चटणी
वेगवेगळ्या ओल्या,सुक्या चटण्यांचे प्रकार ह्या धाग्यात लिहिले तर हव्या त्या चटणी साठी एकत्र कलेक्शन मिळेल.तुम्हाला काय वाटते?
१)शेंगदाणे +तीळ+लसूण चटणी
१ वाटी शेंगदाणे,१/२ वाटी तीळ, १०ते १२ सुक्या लाल मिरच्या,१ मध्यम गड्डी लसूण,मीठ
शेंगदाणे व तीळ वेगवेगळे खमंग भाजणे.गॅस न लावताच लाल मिरच्या दाणे तीळ भाजलेल्या गरम कढल्यात घालून थोड्या परतणे.कढल्याच्या तेवढा गरमपणा पुरतो.
मिक्सर मध्ये तीळ आधी फिरवून घेणे त्यावर दाणे, मग मिरच्या आणि शेवटी लसूण घालणे. भरडच वाटणे.
घट्ट झाकणाच्या काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवणे.
अतिशय खमंग ऑलपरपज चटणी तयार.भाकरीपासून वड्यापर्यंत कशाही बरोबर मस्तच!
२)चणाडाळीची चटणी
१ वाटी चणा डाळ(हरबराडाळ) ,५ते ६ हिरव्या मिरच्या,१ पेराएवढं आलं,३ते ४ लसूण पाकळ्या,मीठ,फोडणीचे सामान
डाळ ३ ते ४ तास भिजत घालणे व नंतर वाटणे.वाटताना आले,लसूण व मिरच्याही त्यात घालून भरड वाटणे.
तेलावर खमंग फोडणी करणे.कढीलिंबाची ४,५ पाने फोडणीत घालून चुरचुरीत होतील असे पहाणे.मग ही फोडणी भरड वाटणावर घालणे.मीठ घालणे व कालवणे.
इडली,डोसा,उत्तपा इ. प्रकारांबरोबर ही चटणी फार छान लागते.
३)ओल्या खोबर्याची चटणी
ओले खोबरे १ वाटी, ४ते ५ सुक्या लाल मिरच्या,लसूण १० ते १२ पाकळ्या,१पेरभर आलं,मीठ,फोडणीचे सामान
ओले खोबरे वाटणे,लालमिरच्या घालून वाटणे,लसूण व आले घालून वाटणे,मीठ घालून परत एकदा मिक्सर फिरवणे.
तेलाची खमंग फोडणी करणे,कढीलिंबाची पाने चुरचुरीत करुन घेणे आणि हवी असल्यास पाव चमचा उडदाची डाळ घालणे व तीही खमंग होईल असे पहाणे.वाटणावर ही फोडणी ओतून चांगले कालवणे.
इडली,डोसा,उत्तपा इ. बरोबर ही चटणीही फर्मास लागते.
वाचने
27031
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
पहिला प्रकार..
कढीपत्त्याची चटणी
In reply to कढीपत्त्याची चटणी by मनस्वी
सावलीत.....
In reply to सावलीत..... by प्रभाकर पेठकर
कढीपत्ता आणि कढीलिंब
In reply to कढीपत्ता आणि कढीलिंब by मनस्वी
उत्तर
कडुलिंब
In reply to कडुलिंब by स्वाती दिनेश
ओक्के!
अगं
In reply to अगं by वरदा
अफलातून धागा..
In reply to अफलातून धागा.. by प्राजु
????
In reply to ???? by प्रभाकर पेठकर
ही ही ही
In reply to ???? by प्रभाकर पेठकर
अहो..
In reply to अहो.. by प्राजु
नाही म्हणणार...
धागा मस्त आहे.
In reply to धागा मस्त आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिरव्या मिरचीचा ठेचा!
छान
मस्त चटण्या आहेत...
अशीच
In reply to अशीच by वरदा
या दोन
छान धागा
In reply to छान धागा by ईश्वरी
एक छोटीशी टीप
अच्छा
पंचामृत
आहा!
लाल तीखट
ए! हसू नका हं!!
In reply to ए! हसू नका हं!! by पिवळा डांबिस
ए झकासऽ
अजून एक चटणी - सुकटाची
आंबट-गोड टक्कू
वावा...
अजून एक..
In reply to अजून एक.. by स्वाती दिनेश
असंच
मेतकूट, अंड्याची चटणी, कांद्याची चटणी
In reply to मेतकूट, अंड्याची चटणी, कांद्याची चटणी by वेलदोडा
आम्ही अशी कांद्याची भाजी करतो
अजून..
ईश्वरीताई...
मुंग्यांची चटणी
काय मस्त!!
चटण्यांची दुनिया!
पाकिस्तानी आणि लेबनीझ चटणी...
+१
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to मस्त by नंदन
तिखट....?
बोंबिलाची
पावसाळ्या
खूप छान
अजून
- दाण्याची चटणी
एक वाटी शेंगदाण्यात एक चमचा जिरे, आवडीप्रमाणे तिखट, चवीपुरते मीठ व चिमुटभर साखर घालून भरड वाटावे.
- झिठमिठलं
हिरवी मिरची भाजून घ्यावी. त्यात मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, दही घालून व्यवस्थित कालवून घ्यावे.
~साक्षी