✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पढत मुर्ख व मुर्खाची लक्षणे

आ
आयुर्हित यांनी
Tue, 07/01/2014 - 11:09  ·  लेख
लेख
एका पढत मूर्खाची एक गोष्ट आहे. एक पढत मुर्ख एका गाढवावर बसला होता आणि गाढव पळत होता. त्याच त्याचं रस्त्यावरून तो बराच वेळ गोल गोल फिरत राहिला. तेव्हा कुणीतरी त्या सज्जन गृहस्थाला विचारले की,” मी बराच वेळ तुम्हाला इथेच फिरताना बघतो आहे. तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे? तर तो म्हणतो, “मला माहित नाही. गाढवाला विचारा.” बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असेच होते. आपण समजून न घेताच काम करत रहातो, अनेक गोष्टी करत रहातो की याचा उद्देश काय आहे? असे करताना निसर्गाने जे उपलब्ध केले आहे त्याचा आनंदही उपभोगत नसतो. समर्थ रामदास स्वामींनी १७व्या शतकात, त्यांचे पट्टशिष्य आणि लेखनिक कल्याणस्वामींकरवी लिहवून घेतलेला दासबोध हा ग्रंथ आहे. एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांच्या, साधकांच्या, निस्पृहांच्या, विरक्तांच्या, सर्व सामान्यांच्या,बालकांच्या,प्रौढांच्या,जराजर्जरांच्या अशा सर्व जातीपंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांच्या मानवी मनाला उपदेश केला आहे. दशक दुसरा,समास पहिला यात मुर्खाची लक्षणे त्यांनी दिलेली आहेत, जी आजही पदोपदी समोर येतात व आपला महत्त्वाचा वेळ वाया घालवतात. ॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक दुसरा,समास पहिला : मूर्खलक्षण ॥ श्रीराम ॥ ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना । कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ॥ १॥ तुज नमूं वेदमाते । । श्रीशारदे ब्रह्मसुते । अंतरी वसे कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २॥ वंदून सद्गुरुचरण । करून रघुनाथस्मरण । त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥ ३॥ येक मूर्ख येक पढतमूर्ख । उभय लक्षणीं कौतुक । श्रोतीं सादर विवेक । केला पाहिजे ॥ ४॥ पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण । साअवध होऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५॥ आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार । परि कांहीं येक तत्पर । होऊन ऐका ॥ ६॥ जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान । जे केवळ अज्ञान । त्यांचीं लक्षणें ॥ ७॥ जन्मला जयांचे उदरीं । तयासि जो विरोध करी । सखी मनिली अंतुरी । तो येक मूर्ख ॥ ८॥ सांडून सर्वही गोत । स्त्रीआधेन जीवित । सांगे अंतरींची मात । तो येक मूर्ख ॥ ९॥ परस्त्रीसीं प्रेमा धरी । श्वशुरगृही वास करी । कुळेंविण कन्या वरी । तो येक मूर्ख ॥ १०॥ समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता । सामर्थ्येंविण करी सत्ता । तो येक मूर्ख ॥ ११॥ आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति । सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ १२॥ अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी । जो बहुतांचा वैरी । तो येक मूर्ख ॥ १३॥ आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यासीं करी मीत्री । परन्यून बोले रात्रीं । तो येक मूर्ख ॥ १४॥ बहुत जागते जन । तयांमध्यें करी शयन । परस्थळीं बहु भोजन| करी, तो येक मूर्ख ॥ १५॥ मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न । सप्त वेसनीं जयाचें मन । तो येक मूर्ख ॥ १६॥ धरून परावी आस । प्रेत्न सांडी सावकास । निसुगाईचा संतोष मानी, तो येक मूर्ख ॥ १७॥ घरीं विवेक उमजे । आणि सभेमध्यें लाजे । शब्द बोलतां निर्बुजे । तो येक मूर्ख ॥ १८॥ आपणाहून जो श्रेष्ठ । तयासीं अत्यंत निकट । सिकवेणेचा मानी वीट । तो येक मूर्ख ॥ १९॥ नायेके त्यांसी सिकवी । वडिलांसी जाणीव दावी । जो आरजास गोवी । तो येक मूर्ख ॥ २०॥ येकायेकीं येकसरा । जाला विषईं निलाजिरा । मर्यादा सांडून सैरा वर्ते, तो येक मूर्ख ॥ २१॥ औषध न घे असोन वेथा । पथ्य न करी सर्वथा । न मिळे आलिया पदार्था । तो येक मूर्ख ॥ २२ । संगेंविण विदेश करी । वोळखीविण संग धरी । उडी घाली माहापुरीं । तो येक मूर्ख ॥ २३॥ आपणास जेथें मान । तेथें अखंड करी गमन । रक्षूं नेणे मानाभिमान । तो येक मूर्ख ॥ २४॥ सेवक जाला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित । सर्वकाळ दुश्चित्त । तो येक मूर्ख ॥ २५॥ विचार न करितां कारण । दंड करी अपराधेंविण । स्वल्पासाठीं जो कृपण । तो येक मूर्ख ॥ २६॥ देवलंड पितृलंड । शक्तिवीण करी तोड । ज्याचे मुखीं भंडउभंड । तो येक मूर्ख ॥ २७॥ घरीच्यावरी खाय दाढा । बाहेरी दीन बापुडा । ऐसा जो कां वेड मूढा । तो येक मूर्ख ॥ २८॥ नीच यातीसीं सांगात । परांगनेसीं येकांत । मार्गें जाय खात खात । तो येक मूर्ख ॥ २९॥ स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार । करी थोडें बोले फार । तो येक मूर्ख ॥ ३०॥ तपीळ खादाड आळसी । कुश्चीळ कुटीळ मानसीं । धारीष्ट नाहीं जयापासीं । तो येक मूर्ख ॥ ३१॥ विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ३२॥ लंडी लटिका लाबाड । कुकर्मी कुटीळ निचाड । निद्रा जयाची वाड । तो येक मूर्ख ॥ ३३॥ उंचीं जाऊन वस्त्र नेसे । चौबारां बाहेरी बैसे । सर्वकाळ नग्न दिसे । तो येक मूर्ख ॥ ३४॥ दंत चक्षु आणी घ्राण । पाणी वसन आणी चरण । सर्वकाळ जयाचे मळिण । तो येक मूर्ख ॥ ३५॥ वैधृति आणी वितिपात । नाना कुमुहूर्तें जात । अपशकुनें करी घात । तो येक मूर्ख ॥ ३६॥ क्रोधें अपमानें कुबुद्धि । आपणास आपण वधी । जयास नाहीं दृढ बुद्धि । तो येक मूर्ख ॥ ३७॥ जिवलगांस परम खेदी । सुखाचा शब्द तोहि नेदी । नीच जनास वंदी । तो येक मूर्ख ॥ ३८॥ आपणास राखे परोपरी । शरणागतांस अव्हेरी । लक्ष्मीचा भरवसा धरी । तो येक मूर्ख ॥ ३९॥ पुत्र कळत्र आणी दारा । इतुकाचि मानुनियां थारा । विसरोन गेला ईश्वरा । तो येक मूर्ख ॥ ४०॥ जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावाअवें । हे जयास नेणवे । तो येक मूर्ख ॥ ४१॥ पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांस ईश्वरी देणें । ऐशा केल्या बहुत जेणें । तो येक मूर्ख ॥ ४२॥ दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडून चाले । दिवसा झांकिले डोळे । तो येक मूर्ख ॥ ४३॥ देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही । ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो येक मूर्ख ॥ ४४॥ परपीडेचें मानी सुख । पससंतोषाचें मानी दुःख । गेले वस्तूचा करी शोक । तो येक मूर्ख ॥ ४५॥ आदरेंविण बोलणें । न पुसतां साअक्ष देणें । निंद्य वस्तु आंगिकारणें । तो येक मूर्ख ॥ ४६॥ तुक तोडून बोले । मार्ग सांडून चाले । कुकर्मी मित्र केले । तो येक मूर्ख ॥ ४७॥ पत्य राखों नेणें कदा । विनोद करी सर्वदा । हासतां खिजे पेटे द्वंदा । तो येक मूर्ख ॥ ४८॥ होड घाली अवघड । काजेंविण करी बडबड । बोलोंचि नेणे मुखजड । तो येक मूर्ख ॥ ४९॥ वस्त्र शास्त्र दोनी नसे । उंचे स्थळीं जाऊन बैसे । जो गोत्रजांस विश्वासे । तो येक मूर्ख ॥ ५०॥ तश्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेचि मागे । आपलें आन्हीत करी रागें । तो येक मूर्ख ॥ ५१॥ हीन जनासीं बरोबरी । बोल बोले सरोत्तरीं । वामहस्तें प्राशन करी । तो येक मूर्ख ॥ ५२॥ समर्थासीं मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी । घरीचा घरीं करी चोरी । तो येक मूर्ख ॥ ५३॥ सांडूनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भर्वसा । सार्थकेंविण वेंची वयसा । तो येक मूर्ख ॥ ५४॥ संसारदुःखाचेनि गुणें । देवास गाळी देणें । मैत्राचें बोले उणें । तो येक मूर्ख ॥ ५५॥ अल्प अन्याय क्ष्मा न करी । सर्वकाळ धारकीं धरी । जो विस्वासघात करी । तो येक मूर्ख ॥ ५६॥ समर्थाचे मनींचे तुटे । जयाचेनि सभा विटे । क्षणा बरा क्षणा पालटे । तो येक मूर्ख ॥ ५७॥ बहुतां दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक । ज्याची सभा निर्नायेक । तो येक मूर्ख ॥ ५८॥ अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी । संगतीचें मनुष्य तोडी । तो येक मूर्ख ॥ ५९॥ घरीं असोन सुंदरी । जो सदांचा परद्वारी । बहुतांचे उच्छिष्ट अंगीकारी । तो येक मूर्ख ॥ ६०॥ आपुलें अर्थ दुसर्यापासीं । आणी दुसर्याचें अभिळासी । पर्वत करी हीनासी । तो येक मूर्ख ॥ ६१॥ अतिताचा अंत पाहे । कुग्रामामधें राहे । सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२॥ दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥ ६३॥ उदकामधें सांडी गुरळी । पायें पायें कांडोळी । सेवा करी हीन कुळीं । तो येक मूर्ख ॥ ६४॥ स्त्री बाळका सलगी देणें । पिशाच्या सन्निध बैसणें । मर्यादेविण पाळी सुणें । तो येक मूर्ख ॥ ६५॥ परस्त्रीसीं कळह करी । मुकी वस्तु निघातें मारी । मूर्खाची संगती धरी । तो येक मूर्ख ॥ ६६॥ कळह पाहात उभा राहे । तोडविना कौतुक पाहे । खरें अस्ता खोटें साहे । तो येक मूर्ख ॥ ६७॥ लक्ष्मी आलियावरी । जो मागील वोळखी न धरी । देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो येक मूर्ख ॥ ६८॥ आपलें काज होये तंवरी । बहुसाल नम्रता धरी । पुढीलांचें कार्य न करी । तो येक मूर्ख ॥ ६९॥ अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं । नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७०॥ आपण वाचीना कधीं । कोणास वाचावया नेदी । बांधोन ठेवी बंदीं । तो येक मूर्ख ॥ ७१॥ ऐसीं हें मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे । चीत्त देउनियां शहाणे । ऐकती सदा ॥ ७२॥ लक्षणें अपार असती । परी कांहीं येक येथामती । त्यागार्थ बोलिलें श्रोतीं । क्षमा केलें पाहिजे ॥ ७३॥ उत्तम लक्षणें घ्यावीं । मूर्खलक्षणें त्यागावीं । पुढिले समासी आघवीं । निरोपिलीं ॥ ७४॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मूर्खलक्षणनाम समास पहिला ॥ १॥ जय जय रघुविर समर्थ|
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
औषधोपचार
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
मदत

प्रतिक्रिया द्या
31524 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

धन्यवाद!

पैसा
Tue, 07/01/2014 - 11:39 नवीन
रामदास स्वामी द्रष्टे होते. असे नमुने सगळ्या काळात असतात, असतील हे जाणून वर्णन केलं आहे. त्यातून शिकण्यासारखं बरंच आहे. परंतु आम्ही फक्त वाचतो!
  • Log in or register to post comments

छान

प्रसाद गोडबोले
Tue, 07/01/2014 - 11:53 नवीन
विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ३२॥
हा श्लोक वाचला ... पाय परत जमीनीवर टेकले ! मनापासुन आभारी आहे हे शेयर केल्या बद्दल :)
  • Log in or register to post comments

नो कमेंटस!!

स्पंदना
Tue, 07/01/2014 - 11:53 नवीन
नो कमेंटस!!
  • Log in or register to post comments

पढतमूर्खाची लक्षणे पण येऊ

प्यारे१
Tue, 07/01/2014 - 13:40 नवीन
पढतमूर्खाची लक्षणे पण येऊ द्या!
  • Log in or register to post comments

ही पहा

आयुर्हित
Fri, 07/04/2014 - 01:53 नवीन
ही पहा पढतमुर्खाची लक्षणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

श्री रामदास स्वामींनी

अधिराज
Tue, 07/01/2014 - 14:56 नवीन
श्री रामदास स्वामींनी सांगितलेली लक्षणे यथोचितच आहेत. ह्या लक्षणांचा तुम्ही कदाचित अभ्यास केलाहि असेल. पण ह्या आधी बर्‍याच प्रतिसादांतून व्यक्त झालेले तुमचे विचार अंधश्रध्देला खतपाणी देणारे आहेत.
  • Log in or register to post comments

जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं

आयुर्हित
Tue, 07/01/2014 - 20:44 नवीन
जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान । जे केवळ अज्ञान । त्यांचीं लक्षणें ॥ ७॥ जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे कार्यकारण भाव समजून येत नाही तोपर्यंतच माझी श्रध्दा आपल्यासाठी अंधश्रध्दा असु शकते. आणि म्ह्णुनच हा सारा खटाटोप करत आहे, तो आपण पुर्ण ओपन माईंड ठेवुन समजून घेतला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

अच्छा अच्छा! म्हणजे तुम्हाला

अधिराज
गुरुवार, 07/03/2014 - 12:23 नवीन
अच्छा अच्छा! म्हणजे तुम्हाला अपेक्षित असे प्रतिसाद न देणारे ते तुमच्या लेखी मुर्ख असे आहे तर! असा समज असेल तर हे हि एक लक्षणच आहे मुर्खाचे. १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

यातील काही शब्द जरा कठीण आहेत

कवितानागेश
Tue, 07/01/2014 - 19:05 नवीन
यातील काही शब्द जरा कठीण आहेत. अशा शब्दांचे अर्थदेखिल सोबत द्या.
  • Log in or register to post comments

आजच्या मराठीत येवु द्या.

सिद्धेश महाजन
Tue, 07/01/2014 - 20:03 नवीन
हो खर आहे काहि शब्द समजायला कठिण आहेत. क्रुपया आजच्या बोली भाशेत कोणी रुपान्तरित करेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ह्याचा अर्थ काय?

भृशुंडी
Tue, 07/01/2014 - 22:07 नवीन
स्त्री बाळका सलगी देणें । पिशाच्या सन्निध बैसणें । मर्यादेविण पाळी सुणें । तो येक मूर्ख ॥ ६५॥ ?
  • Log in or register to post comments

अर्थ

पैसा
Tue, 07/01/2014 - 22:15 नवीन
सलगी देणे = जवळ करणे (नको इतके, अर्थात डोक्यावर बसवणे असा अर्थ अभिप्रेत असावा.) पिशाच्या = वेड्याच्या (पिसा =वेडा) सुणे = कुत्रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी

जरा अवांतर

प्रसाद गोडबोले
Wed, 07/02/2014 - 12:04 नवीन
पैसा ह्या शब्दाची व्युत्पत्ती ह्या पिसा वरुन तर झाली नसेल ना ? *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गूगलकाकांना विचारा

पैसा
Wed, 07/02/2014 - 12:07 नवीन
गूगलकाकांना विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

जरा अजून अवांतर

एस
Wed, 07/02/2014 - 12:08 नवीन
तो पिसाचा मनोरा वेडाच आहे ना असा झुकायला! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खुपच छान..

बाबा पाटील
Wed, 07/02/2014 - 12:44 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

आयुर्हित
Wed, 07/02/2014 - 12:50 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

बापरे

दिपक.कुवेत
Wed, 07/02/2014 - 16:43 नवीन
हे एवढं सगळं तुम्हि टंकलय? फार पेशन्स बुवा!!!
  • Log in or register to post comments

चोप्य पस्ते

प्रसाद गोडबोले
Wed, 07/02/2014 - 17:23 नवीन
च्प्य पस्ते रे ... हे बघ ह्या इथे आहे संपुर्ण http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

धत तेरी कि

दिपक.कुवेत
गुरुवार, 07/03/2014 - 16:36 नवीन
कॉपी-पेस्ट आहे व्हय. मग ह्यात यांच योगदान काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अरेरेरे! निदान दुसर्‍यांना

अधिराज
गुरुवार, 07/03/2014 - 17:58 नवीन
अरेरेरे! निदान दुसर्‍यांना शानपना शिकवताना तरी स्वताचं डोकं वापरावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है!

आयुर्हित
गुरुवार, 07/03/2014 - 20:32 नवीन
दिपक.कुवेतजी,अधिराजजी, आपल्या डोळ्यांनी लेख परत एकदा नीट वाचावा, रंग बदल असेल तर तो ओळ्खावा ही विनंति.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

छान.

सस्नेह
Wed, 07/02/2014 - 22:04 नवीन
मूर्खलक्षणेच काय, आख्खा दासबोधच वाचनीय अन चिंतनीय आहे.
  • Log in or register to post comments

अनुकरणीय बाबत आपलं काय मत आहे

प्यारे१
गुरुवार, 07/03/2014 - 12:36 नवीन
अनुकरणीय बाबत आपलं काय मत आहे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

प्यारेबुवा,

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/03/2014 - 13:11 नवीन
दासबोधामधे वर्णन केलेल्या आदर्श पुरुषाचे अनुकरण करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. पण ते कितपत जमेल अशी शंका प्रत्येकाच्याच मनात असते. अनुकरण नाही तरी किमान दासबोधाचे चिंतन झाले तरी बरेच काही साध्य होईल असे वाटते. (तेवढेच करायचा अटोकाट प्रयत्न करत असलेला) पैजारबुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अतिताचा अंत पाहे ।

मनीषा
गुरुवार, 07/03/2014 - 13:35 नवीन
अतिताचा अंत पाहे । कुग्रामामधें राहे । सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२॥ दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥ ६३॥ काय बोलावे? समर्थ सर्वज्ञानी होते हेच खरं ... अवांतर : "समर्थांनी मूर्खांची इतकी लक्षणे लिहून ठेवली आहेत, तरीही अजून काही लिहायची बाकी आहेत......." इति. पु. ल. देशपांडे
  • Log in or register to post comments

पढत मूर्ख मंजे काय?

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/03/2014 - 23:43 नवीन
पढत मूर्ख मंजे काय? . . . . . . जो वाचता वाचता ..मूर्ख झाला..तो का???
  • Log in or register to post comments

पढतमुर्खाची लक्षणे

आयुर्हित
गुरुवार, 07/03/2014 - 23:47 नवीन
पढतमुर्खाची लक्षणे यायची आहेत अजुन पूढ्च्या भागात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ब्वॉरं..मग पडू या...आपलं ते

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/04/2014 - 00:09 नवीन
ब्वॉरं..मग पडू या...आपलं ते हे..पढू'या मग त्या भागात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

स्वतःचे डोके न वापरता चार

बॅटमॅन
Fri, 07/04/2014 - 00:45 नवीन
स्वतःचे डोके न वापरता चार पुस्तकातील आंधळेपणे रट्टा मारलेल्या उतार्‍यांच्या बडबडीवर अन्य लोकांना सुनावणारे आणि खरेच कुणी तर्कसंगती इ. बद्दल बोलले की कमरेखाली उतरणारे लोक म्हंजे पढतमूर्ख. अध्यात्माच्या नावाखाली भाकडकथा पसरवणारेही त्यातच येतात. (आता कुंय कुंय करत कुणीतरी गरळ ओकेल, पहाच बुवा तुम्ही =)) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@(आता कुंय कुंय करत >>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/04/2014 - 06:29 नवीन
@(आता कुंय कुंय करत >>> =)))))) *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आयुर्हितमहाराज,

बाळ सप्रे
Fri, 07/04/2014 - 09:45 नवीन
आयुर्हितमहाराज, असे ६०-७० श्लोक विकीवरुन इथे चिकटवण्यापेक्षा एक एक श्लोक घेउन त्याचा मतितार्थ समजावून सांगितल्यास जास्त योग्य ठरेल. वरील श्लोकातील बरेच शब्द जुन्या काळातील आहेत, तसेच वरवर पहाता काही श्लोकांचे अर्थही आजच्या काळानुरुप बोधकारक वाटत नाहित. तुमच्या मिपावतारामध्ये हे ही एक कार्य होउन जाउ द्या.. नाहितर काय आम्हाला दासबोध म्हणजे डोक्यावर घेउन चालण्याचा ग्रंथ एवढेच माहित आहे. त्याने चाल सुधारते ..
  • Log in or register to post comments

लोल

प्रसाद गोडबोले
Fri, 07/04/2014 - 11:34 नवीन
नाहितर काय आम्हाला दासबोध म्हणजे डोक्यावर घेउन चालण्याचा ग्रंथ एवढेच माहित आहे. त्याने चाल सुधारते
आयुर्हित हे असामीच आहेत हो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हे काम आयुर्हित यांनीच केले

धन्या
Fri, 07/04/2014 - 11:53 नवीन
हे काम आयुर्हित यांनीच केले पाहिजे असं काही नाही. मिपावर समोरच्याला "दासबोध वाचा मग बोलू", "समर्थांनी दासबोधात अमक्या दशकाच्या तमक्या समासात असं असं म्हटले आहे" असं सांगणारे जाणकारही आहेत. त्यांनीही अर्थ समजावून सांगितला तरी चालेल. जल्ला समष्टी का काय ती आमानापन मिलू दया की. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

@स म अष्टी >>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/04/2014 - 13:05 नवीन
@स म अष्टी >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हे मला उद्देशुन आहे काय धनाजी राव ?

प्रसाद गोडबोले
Fri, 07/04/2014 - 13:10 नवीन
ऑन सीरीयस नोट : हे मला उद्देशुन आहे काय धनाजी राव ? तसे असल्यास २ श्लोक क्वोट करतो फक्त ... "प्रचीतीविण बोलणे | ते अवघेचि कंटाळवाणे | जैसे तोंड पसरुनिया सुणे | भुंकुन गेले ||" (माझं नुसतंच वाचन आहे मित्रा , प्रचिती नाही दुसर्‍या शब्दात बोलायचे तर "अभ्यास" आहे "अधिकार" नाही म्हणुन मी बोलण्याला अर्थ नाही ) " अधिकारेविण सांगणे | अलभ्य होये तेणे गुणे | ह्या कारणे शहाणे | अधिकार पहाती ||" (इथे किती लोकांना श्रवणाचा तरी अधिकार आहे कोण जाणे , श्रवणाचा अधिकार नसतानाही जर र्त्यांना सांगितले तर लोक कन्फुज होतात असा अनुभव आहे , उदा. तत्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग | तोचि झाले आंगे स्वये तुका || हे जर अनधिकारी माणसाला सांगितले तर एक तर त्याला ते समजणार नाही शिवाय तो स्वतःला तुका समजायला लागला तर त्याला त्या अवस्थे पर्यंत पोहचणेही अवघड होवुन जाईल... म्हणुन अधिकार पाहिला पाहिजेच!! सध्या नुसताच अभ्यास आहे , अधिकार नाही , अधिकारासाठी पुढे मागे त्रिदंडी सन्यास घ्यायचा आणि अभ्यासलेले सारे प्रचीतीस आणायचा विचार आहे ... त्यानंतर प्रवचन करायचे की नाही ते ठरवु :) ------------------------------------------------------- ऑन अ लाईटर नोट : इथे नुसती वादावादीच करायची असल्यास आपण दासबोधच काय ज्ञानेश्वरी ,गीता , उपनिशद , ओल्ड टेस्टामेन्ट ,न्यु टेस्टामेन्ट , संविधान , डिक्लेरेशन ऑफ इन्डेपेन्डस्न , बया , हैदोस, सविताभाभी , इलेयड , ऑडेसी...कशातलाही रेफरन्स शोधुन काढु *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

जल्ला समष्टी का काय ती

सतिश गावडे
Wed, 08/22/2018 - 23:20 नवीन
जल्ला समष्टी का काय ती आमानापन मिलू दया की. :D
यष्टी समष्टीवरुन लक्षात यायला पाहिजे होतं तुमच्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ट्रॅफिक जॅमच्या धाग्यावर

सूड
Fri, 07/04/2014 - 14:46 नवीन
ट्रॅफिक जॅमच्या धाग्यावर ताळतंत्र सोडून प्रतिसाद देणारे लोकांना मूर्खांची लक्षणे सांगतायेत हे बघून भरुन पावलो. आता डोळे मिटायला मोकळा!! उचलायला या रे! ;)
  • Log in or register to post comments

सिक्सर

प्रसाद गोडबोले
Fri, 07/04/2014 - 14:50 नवीन
ट्रॅफिक जॅमच्या धाग्यावर ताळतंत्र सोडून प्रतिसाद देणारे लोकांना मूर्खांची लक्षणे सांगतायेत
>>> ये माररा सिक्सर ! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+११११११११११११११११

बॅटमॅन
Fri, 07/04/2014 - 15:03 नवीन
अगागागागाग्ङाङागागागागागागागाङागागागागागागागागा =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सूड,प्रसाद गोडबोले,बॅटमॅन

आयुर्हित
Sat, 07/05/2014 - 00:25 नवीन
क्लीब म्हणता अर्जुना नाही जीभ कचरली शहाण्याला शब्दाचीच एक ठिणगी पुरली अर्जुनालाच कळला अर्थ शब्दांचा ज्वलंत तारे तोडती विद्वान शिवी देतो भगवंत!
  • Log in or register to post comments

क्लीब म्हणजे?

तुडतुडी
Wed, 08/22/2018 - 21:27 नवीन
क्लीब म्हणजे?
  • Log in or register to post comments

क्लीब

समर्पक
Wed, 08/22/2018 - 22:14 नवीन
पौरुषहीन, षंढ
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा