फरसबीची भाजी
आनंदघन यांचे राजवाड्यांचे गाव वाचले आणि आमची म्हैसूर ट्रीप आठवली.त्यावेळी आम्ही एका गेस्ट हाऊस मध्ये राहिलो असताना तेथल्या खानसाम्याने फरसबीची इतकी झक्कास भाजी केली होती की त्याच्याकडून रेसिपी घेतल्याशिवाय राहवले नाही.तीच पाकृ तुम्हाला सांगत आहे.
साहित्य- २५० ग्राम फरसबी,१ मध्यम कांदा, १/२ वाटी ओले खोबरे,२ सुक्या लाल मिरच्या,कढीलिंबाची ४,५ पाने,१/२ चमचा उडीदडाळ,फोडणीचे सामान,तेल,मीठ चवीनुसार,साखर १ चहाचा चमचा,कोथिंबिर
कृती- कांदा चौकोनी चिरा,फरसबी चौकोनी चिरा.१ टेबलस्पून तेलात फोडणी करा.त्यात कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ,लाल सुक्या मिरच्या घाला व परता.कांदा घाला व परता.खोबरे घाला व परता.झाकण ठेवून एक दोन वाफा येऊ द्या.चिरलेली फरसबी घालून परता.झाकण ठेवून शिजवा.शिजल्यावर चवीनुसार मीठ व साखर घाला.कोथिंबिरीने सजवा.
ओल्या खोबर्याऐवजी सुके खोबरे/डेसिकेटेड कोकोनट घालूनही ही भाजी करता येईल पण ओल्या खोबर्याची चव अर्थातच जास्त चांगली लागते.
याद्या
17135
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
साधी आणि सोपी
हम्म!
आम्हीही अशीच खातो
In reply to हम्म! by प्रियाली
करेक्ट..
ओलं खोबरं
फरसबी
फरसबी =
In reply to फरसबी by अमोल केळकर
हो
In reply to फरसबी = by मनिष
धन्यवाद !!
In reply to हो by स्वाती दिनेश
आवडती!
स्वाती,
हो
In reply to स्वाती, by स्वाती राजेश
ही फणसाची
नाही हो..
In reply to ही फणसाची by राजे (verified= न पडताळणी केलेला)
थोडा
फ्रेंच बीन्स आणि श्रावण घेवडा वेगवेगळे
हेच म्हणते चतुरंग...
In reply to फ्रेंच बीन्स आणि श्रावण घेवडा वेगवेगळे by चतुरंग
हं..
मी पण
In reply to हं.. by स्वाती दिनेश
घेवडा / वालपापडी
अरे बाप रे!