मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सेव्ह मिपा

सस्नेह ·

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 17:38
नक्की हाच प्रॉब्लेम आहे का? आणि असल्यास क्षमता वाढवणे हा पहिला उपाय ठरावा, न की अतिरीक्त भार कमी करणे .. तसेच Archive करणे हा देखील मार्ग असू शकेल ना.. मला फारसे यातले कळत नसल्याने या सार्‍या शंकाच समजा ..

सुधीर Sat, 07/05/2014 - 17:58
विदाची अडचण त्याच्या आकारमानाशी संबधीत आहे की इतर दुसर्‍या कारणांशी याचा तांत्रिक खुलासा निलाकांतच करू शकतात. जर आकारमानाशी संबधीत असेल तर १, २, ३ शी सहमत.

लंबूटांग Sat, 07/05/2014 - 17:59
या सर्व उपायांनी हार्ड-डिस्क वरील जागा रिकामी होईल. सर्व्हरवरचा ताण कमी होणार नाही. विदागाराला अडचणी येत आहेत ह्या केवळ जुन्या धाग्यांनी येत आहेत हा निष्कर्ष सर्वांनी कसा काढला हे मला समजत नाही. मिपापेक्षा कितीतरी पटीने डेटा असलेल्या वेबसाईट्स अस्तित्वात आहेत आणि ड्रुपल वरच बेस्ड आहेत.

भाते Sat, 07/05/2014 - 20:44
स्नेहांकिता ताई, आपण सुचवलेले सगळे मुद्दे पटले. काही शंका नीलकांत/प्रशांत माझ्या शंका सोडवू शकतील. ह. घ्या. :) सध्या मिपावर २८ हजारांपेक्षा जास्त धागे आहेत. समजा, त्यापैकी ३ हजार धागे सर्वानुमतीने / धागाकर्त्यांकडून उडवले गेले तर २५ हजार धागे उरतील. पण त्यामुळे धाग्यांच्या क्रमवारीत काही रिकाम्या जागा राहतील. उडवलेले धागे वगळुन उर्वरीत धागे त्याच क्रमवारीत लावायचे तर सगळ्या धाग्यांचे क्रमांक बदलतील. मग एखाद्या विशिष्ट मिपाकरांचे सगळे धागे नविन क्रमवारीप्रमाणे लावणे किचकट जाणार नाही का? उडवले गेलेल्या धाग्यांचे क्रमांक तसेच रिकामे ठेऊन नविन धाग्यांना ते क्रमांक देणे अवघड जाणार नाही का?

In reply to by भाते

माहितगार Sun, 07/06/2014 - 11:45
(चांगल्या) लेखांचा क्रमांक (वेबपत्ता) बदलणे, मराठी विकिपीडिया आणि इतरत्र दिल्या जाणार्‍या संदर्भ दुव्यांची दिशाभूल करणारे ठरते. असे करणे चांगले लेखन करणार्‍यांना, संदर्भ देऊन लेखन करणार्‍यांना अन्यायकारक आहेच पण अभिप्रेत वाचनीय लिंक चुकीच्या ठिकाणी उघडणे अथवा डेड निघणे संकेतस्थळाची विश्वासार्हता आणि वाचकवर्ग कमी करणारे ठरू शकते हे लक्षात घेतले जाईल अशी अपेक्षा आहे. रिकाम्या उडवावयाच्या धाग्यांचे अल्फाबेटीकल अथवा इतर प्रकारे क्रमांकन करून वाचनीय धाग्यांचे क्रमांक तसेच राहू देण्यावर मिपा प्रशासन भर देईल अशी विनंती आणि आशा आहे.

In reply to by भाते

लंबूटांग Sun, 07/06/2014 - 16:42
या ३ हजार धाग्यांच्या जागा रिकाम्या राहिल्या तर काहीही फरक पडत नाही. नवीन धाग्यांचे क्रमांक आजच्या २५००० पासून तसेच पुढे चालू राहतील. सर्व विदागारांमधे प्रायमरी की ही ऑटो इंक्रिमेंट करण्याची क्षमता असते. जी तुम्ही अगदी २५००० क्रमांकाचा धागा उडवला तरी पुढील धाग्याला २५००१ हा क्रमांक देण्यास सक्षम असते.

In reply to by लंबूटांग

सर्व विदागारांमधे प्रायमरी की ही ऑटो इंक्रिमेंट करण्याची क्षमता असते. जी तुम्ही अगदी २५००० क्रमांकाचा धागा उडवला तरी पुढील धाग्याला २५००१ हा क्रमांक देण्यास सक्षम असते. +१०० --- धाग्यांचे क्रमांक हा महत्वाचा मुद्दा नसावा. त्यांत बदल करायची गरज नाही. किंबहुना तसे करणे गोंधळ निर्माण करणारे आणि काम वाढवणारे ठरू शकते. ऑटो इंक्रिमेंट प्रक्रिया साधी आणि सहज उपलब्ध असते. तरीसुद्धा: १. "सर्व धागे तपासून त्यातले अनावश्यक धागे गाळण्यासाठी वेगळे करणे आणि हे करताना एकाही चांगल्या धाग्यावर (नजरचुकीने गाळण्याचा) अन्याय होणार नाही याची खबरदारी घेणे" हे केवळ किचकटच नव्हे तर खूप वेळखाऊ काम आहे. कारण हे काम मानवी हस्तक्षेपाशिवाय होऊ शकणार नाही. २. या प्रकल्पात खरडवह्या पकडल्या तर तो वरील कारणाने अधिकच किचकट आणि वेळखाऊ बनेल ! --- गाळलेल्या धाग्यांमुळे "एरर मेसेज" न येता "तो तांत्रीक कारणामुळे गाळलेला आहे" अशी सुचना समोर येण्यासाठी छोटासा कोड लिहून संस्थळाच्या "ब्रँड व्हल्यु" ला होणारा धोका टाळता येईल. ---

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

(यातून पोस्ट करणार्‍याचे, आभाराचे प्रतिसाद वगळावे) आणि त्यापेक्षा कमी प्रतिसादांच्या सर्व पोस्टस डिलीट कराव्या, (कारण त्यांचा संकेतस्थळाला काहीही उपयोग नाही); असं सुचवतो. नीलकांतच्या सदस्यांकडून अपेक्षा आणि प्रशांतनं सांगितलेल्या तांत्रिक अडचणी, सर्वांना मार्गदर्शक ठरतील.

चौकटराजा Sun, 07/06/2014 - 08:36
मला अशीच काही काही कोडी पडली होती. प्रत्यक्ष भेटीत प्रशांत यांच्याशी यावर बोलणे होत असे. मिपावरील अनेक खरडी, धागे फारसे महत्वाचे ऐवज नाहीतच. खरे तर खूपसे मिपाकर फारशा ज्ञानाची अपेक्षा धरून धागा वा प्रतिसाद देत नाहीतच. तरीही नीलकांत यांचे ऋण काही फिटणारे नाही. कारण त्यानी व्यक्त व्हायला दिलेली संधी. मला वाटते जुने उल्लेख मालक लोकाना महत्वाचे वाटत असावेत. तसेच त्याना इथे फक्त चित्रे लटकविण्यात अडचण असावी. म्हणून फक्त लिंक द्वारे इथे चित्र पहाता येते. अर्थात याबाबत मालकच जास्त खुलासा करू शकतील म्हणा !

सस्नेह Sun, 07/06/2014 - 14:08
कधीतरी घरात साठलेली अडगळ, अनावश्यक पसारा आपण कमी करतोच की. तसेच हे दालनसुद्धा स्वच्छ, नीटनेटके, आटोपशीर राहावे असे वाटते. बाकी, 'आवरोमॅनिआ' चे इन्फेक्शन मला आहे थोडे, हे इथे कबूल करते ! *wink*

In reply to by सस्नेह

चौकटराजा Mon, 07/07/2014 - 08:39
आवरोमॅनियाचे इन्फेक्शन तुम्हालाच काय मलाही आहे .एवढेच काय ईश्वरलाही आहे. डेथे सर्टीफिकेटचे कार्यालय.मोघे गुरूजींचा वाधता बॅ़क बॅलन्स हे त्याचे पुरावे आहेत.

नीलकांत Wed, 07/09/2014 - 14:00
मिपावरून कुठलेही लेख किंवा व्यनि हटवायची गरज नाही. सध्या आहे त्यापेक्षा दहा पट अधीक लेख आणि माहिती साठवण्याची क्षमता सध्याच्या मिपाच्या सर्व्हरमध्ये आहे. अडचण येतेय ती अन्य तांत्रीक बाबींची आहे. त्याची चर्चा येथे करता येणार नाही. त्यामुळे वर दिलेली सुचना केवळ कुणी सदस्य लेख लिहीतोय आणि अचानक मिपा माझ्या खटपटींमुळे विश्रांतीअवस्थेत गेले तर त्यांचा हिरमोड होऊ नये याची पुर्वदक्षता म्हणून दिलेली आहे. त्या सुचनेला त्यापेक्षा जास्त महत्व देऊ नये एवढी विनंती. बाकी सर्वांना मिपाची काळजी आहे याची दखल घेतली आहे. (आनंदीत नीलकांत)

In reply to by सस्नेह

सखी Wed, 07/09/2014 - 21:49
:) स्नेहांकिता नीलकांतने काळजी नसण्याचे कारण दिलेच आहे. पण जाताजाता तुझ्या दुस-या मुद्याबद्दल सांगायचे तर खरडी सध्या फक्त संपादकांनाच डिलीट करता येतात. बाकी नीलकांत आणि सगळ्याच संपादकांचे आभार जितके मानावे तितके कमीच हे ही नमुद करावेसे वाटते.

गेल्या काही काळापासून मिपाच्या डेटाबेस (विदा) ला काही अडचणी येत आहेत. आजपासून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करीत आहोत. मिपा विश्रांती अवस्थेत जाणार असल्यास काही वेळे आधी कळवण्यात येईल मात्र तरी सुध्दा सर्व लेखकांनी आपल्या लेखनाची एक प्रत साठवून ठेवावी ही विनंती. वरील सूचना गेल्या काही दिवसांपासून मिपाच्या दर्शनी पानावर दिसते आहे. याबाबतीत मिपाच्या विदाबाबत काही निरिक्षणांवरुन काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात. १. मिपा सुरु झाल्यापासून सर्व धागे विदा वर आहेत. यापैकी काही एकोळी तर काही निरर्थक, शून्य अथवा दोन-तीन प्रतिसाद असलेले आहेत.

ड्रेस्डेन - प्राग - ४ (अंतिम)

मधुरा देशपांडे ·

यशोधरा Sat, 07/05/2014 - 15:02
किती देखणा आहे बास्टाय परिसर! फोटो फार सुरेख आलेत आणि लिहिलेसही मस्त. ह्या लेखमालिकेसाठी आभार. पुन्हा अशीच कोणती नवी एखादी लेखमाला घेऊन येशीलच. :)

स्वाती दिनेश Sat, 07/05/2014 - 17:42
छान परिसर, चित्रे आणि लेखनही.. अवांतर- ड्रेस्डेनची खासियत असलेला ड्रेस्डनर ष्टोलन मिळाला का? अर्थात आत्ता सिझन नाहीये म्हणा..पण ख्रिसमसच्या सुमारास तो जर्मनीभर मिळतो.जरुर खा. स्वाती

रेवती Sat, 07/05/2014 - 23:35
सुरेख फोटू व लेखन. नजर हलू नये असा देखावा म्हणजे चित्र क्र. २. याचे ग्रिटींग कार्ड बनवलेत तर मस्त दिसेल. या भागातील सर्व फोटूंना १०० पैकी १०० गुण! लेखमालेसाठी धन्यवाद!

आयुर्हित Sun, 07/06/2014 - 23:29
अद्भुतरम्य निसर्गाची करामत! एवढी स्वच्छ नदि, काठावरची हिरवळ व घनदाट झाडी पाहून फार फार कौतुकच वाटते जर्मन लोकांचे. आमची एवढि छान सहल घडवून आणल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

यशो, दिपक, स्वातीताई, रेवाक्का, इस्पीकचा एक्का काका, अजया, चौकटराजा, मुवि काका, चित्रगुप्त काका, प्रशांत आवले, खटपट्या, मदनबाण, आयुर्हित, सगळ्यांना धन्यवाद. यशो आणि दिपक, हो अगदी चारच दिवसांची सहल होती. जमेल तसे लिहीन नक्की इतर ठिकाणांविषयी. स्वाती ताई, ड्रेस्डनर ष्टोलन नाही मिळाला. :( रेवाक्का, फोटो सगळे नवऱ्याने काढलेत. :)

ड्रेस्डेन - प्राग - १ ड्रेस्डेन - प्राग - २ ड्रेस्डेन - प्राग - ३ सहलीचा शेवटचा दिवस उगवला. सॅक्सॉन स्वित्झर्लंड हा ड्रेस्डेन पासून अंदाजे पाउण तासावर असणारा परिसर. एल्बं नदी, आजूबाजूचे डोंगर, आणि वर्षानुवर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून, झीज होऊन तयार झालेले उंचच उंच खडक असा हा परिसर.

विदेशी माध्यमांचा खोडसाळपणा

आयुर्हित ·

मदनबाण Mon, 07/07/2014 - 13:56
ह्म्म्म... बर्‍याच प्रमाणात सहमत ! विदेशी मिडीयाने आपल्या देशाचे चित्र त्यांना हवे तसे रंगवुन ठेवले होते,आणि आजही अनेक फिरंग्यांना हिंदूस्थान म्हणजे गायी आणि हत्ती असणारा देश वाटतो... इथे जेव्ह्या त्यांचे पैसे बाजारात ओतुन नफा मिळवायचे असते तेव्हा ते आपल तोंड भरुन स्तुती करतात्,आणि नफ्याचा ओघ आटला की कोणती इंडिया असे म्हणतात... यावेळी सुद्धा लोकसभेच्या निवडुकीच्या वेळी परदेशी प्रसार माध्यमांनी जेव्हढे कव्हरेज करायला हवे तितके केले नाही, निदान मला तरी तसेच जाणवले. अनेक न्यूज चॅनलवर {परदेशी} या विषयांवर जास्त काही बोलले केल्याचे दिसले नाही,अमेरिकन मिडिया ने तर जवळपास बॉयकॉट केल्या सारखेच भासले. काही दुवे :- British comic blasting western media for ignoring Indian elections goes viral How Western media reacted to Narendra Modi’s victory The Indian election and the lessons the west can take from Narendra Modi's popularity जाता जाता :- आपल्या मिडीयाला सुद्धा जरा कोणी नीट वर्तांकन कसे करावे याची शिकवणीच दिली पाहिजे. कुठलीही चर्चा ही चर्चा न वाटता,शाब्दिक हाणामारी आणि नुसती आरडा-ओरड वाटते.ब्रेकिंग न्यूच चे खुळ आणि आम्ही ही बातमी पहिल्यांदा तुम्हाला दाखवली/दिली हा खुळचटपणा बंद केला पाहिजे.त्याजागी बातम्या सविस्तर आणि मुद्देसुद देण्यावर भर घालण्याची गरज आहे.एकच विषय दिवस बसुन रवंथ करणे हे लोक कधी बंद करणार ? उदा. शंकराचार्य आणि साईबाबा विवाद ! अख्खा दिवस अक्षरशः पिडलं या लोकांनी ! अरे देशात त्या दिवशी हा विषय सोडुन इतर कुठल्याच घटना या देशात घडल्याच नाहीत ? थोडक्यात सांगायच झाल तर पोरकटपणा बंद करुन प्रोफेशनली बातम्या देणे सुरु करायला हवे.

आयरिश टाइम्स किती लोक वाचतात ? वाचकातल्या किती जणांना भारत किंवा काश्मीरबद्दल माहिती / कळकळ आहे? त्यांचा भारताच्या जागतीक छबीवर किती परिणाम होऊ शकेल? "...Sales of The Irish Times fell 7.1 per cent in July-December 2013 compared with the same period in 2012. Print circulation stands at 82,059, a drop of 6,297 copies." केवळ पाश्चिमात्य आहे यासाठी "सगळ्याच पाश्चिमात्य माध्यमांना" उगाच महत्व देण्याची सवय आपण सोडली पाहिजे. यामुळे आपणच त्यांचे महत्व निष्कारण वाढवत असतो. हे केवळ पाश्चिमात्य गोरा आहे म्हणून जॅनिटरला साहेब म्हणण्यासारखे आहे. अर्थात योग्य ठिकाणी, योग्य तर्‍हेने विरोध करायला ना नाही हेवेसांन.

आजकाल विदेशी माध्यमांत काही बातम्या मुद्दाम हेतुपुरस्सर धडधडितपणे चुकिच्या पद्द्तिने छापल्या जात आहेत,जेणेकरुन भारतीय राज्यव्यवस्था व अखंड एकता याला सुरुंग लावला जाईल.

कल्पित सत्य: भाग १, २ (सव्वाशेर तडका आणि बुमरेंग)

निमिष सोनार ·

In reply to by धन्या

कैमेरा भेग पडलेल्या जमिनीत जाण्याइतक्या दुष्काळाची कल्पना, केवळ प्रतिभावंतच करु जाणे. यावरनं एक म्हण आठवली, पृथ्वी आहे गोल, म्हणून भाऊंचा विचार खोल!
झाडामागून शेतकऱ्याचा मित्र बाहेर येतो आणि रडणाऱ्या व शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या फोटोग्राफर चा फोटो काढतो व त्याच्या मित्राच्या न्यूज चैनेल ला पाठवतो.
म्हणजे दुष्काळ पडला तरी शेतकरी कैमेरा (किंवा सेलफोन) बाळगून आहे, काय हा ज्वलंत विरोधाभास! त्यातही तो स्मार्टफोन असून वॉट्स अ‍ॅप वगैरे सोयींनी युक्त आहे. इतकंच काय तर तळागाळातल्यांच्या सुद्धा न्यूज चैनेलवर ओळखी आहेत. श्यामची आई म्हणते तसं, `आम्ही बावळट असू, पण दरिद्री नाही!'. तस्मात आपण स्ट्रेट, करुणासिंधू मानेगुरुजींशी बरोबरी साधली आहे.
`पावसाचे काय करायचे ते मी पाहून घेईन'
या उत्तरातून `तू खा ऊस, तोपर्यंत मी पाडतो पाऊस' असा बाणेदार स्वभाव दिसतो. `धरणं काय आम्ही झिप उघडून भरायची'? अशा बेताल वक्तव्यांपुढे, हे वाक्य शोषितांना दिलासा देणारं आहे.
अरे मम्मी, चॉकलेट एक्स्पायर झाले आहे
`कितीही घाई असली तरी, अधाश्यासारखं उघडण्यापूर्वी, डेटाबेस न्याहाळा' असा संदेश जाणवला.
ते चॉकलेट थोडे लूज झाल्यासारखे सुद्धा वाटत होते.
शिवाय चाचपून पाहा, लूज वस्तू, एक्सापयरी डेट उलटून गेलेल्या असू शकतात, ही गर्भित सूचना.
फ्री में देता हू! मेरी तरफ से!!"
फुकटचा माल महागात पडू शकतो! हा नवा आयम.
"बेटा मत ले. खराब है वो" ... असे म्हणून त्याने लगेच जीभ चावली!
माल खराब असला की जीभ सांभाळा!
आणि रितेश ला नवे फ्रेश ताजे चॉकलेट मिळाले.
बाळ रितेश, पुढच्या वेळी हातोहात होणारी फसवणूक टाळ, फ्रेशमालाचा हट्ट धर.

In reply to by भृशुंडी

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/10/2014 - 23:10
अजून बालीश विनोदानं हसू येण्याचे दिवस सरलेले दिसत नाहीत. वस्त्र सावरा, ते फेडण्याची वेळ येणे बरे नोहे.

दुसर्‍या कपोलकल्पित सत्य कथे च्या पात्रां पैकी सुरेश चे अडनाव देशमुख होते का? आणि दुकानदाराचे रेशमीया? हे दुकान ठाण्यात इस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ किंवा पोखरण रोड वर होते का? कथा क्र. १ मधे जमिनीला पडलेली भेग साधारण केवढी मोठी असते? बाकी स्पा बरोबर सहमत. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निमिष सोनार गुरुवार, 07/10/2014 - 13:13
तुमच्या प्रतिसादावरून मला लगेचच "कॉमेडी एक्स्प्रेस" मधील महाप्रश्ने या पात्राची आठवण झाली. त्याच स्टाईल ने तुम्ही प्रश्न विचारले आहे. मजा आली :-)

भिंगरी Sun, 07/06/2014 - 12:06
भेगेतून कैमेरा आत गेला.जमिनीतील पाण्याचा शोध घेऊ लागला. पण त्याला फक्त वेळोवेळी पेरलेली वाळून कुजून गेलेली बियाणेच दिसली............

भृशुंडी गुरुवार, 07/10/2014 - 00:13
निमिषभौ, चालू द्या. तुमचं काल्पनिक सत्य आवडलं. अजून काही सत्यं वाचायला मजा येईल. वि.सू. -> मी दिलेला हा प्रतिसाद संपूर्ण काल्पनिक आहे पण तो सत्य व्हायला हवा का, हा विचार लेखकाने करायचा आहे.

मराठे गुरुवार, 07/10/2014 - 23:19
कॅमेरा कोरड्या ठण्ण विहीरीत टाकून दिला असं लिहीलं असतं तर चाललं असतं. पण तरीही पहिला किस्सा थोडा इल्लॉजिकल वाटला. दुसरा चांगला आहे. एक छोटेखानी कथा होऊ शकली असती.

लेखनविषय:
लेखनप्रकार
#कल्पित_सत्य (१)"सव्वाशेर तडका" सुचना: हा प्रसंग मला सुचलेला आणि पूर्णपणे काल्पनीक आहे पण तो सत्य व्हायला हवा का याचा विचार वाचकांनी करावा. एका न्यूज चैनेल चा फोटोग्राफर पाऊस न पडणाऱ्या एका भागात जातो. पाऊस न पडल्याने चिंतेत असलेला एक शेतकरी आकाशाकडे खूप आशेने बघत असतो. फोटोग्राफर त्याचा फोटो काढतो. त्या शेतकऱ्याला खूप राग येतो. तो फोटोग्राफरच्या कानाखाली एक ठेवून देतो. त्याचा कैमेरा हिसकावून घेतो आणि भेग पडलेल्या जमिनीत टाकून देतो. कैमेरा गेल्यामुळे फोटोग्राफर रडतो व शेतकऱ्याला मारायला धावतो.

वारी

आनंदमयी ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

आयुर्हित Sat, 07/05/2014 - 09:51
छान व मनाला भावनारी कविता. फक्त एक बदल सुचवू इच्छितो: विष्णुरूपी लीन होवून जगावे अंतास उरावे विष्णूरूप ||

काव्यरस
श्वासांतून वाहे सावळा मुरारी.. पायी चाले वारी पंढरीची|| सावळ्या डोहात सावळा तरंग भक्तिरूपी दंग वारकरी|| बंधने जुनी का भासती विजोड देहा लागे ओढ विठ्ठलाची..|| अधिरश्या जिवा पावलांची साथ वसे अंतरात भक्तियोग || पाहता लोचनी विठ्ठल सावळा तप्त जीव भोळा श्रांत होई || विष्णुरूपी लीन होवून मरावे अंतास उरावे विष्णूरूप || अदिती जोशी

न आवडलेली पुस्तके- (कादंबरी)

पुस्तकमित्र ·

चित्रगुप्त Sat, 07/05/2014 - 02:30
न आवडणारे पुस्तक पूर्ण वाचवलेच जात नाही, मग त्याविषययी लिहिणार तरी कसे ? त्यातून " समग्र ग्रंथ पाहिल्याविण, उगाच देई दूषण, मनुष्य नव्हे पाषाण, मनुष्यवेषे" असे समर्थ सांगून गेलेतच... तस्मात पसार. हां, मात्र असे कधीकधी होते, की विशीत आवडलेले पुस्तक चाळीशीत नावडते ठरते वगैरे...

कंजूस Sat, 07/05/2014 - 02:55
पक्षीकोष ,मारुति चितमपल्ली यांचे .मोठे जाडजूड पुस्तक ,अगोदर काही पुस्तके आली आहेत म्हणून हाती घेतले .पण नाही आवडले .रंगीत चित्रे नाहीत .पक्षांची संस्कृत /मराठी नावे शोधण्याचा खटाटोप वाटला .थोडेसे पक्षी घेऊन प्रथम लहान पुस्तक काढायला हवे होते .

अजया Sat, 07/05/2014 - 08:48
नुकतच जॉन ग्रीनचं लूकिन्ग फॉर अलास्का वाचलं. फॉल्ट ईन युअर स्टार्सचा फेमस बेस्ट सेलर लेखक.त्याची ही पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. अमेरिकेतल्या बोर्डींग स्कूलमध्ये राहणार्‍या टीन एजर मुलांची ही गोष्ट आहे. मला त्यातला न आवडलेला भाग म्हणजे सतत हे मुलं दारू पीत असल्याचे,स्मोकींगचे, आणि शारिरीक आकर्षणाचे उल्लेख. ते इतक्या वेळा येतात की ही मुलं हे सोडून दुसरं काही करत नाहीत की काय असं वाटायला लागतं. कथाही उल्लेखनीय वाटली नाही. अर्थात ती आवडणारेही लोक असणारच. मला मात्र अत्यंत कंटाळवाणी वाटली एवढं खरं!!

पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमातील सगळ्या विषयांची सगळी पुस्तके. त्या वेळी अभ्यास करताना तरी कधीच आवडली नाहीत आणि नंतर वाचायचा कधी प्रयत्न केला नाही. (इथे पुस्तके म्हणजे कादंबरी असे अपेक्षीत असेल तर अवांतरा बद्दल क्षमस्व) पैजारबुवा,

In reply to by प्रचेतस

प्रसाद प्रसाद Sat, 07/05/2014 - 09:57
पी. एच. डी. चा प्रबंध असावा असेच युगंधर आहे किंवा मोठी कांदबरी लिहायची म्हणून बरीच माहिती काढली आहे पण अजून अंतिम स्वरूप आलेले नाही. माहिती ठासून भरली आहे. पण लेखकाचा अनुभवसंपन्न अंतिम हात फिरलेला नाही असं युगंधर वाचून वाटलं होतं. मृत्यंजयप्रमाणेच आकृतिबंध पण चुकीच्या व्यक्ति कथा सांगताहेत असं का कुणास ठाऊक वाचताना वाटलेलं आठवतं.

In reply to by प्रचेतस

कवितानागेश Sat, 07/05/2014 - 10:21
मोठा सेटबॅक!! :D मी कशीबशी २५ पाने वाचली, मग चाळलं... आणि दुसर्‍य दिवशी ज्यानी कौतुकानी दिले होते त्याची अजूनच 'कौतुक' करुन त्याला परत दिलं. एकतर असं खूप वर्णन वर्णन वाचलं आणि नाटकी डायलॉग्ज वाचले की नासी. फडकेंची कादम्बरी वाचल्याचं फीलिन्ग येते. सगळंच प्लास्टिकचे. खरी माणसं दिसतच नाहीत. पुन्हा मूळ संहितेत बदल केले की रस्ताच चुकल्यासारखं वाटतं.

In reply to by कवितानागेश

प्रचेतस Sat, 07/05/2014 - 12:18
सहमत. 'युगंधर' कादंबरी फसण्यामागे शिवाजी सावंत आणि प्रकाशकांची 'मृत्युन्जय' चे यश 'युगंधर' मध्ये एन्कॅश करण्याची व्यावसायिक गणिते कारणीभूत असावीत असं सारखं वाटत राहतं.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त Sat, 07/05/2014 - 15:34
'युगंधर' हे पुस्तक उत्कृष्ट असल्याचे अधून-मधून उल्लेख वाचनात येत असल्याने उत्सुकता होती. मागे दिवाळी मिपा अंकातली 'नरकचतुर्दशी' ची कथा लिहिताना लायब्ररीत युगंधर दिसले, ते चाळल्यावर निराशा झाली, त्यामुळे पुस्तक घरी आणलेच नाही. तात्पर्य, हे पुस्तक न आवडणारांपैकी मीही एक (अर्थात 'समग्र ग्रंथ वाचल्याविण') यावरून आठवले, रणजीत देसाईंचे 'राजा रविवर्मा' फार वर्षांपूर्वी वाचले होते. चित्रकारांबद्दल कादंबर्‍यांची मराठीत वानवाच असल्याने मोठ्या उत्सुकतेने (पूर्ण) वाचले. परंतु त्यात रविवर्मावरील कोर्टातले खटले, वगैरेवरच फार लिहिलेले होते, आणि प्रत्यक्ष चित्रकलेबद्दल विशेष काहीच नव्हते, म्हणून निराशा झाली होती. अवांतरः रविवर्मा वरील केतन मेहता यांनी बनवलेला सिनेमा 'रंगरसिया' कुणी बघितला आहे का? हा मुळात रिलीज झाला की नाही, याची डीव्हीडी मिळते का, वगैरे बराच शोध घेऊनही समजलेले नाही.

In reply to by चित्रगुप्त

एस Sun, 07/06/2014 - 14:58
ज्या चित्रामुळे त्यांच्यावर खटला दाखल होतो ते चित्रच कादंबरीत दिलेले नाही. इतर चित्रे मात्र दिलीयेत. पण असा प्रयत्न मराठीत होणेच कौतुकास्पद वाटले.

In reply to by एस

यशोधरा Sun, 07/06/2014 - 15:25
राजा रविवर्मा कादंबरी मला आवडली नाही. रविवर्म्याचा चित्रकार होण्याच्या प्रवासापेक्षा इतर फापटपसारा अधिक वाटला. भाषाही फारशी जमलेली नाही, हे वै म.

In reply to by प्रचेतस

चिगो Wed, 07/09/2014 - 16:39
युगंधरबद्दल सहमत.. अत्यंत शब्दबंबाळ कादंबरी.. पाच दहा पानातच दमलो आणि लेखकाला "अरे, काय सांगायचं आहे ते स्पष्ट बोल ना जरा.." असं म्हणावंसं वाटलं, पण ते शक्य नव्हतं.. :-( "मृत्युंजय"पण कधीकाळी वाचणीय वाटलं होतं, तरी आता शब्दबंबाळ वाटतं.. संभाजीपण जरा ह्याच कॅटेगिरीतलं.. वपुंची "बाई, बाटली आणि कॅलेंडर", "वन फॉर द रोड", "कर्मचारी" इत्यादी बरी वाटत असली तरी नंतरनंतरची बरीच पुस्तके बोथड, बोजड वाटतात.. पुलं मात्र कधीच बाळबोध वाटले नाहीत. उलट हा माणूस जगणं एवढं कसा रसरसून एंजॉय करु शकतो, ह्याचं नेहमीच कौतुक वाटत आलंय.. माझ्यामते, "विनोदी"च्या नावाखाली ज्याच्या लिखाणाची अनेक अंगे दुर्लक्षीत करण्यात आली असा लेखक म्हणजे पुलं..

In reply to by प्रसाद प्रसाद

यशोधरा Sat, 07/05/2014 - 10:13
हो लिहिन सविस्तर वेळ झाला की, पण थोडक्यात म्हणायचे झाले तर मला ते लिखाण पटले नाही. फार एकांगी असे वाटले. मागे कुठेतरी मी थोडेफार लिहिलेही आहे त्याबद्दल. ठोस असे काही आढळले नाही मला त्या कादंबरीत.

In reply to by यशोधरा

कवितानागेश Sat, 07/05/2014 - 10:24
मी एका मित्राकडून असंही ऐकलं की यातली भाषाही वाईट आहे. मध्येमध्ये हिन्दी शब्द, हिन्दी क्रियापदं वाचताना दाताखाली खडा आल्यासारखं होतं.. त्यामुळे मी वाचायला घेतलच नाही.

प्रसाद प्रसाद Sat, 07/05/2014 - 10:01
विजया मेहता लिखित झिम्मा वाचले होते. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत कलात्मकतेने केले आहे. खरेतर या मुखपृष्ठानेच माझे जास्त लक्ष वेधले आणि मी पुस्तक खरेदी केले. झिम्माची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने बाई करतात. त्या आपल्या बालपणाकडे आणि तारुण्यातल्या विजया जयवंतकडे फक्त त्रयस्थपणे पाहताच नाहीत तर स्वत:चा उल्लेखदेखिल त्रयस्थपणे करतात जे सुरुवातीला वाचताना थोडेसे विचित्र वाटते आणि नंतर सवय होते हा आकृतिबंध नंतर नाहीसा होऊन त्या नेहमीप्रमाणे चरित्र सांगतात. वयाच्या पंचविशीपर्यंत बाई आत्मचरित्र रूढ अर्थाने आत्मचरित्रासारखे सांगतात, बालपणीचे किस्से येतात, मुख्यत: आठवणी आई-वडील-आजी-गावाकडचे घर अशा घरगुती स्वरूपाच्या, शाळेच्या, शाळूसोबतींच्या, शाळेतल्या शिक्षकांच्या फारशा आठवणी बाई सांगत नाहीत. बाई आठवणीने त्यांच्या नात्यातील शोभना समर्थ आणि नुतनचा उल्लेख एक दोन प्रसंगापुरता करतात. बाईंचे घर विचाराने आचाराने पुढारलेले होते असे जाणवते, घरातील मुलगी म्हणून त्या काळी (बाईंचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४) असणारी फारशी बंधने त्यांच्यावर आहेत असे दिसून येत नाहीत. त्यामुळेच बाईंचे चरित्र सदैव खळखळत वाहणाऱ्या अल्लड प्रवाहासारखे घडत गेले असे वाटते. मात्र येथे एक गोष्ट सांगितली पाहिजे की सुरुवातीला विजयाबाईंच्या आईचा म्हणजेच बायीजीचा बाईंच्या नाटक प्रकरणाला विरोध होता. बाई लहानपणापासून अत्यंत चळवळ्या आणि मनस्वी त्यामुळे इतर तात्कालिक वेडाप्रमाणेच हे ही तात्पुरते वेडच असे घरात समज होता असे आठवणीने बाई नमूद करतात. कॉलेजमध्ये गेल्यापासून मात्र बाईंचे हे आत्मचरित्र थांबते आणि सुरु होते त्यांचे नाट्यचरित्र. वयाच्या १७-१८ व्या वर्षापासून इब्राहिम अल्काझीपासून सुरु झालेलं नाट्यशिक्षण पीटर ब्रूक पर्यंत, वयाची पन्नाशी उलटून गेली तरी सुरूच राहिले असे बाई अभिमानाने सांगतात. आणि ह्यादरम्यानचा त्यांचा नाट्यप्रवास म्हणजेच – झिम्मा. ह्यामध्ये रंगायनची स्थापना, रंगायनचे सुरुवातीचे सहकारी अरविंद देशपांडे, नाटककार विजय तेंडुलकर यांच्यासोबत केलेली सुरुवात त्याचबरोबरच रंगमंचाची, संहितेची, नाट्याविष्काराची येत गेलेली समज याचे साद्यंत वर्णन बाईनी केलेले आहे. मध्येमध्ये विजयाबाई आपल्या खाजगी आयुष्याबद्दल त्रोटक माहिती पुरवत राहतात. जसे वयाच्या पंचविशीपर्यंत लग्न न करता राहण्यासाठी बाईनी घेतलेला नाटकाच्या, त्याच्या तालमीचा आधार. अचानक नाटकाच्या संदर्भातूनच झालेली दुर्गाबाई खोटेची ओळख, रंगायनला त्यांनी मुघल-ए-आझमच्या कपडेपटातून नाटकासाठी दिलेली ड्रेपरी यांचा प्रासंगिक उल्लेख येतो, त्यातून दुर्गाबाईंनी त्यांच्या मुलासोबत दिलेला लग्नाचा प्रस्ताव मग हरेन खोटेशी लग्न, दुर्गाबाईंचा हौशी स्वभाव, त्यानंतर लगेच विजयाबाईंचे नवऱ्याबरोबर जमशेदपूरला स्थलांतर, रोजच्या रुटीनने आलेला कंटाळा आणि हे लक्षात घेऊन हरेन खोटेनी परत मुंबईत हलवलेले बिऱ्हाड. परत बाईंचा रंगायनशी पर्यायाने नाटकाशी आलेला संबंध. पु. ल. देशपांडेंच्या नाटक निमित्ताने झालेला परिचय, नव नाट्याच्या ध्यासाने बाईनी केलेला ब्रेश्तच्या चेअर्स या न-नाट्याचा फसलेला प्रयोग आणि पु.ल नी त्याचे केलेले विडंबन (मला वाटते खुर्च्या नावाने पुलंच्या उरलंसुरलं ह्या पुस्तकात हे विडंबन आहे.). बाई अगदी स्पष्टपणे पुलंनी त्यांच्यावर केलेले हे विडंबन आवडले नाही हे सांगतात. त्याचबरोबर रंगायन टीम आणि बाई यांचा पहिला परदेश दौरा पुलंनी दिलेल्या वाईट अभिप्रायामुळे रद्द झाला हे ही बाई खेदाने सांगतात. (खरेतर पुलंचे नाट्यप्रेम आणि नवनिर्मितीचे त्यांचेही चाललेले प्रयोग पहाता पुलं असं काही करतील असं मला तरी वाटत नाही). ह्यानंतर मात्र बाईंच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले आणि बाई नवऱ्याबरोबर इंग्लंडमध्ये बोर्नव्हिलला गेल्या. परत दोन वर्षाने भारतात आल्यावर बाईंना जाणवलेली कटू सत्य - रंगायनच्या नाट्यचळवळीत बाईंची अनुपस्थिती रंगायनला मारक ठरली होती, रंगायन फुटायला सुरुवात झाली होती त्यातच भारतात परत आल्याबरोबर सहा महिन्यात अचानक हरेन खोटेचा हार्टअॅटॅकने झालेला मृत्यू होतो. त्यावेळी दोन मुले बाईंना झालेली असतात. बाईंचे आयुष्य नवऱ्याच्या अपमृत्युने आणि रंगायनच्या फाटाफुटीमुळे भोवऱ्यात सापडते. कसलेही प्रसंग, व्यक्ती न सांगता बाई सांगतात की मी चुकले आणि ह्या चुकीमुळे दुर्गाबाई खोटे दुरावल्या. एका परिच्छेदात बाई परत खाजगी आयुष्य अत्यंत त्रोटकपणे सांगतात त्यावरून बाईंच्या आयुष्यात कोणी तरी पुरुष येऊन गेला आणि बाई चुकल्या इतकेच कळते (विजयाबाई स्वत: ह्या प्रसंगाचा उल्लेख मी चुकले असाच करतात). ह्यानंतर परत अगदीच थोडक्यात फरोख मेहताची नाटकाच्या संदर्भातूनच भेट आणि लग्न. फरोख मेहता पारशी पण त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांनी बिना अगदी मनापासून स्वीकारले तसेच मुलांना ही सावत्र बाप कधीही न जाणवू देता फरोखनी प्रेम केले अगदी स्वत:ची मुले असल्यासारखे आणि त्यांचे आडनाव मात्र खोटे असेच राहू द्यावे ह्याबाबत फरोख मेहता आग्रही होते. विजयाबाईना फरोख मेहता पासून अनाहिता नावाची मुलगी आहे. अनाहिता न्यूयॉर्कच्या ब्रॉंडवेला सात वर्ष कार्यरत राहून न्यूयॉर्कमधीलच आणि ब्रॉंडवेत काम करणाऱ्या भारतीयाशी संसार थाटते, अशी परत त्रोटक माहिती आणखी एके ठिकाणी बाई देतात. ह्यानंतर सुरु होते जर्मनी पर्व. विविध संकृत नाटकांचा नाट्याविष्कार प्रथम मुंबईत आणि नंतर जर्मनीमध्ये जाऊन जर्मन भाषेत. विजयाबाई शाकुंतल, मुद्राराक्षस, हयवदन अशी संकृत नाटके जर्मनीत जाऊन केली. एकूणच झिम्मामध्ये विजयाबाई नाटकासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, मिळालेले यश, क्वचित चाखावे लागलेले अपयश अशा भरघोस आयुष्याचा नाट्यआलेख अत्यंत सुरेख मांडतात. त्यांच्या हाताखाली तयार झालेला प्रत्येक मराठी कलावंत आता प्रतिथयश आहेत जसे विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, नाना पाटेकर (काही तालीम ह्याला बाईकडून मिळाली आहे), रिमा लागू इ. विजयाबाई चेष्टेने हे आमचे घराणे (गाण्यात असते तसे) असे सांगतात. स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्दल मात्र हातचे राखूनच सांगतात. बालपणीच्या विस्तृत आठवणीनंतर परत अशा घराच्या आठवणी, किस्से त्या क्वचितच सांगतात. कदाचित आत्मचरित्राकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन तयार झालेला असतो, त्यांत सामाजिक घटनांबरोबरच वैयक्तिक आयुष्यही काही प्रमाणात असावे असे वाटत असते. विजया मेहतांचे पुस्तक म्हणून खूप अपेक्षेने घेतले होते पण फारसे आवडले नाही (पूर्व प्रकाशित)

In reply to by प्रसाद प्रसाद

यशोधरा Sat, 07/05/2014 - 10:23
हे तर आत्मचरित्र आहे, कादंबरी नव्हे. पण मला आवडले होते हे आतमचरित्र, उगाच काहीतरी सनसनाटी लिहिण्यापेक्षा अतिशय संयत भाषेत विजयाबाईनी आपले आयुष्य उलगडले आहे. कोणावरही आगपाखड केली नाही, जिथे स्वतःचे चुकले, तिथे तसे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. एक त्रयस्थ दृष्टीने त्या स्वतःचा जीवन उलगडून दाखवू शकल्या आहेत असे वाटते.

In reply to by यशोधरा

प्रसाद प्रसाद Sat, 07/05/2014 - 10:33
य्येस.... पण आत्मचरित्र कादंबरीसारखेच लिहिले आहे की! पु. लं वर केलेली ती आगपाखड नाही तर काय आहे? सनसनाटी लिहिले तरचं आत्मचरित्र चांगले असे कुठे आहे?

In reply to by प्रसाद प्रसाद

यशोधरा Sat, 07/05/2014 - 10:44
सनसनाटी लिहिले तर चांगले पुस्तक असे नक्कीच म्हणायचे नाहीये, तसेच एखद्याने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल किती सांगायचे हे केवळ ती व्यक्तीच ठरवणार आणि तिचा तो हक्क आपण मान्य करायला हवा. पुलंवर आगपाखड केली आहे असे काही मला वाटले नाही, जे जसे घडलेय ते सांगितले आहे, असे माझे मत. मला बाईंनी कादंबरीसारखे काही लिहिल्याचे वाटले नाही, उलट दुर्गाबाई खोट्यांबद्दल किती जिव्हाळ्याने लिहिले आहे. खूप आवडला होता तो भाग. :) पण पुन्हा एकदा जमल्यास तुमची चिकित्सा समोर ठेवून पुस्तक वाचून पाहते. :)

भुमन्यु Sat, 07/05/2014 - 10:29
ह्या भागाने खुप निराशा केली. खरं तर पहिल्या दोन भागांमध्ये जी उत्कंठा वाढली होती ती ह्या भागात कुठेही वाटली नाही. हा भाग खुप लांबवल्यासारखा देखील वाटला. सतीच्या मृत्युनंतर अतिषय रटाळ होतं....

In reply to by भुमन्यु

सागर Sat, 07/05/2014 - 17:56
मी सध्या वायुपुत्रांची शपथ हेच वाचतोय. वाचून सविस्तर प्रतिक्रिया देईनच. पण निम्मे पुस्तक वाचून झाले आहे. अजून तरी छान चालू आहे. आवडत आहे. बहुदा सती मेल्यानंतर (हा मला धक्का आहे कारण मी तेथपपर्यंत अजून आलेलो नाहिये. मराठी अनुवाद प्रत्येक भागागणिक बहरत गेला आहे. त्याचे प्रत्यंतर या तिसर्‍या भागांतही येत आहे. फिक्शन वाचताना माहिती असलेला इतिहास डोक्यातून पूर्ण काढून टाकावा लागतो तरच फिक्शनची मजा घेता येते. मला हे जमत असल्यामुळे असेल कदाचित. पण अतिशय उत्कृष्ट नसली तरी ही शिवा ट्रिलॉजी मला आवडली. सध्या सतीच्या जळालेल्या गालावरचा व्रण पाहून कार्तिक शांत असला तरी गणेशाने सूड घ्यायची प्रतिज्ञा केली येथपर्यंतच मी आलो आहे.

In reply to by भुमन्यु

मृत्युन्जय Mon, 07/07/2014 - 15:23
खरंय शपथ वायुपुत्रांची अपेक्षे एवढे नाही जमलेले. पुस्तके उतरत्या श्रेणीने दर्ज गमावुन बसलेली आहेत. रहस्य नागांचेही चांगले होते पण मेलुह एवढे नाही. पण मला तिन्ही पुस्तकांची मांडणी आणि संकल्पना आवडली. पहिल्या २ पुस्तकांमुळे आमिष प्रथितयश लेखकांमध्ये जाउन बसला. त्यामुळे त्याला बहुधा सहज सोप्पी कथा सोडुन थोडे फिलोसोफिकल लिहुन साहित्यक्षेत्रात भरीव योगदान द्यायची हुक्की आल्ली असावी. तिथेच तिसरा भाग गंडला. पण तरीही हे पुस्तक न आवडलेल्या यादीत न घालता निराशा करणार्‍या यादीत घालीन.

In reply to by प्रचेतस

सागर Sat, 07/05/2014 - 17:58
छावा मला आवडली. एका वेगळ्या उंचीवर नेते ही कादंबरी. अनेक वाचनांतून काही वेगळे पैलू लक्षात येतात हे छावाचे अजून एक वैशिष्ट्य. शब्दांच्या पेरणीबाबत मात्र बर्‍यापैकी सहमत आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 14:14
अंशतः सहमत. नेहमी असते तितकेच शब्दबंबाळ आहे. :) पण रणजित देसाई आणि विश्वास पाटील या दोघांचाही शब्दबंबाळपणा अंमळ वेगळ्या पद्धतीचा आहे, नै ;)

कंजूस Sat, 07/05/2014 - 11:16
कादंबरीचा धागा पण चुकून पक्षीकोषचे लिहिलं .रंगीत चित्रे सर्वाँची नाहीत . 'पण लक्षात कोण घेतो ' शाळेत असतांना वाचायला घेतली परंतू लवकरच कंटाळा आला .कोसला मला काही समजली नाही .त्या वातावरणाची ओळख नाही म्हणून असेल .

In reply to by कंजूस

यशोधरा Sat, 07/05/2014 - 11:24
आता प्रसिद्ध झालेल्या दुसर्‍या आवृत्तीमध्ये सर्व चित्रे रंगीत आहेत. प्रकाशकांच्या मनोगतात त्यांनी म्हटले आहे की पहिल्या आवृत्तीत फक्त ३२ पाने अशी होती. तेह्वा ह्या नव्या आवृत्तीत बर्‍याच सुधारणाही आहेत. सुरुवातीचे चितमपल्ली ह्यांचे मनोगतही उत्तम उतरले आहे.

In reply to by कंजूस

पिलीयन रायडर गुरुवार, 07/10/2014 - 16:36
"पण लक्षात कोण घेतो" मी पण नुकतीच वाचली.. एकतर मला शेवट पर्यंत हे समजलं नाही की ह. ना. आपटेंनी ती लिहीली म्हणजे कल्पना आहे की शेवटी जे उल्लेख आहेत जसे की तळटीपः- हे छापत असतानाच कळाले की अमुक अमुक दिवशी आमचे मित्र वारले, किंवा लेखिकेच्या भावाने लिहीलेले प्रकरण, ते वाचुन वाटतं की हे अगदी डिट्टेल मध्ये आले म्हणजे हे खरे आहे, कल्पना नाही.. दुसरं असं की बाळबोध आहे फार, तेच तेच बर्‍याचदा लिहीते लेखिका, पण गोष्ट घडते तो काळ पहाता स्त्रिया लिहितात हेच खुप मोठे आहे हे समजुन मी वाचत राहिले. सस्पेन्स फारच ताणला आहे, त्यामानानी मला शेवटी काही तरी फारच भयंकर होणार असे वाटले, पण तितकेसे परिणामकारकपणे लिहीता आले नाहीये.. एका स्त्रीने स्वतःच्या स्थितीकडे बघायचा दृष्टिकोन आणि त्याबद्दलचे विवेचन मात्र चांगले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

पिलीयन रायडर गुरुवार, 07/10/2014 - 16:49
अहो काका, लेखकच आहेत.. पण कादंबरी लिहीलेली आहे एका स्त्रीने.. स्वतःचे आत्मचरित्र म्हणुन.. म्हणुन तर मला समजत नाहीये ना की ही हनांची कल्पना समजावी की शेवटचे इतके लहान लहान डिटेल्स पाहुन खरंच सत्यकथा आहे ते मला कळालेलं नाही..

In reply to by पिलीयन रायडर

पैसा Tue, 07/15/2014 - 23:25
बहुतेक १८८०. त्यामुळे भाषा अशी बोजड आणि पाल्हाळिक आहे. तंत्र वगैरे काही बघायचं नाही. विषय त्या काळाच्या मानाने फार धाडसी होता हे महत्त्वाचं. जेव्हा भाषेबद्दल काही समजत नव्हतं तेव्हा आम्ही अशा भाषेला 'टिळक-आगरकरी भाषा' म्हणून हसायचे. पण नंतर या लिखाणाचं महत्त्व कळलं.

In reply to by पैसा

कंजूस Wed, 07/16/2014 - 05:49
आठवीत गेल्यावर आता वाचनालयातून तुम्ही पुस्तके मिळू शकतील कळल्यावर तिकडे गेलो .सिनिअर लोकांनी टारगटपणाने 'पण लक्षात ..'ची भलामण केली .पुस्तकाची मागणी केल्यावर बाईंनी आदराने पाहिले .पुस्तकाचा ठोकळा पाहिल्यावर लक्षात आले की आपल्याला बनवले आहे .निमूटपणे पुस्तक दप्तरात कोंबून घरी आणले .दहा पानांतच मिटले .दुसऱ्याच दिवशी परत केले ."झाले वाचून ?" नाही आता सुटीच्या अगोदर नेईन म्हणून थाप ठोकली .

सागर Sat, 07/05/2014 - 13:52
पुस्तकमित्रा, सुंदर धागा काढला आहेस. अती अजीर्ण झालेले पुस्तक म्हणजे नातिचरामि. कितीही बेकार पुस्तक असले तरी ते शेवटपर्यंत वाचायची माझी क्षमता आहे. पण आयुष्यात वाचू न शकलेल्या पुस्तकांत या पुस्तकाचा क्रमांक खूप वरचा आहे. पुढे कधीतरी परत प्रयत्न करेन. पण भयंकर या सदरात मोडणारी ही कादंबरी आहे. मी ४ प्रयत्न करुनही ही कादंबरी पूर्ण वाचू शकलो नाही. या कादंबरीचे वाचन केल्यावर मला जेम्स हॅडली चेस, सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकांच्या वाचनाचे डोस तब्बल ३-४ महिने घ्यावे लागले तेव्हा बाकीची पुस्तके वाचू शकलो. :P

In reply to by सागर

पिलीयन रायडर गुरुवार, 07/10/2014 - 16:45
नातिचरामी बद्दल सांगायचं तर अगदी नावडतीच असं नाही.. पण बोल्ड नायिका वगैरे असुनही डोक्यात गेलं होतं.. मग अजुन १-२ दा वाचलं.. मग वाटलं आपलीच अक्कल कमी पडत असेल समजुन घ्यायला..पण मला अजुनही लेखिकेला म्हणायचय काय हे समजलेलं नाहीये.. सो सध्यातरी "आवडत नाही" लिस्ट मध्येच आहे..

In reply to by लव उ

चित्रगुप्त Sat, 07/05/2014 - 15:43
नेमाड्यांचे 'हिंदू' अतिशय आवडले आणि अलिकडे दुसर्‍यांदा पुन्हा वाचले. (सुरुवातीची पन्नास-साठ पाने जरा कंटाळवाणी वाटतात, पण त्याचा संदर्भ नंतर लागतो).

In reply to by चित्रगुप्त

सोत्रि Sat, 07/05/2014 - 21:21
सुरुवातीची पन्नास-साठ पाने जरा कंटाळवाणी वाटतात, पण त्याचा संदर्भ नंतर लागतो
+१ - (अडगळ आवडणारा) सोकाजी

पैसा Sat, 07/05/2014 - 14:38
गौरी देशपांडेचं विंचुर्णीचे धडे वाचलं. ते प्रचंड आवडलं. नंतर एकेक पान गळावया वाचलं. तेही आवडलं. म्हणून गौरी देशपांडेची इन्फिबीमवर जेवढी पुस्तकं होती ती सगळी घेतली. त्यातलं पहिलंच वाचलं ते उत्खनन. अरारारारा! हिंदी सिनेमात शोभून दिसतील असे योगायोग, सगळी माणसं अजीर्ण व्हावं इतकी गोड. मुलीची जबाबदारी टाकून पळालेला प्रियकरही चांगला असणे, त्याने मरण्यापूर्वी ऑपरेशनसाठी नायिकेकडेच परत येणे, नायिकेची मुलगी आणि नवरा यांनी त्याचे ऑपरेशन आणि नंतर शुश्रूषा करणे इ. इ. वाचून डॉकं ऑऊट झालं. शिकलेला धडा, निव्वळ लेखकाच्या नावावरून पुस्तके विकत घेऊ नका. लायब्ररीतून आणलं असेल तर निदान २ दिवसांत परत करता येतं. पण न आवडलेली आणि विकत घेतलेली पुस्तके घरात बरीच जागा अडवून बसतात आणि त्यावरची धूळ पण साफ करत रहावी लागते.

In reply to by कंजूस

पैसा Sat, 07/05/2014 - 15:12
१००% पटलं. एखाद्या लेखकाचं एखादं पुस्तक लोकांना आवडतं. बरे पैसे मिळतात. मग दुसरं पुस्तक आणखी सफाईदार येतं. तेही खपतं. त्यानंतर लेखकाच्या प्रतिभेपेक्षा बहुधा प्रकाशकाची धंद्याची गणितं लेखकाला लिहिण्यासाठी ढकलायला लागतात!

प्यारे१ Sat, 07/05/2014 - 15:18
युगंधर आणि छावा. बाकी विश्वास पाटलांच्या जनरलच ऐतिहासिक कादंबर्‍या आत्यंतिक शब्दबंबाळ वाटतात. तर झाडाझडती सारखी कादंबरी बेक्कार डिप्रेस करते. :( चेत्याचं 'टु स्टेट्स' आणि अमिशची 'शिवा-ट्रायोलॉजी' मधली पहिलं दुसरं नि तिसरं चढत्या क्रमानं नावडतात! आता वपु काळे काका नावडते झाल्यानं त्यांची बरीचशी पुस्तकं.

In reply to by प्यारे१

प्रचेतस Sat, 07/05/2014 - 16:16
झाडाझडती अत्युच्च दर्जाची आहे. पानिपत पण पूर्णपणे रणांगणावरच अवतरते. संभाजी मात्र भयंकर शब्दबंबाळ.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ Sat, 07/05/2014 - 16:29
चांगलं लिहीतात नि त्यामुळंच भिडतं रे! उगाच्च डिप्रेस नाही वाटत कुणाच्याही लेखनामुळं. पानिपत पूर्ण केली होती एवढंच आठवतंय. फार डिटेल्स आहेत. प्रचंड अभ्यास आहे हे जाणवतं मात्र.

In reply to by प्यारे१

प्रचेतस Sat, 07/05/2014 - 16:46
तरीही पानिपत समजावून घ्यायचं असेल तर शेजवलकरांच्या ''पानिपत १७६१' या पुस्तकापेक्षा इतर चांगले पुस्तक पाहण्यात नाही.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 14:25
सहमत, मात्र अशा कादंबर्‍यांचे एक महत्त्व असते हे नाकारून चालणार नाही. लहानपणी इतिहास इ. ची गोडी लावण्यात राजा शिवछत्रपती, मृत्युंजय, पानिपत, छावा, स्वामी, पावनखिंड, कादंबरीमय शिवकाल, इ. कादंबर्‍यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. एकदा गोडी लागली अन त्या विषयाचं वाचन जरा औरसचौरस झालं, की मग माणूस तिकडे तटस्थपणे बघू शकतो. पण सुरुवातीलाच शेजवलकर, राजवाडे, इ.इ. वाचले तर इंट्रेस पैदा होणेच शक्य नाही. त्यामुळे नंतर या कादंबर्‍या कितीही हास्यास्पद वाटल्या तरी इतिहासाबद्दल आत्मीयता निर्माण करण्यात त्यांचा फाआआआर मोठा वाटा असतो. कारण भूतकाळ सर्वतोपरी जिवंत करायचा प्रयत्न त्या कादंबर्‍याच करतात. त्यामुळे पोरवयाइतके नंतर भारावून जायला होत नसले तरी त्या प्रतिमा, ती शब्दसृष्टी कायम मनात राहते. मला आठवतंय, दीडेक वर्षापूर्वी पानपतास गेलो होतो तेव्हा जागोजागी मनात पानिपत कादंबरीतलेच तपशील येत होतो. सुवाखेडी, उगराखेडी, पटपरगंज, इ. नावे ऐकून जो ज्याम नॉस्टॅल्जिक झालो त्याला तोड नाही. दिल्लीच्या जवळच रस्त्यावरून बुराडी गावचा बोर्ड दिसला तेव्हाही तीच अवस्था झाली होती. प्रत्यक्ष पानिपत शहरापासून ५ किमी दूरवर ते लढाईचं मोठं स्मारक उभारलंय तिथे काला आमच्या स्मरणार्थ आंब्याचे दुसरे झाडही लावलेय. ते सर्व बघत असताना जे काही वाटतं त्या भावना जागवण्याचे महत्कार्य या कादंबर्‍यांनी केले असे मी मानतो. शेवटी कारणमीमांसा एकीकडं आणि फ्यांटसी दुसरीकडं हे आवश्यक आहेच, पण हरितात्यांचं काम करणार्‍या या कादंबर्‍यांना खरेच पर्याय नाही.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ गुरुवार, 07/10/2014 - 17:27
>>> हरितात्यांचं काम करणार्‍या या कादंबर्‍यांना खरेच पर्याय नाही. खरंच! ह्या प्रतिसादासाठी बॅट्याला पार्टी.

कंजूस Sat, 07/05/2014 - 15:53
वपु आणि पुलंचा वाचकवर्ग एक ठरावीक उत्पन्नगटातला आणि ठरावीक सामाजिक पार्श्र्वभूमीचाही आहे .इतरांना त्यांचे लेखन डोक्यावरून जाते अथवा निरर्थक वाटते .ग्रामीण बाजाचे कथानकही शहरी लोकांना वाचवत नाही .गाजलेले लेखक सतत झुलवत ठेवतीलच असे नाही ,गाजलेले खेळाडू वल्ड कपात गोल करतीलच असे नाही .निराशही करतात .

In reply to by प्रचेतस

यशोधरा Sat, 07/05/2014 - 16:23
वपु, दवणे रटाळशी सहमत, पण पुलंचे लिखाण मात्र बाळबोध नक्कीच नाही. कधीही कोणतेही पुस्तक घ्यावे आणि कोणत्याही पानावरुन पुढे वाचावे. सहजगत्या जमून आलेला असा पुलंचा विनोद आहे. पुलंनी फक्त विनोदी लिखाण केलेले नाही तर त्यांचे ललित लिखाणही तितकेच समृद्ध आहे. त्यातल्यात्यात कान्होजी आंग्रे हा अनुवाद तितकासा जमलेला नाही, असं वाटलं होतं पुस्तक वाचून, पण मूळ पुस्तक मी वाचलेलं नाही, तेव्हा त्याबाबत मतप्रदर्शन करणे बरोबर नाही. त्यांची नंदा, अंतू बर्वा, हरीतात्या, बटाट्याच्या चाळीतल्या एकेक वल्ली, रावसाहेब इत्यादि व्यक्तीचित्रणे कोण विसरेल? वंगचित्रे हे असेच एक सुरेखसे पुस्तक.

In reply to by प्रचेतस

यशोधरा Sat, 07/05/2014 - 16:26
हो की. :) ते मला पटलेलं नाहीये, इतकंच कारणांसकट सांगतेय :) पण पुलंची इतर पुस्तकंही वाचली असशीलच ना तू?

In reply to by यशोधरा

प्रचेतस Sat, 07/05/2014 - 16:41
बरीचशी वाचलीयत. पण आवडली कधीच नाहीत. विनोदी लेखन दमा, शंकर पाटील यांचे जास्त चांगले नव्हे उत्कृष्ट वाटते. कान्होजी आंग्रे चा अनुवाद आवडला होता. बाकी व्यक्तीचित्रणं वाचण्यातच मला फारसा रस नाही. त्यामुळे ते लेखन भिडतही नाही.

In reply to by प्रचेतस

विजुभाऊ Sun, 07/06/2014 - 17:32
वल्लीकाका कान्होजी आम्ग्रे चा अनुवाद पुलंनी उत्तमच केलेला आहे. उत्तम अनुवाद म्हणून पुलंच्या " एका कोळीयाने" या पुस्तकाचा उल्लेख होतो. पण त्या पेक्षाही सर्वोत्तम अनुवाद म्हणून" काय वट्टेल ते होईल" या पुस्तकाला नावाजायला हवे. पुलंची खोगीरभरती , गोळाबेरीज ही पुस्तके वाचा.

In reply to by विजुभाऊ

सागर Mon, 07/07/2014 - 00:31
विजुभाऊ सहमत आहे. एका कोळीयाने आधी खूप छान वाटले होते म्हणून द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड सी मुळात वाचून पाहिले. मग कळाले की अनुवाद चांगला असला तरी तितका ताकदीने मराठीत नाही उतरला. पण माळगांवकरांच्या कान्होजी आंग्रे चा मराठी अनुवाद खरोखर सुंदर केलेला आहे पुलंनी. दुसरे पुस्तक 'काय वाट्टेल ते होईल' हे मात्र मी वाचलेले नाहिये ते आता जरुर वाचेन.

In reply to by कंजूस

पिलीयन रायडर गुरुवार, 07/10/2014 - 16:51
मला तरी पुलंचं कोणतही लिखाण आवडलं नाही असं झालेलं नाही.. पण दमा मिराजदार / व.पु / शंकर पाटील ह्यांचे लेखन मात्र फार क्वचित आवडलय... (वपुंच लिखाण समजा ठिक आहे.. पण कथाकथन एकसुरी वाटलं फार... एकाच टोन मध्ये.. पुणेरी आणि समजुतदार बोलणारी पात्र..) हे माझं वैयक्तिक मत आहे..

In reply to by चित्रगुप्त

पिलीयन रायडर Fri, 07/11/2014 - 12:54
म्हणजे अगदी सुस्पष्ट..व्यवस्थित मराठी..ठाशीव बोलणं..सगळ्यांचा एकच टोन.. ह्या पेक्षा जास्त मी नाही सांगु शकत की नक्की मला काय म्हणायचय.. फक्त मला ते विषेश आवडत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

प्रभाकर पेठकर Fri, 07/11/2014 - 13:00
>>>>पुणेरी आणि समजुतदार बोलणारी पात्र. असं नाही. वपुंनी भाषेत आणि कथेत कितीही सहजता आणायचा प्रयत्न केला तरी त्यांची भाषा अनेकदा, सहजता सोडून, 'साहित्यिक' होते. विशेषतः जेंव्हा त्यांची दोन पात्रे संवाद, वाद, चर्चा करतात तेंव्हा.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Mon, 07/14/2014 - 14:48
थोडक्यात कुठल्याही चित्रपटात 'शारुक खान' शारुक खानच असतो तसं वपुंचं कॅरॅक्टर कुठलंही असलं तरी वपुच बोलतात असं वाटतं. सखी , पार्टनर , अचपुकबाश्रीबुंजिकमोघी (ही कथा आहे), रंगपंचमी, काही खरं काही खोटं , वन फॉर द रोड, मी माणूस शोधतोय, कर्मचारी.... लई लई लई आहेत.

नातिचरामी - मेघना पेठे...चक्क आवडलं, दुसर्‍यांदा-तिसर्‍यांदा तर आणखिनच पटत गेलं. पण मला प्रचंड आवडलेलं आणखीन एक पुस्तक म्हणजे किरण नगरकर यांच अनुवादीत 'प्रतिस्पर्धी', हे ही खूप जणांना आवडलेलं नहिये.

In reply to by स्वप्नांची राणी

सागर Sat, 07/05/2014 - 18:02
नातिचरामीबद्दल असहमत. मी सहा प्रयत्न करुन थकलो. माझी सहनशक्ती भरपूर असूनही या पुस्तकाने माझी केलेली अवस्था खरोखर विसरणार नाही. पण किरण नगरकरांच्या प्रतिस्पर्धी बद्दल पूर्ण सहमत. अफलातून पुस्तक आहे. मराठी अनुवादांच्या गर्दीत अतिशय दुर्लक्षित असे हे पुस्तक आहे.

In reply to by सागर

धन्या Sat, 07/05/2014 - 23:56
आपल्या मनात "बाईच्या जातीने" कसं वागावं याची एक प्रतिमा तयार असते. या कादंबरीची नायिका आपल्या मनातील प्रतिमेला तडा जाईल असं पावलोपावली वागते. कादंबरी न आव्डण्याचं हे एक कारण असावं. :)

In reply to by धन्या

सागर Mon, 07/07/2014 - 00:48
मला नातिचरामि न आवडण्याचं कारण स्त्रीची पारंपारिक प्रतिमा आणि तिचे प्रतिमेला तडा जाणारे वागणेही नाहिये. उलट या मांडणीने कादंबरी फसली आहे. नातिचरामि चा विषय चांगला होता पण मांडणी चुकली आहे असे माझे मत आहे. मला सुदैवाने कोणतेही धक्के पचवता येतात. पण मी वाचन वेगवेगळ्या बाजूंनी व भूमिकांतून करतो. तरीही ही कादंबरी कोणत्याच बाजूने मनांत उतरली नाही. म्हणून माझे नातिचरामि बद्दल अतिशय टोकाचे मत झाले आहे. शक्यता कमीच आहे. पण पुढेमागे कदाचित वाचेनही. कादंबरी म्हणून मला ती पटली नाही.

कवितानागेश Sat, 07/05/2014 - 21:43
पुलंचं पुष्कळ्सं लेखन आवडलय. व्यक्तिचित्रात्मक आणि प्रवासवर्ननं सुद्धा. पण पुन्हा पुन्हा वाचेन असं नाही. त्यांची राजकारणावरची काही विडंबनात्मक पुस्तकं मात्र न वाचताच अर्धीच ठेवली. अजिबात मजा आली नाही. एखाद्या लेखाकचं एक आवडलं म्हणून पुढचं आवडेलच अस्म नाही हे मात्र अगदी हल्लीच पुन्हा अनुभवलं. जेम्स रेड्फिल्ड्चं 'सेलेस्टाइइन प्रोफेसी' वाचलं. सुरुवातीला कशाचेच रेफरन्स लागत नव्हते पण हळूहळू पुस्तक पकड घेत गेलं. शेवट तर फार आवडला. म्हटलं तर सायन्स फिक्शन, म्हटलं तर फिलॉसॉफिकल, थोडा 'मेटाफिजिक्स' चा भाग, पण अगदी खरी वाटणारी माणसं आणि माणसांच्या वागणूकीचा व्यवस्थित आढावा, त्यातल्या त्रुटी, हे सगळं अतिशय सुंदर पद्धतीनी मांडलं आहे. म्हणून उत्साहानी त्याचा सिक्वेल 'टेन्थ इन्साईट' वाचायला घेतला. फार बोजड लिहिलय या पुस्तकात. उगीचच फिलॉसॉफी भरलीये आणि 'एनर्जी' या कन्सेप्टबद्दल त्याला खरोखरच जितकं चांगलं लिहिता आलं असतं तितकी महनत घेतली नाही असं वाटलं. कुठल्यातरी वेगळ्याच एनर्जी सोर्सचा वापर करुन तयार करत असलेला जनरेटर आणि त्याचे धोके अशी थीम असताना त्याला पुस्तक सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनी रंगवता आलं असतं असं वाटतय. निदान त्यानी आधी निकोला टेसलाच्या संशोधनाबद्दल वाचलं असतं तरी पुस्तक जास्त चांगल्या उन्चीवर गेलं असतं. मी कसेबसे सम्पवले. ४-४ दिवसनी ५-५ पाने वाचत सम्पवले.

आदूबाळ Sun, 07/06/2014 - 09:23
अरविंद अडिगा. बुकर मिळालं म्हणून सोसासोसाने "द व्हाईट टायगर" वाचायला घेतलं. निव्वळ थुकराट पुस्तक आहे. एक तर भारताविषयीच्या पाश्चात्य गैरसमजांना पद्धतशीर खतपाणी घालायचं सत्कृत्य हे पुस्तक करतं. उदा. अपघात करवून एखाद्या गरीबाला बळीचा बकरा बनवून सुटून जाता येतं, भारतात व्यवसाय करायचा असेल तर गैरमार्ग वापरल्याशिवाय गत्यंतर नाही वगैरे. दुसरं म्हणजे अडिगाचा टोन. प्रचंड डोक्यात जातो. "थांबा, माझ्या गोर्‍या मित्रांनो, आता तुम्हाला उकिरडा दाखवतोच. किळस वाटून घेऊ नका बर्का, आमच्या भारतात हे असंच असतं" असा काहीसा. तिसरं म्हणजे अडिगाची शब्दकळा. डोक्यात कळा येण्याइतपत भिकार आहे. "द व्हाईट टायगर" वाचून पाचेक वर्षं झाली. अडिगावरचा संताप जरा बोथट झाला होता म्हणून "बिटवीन द असॅसिनेशन्स" उचललं, आणि जुन्या आठवणी करपट ढेकरेसारख्या वर आल्या आणि दहा पानांतच पुस्तक भिरकावून दिलं.

In reply to by आदूबाळ

आतिवास Mon, 07/07/2014 - 14:57
माझं आवडतं पुस्तक :-) कधीतरी लिहीन त्याच्यावर - जमेल तेव्हा. आणि पुन्हा वाचताना तुमच्या टीकात्मक मुद्द्यांना ध्यानात ठेवेन - बघू जमतंय का ते! "बिटवीन द असॅसिनेशन्स" हे अद्याप वाचलं नाहीये!

In reply to by आतिवास

आदूबाळ Mon, 07/07/2014 - 17:13
ऐला!!!! नक्की लिहा. कोणती सौंदर्यस्थळं आहेत हे जाणून घ्यायची जब्बरदस्त उत्सुकता आहे.

एखाद्या पुस्तकाबद्दल छान छान परिक्षणं लिहून येतात, चर्चा घडलेल्याही आपण ऐकतो, कुणीतरी खूप कौतुक करतं, 'एकदा तरी हे पुस्तक वाचाच', असा आग्रह करतं, आणि आपण मोठ्या उत्सुकतेनी पुस्तक वाचायला घेतो तो काय? काही मोजक्या पानातच भलामोठ्ठा अपेक्षाभंग पदरी पडतो! हा असा अनुभव अगदी प्रत्येक वाचनवेड्याला आलेला असतो. ही अशी निराशा येण्याचं कारण काहीही असू शकतं, आपल्या पुस्तकाकडून निर्माण झालेल्या अपेक्षा किंवा मूळ कथेपासून/सत्य परिस्थितीपासून फारकत किंवा असंच इतर काहीही..... पण हे अनुभवही नक्कीच एकमेकांना सांगण्यासारखे असतात. इथेही पुस्तकवेड्यांनी आपले असे गमतीदार अपेक्षाभंग लिहावेत ही विनंती.

झटपट चकली(ब्रेडची)

इशा१२३ ·

सस्नेह Fri, 07/04/2014 - 21:18
ब्रेडचे सर्व पदार्थ आवडतात. हा तर मस्तच आहे. झटपट !

In reply to by यशोधरा

इशा१२३ Sat, 07/05/2014 - 12:33
@ सूड; यशोधरा फोटो का दिसत नाहिये देव जाणे.त्यातहि यशो तूला फक्त भि़जवलेल्या गोळ्याचा फोटो दिसतोय:-( :(

आयुर्हित Fri, 07/04/2014 - 22:13
झटपट आणि सुंदर कल्पना आहे. चकल्या अगदी खुसखुशीत दिसत आहेत. तो.पा.सू. सुंदर फोटो आणि पाकॄ!! ब्रेडचुरा वापरल्यामुळेच खायचा सोडा नको असेल नाही?

In reply to by कवितानागेश

इशा१२३ Sat, 07/05/2014 - 12:52
तीळ भरपूर झालेत.पण कुरकुरीत आणि खमंग लागतात. मला जरा जास्त वाटलेच म्हणून इथे प्रमाण कमी करूनल१/४ वाटिच लिहिलय. :-)

भिंगरी Fri, 07/04/2014 - 22:46
झटपट चकल्या मस्तच लागत असतील. येऊ का खायला? हो म्हणा कि आलेच गरगरत @@@@@

भिंगरी Fri, 07/04/2014 - 23:11
झटपट चकली सारखे झटपट दहीवडेही होतात. साहित्य ... बटर (चहात बुडवून खातात ते.) गोड दही चिंच खजुराची चटणी जिरे पावडर लाल तिखट मीठ कोथिंबीर कृती............. दह्यामध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे. बटर कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे. एक मिनिटाने त्यावर फेटलेले दही टाकून त्यावरआवडत असल्यास चिंचेची चटणी टाकावी. वरून लाल तिखट,जीरा पावडर,चवीनुसार मीठ टाकावे कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावे. थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास थंडही छान लागते.

In reply to by आयुर्हित

भिंगरी Sat, 07/05/2014 - 15:47
माफ करा सर्व मिपाकरांना मी गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गरुन सांगते कि माझ्याकडे क्यामेरा नाही आणि मोबाईलमध्येही नाही. त्यामुळे सद्ध्यातरी माझ्या पाककृतींचे फोटो नाही टाकता येणार.

प्रभाकर पेठकर Sat, 07/05/2014 - 09:55
ब्रेडचा चुरा म्हणजे बाजारात मिळणारे ब्रेड क्रम्ब्स की ताज्या पावाला मिक्सर मध्ये फिरवून केलेला ताजा चुरा? पाव जास्त तेल शोषून घेत नाही?

इशा१२३ Sat, 07/05/2014 - 12:47
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार. :-) @ आयुर्हित:खायच्या सोड्याची अजिबात आवश्यकता नाही.चकली खुशखुशीत होतेय. @ भिंगरी :झटपट दहिवडे माहित आहेत.अजून केले नाहित.आणि चकली खायला याच (येताना दहिवडे आणायच विसरू नका.) @ प्रभाकर पेठकर:ताज्या पावाचा चूराच वापरलाय.

In reply to by इशा१२३

भिंगरी Sat, 07/05/2014 - 14:55
हो हो नक्की आणीन,पण गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र फिरताना त्याचे काय होईल माहित नाही.

साहित्यः ब्रेड चुरा ३ वाटी बेसन पीठ २ चमचे तंदूळ पिठ २ चमचे ओवा १ चमचा धने पुड १/२ चमचा जिरे पुड १/२ चमचा आमचुर पावडर १ छोटा चमचा तिखट १ १/२ चमचा(आवडीप्रमाणे) तीळ १/४ वाटी मीठ चवीनुसार gj कृती: प्रथम तीळ भाजून घ्यावेत. बेसन पीठ आणि तांदूळ पीठ थोडेसे भाजून घ्यावे. एका भांड्यात सगळे साहित्य एकत्र करुन चांगले मळून घेणे.

महाराष्ट्रवादी पक्षांचे स्वबळाचे तुणतुणे

बाबा पाटील ·

तिमा Sat, 07/05/2014 - 12:14
अजितदादा म्हणतात ते पटते. प्रत्येक पक्षाने यावेळेस स्वतंत्र २८८ जागांवर लढावे, म्हणजे मग 'किसमें कितना दम' हे एकदाचे सिद्ध होईल आणि विनाकारण बेटकुळ्या दाखवणे बंद होईल.

श्रीगुरुजी Mon, 07/07/2014 - 12:53
http://www.loksatta.com/lokrang-news/need-of-ncp-free-maharashtra-652897/ मकरंद देशपांडे नावाचा एक अवलिया कलाकार आहे. तो लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, नाटय़चळवळय़ा असा सर्व काही आहे. त्याचं लेखनही तसं हटके असतं. त्याच्या एका नाटकातला एक संवाद त्याची प्रचीती देतो. तो संवाद असा : 'बंद घडी भी दिन में दो बार सही वक्त दिखाती है! हा संवाद आठवायचं कारण (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष! जोमानं सुरू झालेल्या या पक्षाचे घडय़ाळ 'बंद' पडत आलंय. तरीही त्यांच्या साहेबांसकट त्यांच्या चेल्यांना असं वाटतंय की, आपल्यासारखी 'वेळ' कुणालाच 'साधता' येत नाही! घडय़ाळासारखाच आपला पक्ष वेळेशी सुसंगत ध्येयधोरण घेतोय. घडय़ाळाचे काटे पुढे सरकतात तसा आपला पक्षही पुढे सरकतोय! काळ-काम-वेगाचा (इतर कामांप्रमाणेच) आपणच ठेका घेतलाय आणि टोल तर आपलं अंगभूत अंगच आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला चार जागा मिळाल्या. चारपैकी तीन 'घरं'च आहेत. एक पवारांचं, एक मोहित्यांचं, एक भोसल्यांचं. अपवाद असा चौथा निवडून आलाय. पक्षाची कामगिरी नऊवरून चारवर आल्याने निवडणूक आयोगाने 'तुमचा 'राष्ट्रीय' दर्जा का काढून घेऊ नये?' अशी नोटीस काढलीय. 'राष्ट्रीय' दर्जा मिळवण्यासाठीच्या मुख्य तीन-चार कसोटींना उतरेल अशी आता पक्षाची स्थिती उरलेली नाही. त्यामुळे संगमा आणि तारिक अन्वरसह 'राष्ट्रीय' म्हणून मिरवणारा हा पक्ष लवकरच 'महाराष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष होईल. पण त्याने या पक्षाची अंगभूत मस्ती उतरणार नाही! स्थापनेपासून सत्तेला चिकटलेल्या या पक्षाची सध्याची प्रतिमा ही भ्रष्ट सत्ता, संपत्तीचा माज आणि हम करेसो कायदा अशी झालेली आहे. राज्यात सरकार आघाडीचं आहे. मुख्यमंत्री काँग्रेसचा आहे. पण अर्थ, गृह, ग्रामविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकामासह अधिकाराची आणि मलिद्याची खाती याच पक्षाकडे आहेत. आणि भ्रष्टाचाराचे, घोटाळय़ांचे, नियमबाह्य कामांचे आरोप सर्वात जास्त यांच्याच खात्यांवर आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपेक्षा गुंडा मंत्र्यांना हाताशी धरून कारभार करण्यावर भर असलेल्या या पक्षाचा चेहरा विशिष्ट जातीचा, विशिष्ट प्रांताचा आणि दादागिरीचा आहे. तो जाणीवपूर्वक पोसलेला, आणि आपण सत्तेत येण्यासाठीच जन्माला आलोय, हा दर्प आहे. अर्थात याला कारण अर्थातच संस्थापक (आणि तहहयात) अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबच. कारण या एकाच खांबाभोवती हा पक्ष फिरतो. महाराष्ट्राच्या राजकारणात असे एकखांबी तंबू आणखीही आहेत. पण 'साहेबां'ची सर कुणालाच नाही. यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात गेली चार दशके आपल्या विविध 'खेळीं'नी त्रिकोणाचा चौथा कोन बनून राहिलेल्या पवारसाहेबांच्या नावावर अनेक भल्याबुऱ्या गोष्टी आहेत. त्यातला सगळय़ात पहिला गुण म्हणजे इंग्रजीत ज्याला 'अनप्रेडिक्टेबल' असा 'सोफिस्टेकेटेड' शब्द आहे- ज्याला शुद्ध मराठीत 'बेभरवशाचा' असा विश्वासघातकी अर्थ आहे, असा गुण. दुसरा म्हणजे- पवार हिशेब चुकते करतात. तिसरा- ज्याच्या खांद्यावर हात ठेवतील, त्याला खांद्यासकट मानेपर्यंत कधी गाडतील, सांगता येत नाही. राजकारणातून प्रचंड संपत्ती, मालमत्ता वगैरे करूनही कागदाचा एक कपटा पुरावा म्हणून सापडणार नाही याची दक्षता घेणार. सापडलाच, तर कोणीतरी तिसराच माणूस सापडतो आणि चौथा तुरुंगात जातो. साहेबांना विविध क्षेत्रांतले मित्र, भाट, पे-रोलवर असावेत असे पत्रकार, लेखक, कवी, नाटक-सिनेमावाले सर्वच आहेत. त्यामुळे त्यांना 'जाणता राजा' अशी उपाधीही दिली जाते. साहेबांच्या वाढदिवशी कवी भूषणलाही आपल्या प्रतिभेची लाज वाटेल अशी स्तुतिसुमने प्रत्यक्ष आणि ग्रंथरूपाने उधळली जातात. साहेब एकत्रित काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून 'विश्वासार्ह नसलेलं व्यक्तिमत्त्व' म्हणून काँग्रेसमध्ये ओळखले जायचे. (तसे ते कुठेही गेले तरी हे संबोधन कायम राहते.) याचे कारण त्यांनी काँग्रेसमध्ये बंड करून पुलोद सरकारचा केलेला प्रयोग. मग विरोधी पक्षनेते. इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधींशी जुळवून घेत पुन्हा काँग्रेसप्रवेश. आणि राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नरसिंह रावांकडून पराभूत. मग पुन्हा मुख्यमंत्री. पुन्हा दिल्ली. सोनियांना त्यांनीच 'नेतृत्वा'चे साकडे घातले आणि नंतर त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा करत निलंबन ओढवून घेऊन राष्ट्रवादीची स्थापना. स्वतंत्र निवडणुका लढवून पुन्हा सोनिया काँग्रेसशी आघाडी करून गेली १५ वर्षे निव्वळ सत्ताभोग! वाचून आपण दमू, पण साहेब नव्या दमाने तयार! राष्ट्रवादी काँग्रेस काय किंवा काँग्रेस काय, यांना मोदी लाटेनं असा तडाखा दिलाय, की आपलंच शेपूट तोंडात धरून स्वत:भोवतीच फिरणाऱ्या श्वानासारखी त्यांची अवस्था झालीय. वादी काँग्रेसचा गेल्या १५ वर्षांतला कारभार हा कार्यक्षमतेबाबत वेगाने खाली घसरत गेला आणि भ्रष्टाचाराबाबत वेगाने वर चढत गेलेला दिसतो. अर्थात याची सुरुवात १५ वर्षांपूर्वीच झालेली आहे. पप्पू कलानी, भाई ठाकूर यांच्यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्तींना राजकारणात आणून पवारांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची सुरुवात केली. अशा माणसांना आमदारकीची वस्त्रे म्हणजेच कवचकुंडले मिळाल्याने वसई-विरार पट्टय़ात दहशत, तर उल्हासनगरात बेकायदा बांधकामं आणि खूनसत्रं सुरू झाली. याच लोकांना बळ देऊन पवारांनी भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, असा आरोप गोपीनाथ मुंडे, खैरनार, अण्णा हजारे आदींनी केला. वसई-विरारमधल्या दहशतवादाविरोधात विजय तेंडुलकरांसारखे लेखकही रस्त्यावर उतरले. संरक्षण दलाच्या विमानातून स्वत:सोबत गुन्हेगारांना घेऊन आल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. पण पवार ढिम्म. या आरोपांची उत्तरं देण्याचं पवारांनी महत्त्वाचं मानलं नाही आणि सत्ता गेली. मधली साडेचार वर्षे युतीने कारभार केला आणि पवार पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेत आघाडीने आले. दरम्यान, ते केंद्रात मंत्री झाले; पण त्यांचा जीव महाराष्ट्रात.. आणि विशेषत: पुणे जिल्ह्यात! केंद्रीय मंत्री असतानासुद्धा ते तेव्हा महापालिकेच्या विकासकामांची उद्घाटने करत. आज महाराष्ट्राच्या राजकारणात पवार सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांचे भाट सोडले तर कुणीही त्यांच्याविषयी आदरयुक्त बोलत नाही. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर तर पवारांना समवयस्क, आपल्या पिढीतला विरोधकही राहिला नाही. आणि आता तर प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडेंच्या आकस्मिक निधनानंतर दुसऱ्या फळीतला विरोधकही उरला नाही. पवारांना आता देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याशी म्हणजे तिसऱ्या-चौथ्या फळीशी लढावे लागणार आहे. (त्यात त्यांच्याकडे 'स्वस्थ बसा' सांगणारे कुणी मोहन भागवत नाहीत!) तरीही वासरांत शिंग मोडून शिरणाऱ्या गायीसारखे पवार पुन्हा निवडणुकीत उतरलेत.. आपल्या जुन्याच शस्त्रसाठय़ानिशी! पवारांनी पुन्हा काँग्रेसवर दबाव, दलित-मुस्लिमांना आरएसएसची भीती, मराठय़ांना आरक्षणाचे गाजर, व्यापाऱ्यांना एलबीटी घालवायला मदत, पक्षाध्यक्षबदल, भातुकलीच्या खेळासारखे शपथविधी उरक.. असा सगळा उसन्या अवसानाचा खेळ मांडलाय! 'केंद्रात सत्ताबदल झाला आणि अल्पसंख्याकांवरचे हल्ले वाढले,' असं पुण्याचं उदाहरण देऊन सांगताना त्यांना गृहमंत्री आपलेच आबा आहेत याचा विसर पडला. १५ वर्षांत मराठा आरक्षण, आरएसएस, एलबीटीबाबत स्वत:चेच सरकार असून काही करता आले नाही. कधीकाळी आपल्या पुरोगामी प्रतिमेला साजेसे नामांतर, महिला धोरण असे निर्णय घेणारे, अंधश्रद्धांना विरोध करणारे, त्या चळवळींना पाठिंबा देणारे पवार ते हेच का? आज दलितांवरचे अत्याचार वाढलेत, स्त्री-कंडक्टरला भर रस्त्यात मारहाण होते, स्त्री-पोलिसांवर जमाव हात टाकतो, नरेंद्र दाभोळकरांची हत्या होऊन आता वर्ष होईल.. या घटनांबद्दल अवाक्षर न काढता यांना आणखी २६ लवासा हवेत! संवेदनशून्यतेची, अविवेकाची, बेदरकार, बेजबाबदारपणाची यापेक्षा आणखी वेगळी पावती कोणती? तीही दस्तुरखुद्द जाणत्या राजाकडून? बरं, पक्षांतर्गत पुन्हा सगळं तेच! दोघांच्या खांद्यावर हात ठेवून तिसऱ्यालाच पुढे करायचं नि या दोघांना वाकायला लावायचं. दादांचं बस्तान बसतंय तोवर ताईला पुढे करायचं. दर हंगामाला एक ब्लू आय बॉय तयार करायचा नि त्याला डोंबारी जसा काठीच्या टोकावर पोराला ठेवून वर वर नेतो, तसा वर न्यायचा आणि नंतर ब्लू आयचे डोळे पांढरे होतील हे बघायचं. सध्या जितेंद्र आव्हाडांकडे बघून दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ गालात हसत असतील. राज ठाकरेंना लवकर उठण्याचे सल्ले देणारे साहेब स्वत:च्या सुप्रियाला- कार्यकर्त्यांशी नीट बोलणे हेसुद्धा एक चांगले व्यसन नव्या नेतृत्वाने लावून घेतले पाहिजे, असे सांगतील का? थोडक्यात, 'महाराष्ट्राची नसन् नस माहीत, कार्यकर्त्यांना नावाने ओळखणारे नेतृत्व' अशा पवारांच्या राष्ट्रवादीने सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता आणि दोन्हीतून माज, दहशत, अरेरावी आणि लूट केलीय महाराष्ट्राची. प्रगत महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचं काम काँग्रेस-राष्ट्रवादीने केलं. त्यात राष्ट्रवादीचा वाटा मोठा आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने जो धडा शिकवलाय, त्याहून अधिक मोठा धडा विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी यांना शिकवायला हवा. पाण्याशिवाय मासा राहील, पण हे सत्तेशिवाय राहणार नाहीत. म्हणून यांना सत्तेतून घालवायला हवेच. काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवणं जास्त गरजेचं आहे. कारण काँग्रेस आपल्या मरणाने मरेल. पण राष्ट्रवादी हा पक्ष नसून प्रवृत्ती आहे. महाराष्ट्रात जमीन, जंगल, कायदा यांना धाब्यावर बसवून स्वत:ची तुंबडी भरणारी, गुंडांना अभय देऊन राजकीय आश्रय देणारी ही प्रवृत्ती ठेचली नाही, तर रात्रीत भाई ठाकूर, पप्पू कलानी, अविनाश भोसले, सुधाकर शेट्टी अशी नवी साखळीच तयार होईल. आणखी या पराभवाने तरी पवारांच्या राजकारणाची दिशा बदलेल किंवा त्याची इतिश्री होईल. पवारांच्या राजकारणात 'भाकरी फिरवा', 'कारभारी बदला' असे परवलीचे शब्द असतात. आता हे शब्द त्यांच्या आणि त्यांनी संस्थापित पक्षाबद्दल बोलावे लागतील. काँग्रेसनेही ही धोंड गळय़ात बांधून मरण्यापेक्षा स्वतंत्र सरणावर चढावं. तेवढंच जाता जाता स्वसन्मानाचं पुण्य! शेवटची सरळ रेघ : भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा पालवे-मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या 'नैसर्गिक राजकीय वारस' आहेत असं एका वक्तव्यात म्हटलंय. आजवर मानसपुत्र, शिष्य असत. नैसर्गिक राजकीय वारस म्हणजे काय, हे म्हाळगी प्रबोधिनीत जाऊन शिकायला हवे.. कारण गांधी घराण्याबद्दल मग नेमके नवे संबोधन सापडेल!

च्यामारी महाराष्ट्रात दररोज एक एक जण नुसत्या दंडाच्या बेटक्या दाखवतायेत,्खरच एकदा होवुन जावुद्या खडाखडी,पाचही पक्षांना एकमेकांची लायकी तरी कळेल.(अवांतर -आप नावाच्या पक्षाला व इतर चिल्लर मंडळी यांना आम्ही महाराष्ट्रवादी पक्ष मानत नाही त्यामुळे त्यांच्या निष्टावंतानी पोटशुल करुन घेवु नये) तरी सध्या या महाराष्ट्रात पाच दहा तरी भावी मुख्यमंत्री फिरतायेत इतकच कशाला काही कवी मनाचे स्वंयघोषित नेतेही स्वतः मुख्यमंत्री झालो आहे असे स्वप्न पहात आहे अस समजल आहे.तरी सांप्रत देशी स्वबळावर लढल्यास कोना देशीचा (पक्षाचा)नेता राज्य सिंहासनावर विराजमान होतो हे पाहणे बरेच मजेदार प्रकरण असेल्,अशी अपेक्षा आहे,वर

कहां गये वो लोग?--मंग्या

राजेंद्र मेहेंदळे ·

शिद Fri, 07/04/2014 - 18:43
च्यायला, आम्हाला का नाही 'मंग्या' मिळाला असा? गावाला सगळे चुलत भाऊ मिळून खाडीत पोहायला गेलो की पट्टीचे पोहणारे भाऊ खाडीच्या पैलतीरी ताडगोळे/आंबे खायला जात असत व माझ्यासारखे पोहता न येणारे कमरे एवढ्या खोल पाण्यात थोडेफार हात-पाय मारत बसत. तुमचा हा लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद. बाकी, मंग्याचे व्यक्तिचित्रण चांगलं जमलं आहे. और आने दो!

हां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती.डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे उतरले होते.आणि वर्षभर पुस्तकात घातलेल्या माना वर झाल्या होत्या.सुट्टीत कोण कोण कुठे कुठे जाणार ह्याचे बेत ठरत होते.एकीकडे उन्हाळा वाढत चालला होता आणि अंगातुन घामाच्या धारा वाहात होत्या. एकदा असाच दुपारचा चहा पीत गॅलरीत

नारकोंडम बेट-- पुढे

सुबोध खरे ·

कानडाऊ योगेशु Fri, 07/04/2014 - 14:31
ब्रेव्हो!.अविश्वसनीय वाटावा असा अनुभव. डॉक्टरसाहेब तुम्ही खरोखरच भाग्यवानही व धाडसीही आहात.स्पासाहेबांनी एका लेखात (मुंगळा इमॅगिनेशन)नमूद केलेल्या टेक्निकचा वापर करुन,समुद्रात किनार्यावरुन बोटीपर्यंत पोहोत जायचा भाग मी अगदी इमॅजिन करुन वाचला आणि नाकातोंडात पाणी गेल्याचा अनुभव आला.

पोहताना डोळ्यात आणि नाकातोंडात खारे पाणी गेल्यावर काय होते ते चांगलेच माहीती आहे.त्यात समुद्राच्या लाटांचा जोर म्हणजे बघायलाच नको.आणि गणवेषासकट? बाब्बो *clapping*

सुबोध खरे Fri, 07/04/2014 - 14:48
एक पुरवणी बेटाला भेट देण्याचे कारण -- नारकोंडम च्या आसपासहून जाणारी तटरक्षक दलाची किंवा नौदलाची जहाजे तेथिल पोलिसांना सदिच्छा भेट दत असतात आणि त्यांच्या कडून काही गुप्त माहिती/ खबरी ज्या बिनतारी यंत्रणेवर पाठवता येणार नाही ती गोळा करून लष्कर/पोलिस मुख्यालयाला पाठवण्याचे काम करतात.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

एस Fri, 07/04/2014 - 15:20
जाम इच्छा आहे. कमीत कमी त्या नारकोंडम हॉर्नबिलला पाहण्यासाठीतरी या बेटाला भेट द्यायची आहे...! :-) बाकी डॉक्टरसाहेब, लेख अतिशय उत्कंठावर्धक. तुमच्यासारख्यांमुळे आम्हांला अशा हकिकती खिशात दमडी नसतानाही वाचायला तरी मिळतात. ;-) धन्यवाद! पुढचे भागही लवकर येऊ द्यात.

सुबोध खरे Fri, 07/04/2014 - 15:29
नाही. तेथे माणसाना राहायला परवानगी नाही( माझ्या माहितीप्रमाणे) तेथे मनुष्य वस्ती नाही. पोलीसांच्या तुकडीसाठी असलेल्या अंत्यंत अपुर्या सुविधा सोडल्या तर काहीच नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शिद Fri, 07/04/2014 - 18:45
वाचताना आमच्या मुसंडम पेनिनसुला आणि रब अल खालीतल्या उपदव्यापांची आठवण झाली.
तुमचे पण अनुभव येऊद्या लवकरच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रभाकर पेठकर Sat, 07/05/2014 - 10:14
३३ वर्षे मस्कतात काढून इतके वेळा ऐकलेल्या 'मुसंडम' वर जायचे अजून जमून आलेले नाही. तुम्ही लिहीलेत तर नक्कीच प्रेरणा मिळेल. लिहाच लवकर.

In reply to by कवितानागेश

@ लीमाउजेट, शिद आणि प्रभाकर पेठकरः मुसंडम बद्दल लिहायचा विचार आहेच. पण तेव्हा काढलेले कागदी फोटो आता पिवळसर झाले आहेत त्यामुळे मांडी घालून शब्दांना जरा जास्त वेठीला घालून (खरं तर मलाच वेठीला बसवून) लिहायला लागेल. त्यामुळे डिजीटल फोटोवाल्या सहली लिहिणे संपल्यानंतर जुन्या भटकंत्या हाती घेईन. मुसंडम तर फार्फार जिव्हाळ्याचा विषय आहे... त्या स्ट्रॅटेजिक भूभागाचे 'चप्पा चप्पा छानके पहिले मिलिटरी मेडीकल इन्स्पेक्शन' करणारा डॉक्टर म्हणजे अस्मादिक ;) :) .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 14:05
त्या स्ट्रॅटेजिक भूभागाचे 'चप्पा चप्पा छानके पहिले मिलिटरी मेडीकल इन्स्पेक्शन' करणारा डॉक्टर म्हणजे अस्मादिक
इस्पीकचा एक्का बदलून हुकुमीएक्का असा आयडी घ्या बघू आता लौकरात लौकर. _/\_ (दुसर्‍या आयडी हुकुमीएक्क्याने भावनाओंको कृप्या इ.इ. समजून घ्यावे.)

आदूबाळ Fri, 07/04/2014 - 18:43
जबरदस्त! पूर्वेच्या समुद्रात ही आगामी लेखमाला मिपावरच लिहिणार आहात की अन्य कुठल्या दैनिकात / साप्ताहिकात?

In reply to by आदूबाळ

सुबोध खरे Mon, 07/07/2014 - 12:04
माझे मिपा सोडून अन्यत्र कोठेही लिखाण नाही.( आमची दुसरी कुठेही शाखा नाही या धर्तीवर) उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व

जय२७८१ Sat, 07/05/2014 - 12:27
नारकोंडम बेट आणि तुमचे लिखाण दोन्ही अप्रतिम .......... मलाही नेवीत जाण्याची खूप इच्छा होती पण .........१० वि च्या रजेतच मी माझा पाय मोडून घेतला आणि नेवी,आर्मीचा विषय बाजूला पडला .

नारकोंडम बेट-- पुढे आमच्या सर्व लोकांच्या गणवेशात आणि बुटात समुद्राचे पाणी भरून ते जड झाले होते. जेमिनी किनार्यावर आणल्याबरोबर नौदलाच्या मुलभूत प्रशिक्षणाप्रमाणे मागे बसलेल्या नौसैनिकाने जेमिनीची मोटर सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण मोटार मध्ये सुद्धा पाणी शिरले होते आणि ती पण चालू होईना.आता प्रेम कुमारला अजूनच टेन्शन आले. कारण वायरलेस बंद होता. जेमिनीची मोटार चालत नव्हती (आणि त्याच्या खिशातील पाकीट आणि घड्याळ भिजले होते.) तो विचारू लागला सर आता परत कसे जायचे? मी का कुणास ठाऊक बेफिकीर होतो. मी त्याला म्हणालो कि जे होईल ते पाहू.