सध्याच्या महगाईला उद्देशुन-
चाल - संथ वाहते कृष्णामाई
------------------------------------------------------
रोज वाढते महागाई.!
जनतेवरच्या अन्यायाची जाणीव तिजला नाही! रोज वाढते महागाई.!!
महा_गाई ही शासन निती, गतीगतीने सदा वाढती!
फायदातोटा गणिती कल्पना,नाही तिज ठायी !१!
रोज वाढते महागाई.!!
कुणी रुपया म्हणती खोटा, चलनवाढीचा फुटता फुगा !
बाजाराची उतरुन धुंदी, हाती काही नाही !२!
रोज वाढते महागाई.!!
सतत वाढते सोने चांदी, गृह्कर्जही मागे नसती !
माणसांची ही व्हावी दैना , पगार कुचकामी? !३!
रोज वाढते महागाई.!!
आपला
(कृष्णा काठचा) केळकर
मस्त
अरे झक्कास कविता.
संदर कविता
छान आहे
वा!
कविता छान आहे. आवडली
आवडले
झकास!