नमस्कार,
माझे नाव आसावरी जोशी. मी आर्किटेक्ट आहे. गेल्या ३-४ महिन्यांपासून मी या संकेतस्थळावर (हा शब्द बरोबर आहे ना?) येत आहे. येथील सभसदांचे लेखन आणि प्रतिक्रिया नेहमी वाचते. इथले वातावरण खूप छान आणि मनमुराद आहे. मला या संकेतस्थळाची सर्वात कोणती गोष्ट आवडली असेल तर ती आहे या संकेतस्थळाचे नाव! मिसळपाव हे नाव खरेच खूप युनिक आहे आणि ऍट्रॅक्टिव्ह आहे. मिसळपाव हा खूप फेमस पदार्थ आहे व तो सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळेच या संकेतस्थळाचे नाव लगेच लक्ष वेधून घेते. येथे दर दोन तीन दिवसाअंनी खाण्याचे छान छान मेनू होमपेजवर बघायला मिळतात त्याची गंमत वाटते. आज विचार केला की आपणही याचे सभासद होऊ म्हणून झाले.