मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

~ गंध धुंद ~

किल्लेदार ·

नचिकेत जवखेडकर गुरुवार, 11/06/2025 - 11:43
सुंदर सुगंधित लेख. परफ्युमची लहानपणापासूनच ऍलर्जी असल्याने कधीच फार वापरता येत नाही. मध्ये एकदा धीर करून एक बाटली आणली पण लगेच त्रास चालू झाला. तशीच पडून आहे कपाटात.

विजुभाऊ Fri, 11/07/2025 - 10:35
खल्ल्लास....... वाचूनच एकदम धुंद झालो. लै भारी लिहीलेय भाऊ. गंध , वाईन आणि स्कॉच मधे प्रायमरी नोट्स आणि सब नोट्स चे प्रकरण तसे क्लासेस साठीच असते. पानडी आणि व्हाईट रोझ हे आमच्यासाठी चे अस्सल देशी गंध. त्यानंतर कॉलेजात असताना कधीतरी इंटीमेट हे नाव ऐकन्यात आले. डीओ वगैरे प्रकार फारसे जमले नाहीत म्हणून आजमावले नाहीत. कधीतरी आणलेले आणि फक्त खास कार्यक्रम वगैरे साठी जपून ठेवलेले इंटिमेंट , सँडलवुड वगैरे चे फवारे कॉलेजवयीन चिरंजीवाने सढळ हाताने वापरून संपवले. मग ठरवले की फक्त फवारे न आणता अत्तरे च आणायची तेंव्हा पारिजात आणि सोनचाफा या गंधात अडकलो. एकदा बहारीन वरून येताना ओउध ( ऊद) आणले. पण तो वास उग्र ठरला. काही गंध आठवले तरी बर्‍याच जुन्या आठवणी जागृत होतात. हे मात्र खरे

Bhakti Fri, 11/07/2025 - 11:38
वाह! खुपच सुवासिक लेख आहे.फुलांचे सुगंधित परफ्यूम भारतात तरी अधिक प्रचलित आहेत.तेव्हा प्राणीजन्य गोष्टी यासाठी कशाप्रकारे वापरल्या जातात हे नव्यानेच समजलं.

किल्लेदार Sat, 11/08/2025 - 03:35
नचिकेत जवखेडकर- अरेरे. बाटली तशीच असेल तर मी येऊन घेऊन जातो :) कर्नलतपस्वी - हाहा...धन्यवाद. सिरुसेरि, Bhakti - धन्यवाद विजुभाऊ - उद जरा उग्र असतो खरा. मी एकच वापरला. Versache Oud Noir. मस्त आहे. अत्तरे चांगली असतात पण जरा एकसुरी असल्यामुळे थोडी बोअरिंग वाटतात.

प्रचेतस Mon, 11/10/2025 - 12:52
एकदम धुंद फुंद करणारा लेख. बाकी काही पर्फ्युम कितीही महागडे आणि भारी असले तरी आपल्याला आवडतील असे नव्हे. आपल्याला आवडणारा एखादाच मिळतो आणि आपण त्याचे पंखे होऊन जातो. मला आवडलेला आणि रुचत आलेला म्हणजे डियोर सॉवेज. तो एकदा वापरला पण इतका महागडा सतत वापरायला परवडणे शक्य नाही मग त्याचा क्लोन अजमलचा झील वापरतो. अजमल, अर्माफ ह्या दोन्ही प्रतिष्ठित कंपन्या महागडया पर्फ्युम्सचे उत्तम दर्जाचे क्लोन्स तयार करतात. अर्थात अजमल, अर्माफ वापरणेही तसे महागातच जाते ही गोष्ट वेगळी.

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे Tue, 11/11/2025 - 11:37
सुगंधच नव्हे तर कोणतीही कला आपल्याला आवडेल तीच महत्त्वाची आहे उगाच ती महाग आहे किंवा जास्त लोकांना आवडते म्हणून आपण आवडून घ्यावे असे काहीही नाही. मुळात कला चित्रकला हस्तकला शिल्पकला गायन वादन सुगंध किंवा कपडा या गोष्टी आपल्या पंचेंद्रियांना आनंद देणाऱ्या असाव्यात. तुमचा पिंड नसेल तर उगाच खादीचे जाडे भरडे कपडे घालून कोणत्यातरी अगम्य चित्रकलेच्या प्रदर्शनात आपली अभिरुची उच्च आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारे असंख्य लोक आढळतात तसेच अरमानी किंवा गुच्ची चं "औ द तॊईलेत" केवळ महाग आहे म्हणून तुम्हाला आवडलं पाहिजे असं मुळीच नाही. आपण चार पैसे मिळवतो म्हणून आपल्याला भरपूर महाग सुगंध आवडेलच पाहिजे असे नव्हे. हि केवळ गतानुगतिकता आहे. आपल्याला नाट्यसंगीत आवडत असेल तर आवडत नसलेल्या कोणत्यातरी कंटेम्पररी गझल गायकाच्या कार्यक्रमाला १५००० रुपये देऊन निमंत्रितांच्या रांगेत जाण्याची आवश्यकता नाही. एके काळी कॉर्पोरेट जगात आपण सी इ ओ असलो तर आपल्या कडे काळं बेरं (BLACKBERRY) असलाच पाहिजे असा अलिखित नियम होता या गतानुगतिकतेते आजही असंख्य लोक दिसतात आणि उगाच तसाच असायला पाहजे म्हणून स्वतः;ला त्रास होत असताना सुद्धा अट्टाहासाने आपण कसं एन्जॉय करतो आहोत हे जगाला पटवून देण्याचा अट्टहास करताना आढळतात चालायचंच

किल्लेदार Tue, 11/11/2025 - 16:03
प्रचेतस - डियोर महागडा आहे खरा पण क्लोनही चांगले आहेत. सुबोध खरे - खरंय. उगाच महाग आहे म्हणून काहीही आवडून घेण्यात अर्थ नाही. पण पैसे टाकले की गुणवत्ता सहसा चांगली मिळते, अर्थात त्यालाही बरेच अपवाद आहेतच. खिशाला परवडत असेल, आवड असेल आणि खर्च केलेले पैसे वसूल होत असतील तर काहीच हरकत नाही पण उगाच हाईपच्या मागे लागण्यात अर्थ नाही. महागड्या ब्रँड च्या किंमतीत बराचसा भाग हाइपचा आणि ब्रॅण्डिंग चा असला तरी चांगला कच्चा माल वापरलेला असल्यामुळे ब्रँडेड प्रॉडक्ट वापरण्यातले समाधान आणि मजाही वेगळी असते.

गामा पैलवान Fri, 12/05/2025 - 00:49
किल्लेदार, लेख चांगलाच खुसखुशीत झालाय. गंधांची दुनिया अजब असते. लेखातल्या बऱ्याच गोष्टींशी नातेगत ( = रीलेट ) होऊ शकलो. विशेषत: सुगंधी पट्टीशी अगदी घट्टपणे ! ;-) आयुर्वेदांत नासिकेस मेंदूचे द्वार म्हंटलंय. म्हणूनंच गांधांमुळे स्मृती चटकन जागृत होत असाव्यात. आ.न., -गा.पै.

गवि Fri, 12/05/2025 - 08:37
लेख बेहद्द आवडला. शैली, कोटीबाजपणा, विस्तार .. सगळंच एकदम भारी. एखादा सुगंध आपल्याला टेलिपोर्ट करून विशिष्ट जागी, विशिष्ट जगात नेतो हे अगदी पटलं. पॅरिसमध्ये आणि युरोपात कुठल्या कुठल्या परफ्युमरीज फिरून बघितल्याचं आठवतं. फ्रॅगोनार्ड किंवा तत्सम एक नाव आठवतं. कागदाच्या पट्ट्यांवर फवारा आणि मग त्या खिशात घेऊन फिरणे वगैरे सर्व आठवले. मिट्टी परफ्यूम. भारी कंपनीचा घेतल्यास खरा शुद्ध मातीचा सुगंध मिळतो. बाकी ठिकाणी त्यात इतर कायकाय घातलेले असते.

परफ्यूम आवडतं, त्यामुळे लेख थेट भिडला. शैली भारी. खुसखुशीत आणि तितकेच भारी संदर्भ. सकाळ गंधीत झाली. खरं, म्हणजे लेखनाचं कौतुक करायला खूप पानभर लिहायला पाहिजे. इतका भारी लेख आहे. अतिशय सुंदर. लै म्हणजे लै आवडलं लेखन. भावना पोचल्या असतील. दै. लोकमतच्या दीपोत्सवात २०२५ यावेळी कन्नौजच्या अत्तरावर खूप सुंदर लेख आहे. दीडहजार वर्षापासून या कन्नौजला अत्तराचा गंध आहे, तेथील ग़टारांना अत्तराचा गंध आहे, इतके अत्तर तिकडे तयार होतं. कन्नौजवर फिर कभी बोलूया...........! -दिलीप बिरुटे

वेदांत Fri, 12/05/2025 - 12:46
खुप मस्त लेख झाला आहे. अत्तर / परफ्युम हा माझा खूप आवडता विषय.. अत्तर पासुन सुरू करता करता, आता आवडत्या परफ्युम्स ची पूर्ण बोटल मागावण्या पर्यंत मजल गेली आहे. Mancera Cedrat Boise हा तर माझ्या सर्वात आवडता परफ्यूम.. Creed Aventus च्या डीएनए चा क्लोन असला तरीही थोडा वेगळा आहे. कोणत्याही ऋतूमध्ये वापरता येतो आणि नेहमीच कॉम्प्लिमेंट्स मिळतात. Armaaf चा CDNI पण याच वाटेने जातो. सध्या मिडल ईस्टर्न परफ्युम्स पण चांगले येत आहेत , उदाहरण द्यायचे म्हटले तर Afnaan che 9PM, 9PM एलेक्सिर, सुप्रीमसी कलेक्टर एडिशन /नॉट ओन्ली इंटेन्स, लत्ताफा चे खामरा , खमराह कवाह इत्यादि. Silage & Longetivity बद्दल मिडल ईस्टर्न परफ्युम्स नेहमीच एक पाऊल पुढे.. सध्या हिवाळा चालू असल्याने फ्रेंच Avenue चे Liquid ब्राउन पण वापरून बघितले , ज्यांना गोडवासाचे पर्फुम्स आवडतात त्यांच्यासाठी हा खूप छान आहे, उन्हाळ्यासाठी स्वस्त आणि मस्त म्हणजे Rue Broca Theoreme perfume , या विषयाची कितीही माहिती घेत गेलो तरी, अजुन बरेच काही शिकायचे आहे असे नेहमीच वाटत रहाते..

टर्मीनेटर Fri, 12/05/2025 - 14:38
काय त्या 'शाब्दिक कोट्या', काय ती 'ओघवती लेखनशैली, आणि काय ते 'दर्दी' मंडळींचे प्रतिसाद... सगळंच एकदम जबरदस्त 👍 काहीसा उशिराने वाचनात आलेला हा 'सुगंधी' लेख प्रचंड आवडला आहे. अर्थात ही फक्त पोचपावती आहे, ह्यावर एक स्वतंत्र सविस्तर प्रतिसाद लिहावाच लागणार आहे!

किल्लेदार Fri, 12/12/2025 - 00:05
गामा पैलवान, गवि, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - खणखणीत प्रतिक्रियांबद्दल आभार. आपलेही काही अनुभव सांगा. वेदांत - धन्यवाद. Cedrat Boise Intense जास्त चांगला वाटला. OG जास्त टिकत नाही पण आहे चांगला. मिडल ईस्टर्न थोडे उग्र वाटतात म्हणून त्यांच्या वाट्याला अजून फार गेलो नाहीये. टर्मीनेटर - सविस्तर प्रतिसादाची वाट बघतो :). लेखात अजूनही बरंच काही राहून गेलं आहे. तुमच्या शैलीत लिहून काढा.

In reply to by किल्लेदार

टर्मीनेटर Sat, 12/13/2025 - 20:00
सविस्तर प्रतिसादाची वाट बघतो :)
येस सर... लक्षात आहे, पण हल्ली इथे आल्यावर संजय राउत काय, संजय आवटे काय अशा एक से एक दलिंदर लोकांनी प्रसवलेले भंकस विचार वाचण्यात काहीवेळ खर्ची पडतो आणि त्यामुळे हाताशी असलेला फावला वेळ कमी पडतो,. (सब गंदा है पर धंदा है ये... त्या लोकांचा, माझा नाही बर्का 😀) पण ते असो, वर मदनबाण साहेबांच्या प्रतिसादात ''Gucci Flora' ह्या माझ्या (कुठल्याही स्वरुपातील) आवडत्या फ्रॅग्रंसचा उल्लेख वाचला आणि रहावले नाही म्हणुन हा छोटासा प्रतिसाद प्रपंच!

In reply to by टर्मीनेटर

किल्लेदार Mon, 12/15/2025 - 21:16
निवडक खावं आणि निवडक वाचावं म्हणजे डोक्याचं आणि पोटाचं अपचन होत नाही.

मदनबाण Sat, 12/13/2025 - 11:16
सुगंधावर लिहलेला अत्यंत रचनात्मक लेख! माझा अगदी आवडता विषय ! अत्तर- परफ्युम आणि मग डिओ असा माझ्या आवडीचा क्रम आहे. सध्या Hawas Ice,Sauvage,Arabians Tonka,Gucci Flora, Musk Al Tahara अनुभवुन पहात आहे [ क्लोन व्हर्जन ]. तर डिओ मध्ये अजमल चे परफ्युम डिओ अनुभवणे सुरवात केली आहे. यात Aurum Wisal & Wisal Dhahab आणि Sacred Love आहे. याचा काँबो सेट मिळतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye... | Lokah Chapter 1: Chandra |

In reply to by मदनबाण

मदनबाण Sat, 12/13/2025 - 13:48
एक दुवा द्यायचा राहुन गेला होता: How to Smell Rich: Perfume Hacks, Men vs Women & Lasting Tips - Abdulla Ajmal | FO387 Raj Shamani

किल्लेदार Mon, 12/15/2025 - 21:07
हो. बघितलाय हा. अजमल चा सगळा पैका उद प्लांटेशन मधून येतो. परफ्यूम त्याच्यासाठी चिरीमिरी आहे. हवास आईस घ्यायचा राहून गेला. हवास ट्रॉपिकल घेतला. चांगला आहे. Sauvage चांगला आहे पण खूपच कॉमन झाल्यामुळे थोडा कंटाळवाणा झाला.

In reply to by किल्लेदार

मदनबाण गुरुवार, 12/18/2025 - 14:32
Sauvage चांगला आहे पण खूपच कॉमन झाल्यामुळे थोडा कंटाळवाणा झाला. मला क्लोन परफ्युम्स बद्धल काहीच माहित नव्हते आणि मी मुख्यत्वे अत्तर वापरण्यावरच बराच काळ भर दिला आहे. अचानक मला या क्लोन प्रकरा बद्धल कळले आणि मी बर्‍याच काळाने परफ्युवर परतलो. पारध्यां पेक्षा पक्षांचे नाक अधिक संवेदनाशील असते आणि त्यांना तीव्र गंध आवडत नाहीत त्यामुळे Sauvage आणि इतर ट्राय मारले. सध्या Black Opium अनुभवत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

In reply to by मदनबाण

किल्लेदार गुरुवार, 12/18/2025 - 18:28
पक्ष आणि पक्षी दोघांच्याही कधी नादी लागलो नाही त्यामुळे माझ्या नाकाला भावतो तो मला आवडतो. एक दोन परफ्यूम्स तर असे आहेत की पक्षी स्थलांतरच करतील. अंटोनियो पुइज कोरम, टेड लॅपिडस हे त्याच कॅटेगरी मध्ये येतात पण मधून मधून स्वतःसाठी वापरतो. एखादा जुना इंग्रजी चित्रपट किंवा सीरिज बघतांना हमखास उडवतो.

In reply to by किल्लेदार

मदनबाण गुरुवार, 12/18/2025 - 21:11
हा.हा.हा... स्वतःला आवडणारे आणि आपण लावल्यामुळे आपल्या सकट दुसर्‍यांना आवडणारे अशी मी अगदी माझ्यासाठीची विभागणी केलेली आहे. तुम्ही म्हणता तसे मी देखील मला आवडणारे परफ्युम जे कदाचीत इतरांना आवडणार नाहीत वापरले आहेत. प्रदीर्घकाळ विविध सुंगध प्रकार वापरल्या नंतरी मी माझ्यात बदल केला, मी असे सुगंध टाळतो जे तीव्र गंधाचे असतील, कारण काही वेळा अश्या गंधाने इतरांचे [ आपल्या आजुबाजुचे ] डोके ठणकते आणि माझ्यामुळे कोणा इतर व्यक्तीस त्रास होऊ नये ही गोष्ट मला महत्वाची वाटली. माझ्या नोकरीत कामाच्या स्थळी सर्व वयातल्या पक्षांचे प्रमाण बर्‍यापैकी असते,त्यामुळे त्यांचे नाक अधिक संवेदनाशील असते हे मला अनुभवातुनच समजले. करोनाच्या आधी एका स्थळी काम करताना माझ्या आजुबाजुला जवळपास ७ पक्षी जीव होते आणि त्यांच्या गराड्यात मी एकटा... :))) साधारण एक आठवड्यात त्या सगळ्यांना हे समजलेले होते की हा काहीतरी भन्नाट लावुन येतो, दुसर्‍या आठवड्यात त्यांच्यावर पूर्णपणे प्रभाव झालेला होता, तिसर्‍या आढवड्यात पक्षी जीव स्वत: परफ्यूम घेउन हापिसात प्रकटले होते! :))) तर, मलाही फार आवडेल आणि आजुबाजुला असलेल्या सर्व लोकांनाही जबराट वाटेल अश्या सुगंधावर पोहचण्याचा, काय म्हणतात ते... हं... सुवर्णमध्य मी गाठला! :) सुंगधाची आवड ही प्रत्येकाची वेगवेगळी असते,त्यामुळे त्यातल्या त्यात जरा इझी गो, उदा.Sauvage सारखे गंध कॉमन जरी वाटले तरी तितकेच प्रभाकारी असतात व साधरणता कोणाला [स्वतः सकट ] त्रास होत नाही, त्यामुळेच ते बहुधा कॉमनली वापरले देखील जातात. :) वयानुसार आवडीत देखील फरक पडतो. आधी मला व्हाईट उद आवडायचा पण आता मला ब्राऊन किंवा कंबोडी मधुर उद अधिक आवडतो. [ आपला आवडता उद मिळणे ही बहुधा कठीण गोष्ट असावी? ] वरती Black Opium चा उल्लेख केला आहे, तो बर्‍यापैकी तीव्र आहे. मला सगळ्यात आवडलेल्या क्लोन चे नाव सांगायचे राहिलेले ते म्हणजे LIBRE. जसे स्त्रियांना फुलांचे गंध आवडतात तसे पुरुषांना देखील ते आवडतात. उत्तम उदाहरण म्हणजे चांगल्या दर्जाचे मोगरा अत्तर. मला कलोन बेस्ड परफ्यूम्स देखील विषेष आवडतात. जाता जाता: तुमचा फेवरेट मस्क असलेला परफ्यूम कोणता? तसेच काही सुचवाल तर आभारी राहेन. :)

किल्लेदार Sat, 12/20/2025 - 07:49
माझ्याकडे मस्क असलेला कुठलाच नाहीये. मसाल्यांमध्ये माझा आवडता टोबॅको. त्यात बरेच आहेत. उद मधे Versace Oud Noir आणि Mancera Aoud Lemon Mint आहेत. Mancera Red Tobacco मध्ये उद आणि तंबाखू दोनही आहेत.

कांदा लिंबू Sat, 12/13/2025 - 18:01
व्वा! काय त्या 'शाब्दिक कोट्या', काय ती 'ओघवती लेखनशैली, आणि काय ते 'दर्दी' मंडळींचे प्रतिसाद... सगळंच एकदम जबरदस्त हेच मनात आले होते! मी काही सुगंधांचा जाणकार नाही, पण सुगंधांचा अत्याधिक चाहता मात्र आहे. पर्यटनाची आवड असल्याने जिथे जातो तिथून कोणते ना कोणते सुगंध घेऊनच घरी येतो. डियो कधी आवडले नाहीत, अल्कोहोल-बेस्ड परफ्यूम्स पूर्वी वापरायचो, आता फारसे वापरत नाही. माझी पहिली पसंती ऑइल-बेस्ड अत्तरांना. अगदी नेहमीच्या मोगऱ्यापासून ते सफेत ऊद ते कस्तुरी ते अजून काहीही, सर्व गंधांची अत्तरे मनाला वेड लावतात. त्याशिवाय गंध देणारे मूळ स्रोतही जसे ताजा मोगरा, ताजा किंवा सुकलेला सोनचाफा, दालचिनीची साल, विलायची, कॉफीच्या बिया, भीमसेनी कापूर, गवती चहाची पाने, पेट्रोल (हो!), गाईचे ताजे दूध, पिकलेला बंगनपल्ली आंबा... हेही आवडतात. छान लेख लिहिलाय किल्लेदार!

In reply to by कांदा लिंबू

किल्लेदार Mon, 12/15/2025 - 21:14
अत्तरं मलाही आवडतात पण थोडी एकसुरी असतात. अंतरा आणि मुखडा सेम टू सेम. काही आहेत माझ्याकडे पण परफ्यूम्स मधली कलाकारी जास्त भावते. तुमच्याप्रमाणेच मूळ गंध देणारे स्त्रोतही आवडतात. पेट्रोल, नेल पॉलिश, दिवाळीची दारू ( आणि पिण्याचीही अर्थात) हे इतरांना बकवास वाटणारे वासही प्रिय आहेत.

लेखनविषय:
कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.

धुके असे पडले की

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
धुके असे पडले की धुके असे पडले की धुक्याचा महाल आकाशी सोपान त्याचा असा की त्यावरी उभी तू टोकाशी तू परी अस्मानीची मी फकीर धरतीचा वाट अशी भयंकर मार्ग नसे परतीचा विचार तरी काय करावा ? तोही थांबला तर्कापाशी सोपानावरून खुणवू नको जीवाची होईल तडफड तुजसवे वर जायाचे तर प्राणपाखरू करेल धडपड इथे जगुनी काय करावे ? आता जावे स्वर्गलोकाशी

मिताली राजला आउट करणारी नांदेडची मुलगी

मार्गी ·
लेखनप्रकार
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्‍यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्‍या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्‍या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!

शाळेची वेळ झाली -बालकविता

बिपीन सुरेश सांगळे ·

nutanm Mon, 11/10/2025 - 04:52
पोराना काय मुलाना पोरकी ती पोरे आपण व्यवस्थित आईवडिल परेसा पैसा असल्यावर आपलीच मुले ती . माझ्या आईला कधीच पोरे म्हटलेले आवडायचे नाही कारण आमचे सर्व त्यानी त्यान्चयाकडे असलेल़या साधारण पैशात व्यवसथित केले. असो राग नसावा. माझे विचार सान्गितले.

In reply to by nutanm

सौन्दर्य Fri, 11/14/2025 - 00:27
तुमचे हे मत वाचेपर्यंत पोरे व मुले ह्यात फारसा फरक असेल असा विचार केला नव्हता. 'पोरे' म्हणजे आसपासचे सगळेच बालगोपाल, व 'मुले' म्हणजे स्वताची अपत्ये किंवा ओळखीची मुले असा सर्वसाधारण फरक माझ्या मनात होता.

नूतनजी भावना पोचल्या आभार पोरं हा एक सर्वसाधारण शब्द आहे आणि मुलंच असं म्हणायचं असेल तर - माझी मुलं आता शाळेत जात नाहीत , ही कविता त्यांच्यासाठी नाही ! LOL

अभ्या.. Mon, 11/17/2025 - 03:31
अरे वा, असली सेम कविता आम्ही (स्वआ.ब.) आमच्या मिपालहानपणी मिपावरच केलेली होती. अर्थात ते विडंबन होते पण आशय हाच. https://www.misalpav.com/node/36113 . तेव्हा निर्मळ मनाने भरभरुन प्रतिसाद देणारे होते म्हणून लिहूही वाटायचे. असो......

शाळेची वेळ झाली चला चला बॅग भरा चला चला डबा भरा शाळेची वेळ झाली शाळेची वेळ झाली एक वही सापडत नाही गृहपाठाचा पत्ता नाही पेन्सिल तर तुटकी बाई पेनामधून गळते शाई शाळेची वेळ झाली अंघोळ म्हणजे दोनच तांबे नुसती बुडबुड जरा न लांबे बाबांची तर चाले लुडबूड टॉवेल मिळेतो माझी कुडकूड शाळेची वेळ झाली डब्यात काय ? पोळीचा रोल आणि दोन बिस्किटं गोल शाळा माझी तिची घाई कित्ती कामं करते आई शाळेची वेळ झाली घाई आमची झाली भारी तोच व्हॅन आली दारी पण आई घे ना पापा नाहीतर करणार नाही टाटा शाळेची वेळ झाली

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला (तरही)

नाहिद नालबंद ·
लेखनविषय:
काव्यरस
सानी मिसऱ्याची ओळ क्रांतिताई (क्रांति साडेकर) यांची, तरही साठी ओळीबद्दल आभार, त्यांना न विचारता ही ओळ वापरली त्याबद्दल क्षमस्व!

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा! ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक‌ आणि मस्ती की पाठशाला ✪ पानी‌ में शिरा और मस्त पोहा! ✪ अंजवेलमधलं भूताचं झाड… ✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच ✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या! ✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग ✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना ✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा ✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण ✪ सारखी तीच ती‌ संख्या कशी येतेय? ✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे ✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद ✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी! ✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि

निसर्ग आणि माणूसपणाच्या कविता- प्रहरांच्या अक्षरनोंदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

कंजूस Wed, 10/29/2025 - 21:58
चांगला परिचय. >> सर्वात महत्वाचं म्हणजे जवळ जवळ चाळीस पेक्षा अधिक कविता या विविध वृत्तबद्ध रचना आहेत, त्या अधिक वाचनीय झाल्या आहेत. मुक्तछंदातील कविताही तितक्याच सुंदर आहेत. >> - नेमकं.

अभ्या.. Wed, 10/29/2025 - 22:08
अरे वा. अभिनंदन दिपाली वहिनी. अनोखी भेट. . मला तर मराठी ठाकूर म्हणाले की मिपा बल्लव गणपा हाच आठवतो ;)

गवि Wed, 10/29/2025 - 22:20
उत्तम परिचय. त्यांच्या कविता नेहमीच लयबद्ध आणि गेयता असलेल्या .. नेहमीच आवडतात.

मी-दिपाली गुरुवार, 10/30/2025 - 09:26
धन्यवाद प्रा. डॉ. Dilip Birute सर! आपण माझ्या काव्यसंग्रहाची इतकी आवर्जून आणि आस्थेने दखल घेतलीत त्याबद्दल मनापासून आभार! यामधून आपलीही कवितेविषयी, साहित्याविषयी असणारी बांधिलकी, जाणीव आणि जाण दिसून आली. पुस्तक योग्य हाती गेल्याचं समाधान किती महत्त्वाचं आहे, ते या निमित्ताने समजलं. _/\_

परिचय करुन दिलेल्या काव्यसंग्रहाच्या कवींनीही दखल घ्यावी, दाद द्यावी ही गोष्ट लिहित्या-बोलत्या वाचकांसाठी तशी आनंदायी गोष्ट असते. मी-दीपाली आपण दखल घेतली, दाद दिली आभार. खरं तर, कविता वाचत गेलो, थांबत गेलो वाचत गेलो आणि जे उत्स्फूर्तपणे वाटलं ते लिहूनही टाकलं. खरं, तर अजून खूप काही लिहिता येईल अशा त्या प्रहरांच्या अक्षर नोंदी आहेत. धाग्यातही लिहिले होते की अनेक नोंदी सुटल्या. एक वाचक मित्र म्हणाले सर, थेट शांताबाई शेळके, इंदिरा संत यांची आठवण केली असे म्हणालात तर ते अधिक स्पष्ट करता येईल का ? मग आम्ही बोलत बसलो. निसर्ग पाहुन कोणाच्याही मनामधे प्रेम, आपूलकी निर्माण व्हावी. रंग, गंधात रमून जावे हा माणसाचा तसा नैसर्गिक स्वभाव आहे. माणूस घडतो, व्यक्तीमत्वविकास होतो. पाना-फुलांशी बोलायला जवळ जवळ सर्वांना आवडतं. निसर्गाची ओढ माणसाला जन्मजात असते. निसर्गात कोणास प्रियकर दिसतो, कोणास आई दिसते, कोणास मित्र दिसतो, मैत्रीण दिसते आणि आपला संवाद सुरु होतो. अशाच नोंदी प्रहरांच्या अक्षरनोंदीत दिसतात. कविता वाचतांना, इंदिराबाईंची आठवण व्हावी त्याचं कारण आसे की, त्यांचंही बालपण खेड्यात गेलं. बालपणापासून त्यांना निसर्गसहवास लाभला. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेताही त्यांचा निसर्ग संवाद सुरुच होता. आणि ते त्यांचं जीवनच बनून गेले. जुन्या काळी ओव्या आणि निसर्ग, गाणी हा जवळ जवळ जुन्या कुटुंबाचा भागच होता. निसर्गाशी संवास सुरु झालं की ते गाणं होतं. त्यांची एक 'कसे हासू' नावाची कविता आहे.
अंगणात जाई जुई हस तसे बिनमोल मन जाई खोलखोल झुळु झुळू येई वारा पाने फुले हालवीत मन पर्री थरारत.
साधा पाना फुलांना जागवणा-या वा-यांनी सुद्धा कवयित्रीचं मन थरारून जातं. साधी सोपी रचना असते आशय मात्र खोलवर जाणारा असतो. 'मन जाई खोल खोल' असा तो संवाद सुरु असतो. अशा अनेक त्यांच्या कविता आहेत. दीपाली ठाकूर यांचाही निसर्गाशी असाच स्नेह आणि संवाद आहे. त्यांची कविता त्याच वळणांची आहे, दीपाली ठाकूर म्हणतात-
वाट पाहती मिटून पाकळ्या जरा कोणत्या दिशेस तो असे रंगसोयरा पान पान आर्त सांगते ऋतूस संहिता साजि-या क्षणात जागल्या दिठी जुन्या व्यथा ( पुन्हा पुन्हा )
'पाकळ्या मिटून असतात, म्हणजे त्या वाट पाहात असतात' हे कोणाला सुचतं ? निसर्गप्रतिमा हे या कवितेंची वैशिष्ट्ये आहेत. असा तो सारखा निसर्ग संबंध काव्यसंग्रहात दिसून येतो. निसर्गाशी एकरुप झालेली ती कविता. अशा त्या गप्पा रंगल्या. निसर्गातील तरलेतेने आलेला अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, निसर्गातील घटनांची संवेदनशीलता ही केवळ कवयित्रीपुरते मर्यादित राहात नाही. निसर्गकविता कवीची राहात नाही तर, तो निसर्ग अनुभव वाचक, समीक्षक, यांनाही तितकाच उत्कटतेने येतो हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्ये आहे, श्रीमंती आहे. मिपाकर, वाचक, प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनापासून -दिलीप बिरुटे

‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.

तुरीच्या दाण्यांची कचोरी

Bhakti ·

कंजूस Mon, 10/27/2025 - 06:33
एक फोटो झाडाचाही हवा. >> दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे>> वा. कचोरी झकास लागणारच. दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे

टर्मीनेटर Mon, 10/27/2025 - 12:46
भारीच 👍 "ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे." सुरुवातीला हे वाचल्यावर मलापण ही शेगाव कचोरीची रेसिपी असावी असेच वाटले होते... वर श्वेता२४ ह्यांनी चवीबद्दल जे म्हंटले आहे तीच शंका माझीही आहे, चव सेम असते की काही फरक आहे?

Bhakti Mon, 10/27/2025 - 13:23
सर्वांना धन्यवाद! चव शेगावच्या कचोऱ्यांसारखी नाही वाटली. पण असाच पदार्थ गोल गोल तुरीच्या दाण्यांची+मटार दाण्यांची गुजरातमध्ये लिलवानी कचोरी म्हणून प्रसिद्ध आहे.ही माहिती मला दुसऱ्या ग्रुप वरून समजली.लिलवाचा अर्थ म्हणजे बहुतेक तूर असावा. बाकी मी फक्त तूरीच्या दाण्यांचीच कचोरी करणार होते.पण म्हटलं चव फसली तर... म्हणून मटार दाणे पण वापरायचं ठरवलं.पण अशी कचोरी अलरेडी इन्व्हेंट झाली आहे हे पाहून कमालच वाटली.मी योगायोगांवर खुप विश्वास ठेवते.काय भारी योगायोग जुळून आला,गंमतच वाटली :)

कर्नलतपस्वी Mon, 10/27/2025 - 14:05
तुरीच्या झाडाला,भुईला वाकल्या दाण्याने भरल्या, खुणावू लागल्या, जीभ ही चटोरी, लपलप करी केली मी कचोरी कुरकुरीत..... मस्त रेसीपी. उकडलेल्या तुरीच्या शेंगा भारी लागतात.

मारवा गुरुवार, 10/30/2025 - 01:57
तुमच्या बऱ्या अर्ध्याची मज्जा आहे. एकूण प्रकरण चविष्ट दिसतंय. तुरीची तिखट आमटी फक्त माहिती होती. तुरीकचोरी नवी माहिती झाली.

"तुरीच्या दाण्यांची कचोरी" ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगांपासून काढलेले हिरवे दाणे वापरून बनवली जाणारी ही कचोरी कुरकुरीत आणि मसालेदार असते.