Skip to main content

कारलं फ्राय

लेखक भिंगरी यांनी शनिवार, 05/07/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कारलं फ्राय साहित्य........... कारली ६ (लहान असल्यास उभे दोन भाग करावेत .मोठी असल्यास उभे व आडवे असे चार भाग करावेत) अर्धा नारळ खवलेला. ५/६ हिरव्या तिखट मिरच्या. कोथिंबीर तांदळाची पिठी. मीठ (चवी अनुसार) तळण्यासाठी तेल. कोकम कढीपत्ता (४/५ पाने) कृती--- प्रथम कारल्याचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून त्यात थोडे मीठ व कोकम (२/३) टाकावे. साधारण मऊ झाल्यावर बाहेर काढून त्यातील बिया काढून टाकाव्या मिक्सरमध्ये खोबरे,मिरच्या,कोथिंबीर,कढीपत्ता मीठ एकत्र वाटून घ्यावे. आता कारल्याच्या प्रत्येक तुकड्यात हा मसाला भरून

झट्पट दहीवडे

लेखक भिंगरी यांनी शनिवार, 05/07/2014 या दिवशी प्रकाशित केले.
झटपट दहीवडे साहित्य ... बटर (चहात बुडवून खातात ते.) गोड दही चिंच खजुराची चटणी जिरे पावडर लाल तिखट मीठ कोथिंबीर कृती............. दह्यामध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे. बटर कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे. एक मिनिटाने त्यावर फेटलेले दही टाकून त्यावरआवडत असल्यास चिंचेची चटणी टाकावी. वरून लाल तिखट,जीरा पावडर,चवीनुसार मीठ टाकावे कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावे. थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास थंडही छान लागते.

सेव्ह मिपा

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 05/07/2014 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही काळापासून मिपाच्या डेटाबेस (विदा) ला काही अडचणी येत आहेत. आजपासून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करीत आहोत. मिपा विश्रांती अवस्थेत जाणार असल्यास काही वेळे आधी कळवण्यात येईल मात्र तरी सुध्दा सर्व लेखकांनी आपल्या लेखनाची एक प्रत साठवून ठेवावी ही विनंती. वरील सूचना गेल्या काही दिवसांपासून मिपाच्या दर्शनी पानावर दिसते आहे. याबाबतीत मिपाच्या विदाबाबत काही निरिक्षणांवरुन काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात. १. मिपा सुरु झाल्यापासून सर्व धागे विदा वर आहेत. यापैकी काही एकोळी तर काही निरर्थक, शून्य अथवा दोन-तीन प्रतिसाद असलेले आहेत.

ड्रेस्डेन - प्राग - ४ (अंतिम)

लेखक मधुरा देशपांडे यांनी शनिवार, 05/07/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ड्रेस्डेन - प्राग - १ ड्रेस्डेन - प्राग - २ ड्रेस्डेन - प्राग - ३ सहलीचा शेवटचा दिवस उगवला. सॅक्सॉन स्वित्झर्लंड हा ड्रेस्डेन पासून अंदाजे पाउण तासावर असणारा परिसर. एल्बं नदी, आजूबाजूचे डोंगर, आणि वर्षानुवर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून, झीज होऊन तयार झालेले उंचच उंच खडक असा हा परिसर.

विदेशी माध्यमांचा खोडसाळपणा

लेखक आयुर्हित यांनी शनिवार, 05/07/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल विदेशी माध्यमांत काही बातम्या मुद्दाम हेतुपुरस्सर धडधडितपणे चुकिच्या पद्द्तिने छापल्या जात आहेत,जेणेकरुन भारतीय राज्यव्यवस्था व अखंड एकता याला सुरुंग लावला जाईल.

कल्पित सत्य: भाग १, २ (सव्वाशेर तडका आणि बुमरेंग)

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 05/07/2014 या दिवशी प्रकाशित केले.
#कल्पित_सत्य (१)"सव्वाशेर तडका" सुचना: हा प्रसंग मला सुचलेला आणि पूर्णपणे काल्पनीक आहे पण तो सत्य व्हायला हवा का याचा विचार वाचकांनी करावा. एका न्यूज चैनेल चा फोटोग्राफर पाऊस न पडणाऱ्या एका भागात जातो. पाऊस न पडल्याने चिंतेत असलेला एक शेतकरी आकाशाकडे खूप आशेने बघत असतो. फोटोग्राफर त्याचा फोटो काढतो. त्या शेतकऱ्याला खूप राग येतो. तो फोटोग्राफरच्या कानाखाली एक ठेवून देतो. त्याचा कैमेरा हिसकावून घेतो आणि भेग पडलेल्या जमिनीत टाकून देतो. कैमेरा गेल्यामुळे फोटोग्राफर रडतो व शेतकऱ्याला मारायला धावतो.

वारी

लेखक आनंदमयी यांनी शनिवार, 05/07/2014 या दिवशी प्रकाशित केले.
श्वासांतून वाहे सावळा मुरारी.. पायी चाले वारी पंढरीची|| सावळ्या डोहात सावळा तरंग भक्तिरूपी दंग वारकरी|| बंधने जुनी का भासती विजोड देहा लागे ओढ विठ्ठलाची..|| अधिरश्या जिवा पावलांची साथ वसे अंतरात भक्तियोग || पाहता लोचनी विठ्ठल सावळा तप्त जीव भोळा श्रांत होई || विष्णुरूपी लीन होवून मरावे अंतास उरावे विष्णूरूप || अदिती जोशी
काव्यरस

न आवडलेली पुस्तके- (कादंबरी)

लेखक पुस्तकमित्र यांनी शुक्रवार, 04/07/2014 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या पुस्तकाबद्दल छान छान परिक्षणं लिहून येतात, चर्चा घडलेल्याही आपण ऐकतो, कुणीतरी खूप कौतुक करतं, 'एकदा तरी हे पुस्तक वाचाच', असा आग्रह करतं, आणि आपण मोठ्या उत्सुकतेनी पुस्तक वाचायला घेतो तो काय? काही मोजक्या पानातच भलामोठ्ठा अपेक्षाभंग पदरी पडतो! हा असा अनुभव अगदी प्रत्येक वाचनवेड्याला आलेला असतो. ही अशी निराशा येण्याचं कारण काहीही असू शकतं, आपल्या पुस्तकाकडून निर्माण झालेल्या अपेक्षा किंवा मूळ कथेपासून/सत्य परिस्थितीपासून फारकत किंवा असंच इतर काहीही..... पण हे अनुभवही नक्कीच एकमेकांना सांगण्यासारखे असतात. इथेही पुस्तकवेड्यांनी आपले असे गमतीदार अपेक्षाभंग लिहावेत ही विनंती.

झटपट चकली(ब्रेडची)

लेखक इशा१२३ यांनी शुक्रवार, 04/07/2014 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ब्रेड चुरा ३ वाटी बेसन पीठ २ चमचे तंदूळ पिठ २ चमचे ओवा १ चमचा धने पुड १/२ चमचा जिरे पुड १/२ चमचा आमचुर पावडर १ छोटा चमचा तिखट १ १/२ चमचा(आवडीप्रमाणे) तीळ १/४ वाटी मीठ चवीनुसार gj कृती: प्रथम तीळ भाजून घ्यावेत. बेसन पीठ आणि तांदूळ पीठ थोडेसे भाजून घ्यावे. एका भांड्यात सगळे साहित्य एकत्र करुन चांगले मळून घेणे.