Skip to main content
लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 17/07/2020 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
सांजेच्या व्याकुळ वेळी का गोकुळ बाधा होते? आभाळ दाटते तेव्हा मन राधा राधा होते.. साहवे मला ना जेव्हा काहिली तनूची उष्ण, आवेग असा वा-याचा भासतो जणू की कृष्ण.. मिटताना डोळे माझे कुशीत मजला घेतो, रोज मला उठवाया पाऊस होउनी येतो.. घनघोर बरसतो वेडा दिवस असो वा रात्र, रुजवात सुखांची नवथर भिजवुनी सारी गात्रं.. (ही राधा खास रातराणीसाठी....:))

वाचने 24376
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

छान कविता. "मग* आधा आधा होतो", असे विडंबन होऊ शकत, असा विचार आला. परंतु पैबु ते करतीलच असा विचार करून, शांत बसलो. "सांजेच्या व्याकुळ वेळी" वैगरे पोटेंशियल वाक्ये .... *एक प्रकारचे पेयपात्र

In reply to by प्राची अश्विनी

हा प्रतिसाद वाचतानाच मनात विडंबन तयार होत होते. https://misalpav.com/node/47207 पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

विडंबन तयार होण्याच्या प्रक्रियेवर एक लेख अवश्य येऊ द्यात

नेहमीप्रमाणेच सुरेख 'प्राची काव्य' आता संग्रह ट्रॅडीशनल पुस्तकाच्या स्वरुपात येऊन जाऊ द्यात. किंवा टेबलटॉप कॅलेंडरच्या स्वरुपातही छान होईल पहा विचार करून.

In reply to by प्राची अश्विनी

तुमच्या काव्यावर तुटून पडणार्‍या सर्वच काव्यपंख्यांची डिमांड असणार आहे, जे सगुण आहे ते केव्हान केव्हा किर्ती प्राप्त करतेच, चेष्टा आमच्यासारख्या भूछत्रीवाल्यांची होते, तुमचे काव्य दर्जेदार मराठी भारतीय सांस्कृतीक आरसा आबि वारसा आहे आणि ऑनलाईन नसलेल्या रसिकवर्गा पर्यंत तुमची कविता पोहोचलीच पाहीजे असे आग्रहाने म्हणावेसे वाटते.

In reply to by माहितगार

धन्यवाद!! पण संग्रह काढला की तो विकणे आले. मार्केटिंग हा प्रकार अजिबात जमत नाही. त्यामुळे निर्मितीचा आनंद घेते फक्त.

हे
साहवे मला ना जेव्हा काहिली तनूची उष्ण, आवेग असा वा-याचा भासतो जणू की कृष्ण..
आणि हे
भेट होता, सावळी ती जाहली कांती तुझी गं गोरट्या रंगात त्या, आता निळ्याचा वास आहे
सारखं वाटतय का? ऑल डेव्हिल्स थिन्क्स द सेम!! :) :)

क्या बात है! लयदार तरल काव्य. राधा होणे म्हणजे व्याकूळता ही जबरदस्त कल्पना यात दिसते. सं - दी - प

सांजेच्या व्याकुळ वेळी का गोकुळ बाधा होते? आभाळ दाटते तेव्हा मन राधा राधा होते.. निव्वळ अप्रतिम.. खुप आवडल्या ओळी या..

सुरेख काव्य. खरं सांगतो शीर्षक वाचून ही तुमचीच रचना असणार असं वाटलं आणि तसंच झालं.