मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धुके असे पडले की

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
धुके असे पडले की धुके असे पडले की धुक्याचा महाल आकाशी सोपान त्याचा असा की त्यावरी उभी तू टोकाशी तू परी अस्मानीची मी फकीर धरतीचा वाट अशी भयंकर मार्ग नसे परतीचा विचार तरी काय करावा ? तोही थांबला तर्कापाशी सोपानावरून खुणवू नको जीवाची होईल तडफड तुजसवे वर जायाचे तर प्राणपाखरू करेल धडपड इथे जगुनी काय करावे ? आता जावे स्वर्गलोकाशी

मिताली राजला आउट करणारी नांदेडची मुलगी

मार्गी ·
लेखनप्रकार
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्‍यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्‍या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्‍या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!

शाळेची वेळ झाली -बालकविता

बिपीन सुरेश सांगळे ·

nutanm Mon, 11/10/2025 - 04:52
पोराना काय मुलाना पोरकी ती पोरे आपण व्यवस्थित आईवडिल परेसा पैसा असल्यावर आपलीच मुले ती . माझ्या आईला कधीच पोरे म्हटलेले आवडायचे नाही कारण आमचे सर्व त्यानी त्यान्चयाकडे असलेल़या साधारण पैशात व्यवसथित केले. असो राग नसावा. माझे विचार सान्गितले.

In reply to by nutanm

सौन्दर्य Fri, 11/14/2025 - 00:27
तुमचे हे मत वाचेपर्यंत पोरे व मुले ह्यात फारसा फरक असेल असा विचार केला नव्हता. 'पोरे' म्हणजे आसपासचे सगळेच बालगोपाल, व 'मुले' म्हणजे स्वताची अपत्ये किंवा ओळखीची मुले असा सर्वसाधारण फरक माझ्या मनात होता.

नूतनजी भावना पोचल्या आभार पोरं हा एक सर्वसाधारण शब्द आहे आणि मुलंच असं म्हणायचं असेल तर - माझी मुलं आता शाळेत जात नाहीत , ही कविता त्यांच्यासाठी नाही ! LOL

अभ्या.. Mon, 11/17/2025 - 03:31
अरे वा, असली सेम कविता आम्ही (स्वआ.ब.) आमच्या मिपालहानपणी मिपावरच केलेली होती. अर्थात ते विडंबन होते पण आशय हाच. https://www.misalpav.com/node/36113 . तेव्हा निर्मळ मनाने भरभरुन प्रतिसाद देणारे होते म्हणून लिहूही वाटायचे. असो......

शाळेची वेळ झाली चला चला बॅग भरा चला चला डबा भरा शाळेची वेळ झाली शाळेची वेळ झाली एक वही सापडत नाही गृहपाठाचा पत्ता नाही पेन्सिल तर तुटकी बाई पेनामधून गळते शाई शाळेची वेळ झाली अंघोळ म्हणजे दोनच तांबे नुसती बुडबुड जरा न लांबे बाबांची तर चाले लुडबूड टॉवेल मिळेतो माझी कुडकूड शाळेची वेळ झाली डब्यात काय ? पोळीचा रोल आणि दोन बिस्किटं गोल शाळा माझी तिची घाई कित्ती कामं करते आई शाळेची वेळ झाली घाई आमची झाली भारी तोच व्हॅन आली दारी पण आई घे ना पापा नाहीतर करणार नाही टाटा शाळेची वेळ झाली

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला (तरही)

नाहिद नालबंद ·
लेखनविषय:
काव्यरस
सानी मिसऱ्याची ओळ क्रांतिताई (क्रांति साडेकर) यांची, तरही साठी ओळीबद्दल आभार, त्यांना न विचारता ही ओळ वापरली त्याबद्दल क्षमस्व!

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा! ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक‌ आणि मस्ती की पाठशाला ✪ पानी‌ में शिरा और मस्त पोहा! ✪ अंजवेलमधलं भूताचं झाड… ✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच ✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या! ✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग ✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना ✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा ✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण ✪ सारखी तीच ती‌ संख्या कशी येतेय? ✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे ✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद ✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी! ✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि

निसर्ग आणि माणूसपणाच्या कविता- प्रहरांच्या अक्षरनोंदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

कंजूस Wed, 10/29/2025 - 21:58
चांगला परिचय. >> सर्वात महत्वाचं म्हणजे जवळ जवळ चाळीस पेक्षा अधिक कविता या विविध वृत्तबद्ध रचना आहेत, त्या अधिक वाचनीय झाल्या आहेत. मुक्तछंदातील कविताही तितक्याच सुंदर आहेत. >> - नेमकं.

अभ्या.. Wed, 10/29/2025 - 22:08
अरे वा. अभिनंदन दिपाली वहिनी. अनोखी भेट. . मला तर मराठी ठाकूर म्हणाले की मिपा बल्लव गणपा हाच आठवतो ;)

गवि Wed, 10/29/2025 - 22:20
उत्तम परिचय. त्यांच्या कविता नेहमीच लयबद्ध आणि गेयता असलेल्या .. नेहमीच आवडतात.

मी-दिपाली गुरुवार, 10/30/2025 - 09:26
धन्यवाद प्रा. डॉ. Dilip Birute सर! आपण माझ्या काव्यसंग्रहाची इतकी आवर्जून आणि आस्थेने दखल घेतलीत त्याबद्दल मनापासून आभार! यामधून आपलीही कवितेविषयी, साहित्याविषयी असणारी बांधिलकी, जाणीव आणि जाण दिसून आली. पुस्तक योग्य हाती गेल्याचं समाधान किती महत्त्वाचं आहे, ते या निमित्ताने समजलं. _/\_

परिचय करुन दिलेल्या काव्यसंग्रहाच्या कवींनीही दखल घ्यावी, दाद द्यावी ही गोष्ट लिहित्या-बोलत्या वाचकांसाठी तशी आनंदायी गोष्ट असते. मी-दीपाली आपण दखल घेतली, दाद दिली आभार. खरं तर, कविता वाचत गेलो, थांबत गेलो वाचत गेलो आणि जे उत्स्फूर्तपणे वाटलं ते लिहूनही टाकलं. खरं, तर अजून खूप काही लिहिता येईल अशा त्या प्रहरांच्या अक्षर नोंदी आहेत. धाग्यातही लिहिले होते की अनेक नोंदी सुटल्या. एक वाचक मित्र म्हणाले सर, थेट शांताबाई शेळके, इंदिरा संत यांची आठवण केली असे म्हणालात तर ते अधिक स्पष्ट करता येईल का ? मग आम्ही बोलत बसलो. निसर्ग पाहुन कोणाच्याही मनामधे प्रेम, आपूलकी निर्माण व्हावी. रंग, गंधात रमून जावे हा माणसाचा तसा नैसर्गिक स्वभाव आहे. माणूस घडतो, व्यक्तीमत्वविकास होतो. पाना-फुलांशी बोलायला जवळ जवळ सर्वांना आवडतं. निसर्गाची ओढ माणसाला जन्मजात असते. निसर्गात कोणास प्रियकर दिसतो, कोणास आई दिसते, कोणास मित्र दिसतो, मैत्रीण दिसते आणि आपला संवाद सुरु होतो. अशाच नोंदी प्रहरांच्या अक्षरनोंदीत दिसतात. कविता वाचतांना, इंदिराबाईंची आठवण व्हावी त्याचं कारण आसे की, त्यांचंही बालपण खेड्यात गेलं. बालपणापासून त्यांना निसर्गसहवास लाभला. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेताही त्यांचा निसर्ग संवाद सुरुच होता. आणि ते त्यांचं जीवनच बनून गेले. जुन्या काळी ओव्या आणि निसर्ग, गाणी हा जवळ जवळ जुन्या कुटुंबाचा भागच होता. निसर्गाशी संवास सुरु झालं की ते गाणं होतं. त्यांची एक 'कसे हासू' नावाची कविता आहे.
अंगणात जाई जुई हस तसे बिनमोल मन जाई खोलखोल झुळु झुळू येई वारा पाने फुले हालवीत मन पर्री थरारत.
साधा पाना फुलांना जागवणा-या वा-यांनी सुद्धा कवयित्रीचं मन थरारून जातं. साधी सोपी रचना असते आशय मात्र खोलवर जाणारा असतो. 'मन जाई खोल खोल' असा तो संवाद सुरु असतो. अशा अनेक त्यांच्या कविता आहेत. दीपाली ठाकूर यांचाही निसर्गाशी असाच स्नेह आणि संवाद आहे. त्यांची कविता त्याच वळणांची आहे, दीपाली ठाकूर म्हणतात-
वाट पाहती मिटून पाकळ्या जरा कोणत्या दिशेस तो असे रंगसोयरा पान पान आर्त सांगते ऋतूस संहिता साजि-या क्षणात जागल्या दिठी जुन्या व्यथा ( पुन्हा पुन्हा )
'पाकळ्या मिटून असतात, म्हणजे त्या वाट पाहात असतात' हे कोणाला सुचतं ? निसर्गप्रतिमा हे या कवितेंची वैशिष्ट्ये आहेत. असा तो सारखा निसर्ग संबंध काव्यसंग्रहात दिसून येतो. निसर्गाशी एकरुप झालेली ती कविता. अशा त्या गप्पा रंगल्या. निसर्गातील तरलेतेने आलेला अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, निसर्गातील घटनांची संवेदनशीलता ही केवळ कवयित्रीपुरते मर्यादित राहात नाही. निसर्गकविता कवीची राहात नाही तर, तो निसर्ग अनुभव वाचक, समीक्षक, यांनाही तितकाच उत्कटतेने येतो हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्ये आहे, श्रीमंती आहे. मिपाकर, वाचक, प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनापासून -दिलीप बिरुटे

‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.

तुरीच्या दाण्यांची कचोरी

Bhakti ·

कंजूस Mon, 10/27/2025 - 06:33
एक फोटो झाडाचाही हवा. >> दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे>> वा. कचोरी झकास लागणारच. दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे

टर्मीनेटर Mon, 10/27/2025 - 12:46
भारीच 👍 "ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे." सुरुवातीला हे वाचल्यावर मलापण ही शेगाव कचोरीची रेसिपी असावी असेच वाटले होते... वर श्वेता२४ ह्यांनी चवीबद्दल जे म्हंटले आहे तीच शंका माझीही आहे, चव सेम असते की काही फरक आहे?

Bhakti Mon, 10/27/2025 - 13:23
सर्वांना धन्यवाद! चव शेगावच्या कचोऱ्यांसारखी नाही वाटली. पण असाच पदार्थ गोल गोल तुरीच्या दाण्यांची+मटार दाण्यांची गुजरातमध्ये लिलवानी कचोरी म्हणून प्रसिद्ध आहे.ही माहिती मला दुसऱ्या ग्रुप वरून समजली.लिलवाचा अर्थ म्हणजे बहुतेक तूर असावा. बाकी मी फक्त तूरीच्या दाण्यांचीच कचोरी करणार होते.पण म्हटलं चव फसली तर... म्हणून मटार दाणे पण वापरायचं ठरवलं.पण अशी कचोरी अलरेडी इन्व्हेंट झाली आहे हे पाहून कमालच वाटली.मी योगायोगांवर खुप विश्वास ठेवते.काय भारी योगायोग जुळून आला,गंमतच वाटली :)

कर्नलतपस्वी Mon, 10/27/2025 - 14:05
तुरीच्या झाडाला,भुईला वाकल्या दाण्याने भरल्या, खुणावू लागल्या, जीभ ही चटोरी, लपलप करी केली मी कचोरी कुरकुरीत..... मस्त रेसीपी. उकडलेल्या तुरीच्या शेंगा भारी लागतात.

मारवा गुरुवार, 10/30/2025 - 01:57
तुमच्या बऱ्या अर्ध्याची मज्जा आहे. एकूण प्रकरण चविष्ट दिसतंय. तुरीची तिखट आमटी फक्त माहिती होती. तुरीकचोरी नवी माहिती झाली.

"तुरीच्या दाण्यांची कचोरी" ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगांपासून काढलेले हिरवे दाणे वापरून बनवली जाणारी ही कचोरी कुरकुरीत आणि मसालेदार असते.