मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लक्ष लोलक तोलत

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
लक्ष लोलक तोलत उसळते निळी लाट किनाऱ्याशी फुटताना एक अतृप्ती उत्कट मावळतीच्या दिशेला फूल फुटे केशराचे निळ्या घुमटाला पडे कोडे कुण्या नक्षत्राचे तोल ढळण्या आधीच हस्तिदंती मनोऱ्याचा कोष आवळून घेतो मीच माझ्या भोवतीचा

वाचने 633 वाचनखूण प्रतिक्रिया 2

श्वेता२४ Fri, 12/05/2025 - 14:53
तोल ढळण्या आधीच हस्तिदंती मनोऱ्याचा कोष आवळून घेतो मीच माझ्या भोवतीचा