मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेपत्ता बायको, आरोपी नवरा आणि शून्य खून-पुरावा !

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार Wed, 12/17/2025 - 18:37
सर्वांना धन्यवाद ! गुगलनुसार फ्रान्समध्ये नार्कोटेस्टचा पुरावा न्यायालयात विश्वसनीय मानला जात नाही. तिथे ज्युरींच्या मताला अधिक महत्त्व दिलेले दिसते. “intime conviction” (the inner belief of the jurors and judges).

कुमार सर, हा लेख माबोवर आधीही वाचल आहे. छान आहे. एक असाच आरुषी तलवार केसवरही करावा ही विनंती. मी अनेकवेळा ती केस वाचली, अगदी चॅट जीपीटीला आरुषीच्या पालकाना आरोपी ठरवणारा वकील बनवले व डिपसिकला बचाव म्हणून ठरवून वादविवाद घडवला पण त्यातूनही काहीही निष्पन्न झाले नाही डीपसिक आणी चॅट जीपीटी दोघानीही हे मान्य केले की सबळ पुरावे नाहीत. नेमके काय घडले असावे हा प्रश्न कधीच सुटत नाहीये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कानडाऊ योगेशु Wed, 12/17/2025 - 22:02
अ.बा. इरफान खान चा तलवार हा चित्रपट पाहिला आहे का? आरुषि हत्याकांडावरच आधारित आहे. सत्याच्या बर्याच जवळ पोहोचणारा चित्रपट आहे.

लेखनविषय:
लेखनप्रकार
15 डिसेंबर 2020 . . . जगभरात कोविड-19ने थैमान घातलेले, बहुतेक देशांत अधूनमधून टाळेबंदीचे वातावरण आणि जनता हवालदिल झालेली. त्या दिवशी मध्यरात्री फ्रान्समधील एका गावात एक चक्रावून टाकणारी अन् मती गुंग करणारी घटना घडली. चाळीशीतल्या Jubillar जोडप्यातली पत्नी त्या मध्यरात्रीपासून बेपत्ता होती. पुढील पाच वर्षात तिचा ठावठिकाणा लागलेला नव्हता आणि तिचे प्रेतसुद्धा मिळाले नाही - अगदी आपल्याकडचा ‘दृश्यम’ आठवला असेल ना? मात्र पोलिसांनी त्या बाईच्या नवऱ्याला अटक करून ठेवली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

याजसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस भारतात व्हावा।।

kvponkshe ·

विवेकपटाईत Wed, 12/10/2025 - 09:30
मुले अमेरिकेत गेली याचा आनंद प्रत्येक पालकाला होतो. माझा मुलगा अमेरिकेत आहे हे तू सल्ला सांगताना त्यांची छाती 56 याच्यापेक्षा जास्त मोठी होते. पण पंच्याहत्तरी उलटल्यानंतर कोणता वृद्धाश्रम उत्तम आहे याच्या शोध घ्यावा लागतो. अमेरिकेतील मुलांनी जर फायनान्स केले नाही तर शेवट अत्यंत दारुण होतो. बाकी अमेरिकेत ही लोक भारतीय संस्कार जपतात. दारू आणि ड्रग्स पासून दूर असलेल्या मुलांचे भविष्य तिथे ही उज्ज्वल आहे.

धर्मराजमुटके Wed, 12/10/2025 - 10:33
बरं झाले खुश नाही झालात. आयुष्याच्या संध्याकाळी सूड उगवून देखील काही फायदा नसतो. जी गोष्ट ज्यावेळी हवी त्यावेळी मिळाली नाही तर जे नुकसान होऊन गेले ते भरता येत नाही. सुड देखील तरुण वयातच घेता आला तर मजा आहे.

In reply to by धर्मराजमुटके

विजुभाऊ Wed, 12/10/2025 - 11:27
सुड देखील तरुण वयातच घेता आला तर मजा आहे.
एकदम पटले. आणि जे काही घडले यात लेखकाचे काय कर्तृत्व आहे?सूड हा काही पॅसिव्ह गोष्ट नाहिय्ये. त्यासाठी स्वतः काहितरी करावे लागते.

कानडाऊ योगेशु Wed, 12/10/2025 - 15:33
खरेतर स्वप्नललनेने तसा काहीही विश्वासघात केला नाही व हा सारा एकतर्फी मामला होता.उलट प्रत्यक्ष तोंडावर नकार देऊन पाण उतारा न करता आडुन आडुन आता माझ्या बद्दल विचार करणे सोड हे सुचविले.खरेतर लेखकाने तिचे आभार मानायला हवेत. मी ही लग्नाच्या मार्केट मध्ये उभा असताना काही जणींनी नकार दिला होता व त्याचा राग आला होता पण मी देखील काही जणींना नकार कळवला होता. त्यामुळे आधी वाटत असलेली सूडाची भावना कालांतराने नाहीशी झाली. ही मराठी शॉर्ट्फिल्म बघण्यासारखी आहे.

१९९९ साली आमचे स्टेशनरी चे भाड्याचे दुकान होते . त्याच्या कामानिमित्त मला अनेकांकडे जावे लागे. त्यात एक दूरचे नातेवाईक होते त्यांच्या कडे नेहमी जाणे होई. त्या नातेवाईकांची एक मुलगी होती. मी त्या वेळी ऐन तारुण्यात होतो, लग्नाळू होतो. ती मुलगी मला आवडत असे. तिला सुद्धा माहित होते की मी तिच्यावर लट्टू आहे. माझी हिरो होंडाची cd १०० SS घेऊन मी त्यांच्या कडे सामान द्यायला दोन एक आठवड्यातून जात असे. ती घरात असावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत असे, आणि ती दिसली की मनात फुले उमलत असत. ते लोकही मला चहा घेतल्याशिवाय जाऊ देत नसत.

पुस्तक परिचय In service of the republic: The art and science of economic policy

केदार भिडे ·

मस्त. हा विषय माझ्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा आहे. त्याविषयी लिहिल्याबद्दल धन्यवाद.
हे सर्व एकमेकांना आयुष्यात कधीही न भेटणारे लोक हे सर्व काम सुताराला कपडे मिळावेत याकरता, त्याला पाव मिळावा याकरता याकरता अजिबात करत नसतात. शेतकरी बी पेरतो कारण त्याला धान्य विकून नंतर नवा चपलेचा जोड घ्यायचा असतो. पोलादी हत्यारे तयार करणाऱ्याला नंतर नवा सदरा घ्यायचा असतो. हे सर्वच लोक आपल्या हिताचे रक्षण करत असतात, मात्र त्यातून अनेकांचे हित साधत असतात. हे सर्व चालते कोणत्याही केंद्रीय नियोजनाशिवाय, कुणाच्या आदेशाशिवाय.
याविषयी मिल्टन फ्रीडमन साहेबांचा पुढील व्हिडिओ- पेन्सिल जरूर बघावा असा आहे. तुमच्याप्रमाणे मी पण मिल्टन फ्रीडमन साहेबांचा चाहता आहे. https://youtu.be/67tHtpac5ws?si=zy42UPPw-ekU05GQ
वर खाली होणारे विनिमय दर किती महत्वाचे आहेत याकरता संदर्भातील मिल्टन फ्रीडमन यांचा केवळ अडीच मिनिटांचा विडिओ जरूर पहा. अशाप्रकारे सार्वजनिक धोरणासंदर्भात विचार करण्यास हे पुस्तक दिशा दाखवते.
याच विषयावर मिल्टन फ्रीडमन साहेबांचा थोडा अधिक विस्तारातील व्हिडिओ पुढे देत आहे. https://www.youtube.com/watch?v=c9STBcacDIM गेल्या अनेक वर्षांपासून मला मिल्टन फ्रीडमन साहेबांचे म्हणणे अगदी १००% पटत होते. मात्र आता १००% नाही तर अर्धेच पटते. साहेब म्हणतात ते वस्तूंसंदर्भात अधिक योग्य आहे. पण ते सेवांच्या संदर्भात तितक्या प्रमाणावर लागू पडेल का याविषयी साशंक आहे. त्यांचे हे भाषण ५० वर्षांपूर्वीचे आहे. त्यावेळेस इंटरनेटवर आधारीत सेवा पुरविणे हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. पण आता आहे. वस्तू निर्यात केल्या तर त्या आपल्याला वापरायला मिळत नाहीत तसे सेवांविषयी होत नाही. दुसरे म्हणजे साहेब म्हणत आहेत ते सेन्सिबल लोकांच्या जगात अगदी पूर्णपणे योग्य ठरेल. पण समजा ट्रम्पसारखा कोणी महत्वाच्या सत्तापदावर असेल तर कागदावर भारदस्त दिसणारे हे लॉजिक पूर्ण उलटेपालटे होऊ शकते. हे प्रकर्षाने जाणविले काही महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नायरा ऑईलला क्लाऊड सर्व्हिस द्यायला नकार दिला तेव्हा. नायरा ऑईल रशियातून तेल विकत घेत असल्याने त्या कंपनीवर निर्बंध- इतकेच नव्हे तर त्या कंपनीशी कोणतेही व्यवहार करायला अमेरिकन कंपन्यांनाही बंदी. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने तसे केले. आज सगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये आय.टी इन्फ्रास्ट्रक्चर असणे सगळ्यात महत्वाचे आहे. मेकमायट्रीप सारख्या पोर्टलवरून आपण विमानाचे तिकिट बुक करतो तेव्हा आपण जिथे कुठे असू तिथून मेकमायट्रीप आणि विमान कंपन्या यांना जोडणारा एक आय.टी इन्फ्रास्ट्रक्चरमधील दुवा असतो. तीच गोष्ट शेअर मार्केटची. तीच गोष्ट जवळपास सगळ्या प्रकारच्या व्यवसायांची. बॅक एन्डला आय.टी. इन्फ्रास्ट्रक्चर - क्लाऊड की जे काही असेल ते किती महत्वाचे आहे हे त्यावेळेस अधिक प्रकर्षाने जाणविले. तशा क्लाऊड सेवा देणार्‍या जवळपास सगळ्या कंपन्या अमेरिकन आहेत. समजा भविष्यात अमेरिकेशी संबंध आणखी बिघडले आणि नायराप्रमाणे सगळ्या भारतीय कंपन्यांशी व्यवहार करायला तात्यांनी अमेरिकन कंपन्यांना बंदी घातली तर? आता ही हायपोथेटिकल गोष्ट वाटत आहे पण तात्यांचा लहरी स्वभाव लक्षात घेता तसे होणारच नाही याची अजिबात खात्री देता येणार नाही. आज जवळपास सगळा आंतराराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये चालतो. त्याचे कारण १९७४ मध्ये रिचर्ड निक्सनने सौदीशी केलेला पेट्रो डॉलर करार. तेल सगळ्याच देशांना गरजेचे असल्याने तेल विकत घ्यायला डॉलर द्यावे लागणार असतील तर मग ते डॉलर आणायचे कुठून? तर मग इतर वस्तूंची निर्यात केली तर त्याचेही पैसे डॉलरमध्ये घेणे भाग झाले. त्यातून मग सगळा आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्येच करणे भाग झाले. ते डॉलर एका देशातील कंपनीने दुसर्‍या देशातील कंपनीला द्यायचे कसे? तर त्यासाठी परत अमेरिकेचीच स्विफ्ट यंत्रणा. आपण एका गोष्टीविषयी पूर्ण अनभिज्ञ असतो पण आपण जेव्हा परदेशात बनलेली एखादी वस्तू (समजा चीन किंवा तैवानमध्ये बनलेला लॅपटॉप) विकत घेतो तेव्हा आपल्या भारतीय बँकेतील खात्यातून पैसे लॅपटॉप विकणार्‍या कंपनीच्या खात्यात थेट जात नाहीत तर स्विफ्ट नेटवर्ककडून आपल्या (समजा) एच.डी.एफ.सी बँकेकडून त्यांचे टाय-अप असेल अशा एखाद्या अमेरिकन बँकेत (समजा बँक ऑफ अमेरिका) डॉलरमध्ये जातात, तिथून लॅपटॉप विकणार्‍याचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे टाय-अप असेल त्या अमेरिकन बँकेत (समजा वेल्स फार्गो) जातात आणि वेल्स फार्गो बँक ते पैसे लॅपटॉप विकणार्‍याच्या बँक खात्यात यूआनमध्ये देते. आता समजा तात्यांनी निर्बंध आणला- क्ष या कंपनीबरोबर कोणतेही व्यवहार करायचे नाहीत- स्विफ्ट नेटवर्कमधून ती कंपनी बाहेर. मग लागल्या बोंबा? स्टेट बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यातीसाठी अशाप्रकारे स्विफ्ट नेटवर्कचा वापर करते. नायराचे रशियन कंपन्यांना पैसे देण्याचे व्यवहार एस.बी.आयकडूनच व्हायचे. आता एस.बी.आय नायराबरोबर व्यवहार करते म्हणून एस.बी.आय ला स्विफ्ट नेटवर्कमधून बाहेर केले असते तर काय ही भिती वाटून मग एस.बी.आयने नायराचे व्यवहार प्रोसेस करायला नकार दिला. मग त्यांना ते व्यवहार सेंट्रल बँक की अन्य दुसरी कोणतीतरी स्विफ्टमध्ये फार सक्रीय नसलेली बॅंक वापरून करावे लागले. म्हणजे एकूणच काय- तर एक तर आंतरराष्ट्रीय व्यापार करा अमेरिकन चलनात, त्यासाठीचे पैसे ट्रान्स्फर करा अमेरिकन स्विफ्ट पध्दत वापरून. सगळ्या उद्योगांना लागणारे आय.टी इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार? तर अमेरिकन कंपन्या. अशावेळेस अमेरिकेत ट्रम्पसारखा कोणी माथेफिरू असेल आणि त्याचे डोके फिरले तर तो किती अडचणी निर्माण करू शकेल याची कल्पनाही करवत नाही. बाकी सगळे सोडा- समजा अगदी आय.टी इन्फ्रास्ट्रक्चरही बंद करून टाकले तर भारताची पूर्ण अर्थव्यवस्था टेकीला येऊ शकेल. नेटबँकिंग, फोन वरील सगळी अ‍ॅप्स, शेअर मार्केट पासून सगळे व्यवहार पूर्ण ठप्प होऊ शकतील. आता या पार्श्वभूमीवर मिल्टन फ्रीडमनसाहेबांचे गणित कसे बसवायचे? त्यांच्या (आणि अ‍ॅडम स्मिथपासून सगळ्या फ्री मार्केट वाल्यांच्या) म्हणण्याचा अर्थ हा की पूर्ण साखळीत असलेले सगळे घटक आपल्या फायद्यासाठी अशा पध्दतीने वागतात की पूर्ण सिस्टीम व्यवस्थित चालते. पण आपल्याला त्रास झाला तरी बेहत्तर दुसर्‍याचे नुकसान झाले पाहिजे असे म्हणणारा एखादा माथेफिरू त्या साखळीत कुठेतरी किंवा त्या साखळीतील घटकांवर प्रभाव टाकायला आला तर? साहेबांच्या काळात असे काही होईल याची कल्पनाही कदाचित त्यांनी केली नसावी त्यामुळे त्यांच्या गणितात या प्रश्नाचे उत्तर नाही. पण आता ते उत्तर शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. असो. तुमच्याप्रमाणेच मलाही या विषयांची खूप आवड आहे. श्रुती राजगोपालन ज्या जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीमध्ये मर्केटर सेंटरमध्ये आहेत तिथलेच एक प्रोफेसर डॉनल्ड बॉडरॉक्स यांचा कॅफेहायेक हा ब्लॉग पूर्वी मी नेहमी वाचायचो- हल्ली बर्‍याच महिन्यात वाचलेला नाही. कॅफे हायेक मधील हायेक हे फ्रेडरीक हायेक- लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधे एकेकाळी त्यांच्यासारखे ऑस्ट्रीयन प्रोफेसर पण होते. फ्रेडरीक हायेक, फ्रेडरीक बास्तिया, लुडविग व्हॉन मिजस वगैरेंचे एके काळी खूप वाचायचो. गेले ते दिवस आता... :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे Mon, 12/15/2025 - 15:26
नमस्कार, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रवासात असल्याने लिहिता आले नाही. फ्रीडमन यांचा छोटा विडिओ अन्य मोठ्या व्हिडिओचा भाग आहे आणि त्यांची अन्य व्याख्याने पाहणे निश्चित आनंद देणारे आहे. आपल्यालाही ते आवडल्याचे पाहून बरे वाटले. तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेशी जास्तीत जास्त जोडले जाण्यातून त्यावर होणारे अवलंबवित्व हा मुद्दा महत्वाचा आहे. युरोप -इराण व्यापारातही swift चा अडथळा झाला होता आणि त्यातून instex नावाची सिस्टिम त्यांना काढावी लागली असे वाचले. त्यामुळे हे अवलंबवित्व खरेच आहे. मात्र मी उलट्या रीतीने पाहतो कि त्या परदेशी खाजगी कंपन्यांना भारतीय बाजारपेठही हवी आहे त्यामुळे एक मर्यादेपलीकडे उलथापालथ त्यांनाही हवीय असे मला वाटत नाही. (नयराचा विषय कसा मिटला मला माहित नाही). थोडा दबाव, प्रसंगी अपमान आपल्याला सहन करावा लागेल हे खरे. पण नाईलाज आहे. पहिली ४० वर्ष बंदिस्त व्यवस्था आपण राबवून पाहिली आणि त्यातून जगाला पादाक्रांत करेल असे एकही उत्पादन तयार झालेले नाही. त्यामुळे सध्या आंतराराष्ट्रीय व्यवस्थेशी जोडून घेऊन आवश्यक ज्ञान, अनुभव आपल्या लोकांनी घेणे आपल्या फायद्याचे आहे. माझ्या बास्तिया वरील लेखात तेव्हा बाल्यावस्थेत असलेल्या संगणक क्षेत्राला बंदिस्तपणाचे जे ग्रहण लागले त्याचे वर्णन एका संदर्भात दिलेले आहे ते जरूर पहा. तसेच आंतरराष्ट्रीय सोडा, आपल्या देशांतर्गत सुद्धा कितीतरी आर्थिक सुधारणा गरजेच्या आहेत त्यांचा अजून पत्ता नाही. उत्पादकता वाढ, त्यातून आर्थिक वृद्धी, आणि त्यातून समृद्धी याची जाणीव अजून लोकात नाही. सारा काही वाटपाचा खेळ अजून चालू आहे. पैशाला किलोभर समाजवादी विचार आज पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत स्मिथ, मिसेस, हायेक, फ्रीडमन यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी थेट अनुदान, खाजगी शहरे इ सारख्या धाडसी सुधारणा आपल्याला कधीना कधी कराव्याच लागतील. नाही तर त्या न केल्याचे परिणाम तरी भोगावे लागतील. त्याकरता लोकांमध्ये जागृती घडवून आणायचे, सरधोपट समाजवादी दृष्टीपेक्षा वेगळी दृष्टी तयार व्हायला पाहिजे त्याकरता अधिक अभ्यास, अधिक लेखन केले पाहिजे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

याच धर्तीवर ----ईटलीने काही महिन्यांपुर्वी स्टारलिंक बरोबर ईंटरनेट बॅकबोन साठी बोलणी चालवली होती. पण अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने आफ्रिकेतील एका देशाची इंटरनेट सेवा खंडीत केल्याचे कळल्यावर तो करार बासनात टाकला. तस्मात कुठलयाही देशावर फार अवलंबित्व ठेवणे (किंबहुना ईंडिगो प्रकरणानंतर कुठल्याही सर्विस प्रोव्हायडरवर) धोक्याचे ठरु शकते. जाता जाता----एन पी सी आय ने जी पे आणि फोन पे बद्दल ईशारा दिलाय की देशातील ७० टक्के डिजिटल पेमेंट या दोन माध्यमातुन होत आहेत आणि ही ड्युओपोलि मोडुन काढायला हवी.

कंजूस Tue, 12/16/2025 - 04:06
लेखाचा विषय समजून घ्यायला हवा. १.आर्थिक व्यवस्था कशी राखायची हा आहे. यामध्ये आर्थिक धोरण ठरवणारा राजा किंवा सरकार धोरण ठरवतो आणि ते कसे साध्य करायचे ते अर्थशास्त्रज्ञ किंवा जाणकार करून देतो. ते जाणकार केळकर आणि शहा यांचा उल्लेख आहे. या कामासाठी कोणाला नेमायचे ते सरकारच ठरवते. २. देशाची किंवा राज्याची किंवा अगदी कुटुंबाची असो त्यासाठी पैसे कुठून येणार आणि पैसे कुठे आणि किती खर्च करायचे ते ठरवणारी व्यक्ती नेक आणि प्रामाणिक असावी लागते. अन्यथा ती फक्त स्वतःचा लाभ पाहिल .किंवा अन्य कुणाच्या लाभासाठी गुप्तपणे काम करेल. तज्ज्ञ मंडळी भरपूर असतात पण निवड करणे महत्त्वाचे.

In service of the republic: The art and science of economic policy, Penguin, 2022, Pages 500. लेखक – डॉ विजय केळकर आणि डॉ अजय शाह या वर्षाच्या सुरुवातीला मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि हल्लीच वाचून पूर्ण झालं. पुस्तकाच्या आधी लेखकांची थोडक्यात माहिती सांगतो. विजय केळकर आणि अजय शाह दोघेही सुरुवातीचे अभियांत्रिकीचे विद्यार्थी जे नंतर अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रात आले. विजय केळकर यांनी केंद्र सरकारमध्ये अर्थ मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. श्री गिरीश कुबेर यांनी त्यांच्यावरील एक लेख लोकसत्ता दैनिकात नुकताच लिहिला होता.

रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड

युयुत्सु ·

विवेकपटाईत Fri, 12/12/2025 - 16:34
लेख आवडला. समाजासमोर नास्तिक असणारे, प्रत्यक्षात भयंकर अंधविश्वासी असतात. हा माझा अनुभव आहे. बाकी मी आयुष्यात कधीच पत्रिका कुणाला दाखवली नाही. मुलांचे लग्न करताना ही पत्रिका पाहिली नाही. कारण माझा देवावर विश्वास आहे, देवाने जे काही दिले आहे ते चांगले मानून त्याचे आभार मानावे, हीच शिकवण आमच्या वडिलांनी दिली होती.

सुनिल देशमुख हे पुरोगाम्यांचे आधार स्तंभ. त्यांच्या दानशूर प्रवृत्ती मुळेच अनेक उपक्रम अंनिस करु शकली ही वस्तुस्थिती आहे. पण अंनिसला देणग्या दिल्या म्हणुन अंनिसच्या सर्व विचारांशी सहमत अथवा बांधिल असण्याचे कारण नाही.त्यांच्यामुळेच अनेक गोष्टी अंनिसला शक्य झाल्या.दाभोलकरांकडे माणूस समजून घेउन त्याच्या उपयुक्ततेचा उपयोग करुन घेण्याची क्षमता व स्किल होते. दाभोलकरांच्या सहवासात अनेक लोक ज्योतिषविषयक ममत्व बाळगून होते. त्यांना तसे अनुभव वैयक्कित आयुष्यात आलेले होते. ज्योतिष हे सहजासहजी फेकून द्यावे असे शास्त्र नव्हे त्यात काहीतरी असले पाहिजे असे रा.ग.जाधव हे त्यांचे जवळचे मित्र जे नंतर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते यांचे मत होते हे मी त्यांच्याशी बोलताना जाणून घेतले होते. सुनिल देशमुख हे तुमच्या मामासम होते त्यामुळे तुम्हाला त्यांचाअधिक परिचय असणार हे मान्य आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुर्रमखान Sun, 12/14/2025 - 16:28
पण अंनिसला देणग्या दिल्या म्हणुन अंनिसच्या सर्व विचारांशी सहमत अथवा बांधिल असण्याचे कारण नाही.
पटलं. 'अंनिस' म्हणजे एक वेगळा पंथच आहे असं बर्‍याच जणांना वाटतं. इतर सगळ्या संस्थेमध्ये असतात तश्या यांच्यात पण काही अपप्रवृत्तीची लोकं असतात. त्यांचे दाखले देउन ती संस्थाच कशी नालायक आहे, आपल्याच धर्मावर बोलते, भ्रष्टाचारी आहे असं काही लबाड लोकं सांगत असतात. खरंतर वैज्ञानिक मार्गाचा अवलंब करावा, कार्यकारण भाव समजून घ्यावा अश्या साध्या गोष्टी आहेत. मॉडर्न मेडिसिनलाला सुद्धा 'अ‍ॅलॉपॅथी' म्हणून अगदी तसाच प्रकार करतात. खरतर, सिद्ध करता आलं तर इतर कुठल्याही पॅथीची उपचार पद्धतीचा वापर करता येइल. बरं हा निकष त्यांचा काही स्वतःचा नाही. साधी तार्किक सिद्ध करता येइल अशी वैज्ञानिक पद्धत आहे. कायदे तयार करताना, न्यायालये यात सुद्धा अशीच *पद्धत वापरतात. * १९९७ मध्ये जग्गी वासुदेवच्या बायकोने जिवंत समाधी घेतली होती. नंतर १९९९ मध्ये पुरावे नसल्याने त्याला खुनाच्या अरोपातून मूक्त केलं. पण आता (होपफुली) अश्या गोष्टींवर कोर्ट विश्वास ठेवणार नाही. कायदेशीर इच्छामरणाला जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत अश्या लोकांच्या मुसक्या आवळतील.

गामा पैलवान Mon, 12/15/2025 - 03:05
तुर्रमखान,
.... पण काही अपप्रवृत्तीची लोकं असतात. त्यांचे दाखले देउन ती संस्थाच कशी नालायक आहे, ....
दाभोलकरांवर हत्येच्या समयी फ्रॉडचा खटला चालू होता. अनिस नालायक आहे की नाही ते कोर्ट ठरवेल. बाकी, नक्षलवाद्यांचे व अनिसचे जे काही संबंध होते त्यावर आपलं मत वाचायला आवडेल. आ.न., -गा.पै.

रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड ============= --राजीव उपाध्ये कर्वेरोडवर मेट्रो झाल्यानंतर पुलाखाली लावलेले अनेक साहित्यिकांचे फोटो दृष्टीस पडतात आणि काही लेखकूंची अनुपस्थिती ठळक जाणवते. कधी कधी मला प्रश्न पडतो माझे आईवडिल ’लेखकू’ असते तर काय झालं असतं? थोडी फार प्रसिद्धी मिळाली असती, ठराविक सामाजिक वर्तूळात ऊठबस झाली असती. पण माझ्या आई-वडीलांचे सामाजिक वर्तूळ माझ्या सामाजिक वर्तूळापेक्षा खुपच मोठे होते. नको ती अक्कल शिकविणारे कमी होते, मर्यादांचा आदर ठेवणारे, आनंदात सहभागी होणारे खुप होते. १ल्या लोकसभेतील एकुलत्या एक महिला खासदार इंदिराबाई मायदेव आमच्या घरी अनेकवेळा येऊन गेल्या आहेत.

तोरई (दोडके) + कोथिंबिर सूप

विवेकपटाईत ·

गवि Sat, 12/27/2025 - 11:56
दोडका ही आवडती भाजी. याच्या शिरांची चटणी हा तर त्याहून आवडीचा पदार्थ. दोडक्याचे सूप, तेही कोथिंबीर घालून, ही कल्पना छान आहे. मधेच त्यात टोमॅटो घालून मात्र तुम्ही आपल्याच पाककृतीवर अविश्वास दाखवलात. ;-)

कंजूस Sat, 12/27/2025 - 21:12
सुपाचा रंग काय झकास आला आहे. तुरईची चव किंचित तुरट असते . मी कच्चेच दोडके खातो. चणा डाळ घालून केलेली भाजी अविट चवीची लागते. ( बाकी दोडके किंवा घोसाळे मेले तरी आतली जाळी अंग घासण्यासाठी वापरली जातात. ) दोडका शिरांची चटणी शोध कुणी लावला त्यास बक्षीस द्यायला हवे.

In reply to by कंजूस

सोत्रि Sun, 12/28/2025 - 04:02
चणा डाळ घालून केलेली भाजी अविट चवीची लागते.
दोडका शिरांची चटणी शोध कुणी लावला त्यास बक्षीस द्यायला हवे.
१०००+ कंजुसजी, आपले सुत जुळणार असं दिसतंय!! - (द्वाड-का) सोकाजी

करुन बघायला पाहीजे. बाकी सध्या थंडीमुळे बाजारात गाजरे, हरभरे, मटार,घेवडा आणि उंधियु च्या सर्व भाज्या आल्या असल्याने चंगळ आहे. त्यामुळे दोडके, पडवळ, वांगी,भेंडी, दुधी वगैरे नावडत्या भाज्या जरा बाजुला पडल्या आहेत.

दोडक्याचे सूप आज सकाळी सौ. दोडक्याची भाजी बनवत होती. मी विनंती केल्यावर सौ.ने मुगाची डाळ भाजीत टाकली. डाळ टाकण्यामुळे दोडके कमी लागले. तीन दोडके, जवळपास 250 ग्राम, उरले.

लैंगिक वर्तन

युयुत्सु ·

In reply to by युयुत्सु

>>>>"सुसंस्कृत" मानवसमाजाने निर्माण केलेल्या नैतिकतेच्या, धार्मिक जटिल कल्पना.. देव, धर्म आणि लैंगिक गोष्टीचीही जाहीर चर्चा चिकित्सा केली की ते सगळं पापात येत असल्यामुळे च्यायला, निखळ आंनदायी गोष्टींचीही कुचंबना झाली. एका दृष्टीने सार्वजनिक हिताचे विषय असल्यामुळे आपला अशा 'विषयांना' पाठिंबा आहे. :) -दिलीप बिरुटे

प्राणी रस्त्यावर संभोग करतात म्हणुन माणसानेही करावा काय? संप्रेरके सारखीच असली तरी कोणाची विवेकबुद्धी जास्त विकसित झाली आहे? माकडाची की माणसाची? त्याचा वापर करु नये काय?

युयुत्सु Mon, 12/08/2025 - 15:18
माणसे पृथ्वीतलावर उघड्यावर समागम करत होती आणि अनेक ठिकाणी अजुनही करतात. कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात सापडायचे नसल्याने पुरावे देता येणार नाहीत. इतकंच काय तर अजुनही दक्षिण अमेरिकेत एका समाजात लग्ना अगोदर गाढवाशी संभोग करायची प्रथा आहे. संप्रेरकांच्या प्रभावा खाली विवेक नष्ट होऊ शकतो. या वाक्याचा अर्थ आपल्याला कळला नाही की आपण जाणूनबुजुन दुर्लक्ष केलेत? आपण थोडी मानववंश शास्त्राशी जवळीक वाढवावी. म्हणजे आपली संस्कृती श्रेष्ठ हा दुरभिमान आणि झापडे गळून पडतील.

लैंगिक वर्तन ======== पूर्वी अधून-मधून वृत्तपत्रातून झळकणार्‍या काही बातम्या आता नित्याच्या झाल्या आहेत - त्यात "तरूण जोडप्याचे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन" ही बातमी वारंवार झळकते. वेगवेगळ्या कारणांनी होणार्‍या भावनिक कोंडीमुळे अनावर झालेल्या लैंगिक उर्जेच्या निचर्‍याला "अश्लील" संबोधल्याने समाज निरंतर चुकीच्या कल्पना गोंजारत राहतो. मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे सोडवताना काहीतरी भोज्जा (संदर्भबिंदू) पकडणे आवश्यक ठरते.

स्वतःला जगवत ठेवण्याचे प्रयोग (ऐसी अक्षरे ३५)

Bhakti ·

In reply to by युयुत्सु

लढणार्‍या लोकांचं मला खुप कौतूक आहे. पुस्तकाने उत्सुकता चाळवली आहे. वाचलंच पाहिजे.
असंच म्हणतो. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

युयुत्सु Wed, 12/10/2025 - 17:13
पुस्तक पोचलं आहे. १ली १५ पानं वाचूनच झोप उडणार आहे... विशेषतः "केवळ माझ्या दोन पायामध्ये लोंबकळणारं लिंग नाही म्हणून मी सर्जन व्हायला कमी लायक, असा एक मोट्ठा समज सार्‍या वैद्यकीय जगात पसरलेला आहे" हे पान क्र० १२ वरील वाक्य वाचल्यावर आमचं आय्०आय०टी० मधलं शिक्षण फारच सुखद होतं, असं म्हणावं लागेल. आजची वैद्यकीय शिक्षणव्यवस्था इतकी सडलेली असेल तर त्या व्यवस्थेत आपल्याला योग्य उपचार देतील असे वैद्यकीय व्यावसायिक मिळायला नशीबच हवे. शिवाय त्यांच्याकडून नैतिकता आणि पारदर्शकतेची अपेक्षा कशी करावी? अत्यंत उत्तम पुस्तकाला प्रकाशात आणल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद!

1 पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग लेखिका -#ऐश्वर्या_रेवडकर स्वतःचे अवकाश शोधणाऱ्या स्वच्छंदी मुली लग्न संस्थेतील कच्चे दुवे ,पुरुषत्वाचा दुराभिमान, पितृसत्ताक वर्चस्व, स्त्री-आदरातील सामाजिक दांभिकता या मुद्द्यांपर्यंत तटस्थपणे नक्कीच पोहोचतात.तेव्हा त्या विचारांना फेमिनिझम म्हणत आपण हेटाळतो .प