कुणीतरी, केव्हातरी, कधीतरी, कुठंतरी ...
लेखनविषय:
उन्हाच्या सावलीत
सावलीतल्या उन्हात
कधीतरी वेडं मन भिजतं ना?
गप्पांच्या नादात
नादावल्या जगात
कुणीतरी गोलगोल फिरतं ना?
चहाच्या कपात
कपातल्या चहात
काहीतरी गोडगोड घडतं ना?
मनातल्या प्रश्नाचं
मनातलं उत्तर
केव्हातरी कुठंतरी मिळतं ना?
कसंतरी कुठंतरी
कुणीतरी केव्हातरी
कधीतरी प्रेमात पडतं ना?
पडतं ना?
वाचने
7080
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
क्या बात...! एकदम मस्त.
वा छान उभारी देणारं काव्य!
प्रचेतस आणि पाषाणभेद..
मस्त...!!
झकास
अगदी फर्मास !
जयगंधा, चांदणे संदीप अन्
कविता घडते का घडवली जाते ?
In reply to कविता घडते का घडवली जाते ? by Jayant Naik
धन्यवाद.
गोडवा आहे
साध्या सरळ शब्दांची छान कविता
खूप सुंदर!
धन्यवाद सर्वांनाच.
छान काव्य
एकदम भारी!