तुझ्या समोर मी नेहमीच शहाण्यासारखं वागायचं ठरवते.
खूप वाटंत असतं तुझ्याकड अनिमिष नेत्रांनी पहावं..
तुझ्या कपाळावर येणारी चुकार बट, तुझे भुरभुरणारे केस,
तुझ्या गालावरची खळी, बोलताना हलणारे लोभस ओठ..
पण मी अगदी शहाण्या मुलीसारखी बसते, डोळे झुकवून.
झुकलेल्या नजरेला दिसतात तू कोपरापाशी अस्ताव्यस्त दुमडलेल्या बाह्या, तुझी ती लांबसडक कलाकाराची बोटं,
शर्टाच्या पहिल्या उघड्या बटणातून खुणावणारी तुझी रुंद छाती.
मी नजर अजूनच आवरून घेते.
मग दिसतो ऐकू न येणा-या तालावर हलकेच हलणारा तुझा पाय,
त्याचा तो देखणा अंगठा, मृगमुखी!
मी तिथेच हरवून जाते...
भानावर येते तेव्हा तू माझ्या उत्तराची वाट पहात असतोस.
"अं?"
मस्तच.
पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोड
वाह!
सुरेख
+१
धन्यवाद!
अप्रतिम!!!
जबरदस्त
धन्यवाद!
आवडली रे!
धन्यवाद!
सुंदर
सुरेख!
धन्यवाद!
मस्त!
_/\_