मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सैरभैर डायरी - १

कपिलमुनी ·

कांदा लिंबू गुरुवार, 01/01/2026 - 09:54
एक नंबर कपिलमुनी! नवीन वर्षातलं पहिलंच जनातलं, मनातलं वाचतोय; मस्त जमलंय. सुरुवात आकर्षक झालीय; शेवटही भारी होईल असे वाटतेय. पुभाप्र.

अभ्या.. गुरुवार, 01/01/2026 - 15:29
बेस्ट एकदम. शेवटी लिहायचे मनावर घेतला हे फार भारी झाले. . एकदम परफेक्ट जमलं आहे सगळच. येऊद्या एकेक भाग पटापटा.

लेखनविषय:
लेखनप्रकार
बेदरकार बेफिकीर असे पुण्यातील त्या दिवसांचे वर्णन करावे लागेल. गावाकडून कोणी येत नव्हता,फोनबिन भानगड नसल्याने काही विचारत नव्हता,घरी सांगत नव्हता. माझ्यासारख्या वळूला एवढे पुरेसे होते.. पेठेत तलाठी परीक्षा द्यायला आलेल्या किश्याने कॉइनबॉक्स मधून रूमवर फोन केला.. "आक्का अप्पाबळवंतचौकात विजय नरसिंग होमला ऍडमिट आहे, संध्याकाळी ये" इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही अशी घर मालकांची तंबी होती,त्यामुळे असे कोडवर्ड लागायचे..बहुतेक त्याची मनी ऑर्डर किंवा गावाकडून कोणीतरी पाकीट घेऊन आले असणार,त्याशिवाय हा भाड्या एवढा उदार व्हायचा नाही.

इतिहासाची दुरुस्ती

युयुत्सु ·

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Sat, 01/03/2026 - 11:33
मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच जाता जाता -- आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात कमी नाहीत

गामा पैलवान Wed, 12/31/2025 - 18:31
युयुत्सु, इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? माझ्या मते आज घटकेस असं समीकरण मांडता यावं : इतिहास = तथ्ये + दृष्टीकोन तथ्यांविषयी साधारणत: अभ्यासकांत एकमत असतं. परंतु दृष्टीकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो. किंबहुना 'पिंडे पिंडे मतिर्भिन्न' या न्यायाने तसा तो असावाच लागतो. जसजशी ऐतिहासिक साधनांची उपलब्धता वाढते तसतशी वेगवेगळी तथ्ये नव्याने उदयास येऊ शकतात. त्यानुसार दृष्टीकोन ठीकठाक करणे तर्कसंगत ठरावे. तर तुमच्या मते इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Wed, 12/31/2025 - 19:42
श्री० गा०पै० नवी तथ्ये सांगायला हरकत नाही,पण ती कोणत्या पद्धतीने सांगितली जातात, तसेच त्याचा भविष्यातले प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होतो का की कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना एव्हढेच साध्य होते? हा मुद्दा आहे...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान गुरुवार, 01/01/2026 - 00:09
युयुत्सु, नेमक्या याच कारणासाठी स्वत:चा दृष्टीकोन स्वत:च विकसित केलेला बरा पडतो. बाकी, एखादी कालबाह्य गोष्ट पुनर्स्थापित केल्याचं काही उदाहरण मिळेल काय? धन्यवाद! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 08:40
अनेक उदाहरणे देता येतील- ० २०२४ च्या निवडणूकीच्या वेळेला जो उन्माद बाहेर पडला त्यावेळेला अनेक कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना करायचा प्रयत्न केला गेला - त्यात सर्वात संतापजनक म्ह० मुलीना शिकवू नका कारण त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत. ० गोत्र, कन्यादान - या कालबाह्य, निरर्थक आणि अपमानकारक संकल्पनांचे उदात्तीकरण आणि पुरस्कार ० मनुस्मृती - https://www.youtube.com/shorts/b_K3wXnorGw ० बागेश्वर तत्सम बाबा-बुवांचे दरबार बघा. तिथे चालणारे 'मार्गदर्शन' पुरेसे आहे

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान गुरुवार, 01/01/2026 - 19:54
युयुत्सु, मुली जात्याच अनुलोमी ( = hypergamous ) असतात. स्वत:पेक्षा जास्त शिकलेला वा अधिक उत्पन्न असलेला मुलगाच पती म्हणून हवा असतो. मग लग्नाला उशीर होणारंच. गोत्र म्हणाल तर ती पद्धती हा य गुणसूत्र सांभाळून ठेवायचा एक प्रयत्न आहे : https://www.misalpav.com/comment/1001787#comment-1001787 कन्यादान भावनिक प्रश्न आहे. या तीन उदाहरणांचा इतिहासाच्या ( = राजकीय सत्ताकेंद्राच्या ) अभ्यासाशी थेट संबंध नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 21:02
श्री० गा०पै० गोत्राची पोलखोल माझ्या या लेखात विस्तृत्पणे केली आहे. यात अजुन ही कुणी चूक काढलेली नाही https://www.misalpav.com/node/52684

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Fri, 01/02/2026 - 21:25
हा हा हा! गोत्र पद्धतीमध्ये असंख्य चुका आहेत. मुख्य म्हणजे काहीही सिद्ध झालेले नाही. गोत्राला कायद्याने मान्यता नाही आणि मिळणार नाही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो- - एक गोत्र म्हणजे एक मूळ्पुरुष. म्हणजे त्या गोत्रातले सर्वाचे वाय-डीएनए एकच असायला हवे. मग समान गोत्रांचे उदा घेऊ उदा अत्रि गोत्राच्या पुरुषामध्ये एकच हॅप्लोग्रुप असायला हवा (एकापेक्षा एकही अधिक हॅप्लोग्रुप एका गोत्रात चालणार नाही). तेव्हढे तुम्ही मला सिद्ध करून दाखवा किंवा सिद्ध केलेले दाखवा. माझ्याकडून ५००१ररू (रू पाच हजार एक) जाहीर इनाम! - किमेरीझम बद्दल लिहीलेला लेख वाचला असेलच. वरील इनाम मिळवल्यास तुम्हाला अधिक प्रश्न विचारेन. उदा० सगोत्र बद्दल केल्या जाणार्‍या अडाणी प्रचाराबद्द्ल...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Fri, 01/02/2026 - 21:40
युयुत्सु, हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? हॅप्लोग्रुप रोगाचे वाहक आहेत का? या संबंधी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. माझ्या मते यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत सरसकटपणे गोत्रास अंधविश्वास मानणं कितपत उचित ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Fri, 01/02/2026 - 21:50
हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? एखाद्या जोडप्याला मुले होतात तेव्हा आईकडून एम टी डिएनए आणि पित्याकडून य डिएनए मिळते. पुरुषवंशात वाय डिएनए समान असते अशी धारणा आहे. पण तसे नसते. एम टी डिएनए आणि वाय डिएनए च्या रचनेनुसार केलेल्या वर्गीकरणाला हॅप्लोग्रुप असे नाव आहे. ज्यांची संख्या बरीच आहे.

In reply to by गामा पैलवान

कंजूस Sat, 01/03/2026 - 13:29
इतिहास बदलणे...... इतिहास आहे तिथेच आहे. फक्त त्यातली कोणती प्रकरणे शालेय पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत करायची किती पानांचा मजकूर घ्यायचा हे बदलले आहे.( म्हणजे हे पूर्वीपासून चालूच आहे.) ( अवांतर - भाषेसाठी कोणत्या लेखकांचे कोणत्या लेखनातून धडे घ्यायचे हे बदलत असते तसे.)

युयुत्सु Wed, 12/31/2025 - 18:55
संघ आणि भाजपा हे सतत इंग्रजांनी केलेल्या भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाचे दळण दळत असतात. पण ते याच वेळेला नेहेरूच्या कर्तृत्वाचं विकृतीकरण, पश्चिमेच्या ज्ञानाचे विकृतीकरण करत असतात. नथुरामने गांधीना मारले नसते तर गांधी इतके मोठे झाले नसते आणि सावरकर वि नेहेरू हा वाद पण निर्माण झाला नसता. माणसाना मारल्याने सहानुभूतीने मिळून ती जास्त मोठी होतात.

विवेकपटाईत Mon, 01/12/2026 - 11:28
अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. बाकी भारतात इतिहासावर गेल्या 200 वर्षांत शेकडो संशोधन झाले आहे. शेकडो जागांवर पुरातत्व विभाग , विभिन्न विश्वविद्यालय आणि अनेक राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय संस्थांनी जारो वर्ष जुना इतिहास खोदला आहे. पण तो संकलित करण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही आणि त्यावर निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न ही झाला नाही. बहुधा राजकीय दृष्ट्या वोट बॅंकशी संबंध नसल्याने राजनीतिक दृष्ट्या फायदेशीर नसावा. काही दिवसांपूर्वी आचार्य बाळकृष्ण यांना कुणी प्रश्न विचारला होता. world herbal encyclopedia (१०९ खंड 125000 जवळपास पाने) पूर्ण झाल्यावर पुढे काय. त्यांनी उत्तर दिले आपल्या देशात प्रत्येक भागात हजारों वर्ष जुना माणसांचा इतिहास आहे. त्यावर झालेल्या सर्व संशोधन आम्ही एका जागी एकत्र करतो आहे. काही वर्षांत हे कार्य निश्चित पूर्ण होईल. भारताचा माहीत नसलेला सर्वांसमोर येईल. (एक कोटीच्या जवळ पांडुलीपीं पानांचे डिजिटल करण्याचे काम ही आता पर्यन्त झाले आहे) बाकी माझे मत - अधिकान्श पुरोगामी आणि मानसिक दृष्ट्या गुलामांना खरा इतिहास पचणार नाही.

In reply to by विवेकपटाईत

युयुत्सु Tue, 01/13/2026 - 09:03
श्री० पटाईत अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. किशन लाल ने प्रजा वाढविण्याशिवाय जर काही पराक्रम आयुष्यात केला नसेल तर त्याचं नाव कशाला घ्यायचे? इतिहास दुरुस्त करण्याने भविष्य घडत नाही.

माझे वडील संघात जायचे आणि मी ही जावे म्हणुन आग्रही असायचे. ते २००५ मध्ये गेले. परवा जुनी कपाटे आवरताना माझ्या वडीलांचा लंगोट सापडला. त्यात नागपूरचे रेल्वे तिकीट होते. ते बघताना माझ्या अंगावर शहारे आले. पण वडीलांनी नागपूरला/रेशीमबागेला भेट दिली होती हे मला कधीच का सांगीतले नाही, हा प्रश्न सतावत राहिला. ईत्यादी ईत्यादी...

 इतिहासाची दुरुस्ती ========== - राजीव उपाध्ये इतिहासाची दुरुस्ती करण्याचा सध्या एक मोठ्ठा खटाटोप चालला आहे. भारताचा सध्याचा आकार आणि भविष्यात निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेतले तर या उद्योगाने काय साधलं जाईल असा प्रश्न पडतो. एका मित्राने पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सन्याल यांची एक मुलाखत पाठवली https://youtu.be/u0TV6h2v2qE?si=CRL_8aLnKo01b5Oi). संजीव संन्याल रेशीमबागेतील विद्वानांपेक्षा बरेच सुसह्य आहेत. मुलाखातीचा बहुतेक भाग भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाबद्दल आहे. ही मुलाखत बघताना वरील प्रश्न पडला. एक उदा० देतो.

"चित्रगुप्ताचा न्याय: सेल्फी घेणारा माकड झाला"

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्याचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा एका प्रकाशमार्गाने चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. त्याला समोर एक विशाल न्यायासन दिसले , त्यावर चित्रगुप्त विराजमान होते . ते धवल वस्त्रात, तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या पुढ्यात असंख्य ग्रंथ होते. त्यात पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब होता. चित्रगुप्ताने विचारले, “कुठे जाण्याची इच्छा आहे?” तो आत्मा म्हणाला, “माझ्या जीवनात अनेक चुका झाल्या, पण शेवटी मी भगवंताच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या चरणी क्षमा मागितली. माझे पाप नष्ट झाले. मला स्वर्ग मिळाला पाहिजे.” चित्रगुप्ताने एक जड ग्रंथ उघडला.

पर्व -भैरप्पा लिखित महाकादंबरी (ऐसी अक्षरे -३७)

Bhakti ·

प्रचेतस Tue, 12/30/2025 - 12:11
उत्तम परिचय. 'पर्व' वाचलेली आहेच, संग्रहीही आहे. मात्र भैरप्पांची असूनही मला ती तितकीशी नाही आवडली. कदाचित मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत. मात्र भैरप्पांची ही कादंबरी खूप वेगळी आहे. 'युगंधर' मध्ये शिवाजी सावतांनी कशी श्रीकृष्णचरित्राची वाट लावली आहे तसे न करता भैरप्पा ह्यांनी एक नवाच दृष्टीकोन दिला आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti Tue, 12/30/2025 - 14:27
मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
अगदी प्रत्यक्ष सुर्य जवळ असताना काजवा कसा खुणावेल :) माझ्यासारख्या सन्थ वाचकाला मुळ महाभारत वाचायला अजुन किमान ६-७ वर्षे तयारी करावी लागेल.'युगंधर',युगान्त,आणि आता अर्जुन ,द्रौपदी अशीही पुस्तके येतात ती वाचायची इच्छा कधीच होत नाही..पण भैरप्पा यान्चि इतकी उत्तम कादम्बरी अजुन लोकप्रिय व्हायला पाहिजे ती तितकी झाली नाही.

In reply to by प्रचेतस

धर्मराजमुटके Tue, 12/30/2025 - 17:38

सहमत आहे. मी सुद्धा मुळ ग्रंथ पहिले वाचले आणि नंतर त्यावरील टीका (म्हणजे इतर पुस्तके).

In reply to by कांदा लिंबू

Bhakti Wed, 12/31/2025 - 21:19
आवरण वाचली आहे.खुपच अभ्यासपूर्ण कादंबरी आहे,तशीच करूण घटनांनी भरलेली आहे. पहिल्या ४ वर्षांतच या कादंबरीच्या ३४ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या, जो भारतीय कादंबरीविश्वात एक महत्त्वाचा विक्रम मानला जातो.

पर्व 1 मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. #भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' साहित्यातील एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे.

चित्रपट परीक्षण -लूसी

राजेंद्र मेहेंदळे ·

कांदा लिंबू Mon, 12/29/2025 - 13:39
माझ्या मुलाच्या सुचवणीमुळे त्याच्याच बरोबर बसून... #MeToo हा चित्रपट मी दोन-तीनदा पाहिलाय. ‌ मला आवडला. इतरांनाही पाहण्याची शिफारस करीन. ‌ --- सिनेमाची ओळख खूप चांगली करून दिली आहे.

In reply to by कांदा लिंबू

कांदा लिंबू Mon, 12/29/2025 - 16:39
लूसी (२०१४) आवडली असेल तर लिमिटलेस् (२०११) देखील कदाचित आवडेल. प्राथमिक कल्पना बीज एकच आहे; मांडणी अगदी वेगवेगळी आहे.

In reply to by कांदा लिंबू

Bhakti Tue, 12/30/2025 - 15:03
लिमिटलेस्
खिळवुन ठेवणारा सिनेमा आहे. मोरा हा लुसीचा भाऊच आहे :).पण नायक कस ड्रगचे परिणाम ताब्यात करतो,तो नवीन गोळी कशी तयार करतो,हे शेवटी दाखवायला पाहिजे होते.

स्पॉयलर अलर्टमुळे लेख वाचला नाही पण ह्या सिनेमाच्या एक दोन क्लिप पाहिल्या आहेत बकेट लिस्ट मधे आहे, बाकी हिरॉइन कातील सुंदर दिसली आहे ह्यात.

Bhakti Mon, 12/29/2025 - 15:25
खुप छान ..इन्स्ट्र्स्टेलर / interstellor हा सर्वात बेस्ट सायफाय सिनेमा कळायच्या आधी ल्युसी माझी सर्वान्त प्रिय होती :) अजुनहि आहेच!! मानवी मेन्दु हा स्वतन्त्र खोल अभ्यासाचा विषय आहे.Scarlett Johansson ने क्लासिक अभिनय केला आहे.ती भुतकाळात जाउन आदिमानवाच्या बोटाला स्वतःच्या बोटाने हात लावते,तो सीन मला खुप आवडतो.पार्ट-२ येणार नुसतीच अफवा आहे की खरे कोण जाणे.

विजुभाऊ Mon, 12/29/2025 - 18:33
ल्यूसी सिनेमातील तर्कट आपल्याला पटते हेच तर साय फाय ची करामत आहे. ल्यूसी मधे जे घडते ते खरेच खरे आहे का यावर आपण विचार करत बसतो. सायफाय चित्रपट असूनही रंजक पद्धतीने मांडलेला आहे. अगदी मॅट्रीक्स इतका म्हणणार नाही. प्ण अ‍ॅक्षन देखील मस्त घेतली आहे. वेगवान चित्रपट आहे. पहाताना मजा येते.

सोत्रि Tue, 12/30/2025 - 09:57
चित्रपट उत्तम आहेच, वर स्कार्लेट तर अतिउत्तम !! कांदा लिंबूंनी सांगितलेला लिमीटलेशी अत्यंत सुंदर आणि वेगवान सिनेमा आहे. माझी त्याची पारायणं झाली आहेत इतक मला तो आवडातो. - (मुव्ही बफ) सोकाजी

धर्मराजमुटके Tue, 12/30/2025 - 17:36
आमच्या सोसायटीत लूसी नावाची कुत्री आहे तिच्यावरुन सोसायटी मेंंबरांत तुंबळ व्हाटसपयुद्ध झाले होते त्याची आठवण झाली. हे नावच बहुधा कमनशिबी दिसतेय. चित्रपट पाहणेत येईल. अवांतर :
मी हा चित्रपट एच बी ओ की अँड फ्लिक्स वर बघितला
स्मरणशक्ती दांडगी करण्यासाठी काही औषध असेल काय ते घ्या आणि मला पण सुचवा. हल्ली फार विसरायला होतं.

नमस्कार मंडळी माझ्या मुलाच्या सुचवणीमुळे त्याच्याच बरोबर बसून मी हा चित्रपट एच बी ओ की अँड फ्लिक्स वर बघितला आणि हैराण झालो. त्याची ही ओळख.(स्पॉयलर-ज्यांना साय फाय किवा तत्सम चित्रपट बघायला आवडतात त्यांनी थेट बघा, नाहीतर म्हणाल स्टोरी फोडली) तर चित्रपटाची नायिका लूसी ही एक सामान्य मुलगी आहे आणि चित्रपटाच्या सुरुवातीलाच तिचा काही दिवसांपूर्वीच ओळख झालेला बॉयफ्रेंड तिला एक काम सांगतो. तो म्हणतो की त्यांच्याकडची सुटकेस समोरच्या हॉटेलातील काउंटरवर नेऊन दिलीस तर तुला एक हजार डॉलर मिळतील. अर्थात हा काहीतरी झोल असणार असे वाटून ती नकार देते.

५- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माईदेखील पोटुशी होती. त्यामुळे तीला यायला जमले नव्हते. मी घरी आले.काही दिवस शरीराला आराम मिळाला.माई अवघडलेली होती. तीला बिचारीला त्रास होतोय ते मला कळत होते. पण मलाही थोडा आराम मिळाला. घरातल्या कामाचे काही वाटत नाही.पण वैकुंठरावांच्या त्रासापासून काही दिवसतरी सुटका झाली. क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53387 मला डोहाळ्यांचा त्रास व्हायला लागला. काहीही खाल्ले की पोटात टिकत नाही. कसली कसली स्वप्ने पडायला लागली.

संस्कृती लेखिका- इरावती कर्वे (ऐसि अक्षरे-३६)

Bhakti ·

Bhakti Sun, 12/28/2025 - 08:46
सर्वांना धन्यवाद :)
तिकडे प्रतिक्रिया देता येत नाहीत. [ Video settings : made for kids केले असल्याने].
हे नव्हते माहिती.पुढच्यावेळी हा पर्याय निवडणार नाही.खुप खुप धन्यवाद कंकाका

Bhakti Mon, 12/29/2025 - 15:46
या पुस्तकाचे प्रकाशक देशमुख ॲन्ड देशमुख यांनी चेपूवरील त्यांच्या पेजवर माझा ह्या पुस्तकाचा परिचय शेअर केलाय(लाईक खुप कमी आहेत पण दखल घेतल्याचे तेवढंच सुख :))

संस्कृती लेखिका- इरावती कर्वे
संस्कृती म्हणजे संचय... वर्तमानकाळात श्रीमंत भूतकाळची कर्तबगारी मागच्या पिढीकडून जे जे मिळाले ते . ५०-७० वर्षापूर्वीचे हे संस्कृती पुस्तकातील समाजमनाचे विश्लेषण करणारे लेख आजही काळातीत आहे.इरावतीबाईंची 'आमची संस्कृती' ,'मराठी लोकांची संस्कृती' ही पुस्तकेदेखील मानववंशशास्त्र हा त्यांचा विषय या दृष्टिकोणातून लिहिला आहे. 'मराठी लोकांची संस्कृती' या पुस्तकाची पीडीएफ आंतरजालावर सहज मिळेल,नक्की वाचा.

४- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वैकुंठराव अगोदरच कुठेतरी निघून गेले होते. सासुबाईंनी ओठावर लावायला सायीची वाटी दिली. म्हणल्या हे लाव.तोंडावर. आणि सगळं आवरून मगच ये बाहेर. भरल्या घरात असलं रडव्या तोंडाने नांदायचे नसते. लक्ष्मी बाहेर निघून जाते अशाने. क्रमशः मागील दुवा : https://www.misalpav.com/node/53386 खूप गदगदून रडायचे होते पण गळ्यातले त्राणच संपून गेले होते. त्या दिवशी तशीच पडून राहिले. खाण्यापिण्याचीही वासना हरवली होती. संध्याकाळी सासूबाई नी जवळ घेतले. माझ्या पाठीवरून तोंडावरून हात फिरवला. मला माई आठवली. मला कुठे दुखले खुपले की ती ही असेच करायचे. माझ्या डोक्यावर हात फिरवत सासूबाई म्हणाल्या. खा पोरी दोन घास खाऊन घे.

३- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तोच विचार होता अगोदर. आणि तेच केलं असते पण वैकुंठरावाना गोपीकाबाई च आवडल्या . त्यामुळे यावं लागलं इकडे. आतोबा हसतात. क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53380 अगे कौसल्ये असे कसे म्हणतेस. समोरून चालून स्थळ आलंय तर नको का म्हणतेस. दुर्गा आज्ज्जी आता या बोलण्यात पुढे आली. जोडा कसा राम सीतेसारखा शोभेल. मला कळतंच नव्हते काय चाललंय ते. जोडा आणि सोयरीक हे दोन नवीन शब्द माहीत झाले इतकेच. बैलजोडी माहीत होती. पण जोडा हे काहितरी नवीनच. घरात का ठेवणार आहेस. मुलीला, मी या वयाची होते तेंव्हा सासूबाईच्या हाताखाली स्वयंपाक शिकत होते. आडाचे पाणी शेंदायचे, दोन दोन खंडी ज्वारीचे पीठ दळायचे.

सर्वांना शुभेच्छा!

युयुत्सु ·
लेखनविषय:
 प्रभु येशूच्या जन्मदिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा! :) ए०आय० चिरायु होवो! येणारा काळ आणि तंत्रज्ञान तुम्हाला उत्कर्ष साधण्यास मदत करो!