून थांबतो. आपला चर्चा विषय आहे की भारताला तरूण पंतप्रधान हवा की नको. लायकी वयानुसार ठरते की नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

आनंदयात्री 18/04/2008 - 11:05
विषयांतराबद्दल क्षमस्व पण राजकारणासारख्या विषयावरसुद्धा लिहीतांना त्याच्या लिखाणात कधीच कुठला अभिनिवेष नसतो, नीलकांताचे कौतुक वाटते. :) मी स्वत: प्रयत्न करुनही अजिबात साध्य करु शकलो नाही आजतागायत. अभिनंदन नीलकांत.

विद्याधर३१ 18/04/2008 - 07:46
तरुण रक्त वगैरे ठीक आहे. पण डायरेक्ट पंतप्रधानपद ?? आपण लायक आहे हे सिध्द तरी करुद्या की त्याला. सुमार केतकराना वाटले म्हणून राहूल आणी प्रियांका काही लायक ठरत नाही. विद्याधर

विसोबा खेचर 18/04/2008 - 09:51
छान चर्चा सुरू आहे, वाचून जरा टाईमपास झाला! ;) बाकी, हल्लीचं राजकारण हा माझ्या आवाक्याबाहेरचा आणि बुद्धीपलिकडचा विषय आहे... चालू द्या... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

एक 18/04/2008 - 23:30
आजचं राजकारण आणि बुद्धी यांचा काही संबंध राहिला आहे का? बिन मणक्याची पाठ, दोन हात (वरच्यांचे पाय पकड्ण्यासाठी) आणि जीभ (वरच्यांचे *** चाट्ण्यासाठी, किंवा गुणगान गाण्यासाठी) असली कि पुरे.. *** == वरच्याच्या मनात येईल तो अवयव. यापैकी कुठलही क्वालिफिकेशन तुमच्या आमच्याकडे नाही. त्यामुळे आपण बाहेरच बसलेलं बरं, काय म्हणता?

नीलकांत 18/04/2008 - 10:25
भारतात निवडून आलेला कुणीही पंतप्रधान होऊ शकतो. लोकसभेच्या निवडणूकीसाठी उभे राहण्याची वयाची पात्रता आहे २५ वर्षे. ती राहूलनी पुर्ण केली आहेत. येत्या निवडणूकीत जर का तो बहूमत (आता हे शक्य नाही) किंवा बहूमताच्या जवळ जर गेला आणि त्याची इच्छा झाली पंतप्रधान व्हायची तर त्याला अडवणार कोण? याचा अर्थ मला या देशाचा पंतप्रधान केवळ राहूलच व्हावा असं वाटतं असं नाही. मात्र राहूल गांधी पंतप्रधान झाल्याने देशाचं काही नुकसान होईल असंही वाटत नाही. उलट झालंच तर , राहूलला आपल्या खुर्चीची चिंता नसल्यामुळे तो जास्त निश्चिंतपणे भारताच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकेल असं वाटतं. सध्या देशाची परिस्थिती पाहता, प्रादेशीक पक्षांना आलेलं महत्व लक्षात घेऊन असं म्हणता येईल की कुठलाही एक पक्ष बहूमतात येणं शक्य नाही. त्यामुळे येत्या काळात ज्याला जास्त गतीनं आणि योग्य असं राजकारण करता येईल तो पंतप्रधान पदाच्या जवळ जाईल. ह्यात मात्र राहूल कच्चा असण्याची शक्य आहे. कारण अशी गळेकापू स्पर्धा त्याने कधीच अनुभवलेली नसेल. राहूलसाठी मार्ग मोकळा व्हावा म्हणून काही वर्षांपुर्वी खुप फार्मात असलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंना मध्यप्रदेशात लक्ष केंद्रीत करण्यास सांगण्यात आले. कॉग्रेसच्या परंपरेप्रमाणेच सारं घडतंय. सध्या राहूल आपला ग्रुप बनवताहेत, सचिन पायलट, मिलींद देवरा आदी नवी मंडळी सुध्दा सोबत आहेत. ज्यांना काँग्रेस आवडत नाही त्यांनी निवडणूकीत कॉग्रेसला हरवावं. म्हणजे वादच मिटला. या चर्चेत केवळ एवढंच सांगावसं वाटतं की कॉग्रेस परिवार म्हणजे देशाचे शत्रु वगैरे असं काही नाही हो. गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांनी या देशाला योगदान दिले आहे. त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करणार्‍या परिवारांतून सुध्दा आता युवराज आणि युवराज्ञी समोर येताहेत. या युवराज्ञी बद्दल वरचाच उल्लेख करता येईल की प्रमोद महाजनांच्या मुलीच्या नावात महाजन कायम ठेवून मग त्यांना समोर आणल्या गेले आहे. गोपीनाथरावांचे सुपुत्र सुध्दा राज्यस्तरीय पदाधिकारी आहेत. 'परिवारा'च्या भाषेत जवाबदारी किंवा दायित्व असा शब्द आहे. आपण लायक आहे हे सिध्द तरी करुद्या की त्याला. सुमार केतकराना वाटले म्हणून राहूल आणी प्रियांका काही लायक ठरत नाही. हे मात्र पटले, केतकरांना काय वाटतं हे मात्र कुणीही सांगू शकतो. ;-) सोबतच काही नावं देतो पंतप्रधान झालेल्यांची, देवेगौडा, चंद्रशेखर आणि इंद्रकुमार गुजराल. नीलकांत

In reply to by नीलकांत

आनंदयात्री 18/04/2008 - 10:39
>>या चर्चेत केवळ एवढंच सांगावसं वाटतं की कॉग्रेस परिवार म्हणजे देशाचे शत्रु वगैरे असं काही नाही हो. अम्म्म .. टु बी डिप्लोम्याटीक .. ते देशापेक्षा स्वतःचे जास्त मित्र आहेत. >>गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांनी या देशाला योगदान दिले आहे. अहो राजकारण हा पिढीजात धंदा आहे त्यांचा !

In reply to by आनंदयात्री

मदनबाण 18/04/2008 - 10:58
टु बी डिप्लोम्याटीक .. ते देशापेक्षा स्वतःचे जास्त मित्र आहेत. ज्याला जे मिळेल ते त्याने ओरबाडुन घ्यावे अजुन काय !!!!! हे राजकारणी म्हणजे आपल्या देशाला चिकटलेली गोचीड आहेत..... (१०० मै से ९९ धोकेबाज ) असे समजणारा..... मदनबाण

इनोबा म्हणे 18/04/2008 - 16:30
'आम्ही पंतप्रधानपदासाठी इच्छूक नाही' असे आम्ही आत्ताच जाहीर करतो. मागाहून उगाच वाद नकोत. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

ग़ेले दोन दिवस झाले मी ह्या घटनेचा विचार करत आहे. पहिल्यांदा मी नेहमीचच आहे म्हणून दुर्लक्ष करून विसरण्याचा प्रयत्न केला पण काल रात्री "बघूया काय चाललय देशात" म्हणून "टी व्ही" लावला तर तेच नाटक चालू. अशी सणक आली ना मस्तकात कि विचारू नका, म्हणूनच हा लेख लिहण्याचा खटाटोप .... आत ह्यात गांधींचा काय संमंध ? पण मी ज्या लोकांबद्दल बोलतोय ते महात्मा गांधी नसून आजचे ढोंगी गांधी म्हणजे अनुक्रमे "सोनिया ग़ांधी, राहुल गांधी व प्रियंका वढेरा [ सोईसाठी ग़ांधी , कारण त्याशिवाय व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत नाही ]." एकूण दोन घटना आहेत ..... १.

गमतीदार ऊखाणे.

विवेकवि ·

शितल 17/04/2008 - 21:03
काय हो लग्नाच्या सीझन चालला आहे म्हणुन हे उखाणे की काय ?

वडापाव 18/04/2008 - 13:08
मस्त आहेत, उखाणे लिहायला अन् वाचायला मलाही मजा येते. मी सुध्दा काही उखाणे सुचल्यावर लिहीन म्हणतो. आपला नम्र, वडापाव

सत्या 23/04/2008 - 13:38
रावणाला आला राग बिभिशण हसल्यावर............... रावणाला आला राग बिभिशण हसल्यावर............... .......रावा॑चे नाव घेते ......ला बसल्यावर.....!!!!!!!!!!!!!

सत्या 23/04/2008 - 13:46
रावनाच्या देशात रम आणि वोड्का........... ......राव दिस्ल्यावर सर्वानि मिळुन झोड्पा.

Taxonomy upgrade extras
पुण्यात औन्ध मधे बंगला उभा आहे ऐटित जळू नका लोकहो ... राव आहे आय़् टीत पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' , ........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी. पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक, .... आहेत आमचे फार नाजुक. चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे म्हैस तर............ आहे रेडा. अधिकमासात आईने दिली चांदिची परात, सखींनो २७ फेब्रुवारीला .... ची आली होती हत्तीवरुन वरात. मिताली बिल्डींग,तिसरा मजला घर नं - ११ , घराला लावली घंटी, वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी. गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, ...

कोंढाणा

उदय सप्रे ·

धमाल मुलगा 17/04/2008 - 11:58
झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा ! दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा !
हर हर महादेव ! काश, हम भी होते उस जमाने में... - (मावळखोर्‍यात फिरणारा ढाण्या छावा) ध मा ल.

मनस्वी 17/04/2008 - 14:14
झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा !
काव्य आवडले.

सागर 17/04/2008 - 14:56
उदय मित्रा, नेहमीप्रमाणेच जोशपूर्ण काव्य आहे. झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा ! या चार ओळी तर मस्तच शिवाजी महाराजांच्या काळच्या इतिहासावरचा अधिकार आणि तुझी प्रतिभाही शब्दां-शब्दांतून दिसते... असेच लिहित रहा आणि समस्त महाराष्ट्राला शिवरायांच्या तेजाने भारुन टाक... आजच्या रयतेला आणि नेत्यांनाही अशा प्रेरणेची गरज आहे. (शिवरायांच्या सुराज्याची पुन्हा स्वप्ने पाहणारा) सागर

उदय सप्रे 17/04/2008 - 16:27
प्रतिक्रियांबध्दल आभार ! मला वाटले होते की शेवटच्या ४ ओळींनी तानाजी च्या स्वराज्याच्या प्रायोरिटीज् आणि आपण रायबाच्या लग्नात नसलो तरी चालेल पण आपला बाप "शिवबा" ही कसर नक्कीच भरून काढेल असा विश्वास आणि म्हणूनच हक्कचे शिवबांस सांगणे पण दिसते , हे सर्व बघुन डोळ्यांत पाणी येईल..... दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा !

In reply to by उदय सप्रे

सागर 17/04/2008 - 17:51
मित्रा तानाजीची अवस्था आणि शेवटचे कडवे - डोळ्यांत पाणी तर येणारच पण मी उल्लेखिलेल्या ओळींमुळे त्वेष आणि जोश दोन्हीही येतो. सध्या तरी आपल्या समाजाला अश्रू गाळण्यापेक्षा त्वेषाची आणि जोशाची गरज जास्त आहे बाकी प्रत्येक शब्दन् शब्द टच् करणारा आहे यात शंका नाही जय भवानी जय शिवाजी (मावळा) सागर

विदेश 17/04/2008 - 16:35
कोंढाणा- कोढाणा यातील मी काय वाचू! माझ्या अल्पमतीनुसार कोंडाणा वाचू का? पुन्हा गैरसमज नको-(काव्य उत्तमच आहे याबद्दल दुमत नाहीच)

उदय सप्रे 17/04/2008 - 16:50
या किल्ल्यावर फार पूर्वी कौडिण्य ॠषींचे वास्तव्य होते , पण गडाचे नाव लिहिताना इतिहासात "कोंढाणा" असेच म्हणतात असे मला वाटते. आम्ही पण अल्पमतीच आहोत , आमचा काहीही गैरसमज नाहिये साहेब कुणाहीबध्द्ल , "कोढाणा" ही टंकलेखनातील चूक आहे - म्हणून जाहीर माफी मागतो ! उदय सप्रे

प्राजु 18/04/2008 - 09:29
अतिशय सुंदर कविता. 'गड आला पण माझा सिंह गेला' इतिहासात वाचलेले हे शिवरायांचे शब्द आठवले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

उदय सप्रे 18/04/2008 - 11:13
प्राजु, अभिप्रायबध्दल धन्यवाद ! तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यापासूनच स्फूर्ती घेऊन माझे ब्लॉग्ज तयार केले आहेत , सवड मिळेल तेंव्हा बघा आणि मला अभिप्राय जरूर कळवा. कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/ आपला मित्र, उदय सप्रे

विकास 18/04/2008 - 22:53
कविता आवडली. चित्र मात्र दिसत नाही आहे. बाकी एक अवांतर आठवणः काही वर्षांपुर्वीची (भारतातील - महाराष्ट्रातील) - मित्र मित्र बोलत असताना "सिंहगड" हा शब्द आला. त्यावेळी एका मराठी मुलाने प्रश्न विचारला - म्हणजे तोच नं, ज्याचा "सिंहासारखा शेप" आहे तो? ;)

प्रमोद देव 18/04/2008 - 23:15
उदयराव हे एक काव्य म्हणून उत्तम आहे पण त्यात एक ऐतिहासिक चूक आहे. ही चूक सुधारता आली तर पाहा. झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा ह्यामध्ये तानाजीने उदयभानाला छाटलेले नाहीये तर ते त्याच्या मामाने... शेलारमामाने छाटलेय. उदयभानाशी लढताना तानाजी कामी आला हा इतिहास आहे. अर्थात तानाजीच्या हौतात्म्यामुळे शिवाजी महाराजांनी कोंडाण्याचे नाव बदलून सिंहगड(तानाजी म्हणजे सिंह ... असे महाराज म्हणाले) केले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

उदय सप्रे 22/04/2008 - 09:57
प्रमोदकाका, आणखीन एक लिहायचं अनावधानानं राहून गेलं : "सिंहगड" हे नांव फार आधीपासून प्रचलित होते , तानाजीच्या स्मॄतीप्रित्यर्थ महाराजांनी कोंढाणयाचे नांव बदलून "सिंहगड" केले हा एक पाठ्यपुस्तकी कल्पनाविलास आहे ! "गड आला पण माझा सिंह गेला" ही पण कल्पनाच आहे पण ती तानाजीच्या हौतात्म्याला अगदी साजेशी आणि महाराजांच्या माणसांवरील प्रेम करण्याच्या स्वभावाशी अगदी सुसंगत अशीच आहे - त्यामुळे हे लिहिणार्‍या लेखकाच्या कल्पनाशक्तीला सलाम !

उदय सप्रे 19/04/2008 - 09:37
प्रमोदकाका, सर्वप्रथम तुमच्या या पत्राबध्दल आभार ! कारण कविता वास्तवाचे भान ठेवून वाचणारे खूप कमी लोक असतात आणि तुम्ही त्या खूप कमी लोकांतील एक आहात हे जाणवले. काही स्पष्टीकरण : १. राजा शिवछत्रपती आवृत्ती १४ वी , पान ७७७ पहा : तानाजीचा वज्राघाती तडाखा उदयभानला बसला ! उदयभानचा शिलाघाती प्रहार तानाजीवर कोसळला ! दोन्हीही महप्रचंड शिखरे एकदम एकांच क्षणी धरणीवर कोसळली ! २. छत्रपती शिवाजी महाराज - कृ.अ.केळुस्कर्-तिसरी आवृत्ती- पान ३४० : दोघेही वीर मोठे शूर्,बलवान असल्याकारणाने त्यांची झटापट बराच वेळ मोठ्या निकराने झाली.दोघांसही पुष्कळ जखमा झाल्या आणि शेवटी परस्परांचे वार परस्परांच्या वर्मी लागून ते दोघेही एकाच वेळी समरभूमीवर चित् होऊन गतप्राण झाले. ३. श्रीमान योगी - रणजीत देसाई - अठरावी आवृत्ती - पान ६२१-तानाजीचा भाऊ सूर्याजी राजेंना तानाजीच्या बलिदानाची हकीकत सांगताना म्हणाला : उदयभानूच्या तडाख्यानं त्यांची ढाल तुटली.डाव्या हातावर वार झेलीत तानाजी उदयभानूला भिडले; आणि काय होतय् ,हे कळायच्या आत दोघेही जमिनीवर कोसळले ! प्रमोदकाका, यातील संदर्भ क्रमांक १ व २ यांचा शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील अधिकार वादातीत आहे. क्रमांक ३ - कै.रणजीत देसाई हे भाषाप्रभू आणि म्हणूनच माझा आदर्श आहेत , त्यांचा संदर्भ ऐतिहासिक दृष्ट्या दिलेला नाही , माझा मानाचा मुजरा म्हणून दिला आहे ! शेलारमामांनी उदयभानूस छाटले नव्हते ! हा शाळेतील पाठ्यपुस्तकातील भाग वाटत आहे - तरीही तुम्ही मला संदर्भ दाखवा , मी चूक नक्कीच सुधारीन ! यत फक्त मावळे ३०० होते की ४०० हाच वाद आहे पण त्यामुळे जास्त संख्या असलेल्या गनिमांपुढे कमी मावळे झुंजले या सत्यास गालबोट लागत नाही ! "ऐतिहासिक काव्य किंवा कादंबरी लिहीत असताना कल्पनाविलास करता येतो पण ऐतिहासिक सत्य डावलता येत नाही !"याची विनम्र जाणीव मला आहे कारण संभाजी महाराजांसारख्या वादग्रस्त वादळी व्यक्तीमत्वावर मी कादंबरी लिहीत आहे त्यामुळे असले विवाद उद्भवणार याची मी मनाची पूर्वतयारी केली आहे. या उत्तरामधे आपल्याबध्दल कुठलाही आकस वा गैरसमज नाहिये ह्याची कृपया नोंद घ्यावी , उलट एक सुजाण आणि दक्ष वाचक मला लाभल्याबध्दल आणि हे व्यासपीठ मला दिल्याबध्दल तुमचे आणि मि.पा. चे कोटी कोटी आभार ! आपल्याशी प्रत्यक्ष भेट वा बोलायला आवडेल. आपला विनम्र, उदय सप्रे भ्रमणध्वनी : ९९६७५ ४२७०३

In reply to by उदय सप्रे

प्रमोद देव 22/04/2008 - 11:39
उदय माझे इतिहासाचे वाचन आणि ज्ञानही मर्यादित आहे. आम्हाला दुसरीत एक नाट्यप्रवेश होता ... गड आला,पण सिंह गेला! त्यावेळी तो मला मुखोद्गत होता. त्यात जे म्हटले होते त्याप्रमाणे... मी म्हटलंय. बाकी माझ्याकडे अजून काही माहिती नाही. जे काही पाठ्य पुस्तकात वाचले त्यालाच आम्ही भाबडेपणाने खरा इतिहास मानतो. तेव्हा तुम्ही म्हणता आहात तेच जास्त खरे असेल असे मी गृहीत धरतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

जबरदस्त कविता ! मिपाची जुनी पाने चाळताना आज खजिनाच सापडतो आहे. सस्नेह विशाल ************************************************************* वंदे मातरम .....!

आशिष सुर्वे 13/08/2009 - 13:11
'कोंढाण'' ... निश:ब्द! इतिहासावरील चर्चा वाचून आनंद झाला.. अशा चर्चा होणे फार गरजेचे आहे असे मला वाटते.. ज्ञानात फार मोलाची भर पडतेय. हर् हर् महादेव!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

मदनबाण 13/08/2009 - 13:25
सुंदर कविता... :) दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा ! अप्रतिम !!! मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

आम्ही तोरणा चढत होतो.. एक आज्जी भेटल्या , त्या म्हणाल्या " आर दमताय काय ? आमचा शेलारमामा अर्ध्या तासात चढायचा" आमच्या अडानी मित्राला शेलारमामा कोण हेच माहीत नाही तो म्हणाला आणा शेलारमामाला जर १/२ तासात चढला तर १००० रुपये देयिन आम्ही हसुन हसुन दमलो . नंतर त्याला चुक कळल्यावर चेहरा त्याचा बघण्यासारखा झाला होता

दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा ! हे आवडले कविता पण आवडली

आपल्या लेकाच्या - रायबाच्या लग्नाचे आवतण अर्थात् आमंत्रण द्यायला आलेल्या तानाजीला जिजाऊंच्या मनातील सल ऐकून रहावले नाही आणि आवतण द्यायच्या ऐवजी तो जिजाऊंचे हे आवतण स्वीकारून कोढाणा केवळ चारशे मावळे आणि भाऊ सूर्याजी यांच्यासह जिंकून मृत्यूला सामोरा गेला !