Skip to main content

शब्दक्रीडा

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

झुंज (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 24/08/2015 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपण पुन्हा कधीच जागं न येण्याकरिता या तुरुंगात झोपलोय आज, हे त्या सर्वांना कळलंही होतं एव्हाना…… घरदार दुरावलं, सगेसोयरे दुरावलें...... हिरवे डोळे आणि सुंदर मुलायम केसांचा एकेकाळचा तिचा सगळा राजस रुबाब धुवून निघाला होता, तरीही जगण्यातली सारी झुंज पुन्हा एकवटून, तुरुंगाचे गज आपल्या पकडीत घेऊन, त्या एका निकराच्या क्षणी आभाळाकडं पाहत ती ओरडते … मी अशी हरणार नाही...मी इथून निसटून जाईन..

आमचीबी चालुगिरी…

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 10/08/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा…. आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा.. त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्‍या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो.

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

भामी

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 31/07/2015 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
भामाक्का बाजाराच्या टेम्पोमधून खाली उतरली तेव्हा उन्हं उतरायला होती. घराजवळ पोहोचल्यावर ओट्यावर बसलेल्या धाकट्या लेकी उराशी बिलगल्या, तसं लेकींना कवटाळू धरताना, भामीचं लेकुरवाळं आभाळ आणखीनच भरून आलं. "गोमू कुटं दिसंनांग पोरींनो ? ". " मगाचंधरनं ती शोध्तीय्या पाडीला अन तिच्या पाडसाला". …… "पाडी लई द्वाड, हायवेच्याकडच्या फाट्याकड बघायला जात्येगं पोरींनो ". असं बोलून भामी तिथून निघालीसुद्धा.

( रेशनकार्ड )......शतशब्द-सम्मुच्चय

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 29/07/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
३ वर्षे खच्चून पर्फोर्मंस दिल्यावर शेखरअण्णाने तीला सोलो पाठवायचं ठरवलं. घरवालीशी बोलून झालं, नगरसेवक काचीचं नाव निघालं. घरवालीला केवढा आनंद झाला, काचीबरोबरची रात्रीची "बैठक" छान झाली. "१८ वर्षांपेक्षा मोठी दिसायला लागली आता तु" असं काचीकडून उत्तर मिळाल्यावर खुश झाली. टोपाझची रात्र जवळ येवू लागली, खरेदी वैगेरे झाली. शेखरअण्णाने पारदर्शक डीपकट घालायला लावलं तीला. "कष्टमरको खुश रखेगी…. इदर जैसे डान्स किया, उससे अच्छा उदर करेगी" असं ऐकल्यावर त्याचं टेन्शन कमी झालं. आवश्यक सोपस्कार पार पडले. टोपाझमधे धंदेके टाइमवाला डान्सफ्लोर मिळाला.

ती (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 28/07/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
"स्त्रीला कधीही नाही जमणार, भालाफेकीत किंवा तिरंदाजीत नीट नेम धरून शिकार टिपायला...... तुझं शरीराचं, तुला अडचणीच होईल त्यावेळी !" त्याचा मृतदेह पुरला, तरी डोक्यातले त्याचे शब्द तिला राहूनराहून छळत होते. 'त्याने शिकार करायची, अन तिने धारदार सुऱ्याने शिकारीची चामडी सोलून, छोटूकले तुकडे करून, शेकोटीवर भाजून, चिल्ल्यापिल्ल्यासकट सगळ्यांना खाऊ घालायचे', असा सरळसोट हिशोब राहिला नव्हता आता……त्याला गुहेजवळ पुराल्यानंतर.

तोच जुना शालू ....(शतशब्दकथा )

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 27/07/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या मनाने, मला आग्रह करकरून, तोच मुलायम शालू नेसायला सांगितला होता. मोतीया रंगाचा आणि सुंदर लालचुटूक फाटलेल्या किनारीचा, तोच जुना शालू. तशी मी पहिल्यापासून हौशी, प्रत्येक गोष्ट कशी, सुंदर, नीटनेटकी आणि पद्धतशीर व्हायला पाहिजे, हा माझा कायमचा आग्रह. आजही माझ्या वयाला साजेसाच रंग होता आणि माहेरचा खानदानी बाज होता, काठ स्वतःच्या हाताने फाडला होता त्याचा मी. भावाची जखम बांधायला, मागेपुढे का पाहावे ?? म्हणूनच……फाटका, तरी अत्यंत प्रिय मला आणि माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेला शालू …… ....... ..... ....

आधार (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 24/07/2015 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
(डिसक्लेमर: सदर कथा ही सत्यघटनेवरून जरी प्रेरित असली, तरी, भारतातील कोणत्याही जिवंत अथवा मृत, व्यक्ती/संघटना/घटना यांच्याशी त्याच्या काहीही संबंध नाही.) डोकी भडकतील, अशी अतिरंजित भाषणे करून, दिशाभूल घडवणे, नंतर तरुणांच्या हातून दंगली, नरसंहार सारख्या घटना, घडवून आणणे, ही प्रविण बुगाडियाची स्पेश्यालीटी. धर्मरक्षणाचा गदर करून, विश्वधर्म-परिषदेवर, स्वतःची पकड मजबूत केलेली.

स्टारशिप इंटरप्राईज्_नॅनो (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 22/07/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्टारवर्ष: '२११५', उर्सुला तारेसमुच्चय अंतराळ … अंतिम अथांग मिती……… आणि ती अथांग आहेत, हे माहीत असूनही, स्वयंचलित 'स्टारशिप इंटरप्राईज् नॅनो' धैर्याने निघाली होती, तिच्या अविरत ध्येयाच्या पाठ्लागावर….नवजीवन आणि नवसंस्कृतींच्यां शोधात….अमर्यादित असणा-या मितीचा शोध घेणाच्या, एकदलीय साहसी मोहिमेवर.