Skip to main content

आल्यावर असा येशील की...

लेखक फटू यांनी रविवार, 01/06/2008 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
कधी सांज ढळत असताना ह्रदयात उतर तू माझ्या कधी चांदणं फुलत असताना ह्रदयात उतर तू माझ्या आल्यावर असा येशील की तू परत जावू नकोस राजा तू इथे नाहीस तरीही तू सोबत आहेस असंच वाटतं मला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जणू तूच आहेस रे लपलेला जेव्हापासून तुला ओळखते, आपलं मानलं आहे मी तुला माझं भोवताल, माझा देह सारं काही तूच व्यापून उरलेला आल्यावर असा येशील की तू परत जावू नकोस राजा कधी सांज ढळत असताना ह्रदयात उतर तू माझ्या कधी चांदणं फुलत असताना ह्रदयात उतर तू माझ्या रात्र अन् दिवसाचे श्वास माझे, जणू तुझेच आहेत सारे शपथ आयुष्याची, माझं आयुष्य आहे तुझी देणगी रे या एकाकी वाटचालीमध्ये तूच आहेस रे वाटाडया माझा कितीही असला दुरावा तरी तू आहेस बाहुपाशात माझ्या आल्यावर असा येशील की तू परत जावू नकोस राजा कधी सांज ढळत असताना ह्रदयात उतर तू माझ्या कधी चांदणं फुलत असताना ह्रदयात उतर तू माझ्या (लेखन हे न माझे, हे त्याचे गाणे आहे... 'सुर' या हिन्दी चित्रपटातील ' 'कभी शाम ढले तो मेरे दिलमे आ जाना' या गीताचा भावानुवाद...)
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1748
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया