मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमकाव्य

आली जरी रात सजणी...

Deepak Pawar ·
लेखनविषय:
काव्यरस
आली जरी रात सजणी पण नभी हे चांदणे तुझिया मनातील गुज मज सांगती तव कंकणे. हा गार वारा बिलगता झाकता तू लोचने हे मेघ ही बरसले तव पाहता ते लाजणे. का डोलती या लता? ही वाट झाली धुंद का? तू चालता छेडताती सुर तुझी ती पैंजणे. डोळ्यात डोळे मिसळुनी तू मला गे पाहता नाही जरी बोललो हृदयात या झंकारणे. रेंगाळतो दीस माझा रूसुनी बसताच तू तेव्हा मला आवडे ना ते तुझे गे वागणे. . . दीपक पवार.

दे दवांचे प्याले

चांदणे संदीप ·
काव्यरस
कितीदा ओठांवरती अव्यक्त राहिलेले शब्द ते तुझ्या मी, डोळ्यांत वाचलेले जायचे कुठेशी, मी चाललोय कोठे? तुझ्या रूपाने, रूपाली, मला भारलेले माळून दे म्हणालीस, माला तारकांची केशी तुझ्या टपोरे, चंद्रफूल माळलेले भेटता तुला उराशी, श्वासात आग येते क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले घनगर्द भावनांचा कल्लोळ माजतो ग दे दवांचे प्याले, पाकळ्यांत साठलेले - संदीप चांदणे

सांजावता दाटते का तुझी आठवण?

Deepak Pawar ·
काव्यरस
सांजावता दाटते का तुझी आठवण? जीवास या जाळते का तुझी आठवण? होते तुझे गोड ते लाजणे ही होते तुझे गोड ते हासणे ही गेल्या सुखा माळते का तुझी आठवण? वाऱ्यासवे शब्द येती तुझे हे पर्णातुनी वाटते नांदती हे गंधापरी वाहते का तुझी आठवण? येती जशी पाऊले चांदण्याची होते कशी काहिली ही मनाची रातीस या भाळते का तुझी आठवण? दीपक पवार.

अवती भवती तरंगे.

Deepak Pawar ·
लेखनविषय:
अवती भवती तरंगे तुझ्याच श्वासाचा दरवळ अंतरी फुलते आहे तुझ्याच प्रीतीची हिरवळ. रस्त्यावर पाऊल खुणा कि होई आभास तुझा वाऱ्यावर गंध फुलांचा कि दरवळे श्वास तुझा जिकडे तिकडे दाटली तुझ्याच पदराची सळसळ. संध्याकाळ ही उधळीत रंग तुझ्या आठवांचे रात्र दाटता का आठवे मज पळ चांदण्यांचे? उठता बसता सारखा तुझाच भास मला हरपल. छेडूनी दुखास माझ्या आता हे सूर लाविले तू ते माझेच शब्द होते येथे जे गीत गायिले तू कशास करशी मना तिचीच तू आता कळकळ.

वेडा वेडा पाऊस..

प्राची अश्विनी ·
काव्यरस
वेडा वेडा पाऊस.. वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस? काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस.. छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला, होतं असं चुकून, कळावं ना पावसाला? वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला. म्हणून भिजले, नको ना रे भलता अर्थ लावूस! भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना? बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना? घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना? म्हणून थांबले, नको की रे भलता अर्थ लावूस! बरं, पडायचं तर गुपचूप पडावं नं पावसानं? कशाला त्या विजा बिजा आणि वर गडगडणं? घाबरेल कुणीही, असलं वेडं याचं वागणं! म्हणून बिलगले, नको हो भलता अर्थ लावूस! तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस.. वेडा

तुला काय ठाऊक सजणी, तुझ्यावर कोण कोण मरतंय ...

चित्रगुप्त ·
तुला काय ठाऊक सजणी तुझ्यावर कोण कोण मरतंय आख्खं गाव तुझ्यासाठी रात्रंदिवस झुरतंय माळावरचा दगडू पैलवान भल्या-भल्यांना भरवतो हीव तुझ्यासाठी त्याचा सजणी टांगणीला गं लागलाय जीव सुताराचा चकणा म्हादू तुझ्यावर लईच मरतो तुला बघत पटाशीचं काम कानशीनं की करतो डोईवर घेऊन शेण-बुट्टी ठुमकत गं तू निघते दीवाण्यांची टोळी तुझ्या मागं मागं फिरते प्रत्येकाला तुझाच राणी गुलाम बनून रहायचंय तुला मात्र माधुरी बनायला म्हमईला जायचंय . आमची पेर्णा: . अवांतरः "डिसेंबर २

किती काळ झुलवायचे

किरण कुमार ·
खरे सांग आता तुझ्या बंद ओठी कितीदा नाव माझे उमटायचे किती यायच्या सरी या उरी अन किती अश्रू पाण्यात सिमटायचे तुझी नक्षत्रे बिलगली घराला पुढे चांदण्यांना कसे रेटायचे मळभ ढगांचे पुन्हा पांघरोनी माझ्या नभाने किती दाटायचे उरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती पिसारे फूलवायचे भेटीतही तू भेटसी मुक्याने उत्तराला किती काळ झुलवायचे गज-यात अजूनी गंध मोग-याला राहिले तुला तरी हसवायचे कितीदा करावे रफू मी मनाला कितीदा पुन्हा तूच उसवायचे आता उसासे मी आठवांचे घ्यावे मोर पिसाचे पान उलटायचे पुन्हा खा तू शपथा माझ्याच आणि पुन्हा वेळ येताच पलटायचे जत्रा आसवांची भरताच मन

ब्लिडींग हार्ट....

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
खुप दिवस मनात होते की "रक्तस्त्राव हृदय फुले" दिसावीत. अंतरजालावर एका राजकुमाराची प्रेमकहाणी वाचली म्हणूनच कुतूहल वाढले होते.सकाळची फिरण्याची सवय आज कामाला आली.ज्या झुडूपवर्गीय वनस्पतीला रक्तस्त्राव हृदया फुले येतात ते झुडूप एके ठिकाणी दिसले. जवळच "रडणार्‍या चेरी चे झाड (विपींग चेरी)",बघुन काय वाटले ते लिहीण्याचा प्रयत्न.

वसंतात मृगजळ खास

माहितगार ·
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)