Skip to main content

शिवरायांचे स्मारक

लेखक हेरंब यांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
शिवरायांचा पुतळा समुद्रात हे काही पटले नाही. शिवाय पुतळा उभारणार्‍या नेत्यांना महाराजांविषयी किती आस्था आहे हे जनता चांगलेच ओळखून आहे. स्मारक हवेच तर सर्व प्रमुख गडांच्या डागडुजीसाठी काहीतरी करा. राजगडाकडे तर सरकारचे लक्षच नाही. आपले नेते (सर्व पक्षातले) एक दिवस जरी शिवबांसारखे प्रामाणिकपणे वागले तरी मोठे आश्चर्य म्हणावे लागेल!

यौवनाची बाग

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आत्ताच आमुच्या जीवनाची आत्ता कुठे सुरवात झाली फिरुनी पुन्हा या यौवनाची नुकतीच साठी मागे सरुनी यौवनाला जाग आली बहर पुन्हा आला असा की जीवनाची बाग झाली प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
Taxonomy upgrade extras

गुलाबाचे काटे

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे
Taxonomy upgrade extras

"एक होता पोल्ट्रीयात्री"

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सांगायला बरे वाटतेय की आपले काही सदस्य मिळुन एक नवचित्रपट काढत आहेत. नव्या टेक्नीक नुसार या चित्रपटात प्रेक्षकाना कथेत हवा तो हवा तसा तसा बदल करण्याची सोय असेल. लव्ह ष्टोरी/ शादी / ताटातुट / व्हीलन / हीरो ला चॅलेन्ज / पोलीस/ चोर / तस्करी / लैच लाथाबुक्याने / तलवारीने / सायकल च्या चेन ने / बंदुकानी हाणामारी काय वाट्टेल ते लिहु शकता. थेटरात पिक्चर दिसताना *ज्याला जसा हवा तसा एकाच वेळेस दिसेल अशी सोय ह्या नव्या टेक्नीक मधे आहे (*ही आयडीया : मिपा कुटुंबीयांकडुन पेटंटेड) तुम्ही यात भर घालु शकता / काटछाट करु शकता. तर मग वाट कशाची पहाताय ?

नाते पावसाचे

लेखक चेतन यांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नाते पावसाचे पावसाचा शिडकावा अन् मायेचा ओलावा , मातीचा गंध आणि ह्रुदयाचा हा बंध वार्‍याची साद हेलावणारी ती हाक, चमकणारी विजं अन् प्रेमाचे हे बिजं पावसाचे अन् प्रेमाचे नाते तरी काय? सागराचे उधाण अन् कल्पनांचे आसमान चेहर्‍यावर उडणार्‍या तुषारांचे नसते भान हेलकावणार्‍या लाटा अन् भिजलेल्या वाटा, भिरभिरते विचार आणतं असतात मनातं पावसाचे अन् मनाचे नाते तरी काय? पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात
Taxonomy upgrade extras

साठेचं काय करायचं?? ... नाटक...

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
साठेचं काय करायचं... लेखक : राजीव नाईक... दिग्दर्शक संदेश कुलकर्णी कलाकार : निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष निर्मिती :समन्वय पुणे... ( मौज प्रकाशनाच्या आताची नाटकं या नाईक यांच्या नाट्यसंग्रहात हे नाटक आहे.) हे नाटक पाच सहा भाषांमध्ये भाषांतरित झालं...समन्वयने साठच्या आसपास प्रयोगही केले.. क्रोएशियन रंगभूमीवरही त्याचे प्रयोग झाले... मी या नाटकाचा प्रयोग पाहू शकलो नाही तरी केवळ वाचूनही ते मला फ़ार आवडते..

बाबा...

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
फादर्स डे च्या निमित्ताने... १५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती. खरं तर मदर्स डे आणि फादर्स डे हे साजरे करण्यासाठी अमुक एखादी तारिखच हवी असं नाही. कारण आपल्या मात्यापित्यांचे आपण नेहमीच ऋणी असतो. माझ्या बाबांबद्द्ल काय सांगू मी?? आई सांगते की, माझा जन्म झाला त्याचदिवशी माझ्या काकाच्या पॉवर लूम्सच्या कारखान्याचं उद्घाटन झालं. सगळे जण कार्यक्रम आटोपून बसले होते आणि बाबा सांगत आले की, "मुलगी झाली, मुलगी झाली". त्या काळाला शोभेल अशीच असलेली माझी आजी थोडी नाराज झाली.. .. आणि आई का नाराज झाली या विचाराने माझे बाबा ही नाराज झाले.

चटका !

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
चटका.....एक विरह कविता..... तुझी साथ असल्यावर मरणातसुध्दा जगल्यासारखं वाटतं ! माझ्या तुझ्यावरील प्रेमाच्या उंचीपुढे मला आभाळही ठेंगणं वाटतं ! प्रेम डोळ्यांतून डोकावतं आणि स्पर्शामधे रेंगाळतं ! नि:शब्द भावांचा हा अनुभव, जणू आपलंच बोलणं गेंगणं वाटतं ! कधीतरी बरस ना सखे माझ्यासाठी, वळवाच्या पावसासारखी ! मला सम्पूर्ण वाचून पण तू थंडच ! जसं "पाण्याने" आगीला "डागणं" वाटतं ! ------------------------------------------------------------------------------------ आपण मला इथेही भेटू शकता : कवितांजली : http://uday-sapre.blogsp

घर.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
घर..... तो म्हणाला, "मी आपल्या दोघांसाठी बारा खोल्यांचं प्रशस्त घर बांधलंय !" मी म्हणालो, " मी बारा माणसांचं दोन खोल्यांचं घर वर्षानुवर्षे सांधलंय !"

(रोज वाढते महागाई -)

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या महगाईला उद्देशुन- चाल - संथ वाहते कृष्णामाई ------------------------------------------------------ रोज वाढते महागाई.! जनतेवरच्या अन्यायाची जाणीव तिजला नाही! रोज वाढते महागाई.!! महा_गाई ही शासन निती, गतीगतीने सदा वाढती! फायदातोटा गणिती कल्पना,नाही तिज ठायी !१! रोज वाढते महागाई.!! कुणी रुपया म्हणती खोटा, चलनवाढीचा फुटता फुगा ! बाजाराची उतरुन धुंदी, हाती काही नाही !२! रोज वाढते महागाई.!! सतत वाढते सोने चांदी, गृह्कर्जही मागे नसती ! माणसांची ही व्हावी दैना , पगार कुचकामी? !३! रोज वाढते महागाई.!! आपला (कृष्णा काठचा) केळकर
Taxonomy upgrade extras