मस्त अरूणकाका. खाण्याविषयीच्या म्हणींचे 'भोजन' मस्त बनवले आहे. मजा आली वाचायला.
अवांतरः मराठीत म्हणींचा मोठा खजिना आहे. लेख वाचताना खाणे विषयावर अजून काही म्हणी व वाक्प्रचार आठवले.
साखरेचे खाणार त्याला देव देणार,
असतील शिते तर जमतील भूते,
खाणे थोडे मचमच फार,
गाढवाला गूळाची चव काय? ,
कोल्ह्याला द्राक्षे आंबट
दूधात साखर , भोजनभाऊ,
दूधाने तोंड पोळले की ताक फुंकून पिणे ,
आनंदावर विरजण पडणे ,
घरात नाही दाणा आणि पाटलीण म्हणा ,
चिऊ काऊचा घास ,
तोंडचा घास हिरावून नेणे,
खिरापत वाटणे .
ईश्वरी
लेखाची आठवण झाली. त्यात आश्या बर्याच पाककृती होत्या. उदा. घरादाराचे खोबरे, पाठीचे धीरडे, हाडांची कणीक इ. लेख पूर्ण आठवत नाही.
सुंदर लेख. वाचून मजा आली.
महेश हतोळकर
या जेवणात गरीबाघरची मीठ भाकर आणि कांदा, मुळा भाजी असती तर फार बरे झाले असते, असे आमची विठाई बोलत होती. सध्या बाहेरचे खाऊन खाऊन (शेण नव्हे हो !) तोंडाची चव गेली होती.
एकंदरीत हे जेवण खुपच छान झाले.
-( सणकी )पाषाणभेद
शब्दाच्या खेळाबरोबर पदार्थही छान बनवता की. ऐवढ्या म्हणीचा वापर चा॑गल्या प्रकारे केलेला आहे. रेसीपीच्या बाबतीत पहिला न॑बर येईल मिपावर. >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D<
(पुण्याची सोनम) राम राम मिपा
प्रतिक्रिया
हाहा
मस्त
आटे दाल का भाव माहित नसेल तर
चवदार
:)
हेहेहेहेह
शब्दखेळ
कोल्हटकरांच्या
भन्नाटच की!
लेख आवडला...
मस्त
वा! वा!.....
धन्यवाद
जेवण
सु॑दर
शब्दखेळ
मस्त