शहाणी मुलगी....
लेखनविषय:
तुझ्या समोर मी नेहमीच शहाण्यासारखं वागायचं ठरवते.
खूप वाटंत असतं तुझ्याकड अनिमिष नेत्रांनी पहावं..
तुझ्या कपाळावर येणारी चुकार बट, तुझे भुरभुरणारे केस,
तुझ्या गालावरची खळी, बोलताना हलणारे लोभस ओठ..
पण मी अगदी शहाण्या मुलीसारखी बसते, डोळे झुकवून.
झुकलेल्या नजरेला दिसतात तू कोपरापाशी अस्ताव्यस्त दुमडलेल्या बाह्या, तुझी ती लांबसडक कलाकाराची बोटं,
शर्टाच्या पहिल्या उघड्या बटणातून खुणावणारी तुझी रुंद छाती.
मी नजर अजूनच आवरून घेते.
मग दिसतो ऐकू न येणा-या तालावर हलकेच हलणारा तुझा पाय,
त्याचा तो देखणा अंगठा, मृगमुखी!
मी तिथेच हरवून जाते...
भानावर येते तेव्हा तू माझ्या उत्तराची वाट पहात असतोस.
"अं?" म्हणून मी वर बघते. वेड्यासारखी.
तू हसतोस , तुझ्या गालावरची खळी, मिश्कील डोळे सांगतात की तू ओळखलंयस आत्ता काय घडलं ते.
पण तू चतूर! मला सांभाळून घेत तू शिताफीनं विषय बदलतोस.
मी मग स्वतः वरच चिडते, शहाण्यासारखं वागायच्या प्रयत्नात हे वेडेपण कुठून आलं म्हणून ..
वेळ कसा भुर्रकन उडून जातो.
तू गेल्यावर मी आठवत बसते उडून गेलेला क्षण अन् क्षण..
काही काही म्हणून आठवत नाही. शप्पथ.
मग मात्र मी ठरवते पुढच्या वेळी ना अगदी अगदी शहाण्यासारखं वागायचं.
आणि मी वेड्यासारखी तुझ्या भेटीची वाट पाहू लागते...
वाचने
7883
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
_/\_
In reply to _/\_ by राघव
:)
ओहो.. सुंदर
In reply to ओहो.. सुंदर by तुषार काळभोर
खरंय. :)
आई ग :), एकदम कातिल, फार फार
In reply to आई ग :), एकदम कातिल, फार फार by वीणा३
:) धन्यवाद .
भारीच हो !
In reply to भारीच हो ! by संजय क्षीरसागर
धन्यवाद सर!
सुंदरम्
उत्कृष्ट.
खूप मस्त :)
हळुवार आणि तरल
सर्वांनाच धन्यवाद.
खूपच छान..