मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गृहकृत्यदक्ष(?) कवियित्रींसाठी मार्गदर्शन. !!

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कवियित्रींना साधारण गृहीणीसारखे पण वावरावे लागते व कविता लिहुन रसिकांना ही खुष ठेवावे लागते. हे फार कसरतीचेच काम आहे. मी खाली काही Techniques देत आहे जे वापरल्यावर कवियित्रींना ग़ृहीणीच्या रुपात वावरताना सुध्दा कविता लिहिण्यात काहीच अडचण येणार नाही. नेहेमीच्या रोजच्याच वेळात घरकाम करता करता बर्याच प्रसंगातुन स्वत:मधील कवियित्रीला कसे जिवंत ठेवायचे हे समजायला त्यामुळे त्यांना नक्कीच मदत होईल. मी खाली काही काव्यप्रकार कवियित्रींनी केव्हा आणि कसे वापरायचे हे सविस्तरपणे सांगितले आहे. खरेतर खालील उपाय वाचुन इतर गृहीणी सुध्दा कविता लिहु शकतील. काही समस्या असल्यास व्यासपीठावर मार्गदर्शन करणेत येईल. --

खजुराहो-बनारस सोलो ट्रिप

प्रकाश घाटपांडे ·

घाटपांडे काका, ट्रिप मस्त झाली. मिपाशास्त्रानुसार सहलीच्या धाग्यात छायाचित्रे असायला पाहिजे होती. सहलीच्या धाग्यात छायाचित्रे नसली तर, मिपाशास्त्रानुसार आनंद कमी मिळतो. छायाचित्रे असली की मजा येते. बाय द वे, आपल्या बियरच्या गप्पा वाचक म्हणून उत्साह वाढवणा-या होत्या, रेस्टारॉची शोधाशोध, मंदिरे, घाट आणि एकूण प्रवास भन्नाट. सलग वाचून काढले. आपल्या भेटीला दहा एक वर्ष झाली असतील. छ. संभाजीनगरला या. मस्त फिरवतो. सायकांळी निवांत बसू आणि गप्पा मारू.. -दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु Sun, 12/07/2025 - 12:12
फलाटावर आलो. तिथे काही भिकारी एक भटकी गाय व वंदे भारत उभी होती.
तसेच
पाच सेकंदात शिवलिंग व मी यांनी परस्परांचे दर्शन घेतले.
अशा वाक्यांमुळे प्रवासवर्णन खुसखुशीत झाले आहे.

पण फोटो पाहीजेतच. त्या शिवाय प्रवास वर्णनाची मज्जा नाही. घाटाचे फोटो, खजुराहोचे फोटो (नुसते भटकंतीचे टाकले तरी चालतील, मंदिरांचे जालावर दिसतीलच). काही विशेष आध्यात्मिक अनुभव वगैरे?

मदनबाण गुरुवार, 12/11/2025 - 11:38
प्रकाका तुमच्या भटकंतीची कथा आवडली. तुम्ही बरेच भाग्यवान दिसता, नाही म्हणजे बुकिंग सगळीकडे पटकन मिळाले ना ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rehman Dakait Entry Song :Dhurandhar

In reply to by मदनबाण

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/11/2025 - 13:03
तात्काळ मिळाले की स्वीकारायचे तोपर्यंत पुढचे फार ठरवायचे नाही.अनेकदा कॅन्सल ही करावी लागली. स्वैर मूडची किंमत मोजावी लागते. माझ्या स्वयंप्रवासी शिक्षणाचा तो भाग आहे.

In reply to by कंजूस

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/11/2025 - 13:14
काशी विश्वनाथ मंदिराचा आतला भाग स्वच्छ आहे पण तिथे पोहोचण्यासाठी असलेलेले रस्ते विकसित होत आहेत. ओव्हरब्रिज होणार आहेत. मंदिराला चार गेट आहेत. तिथे पोहोचायचे मार्ग फार अरुंद आहेत

In reply to by कंजूस

सौंदाळा Fri, 12/12/2025 - 17:55
काशी विश्वनाथ कॉरिडॉर म्हणजे विश्वनाथ देवळापासून गंगा नदी पर्यंत जाण्यासाठी बांधलेला रस्ता / घाट (नदीकाठच्या कोणत्याही मंदीरामधे असतो तसाच) पण पूर्वी कच्ची, पक्की दुकाने, घरे असल्यामुळे देवळातून थेट नदीवर जाता यायचे नाही. हे सर्व हटवून प्रशस्त दगडी घाट, दिवे वगैरे केले आहेत. विश्वनाथ मंदीराबाहेरील घाटावर थेट नदीच्या बाकीच्या घाटांवरुन जाता येते पण घाटावरुन देवळात यायला मोठी रांग असते. (मी गेलो होत तेव्हा तरी होती)

तसा मी अप्रवासी फार कुठे गेलो नाही.पण नुकताच खजुराहो- वाराणसी अशी दहा दिवसांची स्वैर व सोलो टूर करुन आलो. अंशत: नियोजित पण बरीच स्वैर. IRCTC वरुन trial and error बेसीस वर तात्काळ ट्रेन बुकिंग केले. 25 नोव्हे ला सकाळी सोलो बॅग पाठीवर घेउन ट्रेन PUNE GCT SPECIAL ने भोपाळ ला गेलो. तिथे रात्री 12 ला पोचलो. रात्री IRCTC च्या एका दुर्लक्शित ठिकाणी फलाटा बाहेर असलेल्या एका रिटायरिंग रुम इमारतीत अनेकांना विचारत पोचलो. तिथे सामसूम होती. ऒफिस नाही. मग तिथे एका ठिकाणी एका बाईने एक जळमट व धूळीने माखलेली खोली दिली. तोपर्यंत चौकशी करण्यात माझे सर्व भोपाळ स्टेशन फिरुन झाले होते.

म्हटलं तर इडली नाही तर ढोकळा

युयुत्सु ·

चामुंडराय Sat, 12/06/2025 - 12:47
छान प्रयोग. एकदा एका ठिकाणी इडली पात्रात केलेला ढोकळा (दिसायला अगदी इडली सारखा) खाल्ला होता ते आठवले.

टर्मीनेटर Sat, 12/06/2025 - 13:23
म्हटलं तर इडली नाही तर ढोकळा 😀 भारीच! कधी कधी अपघाताने अशा चांगल्या रेसिपीज जन्माला येतात... गेल्या आठवड्यात घरी एकटाच होतो आणि अचानक 'रोस्टेड टोमॅटो सुप' प्यायची हुक्की आली म्हणुन गुगलवर त्याची रेसिपी शोधली तर ही रेसिपी सापडली होती परंतु इतके कमी पदार्थ वापरुन बनवलेले सुप चवीला मिळमिळीत लागेल अशी शंका आल्याने त्यात काही पदार्थ वाढवले आणि कृतीतही काही फेरबदल करुन बनवलेले 'रोस्टेड टोमॅटो सुप' चवीला तर झकास झालेच होते व त्याचे टेक्स्चर आणि रंगही मस्त आला होता. आता पुन्हा एकदा ते बनवुन त्याची सचित्र रेसिपी टाकतो...
टीप- वरील बॅटरमध्ये आलं आणि मिरच्यांचे वाटण घातले असते तर अजून मजा आली असती.
ह्यात 'लसुण'ही अ‍ॅड करावी अशी एक सुचवणी (ढोकळ्यात चांगली लागते असा स्वानुभव आहे). तसेच फोडणीत मोहरी बरोबर धनेही घालुन बघा त्यानेही स्वाद चांगला खुलतो!

कंजूस Sat, 12/06/2025 - 14:45
नेहमी करतो. लवकर करायचे झाल्यास इनो घालतात. गुजराती ढोकळा /खमण/ इदडा यूट्यूबवर शोधल्यास हजारो विडिओ आणि प्रकार सापडतील. लसणाची पातळ चटणी किंवा आंबटगोड लोणच्याबरोबर हे पदार्थ चांगले लागतात.

म्हटलं तर इडली नाही तर ढोकळा ==================== --राजीव उपाध्ये  परवाच मी धिरडी केली होती. भन्नाट झाली होती. बायकोने तर मिटक्या मारत खाल्ली, मग लेक म्हणाली -"बाबा, या विकेंडला माझ्यासाठी परत करा." लेकीचा हट्ट पुरवायला काल परत साहित्य जमवायला गेलो तर हवी ती पिठं सापडेनात. म्हणून पर्यायाचा विचार करत असताना हरभरा डाळ आणि पोन्नी तांदूळ शिल्लक असल्याचे लक्षात आले. मग एखाद्या मुक्तकाव्या प्रमाणे पुढील पाकृ जन्माला आली- २ वाटी हरभरा डाळ+ १ वाटी पोन्नी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले.

जोगेश्वर महादेव मंदिर,देवळाणे

गोरगावलेकर ·

गोरगावलेकर Wed, 12/03/2025 - 16:04
लेख भटकंती विभागात हलवावा ही संपादकांना नम्र विनंती . तसेच लेखात जे आहे, ते जसे आहे तसेच एक सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून दाखवायचा प्रयत्न केला आहे . कुठेही अश्लीलता दिसल्यास लेख उडवला तरी चालेल .

कर्नलतपस्वी Wed, 12/03/2025 - 17:55
खजुराहो प्रमाणेच शिल्पकला आहे. खजुराहो मधे सॅण्डस्टोन वापरला आहे तर इथे काळा दगड असावा असे वाटते. पुढील पिढीचे दुर्दैवच म्हणावे लागेल,जर सरकारने या बहुमूल्य संपत्ती कडे लक्ष दिले नाही तर लवकरच नष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत. लेख व प्रचि बद्दल धन्यवाद.

दुर्गविहारी Wed, 12/03/2025 - 19:30
माझ्या या भटकंतीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्याबद्दल धन्यवाद ! माझ्या इथल्या धाग्यावरुन यु ट्युबवर व्हिडीओ तयार केले गेले आहेत. या मंदीराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे त्रिदल पध्दतीचे मंदीर आहे. म्हणजे मध्ये मुख्य गाभारा आणि दोन्ही बाजुला दोन गाभारे अशी याची रचना आहे. सभमंडपात पुर्ण स्तंभ आणि वामन स्तंभ आहेत. शिवाय वामन मंडपात बसण्यासाठी दगडी बाक आहेत, हि रचना बरीचशी चालुक्य शैलीतील मंदीराची असते. हे मंदीर चालुक्य किंवा राष्ट्रकुटांनी उभारले असावे. https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOjJDveCZH51-MBeeS5AAUS8PiQsI9KKVmQkLHV_ISaEp2fFZYTlU93igClmfGsMppm3Jf6N18O7WZ-Qbx-zzJBDzTOjhHvqZbiVjRbSzoyC1RwM-vDDrlS5i18hmF_mGtqj89JDVNPXxoypb_CcNPt=w728-h546-s-no?authuser=4 तुम्ही जो मंदीराच्या अधिष्ठाण म्हणजे हंसाचा थर असलेला फोटो पोस्ट केला आहे, त्यात तळाशी हंस थर , त्यावर खुर हा थर आहे, त्यावर कुंभ, मग कणिका, त्याच्यावर आतल्या बाजुला खोल गेलेला आंतरपत्री हा थर आणि सगळ्यात वर आहे तो ग्रास पट्टी ज्यावर कीर्तिमुखांचा थर दिसतो आहे. https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMPUXzzFOPm3Hzb--ADAFrZsBWWSQwq-5xaUX0hPLEGl4pWLd7n1QRLQ7N0Mc-wRl-zMkEKEBAVCVo1w0oKtJowhBNAnkGOrYIx8Fc0zjHM3uCyscsfK9AfSrpBEDBoOPChNCFkbYNUqwgE_l9vmmIp=w410-h546-s-no?authuser=4 या कोरीव पुर्ण स्तंभाच्या स्तरावरुन मंदीराची उभारणी नक्कीच चालुक्य किंवा राष्ट्रकुटांच्या काळातील आहे. https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMNBcKystt1R7TFd8iCQaBfb611FQC3Yv-LXtYU9VB5Ro9a6OreGZ5eB57fQYEbaePt7Pz0OVX7gaq5Grg-YknBsS9CYMW2J4WDSFyvZKru9V0DeWsmomesT72oUiX0__Im808UYr9_gT-bRA3-DwUH=w410-h546-s-no?authuser=4 हि मुर्ती बहुधा नंदीवर आरुढ झालेल्या शिवाची असावी. मंदीर तसेही शंकराचे आहे. https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMYeUIujNwKfS-NqruDaZAPU71Jnvv1WddNqV7a_mMia_uKW3BHRe6oKDSLukOZxXGeJixClNIO--YSiPIY7Ykg0NVbHt9iOjLRDGmoTGOGpV9Oh_OsK_RE4EdNRhT7iDxcAUvKSG60AB5musEMXH74=w728-h546-s-no?authuser=4 हे मकरप्रणाल आहे. शंकराच्या पिंडीला अभिषेक केलेल जल येथून बाहेर येते. मकर म्हणजे मगरीचे मुख असण्यामागे दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे मकर हे गंगेचे वाहन आहे. सहाजिकच यातून येणारे जल हे गंगाजला इतके पवित्र असेल. आणि दुसरे कारण म्हणजे मकर हे वरुणाचे वाहन आहे. आपल्या या धाग्यामुळे पुन्हा एकदा या मंदीराला भेट देण्याची इच्छा झाली आहे.

टर्मीनेटर Fri, 12/05/2025 - 15:02
या शिल्पांमधून मध्ययुगीन कलाकारांनी जीवनातील आनंद, प्रेम आणि संतुलन यांचे दर्शन घडवले आहे. नाशिक -धुळे भागात कधी येणे झाल्यास आपल्या संस्कृतीचा हा जिवंत वारसा पाहण्यास विसरू नये
+१००० माझी धुळे, जळगाव परिसरात शून्य भटकंती झाली असल्याने एवढ्या सुंदर मंदिराबद्दल अद्याप काहीच माहिती नव्हती. लेख वाचल्यावर हा सुरेख 'सांस्कृतिक ठेवा' पाहण्यासाठी मुद्दाम ह्या परिसराला भेट देणे अगत्याचे आहे असे वाटत आहे... छान लेख आणि मस्त फोटोज 👍

किल्लेदार Sat, 12/20/2025 - 11:36
इथले कोरीव काम थोडे वेगळे वाटले. हा प्रदेश एकंदरीतच जरा रुक्ष असल्याने कधी जायचा विचार केला नाही. एकदाच कुठल्या एका प्रवासात रेल्वेच्या खिडकीतून "हादबीची शेंडी" बघितल्यावर पुढच्या स्टेशनात उतरायचा मोह झाला होता. परत त्यानंतर जाणे झाले नाही.

चौथा कोनाडा Sat, 12/20/2025 - 14:27
सुंदर मंदिर आणि सुंदर प्रचि... तुमच्यामुळे या अनोळखी मंदिराची भटकंती झाली ... माहिती देखील आटोपशीर आणि छान दिली आहे. धन्यवाद जीजीके.

In reply to by किल्लेदार

गोरगावलेकर Sun, 12/28/2025 - 11:53
कळस बटबटीत रंगात रंगवलेले बघून अतिशय दुःख झाले. जुन्याची किंमत आपल्या लोकांना कधी कळणार हे तो देवच जाणे ! हो , भुलेश्वर मंदिराला भेट दिली तेव्हाही हाच अनुभव आला होता .

गोरगावलेकर Sun, 12/28/2025 - 11:45
@Bhakti: प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार @टर्मीनेटर: लेख भटकंती विभागात हलवल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार . स्वतःचे वाहन असल्यास हे ठिकाण नाशिकपासून फार काही दूर नाही . सोबत मालेगाव -धुळ्या जवळचे झोडगे येथील माणकेश्वर मंदिरही पाहता येईल . @प्रचेतस, मदनबाण, श्वेता२४, चौथा कोनाडा,  किल्लेदार :प्रतिसादाबद्दल आभारी आहे .

दिवाळीनंतर काही महत्वाच्या कामानिमित्त आमच्या मूळ गावी जाणे झाले. सकाळी लवकर निघून नाशिक-मालेगाव-धुळे मार्गे संध्याकाळपर्यंत जळगांव भागात पोहचणे असा नेहमीचा प्रवास. यावेळी आदल्या रात्री नाशिकला मुक्काम झाल्याने आम्हाला पुढच्या प्रवासासाठी भरपूर मोकळा वेळ मिळणार होता. सकाळी साडे आठला नाशिक सोडले . एक दीड तासात चांदवड पर्यंत आलो .

छोटीसी बात, गोईंग डाऊन आणि येरूडकर..- किंडल बुक्स..

गवि ·

सोत्रि Wed, 12/03/2025 - 14:52
किंडल अनलिमिटेडवर लगेच डाउनलोड करून टाकले. संध्याकाळी हापिसच काम संपल की वाचून संपवणार आज!! छोटीसी बात... - (गवीपंखा) सोकाजी

कंजूस Wed, 12/03/2025 - 15:38
गगन विहारी सर, माझ्या नावाला स्मरून पुस्तकाचं सांपल वाचलं. गोष्ट एकदम फ्लाइट फास्ट आहे. नायकाचं सुंदरींवर बारिक लक्ष आहे. असू द्या. तरुणांना आवडतील कथा.

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 15:53
मला UPI आणि credit card दोन्ही वरून पेमेंट करताना समस्या येत आहे त्यामूळे डाउनलोड करता येत नाहीये... ;( काय कारण असावे? मी सेव्ह कार्ड ऑप्शन सिलेक्ट करत नाही हे कारण असावे काय?

In reply to by टर्मीनेटर

गवि Wed, 12/03/2025 - 16:16
UPI मध्ये तर सरळच प्रक्रिया आहे. त्यात सेव्ह काही करावे लागत नाहीच. किंडल किंवा अमेझॉन मोबाईल ॲपमध्ये मात्र थेट कोणतेही किंडल संबंधित पेमेंट केले किंवा घेतले जात नाही. काहीतरी पॉलिसी आहे. वेब ब्राउझरवर किंडल किंवा अमेझॉन वेबसाईट ओपन करूनच ते करावं लागतं.

In reply to by गवि

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 16:24
येस सर... मी तुम्ही दिलेल्या amazon च्या लिंक वरूनच प्रयत्न करत होतो... फक्त ज्या फोन वरून UPI पेमेंट करण्याचा प्रयत्न केला त्यात माझे UPI अकाउंट नाही पण मला ज्यावर ते आहे त्यावर पेमेंट रिक्वेस्ट आली नाही... म्हणून क्रेडिट कार्ड वरून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला पण ते ही प्रोसेस होत नाहिये... आता थोड्या वेळानी घरी पोचल्यावर वेब ब्राउझर वरून प्रयत्न करतो...

In reply to by गवि

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 17:08
"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता" काय काय गळे... वगैरे म्हणतात ना... त्यावर विश्वास आहे 😀 त्यामुळे प्रयत्न करत रहाणे हे माझे इतिकर्तव्यच आहे हो...

In reply to by गवि

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 17:24
माझ्यासारख्या अत्यंत सोज्वळ माणसाचा अतिशय "सात्विक' प्रतिसादही अश्लील वगैरे वाटत असेल तर पुढे काय बोलायचे? भलाई का जमानाच नहीं रहा सेठ 😀

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 19:44
वेब ब्राउझर वर पेमेंट झालं हो गवि शेठ... आता वाचतो.... (वाचतो कसला मजा घेतो... तुमचे लेखन वाचणे हा कायमच मजेदार अनुभव असतो 😍)

गविंचे पुस्तक खरेदी करतो. या वीकेंडला वाचून अभिप्राय देखिल कळवतो. - एक गविफॅन (गवि मिसळपाववर नसतील तर माझीही पावले इथे वळणार नाहीत. एवढे गवि आणि मिसळपाव यांचे माझ्या मनात साटेलोटे आहे. कोणत्याही प्रतिसादावरुन गवि एक मायाळू, केअरिंग, समंजस आणि ऐकुन घेणारे पण नेमकं, महत्वाचे, क्वचित तीक्ष्ण, शक्यतो आबदार पुढच्याला न दुखावता, बोलणारे, तरिही ऐसपैस आणि रिलॅक्स्ड व्यक्ती वाटतात. अशी माणसे क्रियेटिव्ह असतील तर मला अशा माणसांचा स्नेह खूप भावतो हवाहवासा वाटतो. त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते. (त्याच्या शांत समंजस पवित्र वृत्तीमुळे) ) आणि गवि चा लाँग फॉर्म गगन विहारी आहे हे मला पहिल्यांदा कळले. गविजी, वाचेन, सांगेन. खूप धन्यवाद.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

धर्मराजमुटके Wed, 12/03/2025 - 18:33
त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते.
चुक. डॉगेश भाई त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

In reply to by धर्मराजमुटके

पॅट्रोनस हे वृत्ती आणि प्रकृतिवर ठरत असतो त्यांना चॉइस नाही तो आपोआप निवडला जातो. मला तरी ते डॉगेश भाऊ नाही वाटत.

गवि Wed, 12/03/2025 - 18:34
ताजा कलम. खालील लेख लिहून एक दिवस व्हायच्या आतच विमान अपघातांच्या कहाण्या ऊर्फ एअर क्रॅशेस, या लेखांचं पुस्तक "गोईंग डाऊन" हेही किंडलवर आलं आहे. अनेक वाचक गेली काही वर्षे या लेखांचं काय झालं असं विचारत होते. आता ते पुन्हा सर्वांना वाचायला किंडलवर प्रकाशित झाले आहेत. लिंक https://amzn.in/d/fmxMFvV B

In reply to by गवि

गविजी हे पुस्तक छापायला कुणीही तयार झाले असते. तुम्ही प्रयत्न केले का तसे? (अजून एक म्हणजे चॅटजीपीटी आणि इतर मंडळी यांचा चित्रांचा सेन्स पूर्ण गंडला आहे, वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि Wed, 12/03/2025 - 21:06
धन्यवाद अण्णा..
वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता
खरं आहे. आता यापुढील भाग येईलच. तेव्हा इथून आयडियाज घेईन. डन..

गामा पैलवान गुरुवार, 12/04/2025 - 04:37
गवि, तुमची लेखणी सिद्धहस्त आहे याचा अनुभव इथे घेतलाय. आता परत एकता पुस्तक वाचून घेईन. आ.न., -गा.पै.

गवि गुरुवार, 12/04/2025 - 05:36
@ राजेंद्र मेहेंदळे @ कंकाका @ डॉ कुमारेक काका @ धर्मराजमुटके @ कर्नल तपस्वी @ प्रा डॉ सर @ आन गा पै प्रत्येकाला खूप खूप धन्यवाद.. स्वतंत्र प्रतिसाद देऊन धागा पुन्हा पुन्हा वर आणणे होऊ नये म्हणून एकत्रच.. _/\_

अकिलिज Fri, 12/05/2025 - 21:36
एका सिद्धहस्त लेखकाने आपले पुस्तक प्रकाशित करावे ही खरंतर आमच्यासारख्या वाचनकर्त्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण त्यांचा नम्रपणा पहा. छोटीसी बात म्हणून सोडून दिली. गवि गवि, किती शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून. हणमंतअण्णा शंकरांच्या मताशी बाडीस.

श्रीरंग_जोशी Fri, 12/05/2025 - 22:45
दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, गवि. अ‍ॅमेझॉनवरुन दोन्ही विकत घेतली आहेत. पुनर्वाचनाचा आनंद घेतो.

In reply to by गवि

श्रीरंग_जोशी Sat, 12/06/2025 - 05:15
प्रथम मला वाटले की माझा अ‍ॅमेझॉनचा नो-रश रिवॉर्डमुळे मला शुन्य डॉलरला मिळाले आहे. परंतु नो रश रिवॉर्डचे मूल्य पूर्वीइतकेच आहे. दोन्ही पुस्तकं विनामुल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!!

गवि Fri, 12/05/2025 - 23:39
आज आणि उद्या हे पुस्तक पूर्ण मोफत, शून्य किंमतीत घेता येईल असे केले आहे. पुस्तक आवडलं तर इतरांना शिफारस करणे, परीक्षण करणे, रेटिंग देणे वगैरे मार्गांनी पुस्तकाच्या प्रसारात मदत करावी अशी मिपाकरांना विनंती.

In reply to by गवि

कंजूस Sat, 12/06/2025 - 05:24
दोन्ही पुस्तकं किंडलवर घेतली, ॲपच्या लायब्रीत आली. वाचून प्रतिसाद लिहितो तिकडे. विमान, बोट किंवा रेल्वेमध्ये कामानिमित्त संबंध आलेले मराठी लोक बरेच असतील परंतू ते आवर्जून मराठीमध्ये तांत्रिक माहिती लिहीत नाहीत. तुम्ही इकडे मिसळपाव साईटवर लिहीत होतात ते मिसळपावचे वाचक वाचत होते. परंतू आता तुम्ही ही पुस्तके किंडलवर आणल्याने जगात सर्व ठिकाणी पोहोचतील. आभार.

कंजूस Sat, 12/06/2025 - 15:02
छोटीसी बात वाचले. पहिल्या दोन कथा मानसिक आघात आणि विरहावर आहेत. एरपोर्टचे वातावरण बरोबर पकडले आहे. पण विरह धक्का आहे. दुसऱ्या कथेत दारूच्या नशेत विरहदु:ख विसरू पाहणारा तरूण आहे. तिसरी 'आज' ही कथा चॅटिंग करण्याच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची आहे. आभासी जग खरे वाटणारी पिढी आहे. चौथी कथा ही कौटुंबिक प्रेम आणि सुखदुःखाची आहे. पाचवी कथा 'तुलपा' ही एक गूढ गोष्टीत रमलेल्या नायकाची आहे. शेवटची बी.पी.ओ. ही याच प्रकारच्या सॉफ्टवेअर सर्विस देणाऱ्या उद्योगातील वातावरण, त्रास मांडते. त्यातील कर्मचाऱ्यांचे स्वभाव , आवडनिवड आणि अपेक्षा उलगडत जातात. एअरपोर्ट असो वा बी.पी.ओ. गविंनी निरीक्षणांचा कथांमध्ये चांगला उपयोग करून घेतला आहे. शिवाय कथा चटपटीत ठेवून कोणताही संदेश न देता करमणूक केली आहे.

In reply to by कंजूस

गवि Sun, 12/07/2025 - 11:42
कंकाका, "गोईंग डाऊन" या पुस्तकाला तुम्ही अमेझॉन पेजवर दिलेला सुंदर अभिप्राय वाचून मनापासून आनंद झाला. विमान अपघातांच्या मीमांसेत सर्व क्षेत्रातल्या वाचकांनी रस दाखवावा, समजून घ्यावं, आणि तांत्रिक गोष्टी सोप्या भाषेत पोचाव्या यासाठीच हे पुस्तक लिहीलं.. खूप आभारी आहे !

गवि Sun, 12/07/2025 - 11:29
धन्यवाद वाचकहो ! अमेझॉन डॉट इन, संपूर्ण किंडल कलेक्शनमध्ये: गोईंग डाऊन – Travel Writing मध्ये #2 रँक गोईंग डाऊन – Hot New Releases मध्ये #1 स्थान छोटीसी बात – Fiction (Suburban Literature) मध्ये #7 रँक विक्री किंवा मानधन यांच्यावर ही रँक अवलंबून नाही. वाचकांच्या प्रतिसादावर आहे. त्यामुळे वाचकांचे ऋण पुन्हा एकदा मानतो.

पूर्ण वाचले आणि अर्थातच आवडले. लगे रहो!! काही कथा (पॅन अ‍ॅम/के एल एम ची) एअर क्रॅश इन्वेस्टिगेशनमध्ये मालिकेत बघितल्या होत्या ते आठवले. मधेच "सली" या नितांतसुंदर चित्रपटाची आठवणही झाली. अवांतर-टॉम हॅन्क्स तसाही फॉरेस्ट गंप मुळे आवडतोच. त्यावर एकदा लिहायचे आहे. बघुया.

गवि Wed, 12/10/2025 - 08:27
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. एटीएम गार्ड, येरूडकर तुम्हाला भेटायला आलाय. लिंक: https://amzn.in/d/fln7d4w C अमेझॉन Book overview: हे पुस्तक तसं तर कथा सांगणारं आहे. पण त्याहूनही जास्त.. या पुस्तकात तुमच्या आमच्या गल्लीबोळातलं आयुष्य कागदावर तसंच, न लाजता, न लपता उतरलेलं आहे. हे सर्व वाचताना तुम्ही कधी मुसळधार पावसाचं पाणी भरत चाललेल्या एटीएम रूममध्ये नाईट शिफ्टवर असलेल्या येरुडकरला भेटाल.. तर कधी आईसक्रीमवाल्या "गंदे अंकल"च्या नजरेतून त्या निरागस पोरीच्या मनात शिराल. कधी "चिनू"च्या विंडोज ९८ च्या स्क्रीनवर चमकणारे याहू मेसेंजर, जिओसिटीज आणि देसीबाबा यांच्या आठवणी.. आणि ते किर्र वाजणारं १२८ केबीपीएस मोडेम तुम्हाला स्वतःच्याच त्या दिवसांत ओढून नेतील. कधी एमआरआय मशीनच्या बोगद्यात, धाड धाड वाजणाऱ्या आवाजात, आपल्याच मनातले शब्द ऐकू येतील. व्हिएतनामच्या "बा ना" हिल्समधे धुक्यात हरवलेला तो सोनेरी पूल.. आणि ती फॅमिली.. आणि.. असाच एक केळकर नावाचा पोरगा.. अर्धवट प्रेमात पडलेला.. शिवराळ पण मनातून मनाशी बोलणारा. वाचा आणि बघा काही जुळते का तार..

गवि गुरुवार, 12/18/2025 - 12:06
एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या पंधरा दिवसांत एकूण २७३४ किंडल पेजेस वाचन या तीन पुस्तकांचे मिळून झाले. यापैकी छोटीसी बात : १६०० पाने, छोटीसी बात: ८९० पाने आणि येरूडकर: २४१ पाने असे साधारणपणे आकडे आहेत. वाचकांचे सहस्र आभार. गेले दोन दिवस मात्र अचानक वाचने शून्यावर आली आहे. त्यामुळे हिरमोड झाला. प्रत्येक पुस्तक बेस्टसेलर रँकमधे वर होते पण ते काळानुसार अजून काही काळ तरी वाचनात रहावे आणि लाखो पुस्तकांच्या गठ्ठ्यात कायमचे गाडले जाऊ नये यासाठी सर्वांना विनंती अशी, की ज्यांनी हे पुस्तक अद्याप वाचले नसेल त्यांनी अवश्य वाचण्याचा प्रयत्न करावा. काही वाचकांनी कौतुक करणारे रिव्ह्यू आणि रेटिंग दिली आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही करावे. पुन्हा एकदा सर्व वाचक आणि प्रतिसादकर्ते आणि अभिप्राय, तारांकन देणारे यांच्याबद्दल कृतज्ञता..

तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. रिव्ह्यू किंवा मत अगदी दोन चार ओळींत लिहीलंत तरी चालेल.

देवव्रत रेखेच्या यशाची चेताशास्त्रीय (जीव॒शास्त्रीय) चिकीत्सा

युयुत्सु ·

कांबळे आडनावाच्या एखाद्या २ वर्षाच्या बाळाला (हे बाळ त्यातल्या त्यात जास्त मेंटल क्षमतेचे निवडून) त्या वयापासून हे घनपाठाचे (किंवा तत्सम) ट्रेनिंग देऊन (म्हणजे फक्त इतकेच नित्यनेमाने आणि शिस्तीने), त्याचे नीट भरणपोषण करून त्याच्या मेंदूच्या वळ्या तशा घडवून करायला लावला तर? मी जितके वाचले त्यानुसार हा मेंदूने पर्म्यूटेशन आणि कॉम्बिनेशन प्रोब्लेम सोडवणे या धरतीवरचा प्रोब्लेम वाटला. शिवाय संपूर्ण प्रयोग मेंटली किती चॅलेंजिंग होता यावर कुठेही कसलेही तांत्रिक स्पष्टिकरण दिसले नाही. अजून एक, समजा या तरुणाचा मेंदू असा पूर्ण न भुतो न भविष्यती असा आहे असे मला मान्य करायला काहीही अडचण नाही. पुरोगाम्यांचा (आणि माझा देखील) हा आक्षेप आहे, की या चॅलेंजच्या सोडवणुकीमुळे कोणत्या विज्ञानात भर पडेल का? या तरुणाचे आयुष्य आता असेच जाणार आहे की तो त्याच्या बुद्धिचा उपयोग करून नवं काहीतरी मांडू शकणार आहे किंवा अगदी जे लोक याचा शास्त्रीय अभ्यास करणार आहेत त्यांचा तो स्पेसिमन तरी व्ह्ययला तयार आहे का जेणेकरुन न्युरोसायन्स मधे काहीतरी महत्त्वाची भर घालता येईल? हे केवळ या तरूणावरच नाही परंतु इतर अशा सर्व मेंदूंना मानवी संस्कृतिचा ठेवा म्हणून जपणे त्यांचा अजून विकास करणे आणि त्यांच्याकडून मुलभूत संशोधने करून घेणे हे तरी सरकार ने करायला हवे. परंतु, (सध्याचे) सरकार या तरुणाला फॉर ऑल दि रॉंग रिझन्स डोक्यावर घेईल.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नाही त्यामुळे यातल्या ब्राह्मण एज ए वांशिक एथिनिसिटी च्या तुमच्या मुद्द्यांवर आणि निष्कर्षांवर काहीही महत्त्वाचे मांडता येणार नाही मात्र तुमचे निष्कर्ष मी झिडकारत नाही आणि त्यांची सत्यासत्यता पडताळण्याला माझा काडीचाही आक्षेप नाही. ते बिनचूक निघाले तर त्याचा ही उपयोग आपल्याला नक्की होईल.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

खटपट्या Wed, 12/10/2025 - 23:27
मी सुध्दा मानववंशशास्त्राचा अभ्यासक नाही. पण महाराष्ट्रातील ब्राम्हणांचे रंग रुप पाहता (विशेषतः कोकणातील) ते या भुभागातील असावेत असे वाटत नाही. कारण महाराष्ट्रातील जो बहुसंख्य समुदाय आहे त्यांचे आणि कोकणातील ब्राम्हणांचे रंगरुप यात खूप फरक आहे. त्यामुळे ते भारताच्या अन्य भागातून आले असावेत असे वाटते. मी चूक असूच शकतो.

In reply to by खटपट्या

रामचंद्र Wed, 12/10/2025 - 23:58
काही वर्षांपूर्वी सोबत साप्ताहिकात बहुधा जोगळेकर किंवा करंदीकर यांच्या एका लेखात अशीच भूमिका मांडली होती. त्यांनी चित्पावन ज्ञातीतली आडनावे आणि इराणमधील प्राचीन गावांची नावे यातील साम्य आणि अन्य काही साधर्म्यसंदर्भ दिले होते असे वाचल्याचे आठवते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

युयुत्सु गुरुवार, 12/04/2025 - 07:37
श्री० हणमंत अण्णा,
कांबळे आडनावाच्या एखाद्या २ वर्षाच्या बाळाला (हे बाळ त्यातल्या त्यात जास्त मेंटल क्षमतेचे निवडून) त्या वयापासून हे घनपाठाचे (किंवा तत्सम) ट्रेनिंग देऊन (म्हणजे फक्त इतकेच नित्यनेमाने आणि शिस्तीने), त्याचे नीट भरणपोषण करून त्याच्या मेंदूच्या वळ्या तशा घडवून करायला लावला तर?
अवश्य! ज्याला कुणाला वेदांचे रक्षण आणि अभ्यास करायचा आहे त्याला तो करता यायला हवा. काही दिवसांपुर्वी बहुधा नाशिकमधील ’काकडे’ आडनावाचा एक बालक संथा घेऊन वेदपठण करत रिल असल्याचे बघायला मिळाले होते. त्यामुळे कांबळे आडनावाच्या व्यक्तीला वेदपठण करायचे असल्यास अवश्य करता यावे. ते जर करायला मिळाले तर आजच्या अनेक प्रश्नांची धार कमी होईल. पण मला ’उपाध्ये’ आडनाव असून वेद शिक्षण - केवळ मुंज केली नाही - म्हणून नाकारले होते. पात्र ब्राह्मणेतरांना जानवी वाटणे ही सततची प्रक्रिया होऊ शकली तर समाजाचे जास्त कल्याण होईल.
मेंदूने पर्म्यूटेशन आणि कॉम्बिनेशन प्रोब्लेम सोडवणे या धरतीवरचा प्रोब्लेम वाटला. शिवाय संपूर्ण प्रयोग मेंटली किती चॅलेंजिंग होता यावर कुठेही कसलेही तांत्रिक स्पष्टिकरण दिसले नाही.
हे लेखनकला अस्तितत्वात नसताना एकही अक्षर हरवू नये या साठी निर्माण केले गेलेले डेटा प्रिझर्व्हेशन तंत्र आहे. हे तंत्र म्हणजे एक अत्यंत अवघड ’मेंटल जिमनॅस्टिक’ असते. त्यामुळे त्याचे कौतुक जास्त ... मी तुम्हाला एक उदा० म्हणून मनातल्या मनात एक त्यातल्या सोपा प्रयोग सांगतो. एक ३ आकडी मोठी संख्या मनात पकडा (उदा० ५००) आणि डोळे मिटून त्यातून ९ वजा करा॒. आलेल्या प्रत्येक उत्तरातून संख्या संपेपर्यंत ९ वजा करत राहायचे. तुम्हाला आपली एकाग्रता किती हास्यास्पद आहे ते लक्षात येईल.
पुरोगाम्यांचा (आणि माझा देखील) हा आक्षेप आहे, की या चॅलेंजच्या सोडवणुकीमुळे कोणत्या विज्ञानात भर पडेल का?
या तरूणाच्या मेंदूचा स्कॅन केला तर विज्ञानात भर नक्की पडेल. पण माणसे असंख्य आह्वाने स्वत:ची मस्ती जिरविण्यासाठी स्वीकारतात. रुबिक क्युब कमीतकमी वेळेत सोडविण्याने, एखादा अवघड सुळका पादाक्रांत करण्याने विज्ञानात कोणती भर पडते? https://www.youtube.com/shorts/bSA-TYvUKN8 https://youtube.com/shorts/1cu-nCt1X2k?si=PCsEINs1v5w1ze33 वर दिलेल्या आह्वानांनी विज्ञानात नक्की काय भर घातली. आपल्या शंकांचे समाधान झाले असेल अशी आशा करतो.

विवेकपटाईत गुरुवार, 12/04/2025 - 09:18
निरंतर एकाग्रतेने अभ्यास केल्याने कुणीही करू शकतो. त्यात विशिष्ट कुळात जन्म घेण्याची गरज नाही. लेखन क्रिया आल्यानंतर रामायण महाभारत ते समस्त ग्रंथात मोठ्या प्रमाणावर भेसळ झाली आहे पण वेद त्यापासून वाचले. हेच महत्व या विद्येचे आहे.

सोत्रि गुरुवार, 12/04/2025 - 10:30
*खरं तर बुद्धी, दीर्घायुष्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही.* पण एखाद्या मानवसमूहात काही गुणांचे प्रमाण लक्षणीय़ वाढलेले दिसत असेल तर ते का?
हा मुद्दा रोचक आहे, आणि त्याचा आढावा घेणार्‍या लेखातले मुद्दे विचारप्रवर्रतक नक्कीच आहेत. - (चिकीत्सक) सोकाजी

भीमराव Sat, 12/06/2025 - 20:19
काही पण म्हणा पण लहानपणी श्लोक पाठांतर केलं तर बुद्धी तल्लख होते. मी लहान असताना वारंवार घोकंपट्टी केलेली रामरक्षा, गीतेचा पहिला आणि बारावा अध्याय, खुप सारे श्लोक आणि अष्टके अजून पाठ आहेत. म्हातारी लोकं पाढे पाठ करत असत त्यांना अगदी पावकी दिडकी अडिचकी, निमकी सवायकी हे असले कालबाह्य गोष्टी अजून पाठ आहेत. ते लोकं आजही हिशोब त्याप्रमाणे च करून आपल्या ला तोंडांत बोटं घालायला लावतात. राहता राहिला प्रश्न बामनांचा, तर बामनांनी शेकडो वर्षे स्वतः चा मेंदू स्टोरेज डिव्हाईस (याला म्हराठीत काय म्हणायचं ब्वा) म्हणून वापरला आहे. त्यामुळे सहाजिकच बामनांची घोकंपट्टी आणि पाठांतराची क्षमता निर्विवाद पणे वरचढ आहे. सुतारांच्या आजच्या पिढ्या सुद्धा दुरुस्ती, हस्तकला, इत्यादी मध्ये इतरांच्या तुलनेत लवकर गती घेतात, गुजराती लोकं अंगभूत मार्केटिंग च्या कलेनं धंदे चांगले करतात. शेवटी- नुसती घोकंपट्टी म्हणजे प्रज्ञेचे शिखर नाही आणि नुसती एक सुरी कारागिरी म्हणजे सुद्धा प्रज्ञेचे शिखर नाही. बामनी ज्ञान पाठ करणारे पाठ करत राहिले आणि तुकाराम महाराज त्याच ज्ञानाची गाथा गाऊन गेले. गवंडी पाथरवट दगड माती करत राहिले आणि हेमाद्री पंत एक बांधकाम शैली विकसित करुन गेले.

युयुत्सु Sun, 12/07/2025 - 09:32
श्री० भीमराव
काही पण म्हणा पण लहानपणी श्लोक पाठांतर केलं तर बुद्धी तल्लख होते. मी लहान असताना वारंवार घोकंपट्टी केलेली रामरक्षा, गीतेचा पहिला आणि बारावा अध्याय, खुप सारे श्लोक आणि अष्टके अजून पाठ आहेत.
याचं पण जीवशास्त्रीय स्पष्टीकरण देता येते - मानवी मेंदूच्या लवचिकतेला चेताविज्ञानात 'ब्रेन पलास्टीसिटी' असे संबोधले जाते. जनुकीय वारसा, गर्भावस्थेमध्ये होणारे आघात, जन्मानंतर होणारे पोषण, आजुबाजुचे वातावरण या सर्वांचा मेंदूच्या लवचिकतेवर प्रभाव पडत असतो. बेल कर्व्ह च्या नियमानुसार काही घटकांमध्ये मेंदूचा विकास लहानपणी मिळणारे शिक्षण, उत्तेजन आणि संधी यामुळे खुप मोठ्या प्रमाणात होतो, तर काही जणांमध्ये सामान्य प्रमाणात होतो. तर काही जणांमध्ये खुपच कमी प्रमाणात होतो. ज्यांच्या मध्ये मेंदूचा विकास खुप कमी प्रमाणात होतो ते गुन्हेगारीकडे वळतात.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Sun, 12/07/2025 - 10:08
वर दिलेल्या उत्तरात एक उल्लेख राहून गेला - मेंदूची लवचिकता जेव्हढी जास्त तेव्हढा मेंदूच्या विकासाची शक्यता जास्त! जाता जाता अवांतर - कुत्र्यांच्या मानवीकरणातून माणसाला बरेच शिकण्यासारखे आहे. कुत्र्याच्या प्रत्येक चांगल्या कृतीचे माणुस कौतुक करतो, त्याला शाबासकी देऊन खाऊ देतो. माणसाच्या बाबतीत मात्र तसे होताना दिसत नाही. खिशातून काहीही जात नसले तरी फुकटचे कौतुक करायला माणसांना खुप जड जातं. चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणायला खुप मोठं मन लागतं. त्यात पण माणसं परत छिद्रान्वेषी असतात. मिसिंग टाईल सिण्ड्रोम ने पछाडलेली असतात. मानवाचा विकास या वळणावर मोठ्या प्रमाणावर गंडला आहे असे माझे ठाम मत आहे.

देवव्रत रेखेच्या यशाची चेताशास्त्रीय (जीव॒शास्त्रीय) चिकीत्सा - राजीव उपाध्ये ३.१२.२०२५  १९ वर्षाच्या एका युवकाने एक नवा इतिहास रचला आहे. बरेच डावे-पुरोगामी त्याच्यावर तुटून पडले आहेत. देवव्रत रेखेने जे मिळवले आहे, त्याचे महत्त्व कमी करण्याचा आटापिटा करताना ते आपला अडाणीपणा आणि ब्राह्मण-द्वेष उघडा पाडत आहेत. उजव्यांच्या अंधप्रेमाबद्दल तर बोलायलाच नको. ’ब्राह्मणांच्या बौद्धिक वर्चस्वाची जीवशास्त्रीय कारणे’ असा एक लेख मी काही वर्षांपूर्वी लिहीला. तो वाचून अनेकांनी नाके मुरडली होती.

थॅंक यु संक्षी !

उन्मेष दिक्षीत ·

टर्मीनेटर Tue, 12/02/2025 - 22:40
जवळपास गेल्या वर्षंभरातले भरपूर धागे वाचायचे राहिले आहेत, अजून दिवाळी अंक सुद्धा २०% ही वाचून झाला नाहीये. त्यामुळे सदर धागा नक्की कुठल्या संदर्भात आहे ह्याची काही टोटल लागली नाही... परंतु संक्षींचे मिपावर पुमरागमन व्हावे असे नेहमी वाटते खरे!

मिपा डज नॉट डिजर्व हिम ! संपादकानीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, त्यांची चुक नसताना ! संपादकच गंडलेले आहेत ! संक्षींना घंटा फरक पडत नाही ! मिपाचे दुर्दैव ..

In reply to by उन्मेष दिक्षीत

कर्नलतपस्वी Wed, 12/03/2025 - 07:14
जन पळभर म्हणतील काय काय..... किंवा दोन ओंडक्यांची होते सागरात भेट..... अशी परिस्थिती असताना वरील विधान व्यक्तीगत ओव्हर काॅनफिडन्स वाटतो. कुणाच्या जाण्याने कुणालाही घंटा फरक पडत नाही. आता हे संक्षी कोण यांच्या बद्दल फारसे माहित नाही पण तसेही मिपावर शब्द ओळखच असते प्रत्यक्ष भेटणारे कमीच आणी भेटले तरी कायम स्मरणात रहाणारे कमी,स्मरणात राहिले तरी वेळप्रसंगी उभे रहाणारे नाहीच म्हंटले तरी चालेल.त्यामुळे मिपा एक थिएटर आहे तीन पैशाचा तमाशा......(माझे मिपा बद्दल चे अंडरस्टॅडिंग) @कंजूस भाऊ म्हणल्या प्रमाणे मुक्त स्त्रोत दुनियेत कुणालाच कुणाची गरज नाही. दुर्दैव आणी सुदैव सापेक्ष कल्पना आणी व्यक्तिसापेक्ष म्हटल्यास इथे चुकीचे ठरणार नाही असे वाटते.

In reply to by उन्मेष दिक्षीत

का कोणास ठाऊक हे वाचून १५-१६ वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटाचे नाव आठवले. ते नाव होते - कार्तिक कॉलिंग कार्तिक.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 15:31
कार्तिक कॉलिंग कार्तिक
हे वाचून मला मध्यंतरी एका धाग्यावर गविंनी दिलेला प्रतिसाद आणि त्यावरचे उपप्रतिसाद आठवले 😀 माझे त्यांच्याशी अनेक मतभेद असले तरी बाकी काय असेल ते असो, पण कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवी बुद्धिमत्तेवर आधारित लेखन करणारे संक्षी परत यावे असेच वाटते... मग त्यांचे विचार/मुद्दे कोणाला पटोत की न पटोत... पण कमीत कमी ते विचारप्रवर्तक तरी असायचे आणि त्यावर होणाऱ्या चर्चा 'बौद्धिक' स्वरूपाच्या असायच्या, सध्या चालतात तशा बिनडोक स्वरूपाच्या तरी नसायच्या 😂

In reply to by टर्मीनेटर

पण कमीत कमी ते विचारप्रवर्तक तरी असायचे आणि त्यावर होणाऱ्या चर्चा 'बौद्धिक' स्वरूपाच्या असायच्या
कल्पना नाही. पण मीच काय तो सर्वश्रेष्ठ आणि बाकी कोणाला काही अक्कल नाही, बाकी सगळे जग मूर्ख असला अ‍ॅटिट्यूड असलेल्याशी कसली चर्चा करणार? असला कोणी भेटला की इतर बरेच मिपाकर त्यांना समजेल अशा शब्दात उत्तरे द्यायचे आणि त्या वाहत्या गंगेत मी पण कधीकधी हात धुऊन घ्यायचो. असो.

In reply to by टर्मीनेटर

गवि Wed, 12/03/2025 - 16:50
हे वाचून मला मध्यंतरी एका धाग्यावर गविंनी दिलेला प्रतिसाद आणि त्यावरचे उपप्रतिसाद आठवले
तुमने पुकारा और.. हा हा हा.. कोणता हो प्रतिसाद ?? ;)

गवि Wed, 12/03/2025 - 16:48
मला वाटले संक्षी परत आले की काय. या हो संक्षी आता परतून. झालं ते सर्व जुनं झालं. काळ अस्तित्वात नसला तरी आपण आहोत त्या स्थितीत टिकून रहात नाही. तेव्हा आता या.. :-) ते प्रा डॉ तुमची फार आठवण काढतात.

In reply to by गवि

प्रा डॉ तुमची फार आठवण काढतात.
धन्यवाद. बाय द वे, आपणच संक्षी यांना परत आणू शकता यावर माझा विश्वास आहे. -दिलीप बिरुटे ( संक्षीसेठचा फॅन )

सुबोध खरे गुरुवार, 12/04/2025 - 10:49
मी म्हणजे म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच असे मानणाऱ्या काही अतिहुच्च मिपाकरांपैकी एक होते ते. अर्थात म्हंणून त्यांनी मिपावरून जावे किंवा त्यांना काढावे असे मी कधीही म्हटले नव्हते/ म्हणत नाही. खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांच्या बेताल आणि भंपक प्रतिसादांपेक्षा त्यांचे प्रतिसाद बरेच सुसह्य असत. पण मीच कायम बरोबर अशा अविर्भावात असल्याने त्यांच्याशी एका एका मुद्द्यावर जोरदार वाद घालायला फार मजा यायची.. प्यूबिक रिंग च्या धाग्यावर लै म्हणजे लैच मजा आली असो

In reply to by सुबोध खरे

कर्नलतपस्वी गुरुवार, 12/04/2025 - 11:50
तसेही,कुठे ही जा स्वलाल धन्य सदस्यांची संख्या कमी नसतेच फक्त डिग्रीचा फरक एव्हढेच काय ते.

कंजूस गुरुवार, 12/04/2025 - 11:16
पुण्याचे ते गच्चीवरचे कोणतेतरी रेस्टारंट... अठराशे रुपयांत अमर्याद खा.. त्यावर खूप चर्चा रंगली होती संक्षी विरुद्ध मिपा इलेवन. नंतर ते गायब झाले. मनोगतावर आहेत. पण ते स्थळ आहे मुळमुळीत. त्याचा इग्झाॅस्ट पाइप दाबलेला आहे. ( संपादकांनी नरसाळ्यातून प्रत्येक वाक्य काढल्यावरच उमटतं.)

In reply to by मारवा

तुमच्या मते संक्षी यांचे महत्वाची किंवा तुम्हाला आवडलेली तत्वे कोणती ?
त्यांना हा प्रश्न विचारणे आणि मला- तुमच्या मते क्लिंटन यांचा एखादा आवडलेला प्रतिसाद कोणता हा प्रश्न विचारणे यात तत्वतः काहीही फरक नाही :)

ज्यात देह वावरतोय ते आपण आहोत ! मला माहीत नव्ह्ती अध्यात्माची जादू ! यु न्यु बेटर ! तुम्ही माझ्या चुकांना माफ करत आलात , पण आता शेवटच्या चुकीनंतर माझ्याकडून माफी मागण्याचही डेरिंग झालं नाही ! पण आभार व्यक्त केल्याशीवाय राहावत नाही ! थँक यु फॉर ऑल्वेज केरींग फॉर मी ! वेअर एम आय ? :) - उन्मेष

रंजनाकडून चिंतनाकडे नेणारा लेखकराजा

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार Tue, 12/02/2025 - 11:44
मॉम यांच्या रेन आणि द लेटर या कथांचा पूर्वी स्वतंत्रपणे परिचय करून दिलेला होता. तसेच त्यांची विविध अवतरणे निरनिराळ्या विषयांच्या निमित्ताने विविध धाग्यांवर तुटक स्वरूपात लिहिली होती. या दीर्घ लेखाच्या निमित्ताने त्यांचा सविस्तर जीवनपट आणि आजही वाचकप्रिय असणाऱ्या त्यांच्या काही नावाजलेल्या पुस्तकांचा परिचय करून दिलेला आहे.

Bhakti Tue, 12/02/2025 - 15:34
खुप छान लेख रचना आहे.अनेक विचार करायला लावणारी वाक्ये ,त्यांचा उल्लेख उत्तम केलाय. वैद्यकीय शिक्षण घेतलेले अनेक‌ कलावंत माहिती आहेत,लेखक तसे कमी आहेत?. डॉ.अनिल अवचट यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार Tue, 12/02/2025 - 16:09
डॉक्टर लेखक धन्यवाद ! इथे तुम्हाला दहा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावे मिळतील. + रशियाचे Chekov मराठी डॉक्टर्समध्ये नरेंद्र दाभोळकर, अतुल गवांदे अरुण लिमये, उदय कुलकर्णी आणि अन्य काही.

In reply to by हेमंतकुमार

Bhakti Wed, 12/03/2025 - 11:41
वाह, खुपच महत्वपूर्ण यादी आहे. डॉक्टर लेखक कोण ? असं विचारल कारण,या जगाच्या अनेक रहस्यंभेदांपैकी म्हणजे मानवी शरीर यांचे पूर्ण रहस्य आकलन यांना झालेलं असते.आणि त्यावरच सतत अभ्यास सुरू असतो.लेखात उल्लेख केल्याप्रमाणे डॉ.मॉम हे लेखक अनेक चिंतनाअंती अज्ञेयवादी झाले.जिथवर डॉक्टर लोक लवकर पोहचत असावे असे मला वाटतं.अशा रहस्यभेदांनंतर ते समतोल नसलेल्या अनेक व्यक्तीरेखा, समाजव्यवस्था यावर फिक्शनल,नॉन फिक्शनल पुस्तक लिहितात ,ती वाचनीयच असतात. डॉक्टर लेखक आठवताना मला मी नुकतेच ऑर्डर केलेले "स्वतः जागवत ठेवण्याचे प्रयोग" हे पुस्तक आठवलं.जे सध्याच्या प्रसिद्ध मराठी लेखिका डॉक्टर ऐश्वर्या रेवडकर यांनी लिहिलेले आहे.या आधीही त्यांनी त्यांच्या सामाजिक, स्त्रीवादी, विचारांवर, वैद्यकीय अनुभवांवर 'पाळीचं पॉलिटिक्स', 'विहिरीची मुलगी, बिजापूर डायरी पुस्तक लिहिले आहे. मी मात्र पहिल्यांदाच त्यांना वाचणार आहे :)

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 14:04
ही कथा उच्चभ्रूपणा, दिखाऊ सभ्यता आणि तथाकथित नैतिकता यांचा बुरखा अलगदपणे फाडते.
ह्या एका वाक्यासाठी Rain ही कथा/कादंबरी वाचण्याची ईच्छा झाली आहे. छापील लेखन आता अजिबात वाचत नाही, तुम्ही लेखात 'जालावर' वाचल्याचा उल्लेख केला आहे त्यामूळे डिजिटल आवृत्ती वाचेन! ---
“ समाजातील ‘वर्ग’भेद हे नेहमीच अस्तित्वात असून त्यांचे अस्तित्व नाकारण्याऐवजी ते कबूल करण्यातच प्रामाणिकपणा आहे”
Cakes & Ale ह्या कादंबरीतले हे वाक्य फारच आवडले आहे! 'Acceptance' चे महत्व अजिबात न समजलेले अनेक (तथाकथित उच्चशिक्षित) लोक २१व्या शतकातही काळानुरूप न होता अजूनही असल्या कालबाह्य विषयांवर चर्वित चर्वण करताना (अगदी इथेही) आढळतात हे एकप्रकारे दुर्दैवच म्हणायचे! असो, पुढील लेखनास शुभेच्छा!

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार Wed, 12/03/2025 - 14:22
धन्यवाद ! रेन जरूर वाचून कळवा. त्यातील धर्मगुरूचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे लेखकाने संदिग्ध ठेवले आहे. त्यावर तुमचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल 😀 . .
Cakes & Ale ह्या कादंबरीतले हे वाक्य
हे वाक्य Cakes. . . यातील नसून A Writer’s Notebook या चिंतन-पुस्तकातील आहे. . .
कालबाह्य विषयांवर चर्वित चर्वण करताना (अगदी इथेही) आढळतात
सहमत ! 👊

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 14:37
रेन जरूर वाचून कळवा.
हो... नक्कीच!
हे वाक्य Cakes. . . यातील नसून A Writer’s Notebook या चिंतन-पुस्तकातील आहे.
ओह... ह्यासाठीच मी मोबाईल वरून प्रतिसाद देणे टाळतो 😀 स्क्रोल करताना हे वाक्य 'Cakes & Ale' मधले असावे असा माझा गैरसमज झाला त्यासाठी क्षमस्व!

हेमंतकुमार Sat, 12/20/2025 - 09:16
The Moon and Sixpence या मॉम कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट (1942) युट्युबवर पाहिला. सुंदर असून आवडलाच ! एका महान प्रतिभावंत चित्रकाराचा कलंदरपणा छान चितारला आहे. George Sanders या तत्कालीन प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्याची त्यात मुख्य भूमिका आहे. Paul Gauguin या प्रसिद्ध फ्रेंच चित्रकाराच्या जीवनावर आधारित. https://www.youtube.com/watch?v=1HAk9N0KTK4 या कादंबरीचे वैशिष्ट्यपूर्ण शीर्षक अर्थपूर्ण असून त्यात चंद्र आणि पैशाचे नाणे ही रूपके आहेत. एखाद्या कलाकाराची कलेप्रति असलेली अतीव महत्वाकांक्षा व स्वप्न (the moon) आणि त्या उलट सामान्य माणसाप्रमाणे जगता येणारे सुरक्षित भौतिक आयुष्य ( sixpence) यांच्यातील द्वंद्व लेखकाने दाखवले आहे. यापैकी पहिली गोष्ट साकार करायची असेल तर दुसऱ्याचा त्याग करावा लागणे हे अपरिहार्य.

तुमच्यात असलेल्या लेखनाच्या शिस्तीमुळे हा लेख फार प्रगल्भ झाला आहे. इंग्रजी साहित्याशी आमचा सुतराम संबंध नाही. त्याचे आकलन होण्याची भाषा क्षमताही आमच्यात नाही. मराठीत आपण हा ठेवा आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद! लेखन हा विचारांच्या विरेचनाचा (purgation) उत्तम मार्ग आहे अशी त्यांची धारणा होती. या ठिकाणी catharsis हा शब्दप्रयोग मला अधिक संयुक्तिक वाटतो. फक्त भावविरेचनासाठी च तो का वापरला जावा? लेखन हा वैचारिक हगवणीचा प्रकार आहे असे देखील मानणारा एक विद्रोही पंथ आहेच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हेमंतकुमार Sun, 12/21/2025 - 19:43
धन्यवाद !
purgation) उत्तम मार्ग आहे अशी त्यांची धारणा होती. या ठिकाणी catharsis हा
या निमित्ताने गुगलून या दोन्ही शब्दांचा छोटासा अभ्यास करून टाकला. लेखनातून भावनिक विरेचनासाठी catharsis हा शब्द अधिक योग्य आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

हेमंतकुमार Sun, 12/21/2025 - 21:42
तुमच्या प्रतिसादामुळे मी या संबंधित २ शब्दांच्या उल्लेखाबद्दल मॉम यांचे मूळ लेखन पुन्हा एकदा वाचले. ती ५ वाक्ये खाली देतो म्हणजे मॉम यांनी या दोन्ही शब्दांचा किती समर्पक वापर केला आहे ते समजेल :
“I have put a lot of myself into this narration. I could get rid of many memories by writing about them. They were harbouring inside me for too long. It was a kind of catharsis, the purging of emotions. It was most liberating”.

मारवा Sun, 12/21/2025 - 18:39
त्यातील प्रेमकथा ? Unique आहे. Unique love stories मध्ये Marquez ची love in the time of cholera. वरील कादंबरीतील प्रेमकथा आहे. Off human bondage ची वाचनीयता सुंदर आहे. Maughm ला bondage विषयी विचारलेल्या प्रश्नावर, why did you write one book that was full of candor and human warmth ? त्यावर मॉम ने दिलेले उत्तर " Because I have lived only one life.It took me thirty years of living to process the material for that one book ". वाचनीयता हा मॉम च्या सर्व लेखनाचा महत्वाचा प्लस फॅक्टरआहे.

In reply to by मारवा

हेमंतकुमार Sun, 12/21/2025 - 19:46
पूरक व माहितीपूर्ण प्रतिसाद . धन्यवाद !
Off human bondage
एक छोटीशी सुधारणा : हे शीर्षक Of human bondage असे आहे. Off व Of यामध्ये अर्थभिन्नता असल्याने गैरसमज होऊ नये म्हणून हे लिहिले.

वयाच्या विशीत जेव्हा आपण काही पुस्तके वाचतो आणि ती आवडतात तेव्हा त्यांचे लेखक आपल्या मनावर गारुड करतात आणि त्यातले काही तर कायमचा ठसा उमटवतात. वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत इंग्लिश साहित्याशी काही संबंधच आला नव्हता. नंतर मेडिकलला गेल्यानंतर ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झालो. खरं म्हणजे त्याचा उद्देश अभ्यासाच्या पुस्तकांसाठी होता. परंतु पहिल्याच दिवशी तिथे पाऊल टाकताच लक्षात आले की, अरेच्चा, इथे इंग्लिश गोष्टीची पुस्तके सुद्धा आहेत तर !

लक्ष लोलक तोलत

अनन्त्_यात्री ·

श्वेता२४ Fri, 12/05/2025 - 14:53
तोल ढळण्या आधीच हस्तिदंती मनोऱ्याचा कोष आवळून घेतो मीच माझ्या भोवतीचा

लक्ष लोलक तोलत उसळते निळी लाट किनाऱ्याशी फुटताना एक अतृप्ती उत्कट मावळतीच्या दिशेला फूल फुटे केशराचे निळ्या घुमटाला पडे कोडे कुण्या नक्षत्राचे तोल ढळण्या आधीच हस्तिदंती मनोऱ्याचा कोष आवळून घेतो मीच माझ्या भोवतीचा

परखड

नाहिद नालबंद ·
लेखनविषय:
काव्यरस
यामुळे वाट्यास माझ्या रोज परवड बोलतो कायम म्हणे मी फार परखड वेळ येता कर्जमाफीची बळीच्या मग तिजोरी शासनाची जाम खडखड एकही नेता गुणी ना भ्रष्ट सारे भाषणे आता तयांची हीन बडबड इंग्रजीला शक्य तितकी टाळतो मी टिकविण्या करतो मराठी हीच धडपड यामुळे हरकत तयांची लेखनाला वापरत नाही कधी मी शब्द जडजड