Skip to main content

जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 22/06/2020 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला माझी खूप खूप आठवण येईल ना, आणि तेव्हा जेव्हा आपण भेटू ना, तू म्हणशील, "नमस्कार मॅडम!" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग तुझ्या बाजूला गाडीत बसेन. "अगं, बेल्ट!" मी मग चिडून बेल्ट लावेन. "बोला!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा गीअरवरचा हात हातात घेईन. गालापाशी नेईन. तू हसशील..म्हणशील, लोक बघतील मी म्हणेन बघुदेत. रहावणार नाहीच मला.. बेल्ट काढेन, अशी अख्खी झुकून मी तुझ्या जवळ पोचेन. तुझ्या छातीवर डोक ठेवेन.. मान वर करून तुझ्याकडे पाहीन. तू एवढा ताडमाड उंच, कशी पोचू तुझ्या ओठांकडे?? तू आता गाडी कशी चालवू या चिंतेत असशील.. मी हसून पुन्हा डोकं तुझ्या रुंद छातीवर ठेवेन, विश्वासाने.. तुझा गंध भरून घेईन श्वासांमध्ये.. बघेन ठोके वाढतायत का.. आणि मग... ..... पण जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, तेव्हा तुला माझी आठवण येईल ना? खूप खूप आठवण येईल ना?????
काव्यरस

वाचने 10032
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

छान

हा हा मला पण टेन्शन आलं आता हा गाडी कशी चालवणार म्हणून :) :) मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक ;) कविता आवडलीच :)

असं सहज सोप्पं हळवं लिहिणं अतिशय अवघड! खूप छान! खासंच!

प्रचेतस, मोगरा, सस्नेह, श्रीकांत हरणे, रातराणी, वीणा, सत्यजित आणि शाविकु., धन्यवाद!!

सुंदर कविता ! ही कविता , हा क्षण जगलोय मी ... यवतेश्वरच्या पठारावर. आठवण येते अगदीच नाही असं नाही, पण अगदी खुप प्रकर्षाने येते असंही नाही . फॅक्टय , खोटं नाय बोलत. दर वेळी जुन्या पावसाची आठवण काढत बसलं की हाताशी असलेल्या पावसात मनसोक्त चिंब भिजता येतं नाही, आत्ता आहे ह्या क्षणात राहुन , अत्ता आहे तो पाऊस स्वतंत्रपणे एन्जोय करता येणं ह्यात खरी मजा आहे ;)

क्लास ! -दिलीप बिरुटे

वा मस्तच पुन्हा वाचली.. अप्रतिम

खूप छान ! चिंब पावसात हुरहूर लावणारी कविता.