Skip to main content

प्रेमकाव्य

गाण्यास पावसाच्या...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 01/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे थेंबास ओघळाया हलकेच गाल दे! नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!

प्रेम..

लेखक मन्या ऽ यांनी सोमवार, 01/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम.. प्रेम म्हणजे अथांग सागर प्रेम म्हणजे वाळवंटातील मृगजळ ज्याने तहानलेल्याची तहान काहीकेल्या भागत नाही प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे आपुलकी जो वेळप्रसंगी माणुसकीला जागलेच असे नाही प्रेम म्हणजे अटी प्रेम म्हणजे बंधन जे माणसाला एक माणुस म्हणुन वागवत नाहीत मुक्तपणे जगु देत नाही तरीही हे प्रेम वाटे मजला हवेहवेसे ते प्रेम जे एकमेकांच्या अबोल गोड शब्दांचे एकमेंकाच्या साथीचे समोरच्याच्या मंद गुढ हास्यातले ते प्रेम जे आयुष्यात देवघरातल्या नंदादिपाप्रमाणे अखंड तेवणारे स्वतः जळून काळोख मिटवणारे -दिप्ती भगत (२०जून,२०१९)
काव्यरस

आणि अश्या वेळी

लेखक कौस्तुभ भोसले यांनी मंगळवार, 26/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अश्या वेळी, चंद्राने लपायला हवं ढगांआड... अन लपेटून घ्यायला हवं आपण, भोवतालचं गुलाबी धुकं... एकमेकांच्या श्वासांमधून उधळायला हवीत, प्रितीची गंधफुले... घट्ट मिटायला हवीत, डोळ्यांची नक्षत्रं... टेकवायला हवेत गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे, ओठ एकमेकांवर... आणि मग पहावं, श्वास रोखले जातात की; हृदय धडधडायचं थांबतं..? -कौस्तुभ

उसणं अवसान

लेखक कौस्तुभ भोसले यांनी मंगळवार, 12/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
मी उसणं अवसान आणून म्हंटल होत. तुझ्यासाठी मी चंद्र तोडून आणीन... चांदण्यांचा गजरा करून तुझ्या केसांत माळीन... पण ते सार अशक्य होत..! अन् तरीही तू, माझ्या सोबत सुखाने संसार केलास... माझ्या प्रत्येक स्वप्नांना तू आकार दिलास... माझ्या सारख्या आणाभाका तू घेतल्या नव्हत्यास. तू फक्त एवढंच म्हंटली होतीस, तुझा हात धरुन मी नेहमीच उभी राहिन... -कौस्तुभ
काव्यरस

चांदणरात

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शनिवार, 09/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
पैजणी चांदणरात तुझ्या स्पर्शात हे प्राण घेऊनी आली... स्पर्श संदिग्ध जरासे मंद गुलाब फिरले गाली... ढवळते वारा छेडील्या तारा आकाश असे सचित्र... उधळती रंग पसरले गंध हे भास मला विचित्र... उरी मोगरा प्रसविते झरा तुझी मधुर काया... क्षणाची भूल उठविते झूल निळी सावळी माया... - कौस्तुभ

प्राजक्ताची फुले

लेखक मनोज यांनी बुधवार, 29/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
हळूवार वेच ती प्राजक्ताची फुले रानपाखरे वेलीवरती घेती तेथे झुले. मधुर गोजिरी होते किलबिल. तुझ येण्याची देती चाहूल. प्राजक्त ही मग बहरून येतो शुभ्र फुलांची रास घालीतो केस मोकळे शुर्भ वसने पायावर ते अलगत बसणे फुल फुलाशी घेते वेचून असेच मजला वाटे पाहून चोरुन घेई गंध नेटका अंगणी वाहे वारा अवखळ प्राजक्ताचा गंध सुगंधी की आसे तो तुझाच दरवळ

सुट्टीतील प्रेम

लेखक Shubham vanve यांनी शुक्रवार, 24/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती. ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला, माऊशीकड आलती. त्याच रात्री अंधारात आमची भेट झालती. अंधारात फक्त आमची एकमेकांशी बोलनी झालती. आणि नंतर तिने माझ्याकडे आणि, मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती. आशा काही रात्री गेल्यानंतर आमच्या नात्याला सुरवात झालती. का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती. कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती.

कस सांगू तुला

लेखक Pritam salunkhe यांनी गुरुवार, 02/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस माझं हसणं तू माझं जगणं तू माझा ध्यास तू माझा श्वास तू कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस मला साखर झोपेत पडलेले एक गोड स्वप्न तू पहाटेची अल्लड झुळूक तू माझ्या पौर्णिमेचा चंद्र तू माझ्या सफेद आयुष्यात रंग भरणार तू  इंद्रधनुष्य आहेस.... कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस.. कोणाची तरी काळजी करायला शिकवणाऱ्या काळजीच  कारण  तू माझ्या जगण्याचा श्वास... आणि जगताना लागलेला ध्यास आहेस... कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस... कधी न पूर्ण होणार स्वप्न आहेस की कोणत्या नावाची गरज नसलेलं नात आहेस.