Skip to main content

( आयपीएल चा खेळ रे)

लेखक अमोल केळकर यांनी रविवार, 01/06/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
आयपीएल च्या अंतीम सामन्याच्या पुर्वसंधेला डि.वाय पाटील स्टेडिअमवर जाण्यापुर्वी एक विडंबन चाल प्रसिध्द गाणे ' विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे !! ============================================================== आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे ! आनंदाची शाम त्यांची आनंदाची रात्र रे !! आयपीएल चा खेळ रे,-- खेळाडुंची खाण रे, चौकार-षटकार मार रे ! प्राणांचाही प्राण माझा, पैसा तुची एक रे !! आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !---- सर्वांचा तो देव रे, मोदी स्वयंमेवरे ! सर्वांचा तो देव रे, मोदी स्वयंमेवरे ! प्रिती, शाहरुख, अंबानी , घेती वाटुन संघ रे, !! आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !---- सचिनचा आराम रे, पोलॅक करी काम रे ! मुक्त होई हरभज्जी , चिटणीस येई आत रे !! आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे !---- सामने अनेक रे, बुकी करी फिक्स रे ! टोनी, शास्त्री , अरुणलाल - सांगती आख्यान रे !! आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे ! आनंदाची शाम त्यांची आनंदाची रात्र रे !! आयपीएल चा खेळ रे,-- --------------------------------------------------------------------- आमचा पाठिंबा धोनीला - विजयासाठी शुभेच्छा !!! (मुंबई इंडिअन्स) केळकर
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3077
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

आयपीएलचा खेळ रे यालाच लोक क्रिकेट समजतात रे खर्‍या तंत्राला विसर रे आतशबाजीलाच सलाम रे |

खेळाडुंची खाण रे, चौकार-षटकार मार रे ! प्राणांचाही प्राण माझा, पैसा तुची एक रे !! आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे ! मस्त !!!!

आयपीएलचा खेळ रे! अरे, अरे, काय रेऽऽ! ह्यालाच क्रिकेट म्हणतात का रे, शरीरविक्रयाचा खेळ रे. कोण माझा, कोण परका, सगळीच सरमिसळ झाली रे, धोनी माझा, युवराजही माझा हार-जीत कोणाची रे! पैसा माझा, खेळ परका, कमरेचेही सोडले रे, ह्यालाच क्रिकेट म्हणतात का रे, शरीरविक्रयाचा खेळ रे.

In reply to by प्रभाकर पेठकर

कोण माझा, कोण परका, सगळीच सरमिसळ झाली रे, धोनी माझा, युवराजही माझा हार-जीत कोणाची रे! हे खासच !

केळकरसाहेब अणि पेठकरशेठ, दोघांचीही विडंबने झकास... आपला, (सचिनप्रेमी) तात्या.

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !