मित्रांनो,
टाईम पास चा हा विरंगुळा!
घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!
खडा
भाताचा घास तोंडात जातो तोच गालावर हात ठेवून चेहरा रागिट झालेला पाहिला की समजावे, 'खडा' लागला आहे!
कधी कधी तरूणींच्या डोळ्यांची फडफड पाहिली की तरुणांना 'खडा ' टाकायची हुक्की येते.
ज्वेलरीच्या दुकानातून 'खडा' ऐटीत अंगठीत खुलताना दिसतो.
दगडाचा छोटा कठीण तुकडा अनेक छटांनी सामोरा येतो.