Skip to main content

माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे...

लेखक फटू यांनी रविवार, 08/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही चांगले वागा, किंवा वाईट वागा माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे
Taxonomy upgrade extras

मिपाकरांना नमस्कार.

लेखक आसावरी जोशी यांनी शनिवार, 07/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझे नाव आसावरी जोशी. मी आर्किटेक्ट आहे. गेल्या ३-४ महिन्यांपासून मी या संकेतस्थळावर (हा शब्द बरोबर आहे ना?) येत आहे. येथील सभसदांचे लेखन आणि प्रतिक्रिया नेहमी वाचते. इथले वातावरण खूप छान आणि मनमुराद आहे. मला या संकेतस्थळाची सर्वात कोणती गोष्ट आवडली असेल तर ती आहे या संकेतस्थळाचे नाव! मिसळपाव हे नाव खरेच खूप युनिक आहे आणि ऍट्रॅक्टिव्ह आहे. मिसळपाव हा खूप फेमस पदार्थ आहे व तो सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळेच या संकेतस्थळाचे नाव लगेच लक्ष वेधून घेते. येथे दर दोन तीन दिवसाअंनी खाण्याचे छान छान मेनू होमपेजवर बघायला मिळतात त्याची गंमत वाटते. आज विचार केला की आपणही याचे सभासद होऊ म्हणून झाले.

प्रकाश चित्रे

लेखक झकासराव यांनी शनिवार, 07/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मागचे दोन तीन दिवस झाले पाउस सुरु झाला आहे. अगदीच बदाबदा ओतत नाहिये पण दोन तीन दिवस थोडा थोडा पडला आहे. त्याआधीचे ५-६ दिवसात एकदा माझं सहज लक्ष आकाशाकडे गेलं आणि मी आनंदीत झालो. कारण रोजच निळ दिसणार आकाश वेगळ्याच निळाईने नटल होत. त्यावर डिजाइन म्हणून की काय वेगवेगळे आकाराचे असे अतिशय शुभ्र पांढरे ढग होते. चला आता फोटो काढुच अस म्हणत म्हणतच ५-६ दिवस गेलेच. आणि पाउस आलाच. आता ते गेलेले ढग तर परत येणार नव्हते. पण काल पाउस नव्हता म्हणून वर गच्चीवर जावुन पाहिले तर काय परत तोच देखणा निळा रंग घेवुन आणि त्यावर पांढर्‍या शुभ्र ढगांचे डिजाइन घेवुन ढग होते. फक्त आता त्यांन्चा आकार काहिसा पसरलेला होता.

शिवस्तुती

लेखक पुष्कराज यांनी शनिवार, 07/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अति शितल मृदू शांत चंद्र्मा तो ललाटी जटी जया उगम पावे जन्हवी पुण्यदाती लेपुन तनू भस्मा स्वात्मनंदा विराजी नमन तव करीतो शंकरा पुण्यराशी अणू रणू व्यापणारी लोचने तीन दिव्य करी धरी ड्मरू आणि त्रिशुळ भव्य अति धवल दिव्य कांति तेजसी ती प्रकाशी नमन तव करीतो शंकरा पुण्यराशी अर्धांगी आदी शक्ती वाम अंगास ज्याच्या जगत वंद्य पुत्र गणपती स्कंदराजा देखणा करी प्रपंचा शिव विरक्त योगी नमन तव करीतो शंकरा पुण्यश्लोकी अविरत जपी रामा भक्त श्रेष्ठा दयाळा शरण तव येता उद्ध्ररसी कृपाळा सहज तरूनी जाइ प्राथ्रितो जो शिवाला नमन तव करीतो शंकरा विश्वनाथा नृत्यनिपुण नटराजा मोहसी तू
Taxonomy upgrade extras

कुणीतरी...

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 07/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कसे लागले वेड जीवाला कुठुन जुळले रेशीमधागे चांदरातीला चांदण्यांसवे कोण कुणासाठी हे जागे? कुठुन येइ असा अचानक प्राजक्ताचा गंध सभोवती कुणासाठी अन हसता हसता नकळत डोळे भरुन येती? कुणासाठी ही लागे हुरहुर कशासाठी ये भरुन हा उर कुणासाठी अन आनंदाच्या क्षणीही उठते मनात काहुर कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक कोण कुणा देणारे उत्तर तरी खरे की नाव कुणाचे आठवता मन होइ कातर...
Taxonomy upgrade extras

वीश

लेखक भारती यांनी शनिवार, 07/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तू तर माझी स्पेशल डीश द्यायच्याय तुला भरपूर वीश दिसली नाहीस एक दोन वीक बरी नव्हतीस, होतीस का सीक? स्पेशल माणसाला स्पेशल गीफ्ट आयुर्मान लाभो तुजला 'ह॑ड्रेड ए॑ड फीफ्थ'
Taxonomy upgrade extras