गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.
वाचने
23905
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
लवकरच राजमार्ग चालु होवुन
लवकरच राजमार्ग चालु होवुन तुमची गाडी आणि लेखणी सुसाट सुटु देत.
टुणटुणित होण्यासाठी शुभेच्छा हो साहेब.
+१
In reply to लवकरच राजमार्ग चालु होवुन by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
चला लवकर बरे व्हा पाहू. अजून तुमच्या पंप्र कार्यालयाचे बरेच किस्से वाचायचे आहेत. :-) युव्वर बरे व्होईंग ची मिपा वाट पाहिंग.
+७८६
In reply to लवकरच राजमार्ग चालु होवुन by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आणि आपल्या या पोस्ट वरून एक मालवणी जोक देखील आठवला ज्यात भटजीला बायपासचा अर्थ न समजून तो आमच्या अमुक तमुक यांची बाय पास होऊ दे (परीक्षेत) असे गार्हाणे देवाला घालतो..
हेच स्पिरीट कायम ठेवा, हा अनुभव आपले लिखाण आणखी परिपक्व करून जाईल यासाठी मनापासून शुभेच्छा. :)
काळजी घ्या लवकर बरे व्हा
काळजी घ्या
लवकर बरे व्हा
लवकरात लवकर
लवकरात लवकर बरे होऊन परत लिहीते व्हा.
उत्तम आयुरारोग्यासाठी अनेक
उत्तम आयुरारोग्यासाठी अनेक शुभेच्छा !
प्रकृती ठणठणीत होऊन केलेल्या तुमच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत !
अतिरंजीत नाही पण
अतिरंजीत नाही पण ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास करायची गरज नाही.
आपल्याला फक्त ३ महिने साधे व सोप्पे पथ्य, जुजबी व गरिबालाही परवडतील अशी औषधे पाळुन सर्व ब्लोकेजेस पुर्ण घालविता येतात.
१००% सुरक्षित व आरोग्यदायी.
अरेच्चा
कशाने म्हणता आहात तुम्ही आयुर्हितजी म्हणजे माधवबाग वगैरे असे काही सुचवु पाहत असाल तर तस सल्ला देवु नका.
कोठे जायची गरज नाहि!
In reply to अरेच्चा by प्रमोद देर्देकर
त्यांना कोठे जायची गरज नाहि!
आहे त्यांचा हरी(आयुर्हित), जो (उपाय) देइल खाटेवरी!
@ आयुर्हित: नुसते बोलु नका
In reply to कोठे जायची गरज नाहि! by आयुर्हित
स्पष्ट बोलतोय..राग नसावा. तुम्हि नुसते कोरडे सल्ले देउ नका. आता बायपास न करता ब्लॉकेजेस कसे काढता येतील ह्याचं विवेकजींना काय स्वप्न पडलयं का? मागे सुद्धा माझ्या मँगो मुसच्या धाग्यावर तुम्हि पेठकर काकांना "डायबेटिस विसरण्याचा" हमखास उपाय देणार होतात. पण नंतर त्यांनी सर्वांसमोर सांगा म्ह्टल्यावर तुमचं काहिच उत्तर नाहि. सबब नुसते असं कोड्यात बोलु नका....सगळेच आयुर्हित नसतात. तसे काहि हमखास उपाय असतीलच तर एक तर ते सर्वांसमक्ष ईथेच द्या अन्यथा त्याचा वेगळा धागा काढा जेणेकरुन सर्वांनाच त्याचा फायदा होईल.
खरे आहे आपले.
In reply to @ आयुर्हित: नुसते बोलु नका by दिपक.कुवेत
काही गोष्टी फुकट दिल्या जात नाहीत्. त्यासाठी योग्य ती किंमत मोजावी लागतेच.
ओह तुम्हाला किंमत हवी आहे का?
In reply to खरे आहे आपले. by आयुर्हित
मग आधीच तसं स्पष्ट सांगायचं. उगाच कशाला कोड्यात बोलुन वेळ (तुमचा आणि मिपाचा) खर्च करताय????
झैरात?
In reply to ओह तुम्हाला किंमत हवी आहे का? by दिपक.कुवेत
मिपावर स्वतःची झैरात?
सहमत.
In reply to @ आयुर्हित: नुसते बोलु नका by दिपक.कुवेत
१००% सहमत. दूसर्याच्या गंभीर आरोग्य समस्येबाबत फुकाचे सल्ले, ते ही, किरकोळ संवाद (Casual Talk) रुपात देऊ नये.
धन्यवाद.
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
गैरसमज.
In reply to धन्यवाद. by आयुर्हित
आयुर्हित साहेब तुमचा गैरसमज होतो आहे. माझा प्रतिसाद हा तुमच्या प्रतिसादाला नाही तर तो दिपक.कुवेत ह्यांच्या प्रतिसादाला आहे. मी त्यांच्या प्रतिसादाशी सहमती दर्शविली आहे.
ह्दय
In reply to कोठे जायची गरज नाहि! by आयुर्हित
आम्हीपण त्या जाम मधे होतो आपण काही ऊपाय सागा
नक्किच!
In reply to ह्दय by नरेन
सोलापुरवासियांकडच्या जांभुळाच्या बिया गोळा करुन पुढ्च्या आठवड्यात नक्किच भेटु आपण कट्ट्याला.
संदर्भः बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?
कैच्या कै
In reply to नक्किच! by आयुर्हित
ओ आयुर्हित साहेब, नरेन साहेब ह्द्याच्या जाम बद्दल बोलत आहेत.....जांभळं कुठं मधे आणताय???? अच्छा ती खाउन वरील जाम क्लीयर होतो का????
जाहिरात.
In reply to कैच्या कै by दिपक.कुवेत
दिपक,
आयुर्हित साहेबांचा तो प्रतिसाद म्हणजे त्यांच्या 'बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?' ह्या धाग्याची जाहिरात आहे. त्यांना विवेकपटाईत ह्यांच्या दुखण्याशी कांही देणे घेणे नाहीए.
तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥
In reply to जाहिरात. by प्रभाकर पेठकर
आपण मला काही ही वाईट्ट म्हटले वा शिव्या दिल्या तरी चालेल, पण "त्यांना विवेकपटाईत ह्यांच्या दुखण्याशी कांही देणे घेणे नाहीए." असे मात्र म्ह्णु नका. कारण
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥
आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥
देणं घेणं नाहीच्चे तुम्हांला
In reply to तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥ by आयुर्हित
देणं घेणं नाहीच्चे तुम्हांला अजून कशाशी. बघावे तेव्हा या ना त्या प्रकारे आपली जाहिरात करण्याऐवजी काय करता ओ तुम्ही?
आयुर्हित साहेब, वाईट वाटले.
In reply to तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥ by आयुर्हित
आयुर्हित साहेब, आपलं काय चुकलं आहे हे स्पष्ट करून सांगावे लागते आहे ह्याचेच दु:ख आहे.
विवेकपटाईत ह्यांना हृदयविकाराने ग्रासले आहे. त्यावर त्यांना धीर देण्याऐवजी तुम्ही ह्या प्रतिसादात तुमचेच जांभुळ आख्यान लावून संदर्भ म्हणून तुमच्या लेखाचा दुवा देता आहात. तुम्ही वेगळा धागा काढला आहे. तो उपक्रम स्तुत्य आहे पण म्हणून दूसर्याच्या, तेही अत्यंत गंभीर अशा धाग्यावर, तुमच्या धाग्याचा डांगोरा पिटणे किती नैतिकतेला धरून आहे? तुम्हीच विचार करा. दोन्ही विषयांचा कांही संबंध आहे का? उद्या तुमच्या जांभूळ धाग्यावर कोणी येऊन आपल्या 'राखी सावंतचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश' ह्या धाग्याचा संदर्भ दिल्यास योग्य ठरेल का?
सोडून सोडा की वो काका! का
In reply to आयुर्हित साहेब, वाईट वाटले. by प्रभाकर पेठकर
सोडून सोडा की वो काका! का धरुन बसलाय?
दुर्लक्ष हीच प्रतिक्रिया जास्त सयुक्तिक नाही का?
पेठकर काका, वाईट वाटले.
In reply to आयुर्हित साहेब, वाईट वाटले. by प्रभाकर पेठकर
अरेरे, नरेन यांच्या हा प्रश्न आपल्याकडुन वाचतांना गाळला गेलेला दिसतो आहे हे खेदाने नमुद करावे लागते आहे.
किंवा ग्लकोमा तर नाही ना? हे तपासुन पहावे हि नम्र विनंति.
खेदजनक.
In reply to पेठकर काका, वाईट वाटले. by आयुर्हित
ह्या धाग्याचे गांभीर्य पाहता त्यांना व्यनि करावा एवढेही तुमच्या लक्षात येऊ नये हे खेदजनक आहे.
चिंता/काळजी नसावी.
In reply to खेदजनक. by प्रभाकर पेठकर
धाग्याचे गांभीर्य पाहता नरेन यांना(एकट्याला)का व्यनि करावा?
त्यांच्या सारखेच अजुन इतर मिपाकर असु शकतात कि, त्यांना पण त्याचा लाभ घेता यावा म्हणुनच!
विवेक पटाईतजींना धीर देण्याबरोबरच कायमस्वरुपी बरे वाटण्यासाठी व त्रास कमी करण्यासाठीच "ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास करायची गरज नाही" हे वाक्य लिहिलेला हा प्रतिसाद आपल्याला दिसतच नाही की लक्षात येत नाही?
कि विरोध करायचा म्ह्णुन विरोध आहे?
ह्रदयविकाराने त्रासलेले रुग्ण जवळुन पहाण्याचा व त्यांची बायपास न करवता योग्य पथ्य व उपचाराने ब्लॉकेजेस काढुन बरे करण्याचा अनूभव नक्किच आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यामूळे चिंता/काळजी नसावी.
_/\_
In reply to चिंता/काळजी नसावी. by आयुर्हित
>>>>त्यांच्या सारखेच अजुन इतर मिपाकर असु शकतात कि, त्यांना पण त्याचा लाभ घेता यावा म्हणुनच!
अरे व्वा!
आपला सगळा प्रतिसादच इथे उद्घृत करतो,
"अतिरंजीत नाही पण ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास करायची गरज नाही.
आपल्याला फक्त ३ महिने साधे व सोप्पे पथ्य, जुजबी व गरिबालाही परवडतील अशी औषधे पाळुन सर्व ब्लोकेजेस पुर्ण घालविता येतात.
१००% सुरक्षित व आरोग्यदायी."
ह्यात काय सांगितलं आहे? काय उपाय योजना सुचविली आहे? कुठली औषधं, कुठली पथ्य सांगितली आहेत? आपण डॉक्टर आहात का?
काहीही तपशिल न देता फक्त मला व्यनि करा,
"त्यांना कोठे जायची गरज नाहि!
आहे त्यांचा हरी(आयुर्हित), जो (उपाय) देइल खाटेवरी!"
अशा प्रतिसादांद्वारे आपण स्वतःला हरी म्हणजेच देव म्हणवून घेता आहात. आनंद आहे.
शिवाय,
"काही गोष्टी फुकट दिल्या जात नाहीत्. त्यासाठी योग्य ती किंमत मोजावी लागतेच."
ह्या प्रतिसादातून आपण आर्थिक लाभाची अपेक्षा ठेवता आहात.
तुमच्या जवळ ज्ञान असेल, अनुभव असेल, कायदेशीर वैद्यक शास्त्रातील पदवी असेल सर्व मान्य केले तरी हा धागा हा आपले दुकान चालविण्यासाठी नाही.
तुम्ही समजून घेणार नाही आणि समजले तरीही माझा मुद्दा तुमच्यासाठी सोयिस्कर नसल्याकारणाने तुम्ही स्विकारणार नाही एवढे बाकी मला समजून चुकले आहे. ह्या गंभीर धाग्यावर निदान माझ्या कडून तरी वाद नको, म्हणून ह्या प्रतिसादावरच थांबतो.
योग्य ती किंमत
In reply to _/\_ by प्रभाकर पेठकर
योग्य ती किंमत मोजावी लागतेच याचा अर्थ "आर्थिक लाभ/नुकसान" असाच होतो असे नाहि!
असो, नाहि कळायचे आपल्याला.
एवढा कसला सस्पेन्स आहे हो?
In reply to योग्य ती किंमत by आयुर्हित
एवढा कसला सस्पेन्स आहे हो?
नाही तुम्ही एरवी "जनहितार्थ" गप्पा मारताना फार दिसता.. मग जे काही उपाय असतील ते इथे जाहीर का लिहीत नाही? सगळ्यांनाच फायदा होऊ देत ना..
आणि त्याची नक्की "किंमत" काय हे ही सांगा, आम्ही सगळे मिळुन देउ..
धाग्यावर सर्वांच्या
In reply to एवढा कसला सस्पेन्स आहे हो? by पिलीयन रायडर
धाग्यावर सर्वांच्या फायद्यासाठी "कॉमन" उपाययोजनाच सांगता येतात.आणि तो १०१% देत गेलो आहे.
प्रत्येक रुग्णाचा आजार, प्रकार, गंभिरता, समज,आजाराची मूळ कारणे,इतर असलेले आजार व त्यांची गंभिरता, मानसिक शक्ती, आवड, निवड, धार्मिक तत्वे, व्यवसाय, दिनचर्या, क्रयशक्ति व त्यामूळे आलेली मानसिकता ह्यात जमीन आस्मान एवढा फरक असतो.
यामूळेच उपाययोजनेत फरक करावाच लागतो.
एकाचे औषध हे दुसर्यासाठी विष ठरु शकते.
ब्लॉकेजेस मुळे नाही तर अपुरे ज्ञान असल्यानेच अनेकजण हृदयविकाराचा झटका/त्रास होतो. यात मी पहिले नाव घेईल ते प्रख्यात ह्रदयविकारतज्ञ डॉ. .... यांचेच. पण त्याचे कारण काय आहे हे मला अभ्यास करुन कळले आहे.त्यामूळे मी जे बोलतो आहे ते पूर्ण ज्ञान घेवुनच व अनूभवल्यानंतरच बोलतो आहे.त्यामूळे चिंता/काळजी नसावी.
त्याची नक्की "किंमत" काय यासाठी गरजू रुग्ण व्यनी/मेल करु शकतात कि.
या व्यतिरिक्त इतर काहीही गैरसमज असतिल तर ते त्वरित दुर करणे गरजेचे व सर्वांच्याच हिताचे आहे.
अपुरे ज्ञान ???
In reply to धाग्यावर सर्वांच्या by आयुर्हित
आता तुम्हाला प्रख्यात ह्रदयविकारतज्ञ चे ज्ञान अपुरे वाटत असेल तर मिपावरच्या क्षुद्र पामरांना माफ करावे..
या अजाण बालकांना माहीत नाहिये ते कोणाशी बोलत आहेत !!
+१११११११११११११
In reply to अपुरे ज्ञान ??? by कपिलमुनी
+१११११११११११११
प्रत्येक रुग्णाचा आजार,
In reply to धाग्यावर सर्वांच्या by आयुर्हित
आयुर्हितसाहेब ही पळवाट झाली...
असो.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे, आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी इतक्या गोष्टींचा अभ्यास करायचा, त्यात परत ते औषध लागू पडण्याची वाट पहायची ती वेगळीच, एवढा वेळ काही रुग्णाकडे नसते... त्यात तुम्हाला व्यनि करून तुमच्या 'किंमतीची' गणित/कोडी सोडवायची म्हणजे परिस्थिती अजूनच कठीण होऊन जाईल...
ही पळवाट झाली..." म्ह्णू नका हो..
In reply to प्रत्येक रुग्णाचा आजार, by वाडीचे सावंत
मी
१)उपचार पद्धती कोणती वापरायची? किंवा कोणती वापरायची नाही?
२)औषध लागू पडण्याची किती वाट पहायची?
याबद्द्ल कोठेही भाष्य केलेले नाही(आपणास दिसले असेल तर दाखवुन द्यावे!)
नाहितर असे वाक्य "तुम्ही सांगितल्याप्रमाणे" कसे वापरू शकता?
इतक्या गोष्टींचा अभ्यास करायचा नाही तर मग काय अंधारात तीर मारायचा? म्ह्णजे "आग रामेश्वरि अन् बंब सोमेश्वरि" आणि तो ही तुमच्याच कष्टाच्या पैशांनी!! असे रूग्ण असतील तर मज्जाच मज्जा येइल.
रुग्णाला पुर्ण व कायमस्वरुपी आराम मिळ्वायचा असेल तर असेच खोलात जाऊन अभ्यासणारे तज्ञ हवेत, त्याला क्रुपया "ही पळवाट झाली..." म्ह्णू नका हो..
कोण हे ह्रदयविकारतज्ञ ?
In reply to धाग्यावर सर्वांच्या by आयुर्हित
कोण हे ह्रदयविकारतज्ञ ?? त्यांचे नाव इथे न देण्याचे काय प्रयोजन ? ज्यांना याबद्दल काहीच माहित नाही, पण माहीत करून घ्यायची इच्छा आहे, त्यांनी यावरून काय समजायचे ? त्यांचे नाव उघड करणे हा गुन्हा आहे का? नेमके काय झाले ?
व्यनि केलाय.
In reply to कोण हे ह्रदयविकारतज्ञ ? by चित्रगुप्त
व्यनि केलाय.
+१
In reply to _/\_ by प्रभाकर पेठकर
एकदम बरोबर.
कट्टा
In reply to नक्किच! by आयुर्हित
आपण येणार आहात काय सोलापूरला?
व्यनि केलाय!
In reply to कट्टा by नरेन
व्यनि केलाय!
शुभेच्छा!
आवश्यक ती सगळी काळजी घ्या आणि लवकरात लवकर बरे होऊन परत लिहिते व्हा. पंप्र कार्यालयाचे किस्से, रूपककथा आणि पाककृती असे बरेच अजून वाचायचे आहे.
+१ हेच म्हणतो
In reply to शुभेच्छा! by पैसा
तब्येतीची काळजी घ्या आणि लवकरात लवकर रुजु व्हा. मिपाला अजुन तुमच्याकडुन बरचं काहि लिहुन घ्यायचं आहे.
+२
In reply to +१ हेच म्हणतो by दिपक.कुवेत
शुभेच्छा.
आणि काही काळ संगणक/आंतरजाल दूर ठेवा - ते अधिक चांगलं.
काळजी घ्या सरजी. लौकरात लौकर
काळजी घ्या सरजी. लौकरात लौकर ठणठणीत बरे व्हा हीच इच्छा!!
काळजी घ्या.
राजमार्गावरील ट्रॅफिक जॅम मुळे राज्यव्यवस्था कोलमडू शकते. तेंव्हा शीघ्र काळजी घ्या.
तुमच्या उत्तम आयुरारोग्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना अनेकानेक शुभेच्छा..!
कधी?
शस्त्रक्रिया कधी आहे?
लवकर बरे व्हा विवेकपटाईत सर.
लवकर बरे व्हा विवेकपटाईत सर!
काळजी घ्या!!
काळजी घ्या!!
राजमार्गावरचा ट्रफिक-जाम
राजमार्गावरचा ट्रफिक-जाम लवकरात लवकर दुर होऊन सगळं सुरळीत चालू होण्यासाठी शुभेच्छा.
Get well soon!
लवकर
लवकर बरे व्हा आणि पुन्हा इथे लिहिते व्हा.
शुभेच्छा
लवकर बरे होउन लिहिते व्हा
लवकरात लवकर आवश्यक ती उपाय
लवकरात लवकर आवश्यक ती उपाय योजना करुन बरे व्हा! अभिष्टचिंतन.
लवकर बरे व्हा.
माझ्या शुभेच्छा.
लवकर
लवकर बरे व्हा...उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा!!!!
लवकरात लवकर खणखणीत बरे व्हा.
लवकरात लवकर खणखणीत बरे व्हा. काळजी घ्या. तुमच्या प्रकृतीच्या सर्व तक्रारी दूर होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो याच शुभेच्छा!
आजाराला सुद्धा मिश्किलपणे
आजाराला सुद्धा मिश्किलपणे व्यक्त करण्याच्या तुमच्या वृत्तीला माझा नमस्कार...
लकवर बरे व्हा... शुभेच्च्छा ..
बायपासच करून घ्या, या परिस्थितीत आयुर्वेदावर विसंबू नये असे माझे वैयक्तिक मत आहे..
+११११११११
In reply to आजाराला सुद्धा मिश्किलपणे by वाडीचे सावंत
+११११११११
+१००
लवकर बरे व्हाच आणि ट्रॅफिक जॅम च्या कारणांचाही शोध घेउन परत जॅम होणार नाही याची काळजी घ्या.
+१०१
In reply to +१०० by अजया
लवकर बरे व्हाच आणि ट्रॅफिक जॅम च्या कारणांचाही शोध घेउन परत जॅम होणार नाही याची काळजी घ्या.
ट्रॅफिक
लवकरच सुरळीत होवो !
+१ टू स्नेहाताई
In reply to ट्रॅफिक by सस्नेह
+१ टू स्नेहाताई
शुभेच्छा
उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. शस्त्रक्रिया वगैरे उत्तम होईलच. त्यानंतरच्या काळात मात्र अतिशय काळजी घेणे आवश्यक.
Apan Vayu Mudra for heart attack
https://www.naturalhealthcure.org/yoga-and-exercise/benefits-of-apan-va…
https://www.youtube.com/watch?v=MpTOBDMs9pY
उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा
तुमच्या कसदार लिखाणाचा..
(हात) पंखा
लवकर बरे व्हा..
राजमार्गावरचा ट्रफिक-जाम लवकरात लवकर दुर होऊन सगळं सुरळीत चालू होण्यासाठी शुभेच्छा.
लवकर बरे व्हा आणि लिहिते व्हा.. योग्य ती सर्व काळजी घ्या.
घरातील अनुभवात हृदय मार्ग तज्ञांनी सांगितले की बाह्यमार्ग किंवा बोगदे बांधले तरी योग्य ती काळजी / औषधे घेतल्याने आणि व्यायाम केल्याने असंख्य छोटे रस्ते (पक्षी: कॅपिलरीज) तयार होतात ज्यामुळे राजमार्गावरचा ताण कमी होतो तरीही गरजेइतके ट्रॅफिक व्यवस्थित पार होते.
अर्थात आत्ता गरजेप्रमाणे बायपास बांधाच.
उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!
आपल्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी
आपल्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
लवकर बरे व्हा
पटाईतराव, लवकर बरे व्हा. विशिंग यू अ स्पीडी रिकव्हरी.
काका..लवकर बरे व्हा!!! आणि
काका..लवकर बरे व्हा!!! आणि पुन्हा जोरदार लिखाणाला सुरवात करा!
शुभेच्छा!!!
आपल्याला लवकर बरे होण्यासाठी
आपल्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा!
शुभेछा !
वाहतूक अव्यवस्था निवारण समिती च्या सल्ल्यानुसार
आपली गाडी हाकून पुन्हा लवकरच मार्गस्थ होण्यासाठी शुभेछा !
विश्रांती घ्या.काळजी घ्या...
विश्रांती घ्या.काळजी घ्या...
आपल्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ऐका दाजिबा... :- वैशाली सामंत
राजमार्ग
लवकरच आपला राजमार्ग खुला होवो व आपली लेखणी सुरु होवो हीच प्रार्थना.
पटाईत सर, लवकर ठणठ्णीत बरे
पटाईत सर, लवकर ठणठ्णीत बरे व्हा. ह्या अनुभवावरचा लेख पण लवकर येउ द्या.
लवकर बरे व्हा!
विवेकपटाईतसाहेब,
योग्य ते उपचार घेऊन लवकरात लवकर खडखडीत बरे व्हा हीच शुभेच्छा!
इतक्या महत्वाच्या आणि साध्या धाग्यावरही खडाजंगी व्हावी याला काय म्हणावे? मराठी बाणा? :-) खरं तर विवेकपटाईतसाहेब सगळे उपचार व्यवस्थित करून घेतच आहेत. उत्तम वैद्यकीय सेवा आणि उपचार ते घेतीलच. त्यांनी घाबरून किंवा गोंधळून जाऊन कुठल्याच प्रकारचा सल्ला, मत, मदत, किंवा माहिती मागीतलेली नाही. मिपावरच्या जिव्हाळ्यापोटी त्यांनी आपल्याला आपल्या मनातली गोष्ट मोठ्या मिश्कील थाटात सांगीतलेली आहे. योग्य ती वैद्यकीय खबरदारी ते घेतीलच. अशा धाग्यावर सल्ला देण्याची काही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. इतक्या महत्वाच्या धाग्यावर सगळे निर्णय घेऊन झाल्यानंतर विविध सल्ले देणं त्या व्यक्तीला गोंधळात टाकू शकतं, अशा सल्ल्यांमुळे आपण घेतलेले निर्णय चुकीचे तर नाहीत ना अशी भीती वाटायला लागते. हृदयविकारासारख्या अत्यंत नाजूक बाबतीत असे अगदी निराळे सल्ले रुग्णाने सगळे निर्णय घेतल्यानंतर देणे कदाचित मानसिकदृष्ट्या तणाव निर्माण करणारे आणि क्वचित धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे आपल्या सदिच्छा व्यक्त करून रुग्णाच्या मनाला उभारी येईल अशा निर्भेळ भावना व्यक्त करणे जास्त महत्वाचे आहे असे वाटते.
बारकी पोरं बी अशा म्हत्वाच्या गोष्टीवरून भांडत नाई राव...अशे सगळेच सोताला पेशवे समजायला लागले तर युद्ध आन लढाईच होनार की...अजून काय होनार? ;-)
विवेकपटाईतसाहेब, तुम्ही टेंशन घेऊ नका. ये तो रोज का नाटक हैं! ऐसा (सिर्फ) वैचारिक, तात्विक झगडा नही किया तो हम खुद को मराठी कैसे बुलायेंगे? ;-)
आणि सगळ्या मिपाकरांना १००% खात्री आहे की आपले सगळे उपचार अगदी व्यवस्थित होतील आणि आपण लवकरच मिपावर आपली लेखणी घेऊन याल! :-)
GET WELL SOON
लवकर बरे व्हा!
हा प्रतिसाद कुणाकुणाला आहे हो
In reply to GET WELL SOON by लव उ
हा प्रतिसाद कुणाकुणाला आहे हो 'लव उ' काका/काकू/काके? ;)
शुभेच्छा
वरील सर्वांच्या शुभेच्छांमधे + १ माझी.
शुभेच्छा!
गेट वेल सून!
स्वाती
आजच्या सामना मधील बातमी.
शीव रुग्णालयात जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया...टाक्याशिवाय दूर केला हृदयविकार...४८ वर्षांपासूनचा हृदयरोगी ठणठणीत.
मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - हृदयाच्या धमन्या आकुंचन पावल्या किंवा त्यामध्ये ब्लॉक निर्माण झाला तर अँजिओप्लास्टी किंवा बायपासशिवाय पर्याय नसतो. अशावेळी सामान्यत: हृदय उघडूनच शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र जन्मापासून ४८ वर्षे हृदयरोगी असलेल्या हमीद शेख याच्यावर हृदय कोणत्याही प्रकारे न उघडता विनाटाका शस्त्रक्रिया करून त्याला ठणठणीत करण्यात आले. जगात अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी अशी दुसरी शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान शीव रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञांनी लीलया पेलले. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अवघ्या चार तासांत घरी पोहोचून आपली दैनंदिन कामेही करू लागला आहे.
हमीद शेख याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी धमनी बंद झाली होती आणि त्याचप्रमाणे हृदयातून शरीराला रक्तपुरवठा असणारी धमनी बारीक झाली होती. यामुळे त्याच्या शरीराला कमी रक्तपुरवठा होत होता. जन्मापासूनच हा आजार असलेल्या हमीदला पंचेचाळिशीनंतर हा तास अधिक जाणवू लागला. त्याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. टूडी इको तपासणीमध्ये त्याच्या आजाराचे निदान झाले. हृदय कोणत्याही प्रकारे न उघडता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि अवघ्या चार तासांत रुग्ण चालू-फिरूही लागला. यामुळे ओपन हार्ट सर्जरीचे होणारे दुष्परिणामही टाळता आले.
दोन धमन्यांमध्ये एकाच वेळी स्टेंट
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उदय महाजन यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी ४ जुलै रोजी हमीद शेख याच्यावर विनाटाक्याची हृदयशस्त्रक्रिया केली. कोणत्याही प्रकारे ओपन हार्ट सर्जरी न करता एकाच वेळी दोन धमन्यांमध्ये स्टेंट टाकून त्या खुल्या करण्यात आल्या. जगामध्ये दुसर्यांदा अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे शीव हे एकमेव रुग्णालय ठरले आहे. याआधी २०१२ मध्ये पहिल्यांदा ही शस्त्रक्रिया करण्याचे आव्हानही शीव रुग्णालयानेच पेलले होते.
टिपण्णी
In reply to आजच्या सामना मधील बातमी. by शिद
ह्या विशीष्ट केसबद्दल काही भाष्य करीत नाही. पण अँजिओप्लॅस्टीतही हृदय उघडावे लागत नाही, तसेच छातीवर कसलाही छेद करावा लागत नाही.थोडक्यात अँजिओप्लॅस्टी ही रूढार्थाने शस्त्रक्रिया नाही.
हार्दिक शुभेच्छा. लवकर बरे
हार्दिक शुभेच्छा. लवकर बरे व्हा आणि अजून किस्से, रुपक कथा येऊ द्यात.
लवकरात लवकर
आवश्यक ती उपाय योजना करुन बरे व्हा!
आपण ज्यांना ओळखत ही नाही अशा
आपण ज्यांना ओळखत ही नाही अशा लोकांना ही आपली काळजी आहे, प्रतिसाद वाचून आनंद ही झाला आणि धीर ही आला. हृदयात आधीच्या स्टेन च्या मागे १००% आणि इतर तीन ठिकाणी ही जवळपास शंभर टक्के ब्लोकेज असल्या मुळे बाय पास चा निर्णय घेण्यात आला. दिनांक ३.७.२०१४ दिल्लीतील escort हॉस्पिटल मध्ये डॉक्टर मेहारवाल यांनी बाय पास सर्जरी केली, सर्व सुरळीत पार पडल, १०.७.२०१४ ला सुट्टी मिळाली. आता टाके १८.७.२०१४ उघडतील. कसले ही कॉम्प्लिकेशन नाही. काळजी नसावी.
आयुर्हीत साहेब, जर हृदयात एक दोन ६०-७० टक्के ब्लोकेज असते तर पर्यायावर निश्चित विचार केला असता. पण सद्य परिस्थितीत हिम्मत झाली नाही.
बाकी हॉट-स्पिटल म्हणजे नर्सेस आल्याच, *air_kiss*
आनंद झाला.
In reply to आपण ज्यांना ओळखत ही नाही अशा by विवेकपटाईत
वा..वा.. पटाईत साहेब आम्हा सर्व मिपाकरांच्या, तुमच्या मित्र-नातेवाईकांच्या, कुटुंबियांच्या प्रार्थनांना आणि डॉक्टर मेहरवाल ह्यांच्या अनुभवी हाताला यश आलेले वाचून अत्यानंद झाला.
ह्या पुढे काळजी घ्या. तुम्हास आयुरारोग्य चिंतितो.
+ १०० वर्षे
In reply to आनंद झाला. by प्रभाकर पेठकर
+ १०० वर्षे
विवेकजी!
In reply to + १०० वर्षे by सुबोध खरे
ऑल द बेस्ट.
अगदी
In reply to + १०० वर्षे by सुबोध खरे
असेच म्हणतो.
अरे वा वा,
In reply to आपण ज्यांना ओळखत ही नाही अशा by विवेकपटाईत
अरे वा वा,
चांगली बातमी,
तुम्ही ठणठणीत आहात याची शेवटच्या वाक्यावरुन खात्री पटली.
हॉस्पिटल मधल्या अनुभवांबद्दल जरुर लिहा. *man_in_love* जे बोर्डावर लिहिण्या सारखे नसेल ते व्यनि करा. *secret*
डॉक्टरांच्या सल्ल्यांचे काटेकोर पणे पालन करा. *smile*
आरोग्यपुर्ण आयुष्यासाठी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. *give_rose*
या बाबतीत मात्र असहमत
पैजारबुवा,
वा! पटाईतसाहेबांचा ट्राफिकजाम
वा! पटाईतसाहेबांचा ट्राफिकजाम यशस्वीरीत्या निस्तरला गेला हे पाहून आनंद वाटला. विश्रांती घ्या आणि या पुनरेकवार नव्या जोमाने मिपावर!
असेच म्हणतो !!
In reply to वा! पटाईतसाहेबांचा ट्राफिकजाम by बॅटमॅन
असेच म्हणतो !!