बेदरकार बेफिकीर असे पुण्यातील त्या दिवसांचे वर्णन करावे लागेल. गावाकडून कोणी येत नव्हता,फोनबिन भानगड नसल्याने काही विचारत नव्हता,घरी सांगत नव्हता.
माझ्यासारख्या वळूला एवढे पुरेसे होते..
पेठेत तलाठी परीक्षा द्यायला आलेल्या किश्याने कॉइनबॉक्स मधून रूमवर फोन केला.. "आक्का अप्पाबळवंतचौकात विजय नरसिंग होमला ऍडमिट आहे, संध्याकाळी ये"
इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही अशी घर मालकांची तंबी होती,त्यामुळे असे कोडवर्ड लागायचे..बहुतेक त्याची मनी ऑर्डर किंवा गावाकडून कोणीतरी पाकीट घेऊन आले असणार,त्याशिवाय हा भाड्या एवढा उदार व्हायचा नाही.
डायरी वाचतोय.
जमालीये, तात्याची आठवण येईल
In reply to जमालीये, तात्याची आठवण येईल by टवाळ कार्टा
अ.अ.
जबरदस्त सुरुवात मुनिवर. एकदम
एक नंबर कपिलमुनी!
जमेश
जाम भारी मुनिवर्य...
लेटेस्ट पाने वाचून मागे जाऊन
अरे वा!!
पुढील भाग