✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सौंदर्यवती तू ......

P — psajid, Tue, 07/01/2014 - 11:15
असं गं रक्तिम मुख तुझं जसं मिटल्या लाजाळूचं पान , त्यावर टेचात चालणं गं वळवी वैराग्याची मान !! मीच थिटा वर्णू कसा सृष्टीत तूच महान, सुरमयी कटी सखे तुझा कुमुदिनीचा वाण !! एक पाचोळाच मी सखे ज्याला कुठून देहभान ? मन आलं दबकत चाखण्या तुझे ओठ रंगले पान !! बेहोष गंध तुझा तो त्यात रेखीव कमान, बेसावध तुझ्यात तू मात्र भुंग्यांना त्याची जाण !! कधी जाण हृदय हेही खुपसे तुझ्यावर कुर्बान, मला लाभावं माळण्या वेणी गजरयाचा मान !! नजरे नको प्रतारणा आता तुला मनाचीच आण, काय आहे गं सृष्टीत ? समोर लावण्याची खाण !! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी, (पलूस, सांगली)

प्रतिक्रिया द्या
3529 वाचन

💬 प्रतिसाद (10)

व्वा! क्या बात है!!

आयुर्हित
Tue, 07/01/2014 - 11:30 नवीन
कधी जाण हृदय हेही खुपसे तुझ्यावर कुर्बान, मला लाभावं माळण्या वेणी गजरयाचा मान !! व्वा! क्या बात है!! बहोत खुब!!!
  • Log in or register to post comments

छान.

एस
Tue, 07/01/2014 - 12:48 नवीन
वाळवी वैराग्याची मान !!
वळवी वैराग्याची मान हे बरोबर की वाळवी वैराग्याची मान हे बरोबर याचा विचार करतोय. तसं दोन्ही बरोबर आहेत म्हणा! पहिल्यात वैराग्य डचमळीत (डळमळीत असाही प्रमाणभाषेतला शब्द) होणे तर दुसर्‍यात वैराग्य संपून जाणे.
  • Log in or register to post comments

व्वा! मस्तं आवडली कविता!

अनुप ढेरे
Tue, 07/01/2014 - 13:31 नवीन
व्वा! मस्तं आवडली कविता!
  • Log in or register to post comments

दिलगीर आहे........

psajid
Tue, 07/01/2014 - 14:53 नवीन
खरेतर तो शब्द वळावी किंवा वळवी वैराग्याची मान असाच आहे. इथे कविता डकवताना तो लक्षात आला नाही त्याबद्दल दिलगीर आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

कविता आवडली

पैसा
Tue, 07/01/2014 - 22:03 नवीन
कविता आवडली. वाळवी काढून टाकली आहे! :)
  • Log in or register to post comments

वाह... मस्तच !

मदनबाण
Wed, 07/02/2014 - 07:03 नवीन
वाह... मस्तच ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल
  • Log in or register to post comments

एक पाचोळाच मी सखे

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/02/2014 - 18:07 नवीन
एक पाचोळाच मी सखे ज्याला कुठून देहभान ? मन आलं दबकत चाखण्या तुझे ओठ रंगले पान !!>>>. वाह्ह! मजा आ गया.
  • Log in or register to post comments

आवडली कविता...

प्यारे१
Wed, 07/02/2014 - 18:11 नवीन
आवडली कविता...
  • Log in or register to post comments

सुरेख!

स्पंदना
Fri, 07/18/2014 - 21:32 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/19/2014 - 09:39 नवीन
*i-m_so_happy*
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा