Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्राची अश्विनी on Mon, 06/22/2020 - 09:00
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला माझी खूप खूप आठवण येईल ना, आणि तेव्हा जेव्हा आपण भेटू ना, तू म्हणशील, "नमस्कार मॅडम!" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग तुझ्या बाजूला गाडीत बसेन. "अगं, बेल्ट!" मी मग चिडून बेल्ट लावेन. "बोला!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा गीअरवरचा हात हातात घेईन. गालापाशी नेईन. तू हसशील..म्हणशील, लोक बघतील मी म्हणेन बघुदेत. रहावणार नाहीच मला.. बेल्ट काढेन, अशी अख्खी झुकून मी तुझ्या जवळ पोचेन. तुझ्या छातीवर डोक ठेवेन.. मान वर करून तुझ्याकडे पाहीन. तू एवढा ताडमाड उंच, कशी पोचू तुझ्या ओठांकडे?? तू आता गाडी कशी चालवू या चिंतेत असशील.. मी हसून पुन्हा डोकं तुझ्या रुंद छातीवर ठेवेन, विश्वासाने.. तुझा गंध भरून घेईन श्वासांमध्ये.. बघेन ठोके वाढतायत का.. आणि मग... ..... पण जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, तेव्हा तुला माझी आठवण येईल ना? खूप खूप आठवण येईल ना?????

Submitted by प्रचेतस on Mon, 06/22/2020 - 09:28

Permalink

क्या बात..! बहोत खूब.

क्या बात..! बहोत खूब.
  • Log in or register to post comments

Submitted by मोगरा (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 06/22/2020 - 20:25

Permalink

छान

छान
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 06/22/2020 - 21:43

Permalink

लडिवाळ कविता !

लडिवाळ कविता !
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Tue, 06/23/2020 - 09:05

In reply to लडिवाळ कविता ! by सस्नेह

Permalink

धन्यवाद!:)

धन्यवाद!:)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकांतहरणे on Mon, 06/22/2020 - 22:27

Permalink

वा हा खूप खूप प्रकार ....खरंच

वा हा खूप खूप प्रकार ....खरंच ... खूपच आहे बाबा....
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Tue, 06/23/2020 - 09:01

In reply to वा हा खूप खूप प्रकार ....खरंच by श्रीकांतहरणे

Permalink

:):)

:):)
  • Log in or register to post comments

Submitted by वीणा३ on Mon, 06/22/2020 - 22:31

Permalink

जीव घेतलात आज :)

जीव घेतलात आज :)
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Mon, 06/22/2020 - 23:51

Permalink

हा हा मला पण टेन्शन आलं आता

हा हा मला पण टेन्शन आलं आता हा गाडी कशी चालवणार म्हणून :) :) मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक ;) कविता आवडलीच :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Tue, 06/23/2020 - 09:06

In reply to हा हा मला पण टेन्शन आलं आता by रातराणी

Permalink

हम्म.. मनाचा ब्रेक..;)

हम्म.. मनाचा ब्रेक..;)
  • Log in or register to post comments

Submitted by सत्यजित... on Tue, 06/23/2020 - 00:16

Permalink

सहज...

असं सहज सोप्पं हळवं लिहिणं अतिशय अवघड! खूप छान! खासंच!
  • Log in or register to post comments

Submitted by शा वि कु on Tue, 06/23/2020 - 08:25

Permalink

खूप मस्त लिहिलंय

.
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Tue, 06/23/2020 - 09:11

In reply to खूप मस्त लिहिलंय by शा वि कु

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Tue, 06/23/2020 - 09:08

Permalink

प्रचेतस, मोगरा, सस्नेह,

प्रचेतस, मोगरा, सस्नेह, श्रीकांत हरणे, रातराणी, वीणा, सत्यजित आणि शाविकु., धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 06/23/2020 - 19:43

Permalink

सुंदर कविता !

सुंदर कविता ! ही कविता , हा क्षण जगलोय मी ... यवतेश्वरच्या पठारावर. आठवण येते अगदीच नाही असं नाही, पण अगदी खुप प्रकर्षाने येते असंही नाही . फॅक्टय , खोटं नाय बोलत. दर वेळी जुन्या पावसाची आठवण काढत बसलं की हाताशी असलेल्या पावसात मनसोक्त चिंब भिजता येतं नाही, आत्ता आहे ह्या क्षणात राहुन , अत्ता आहे तो पाऊस स्वतंत्रपणे एन्जोय करता येणं ह्यात खरी मजा आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on गुरुवार, 06/25/2020 - 18:51

In reply to सुंदर कविता ! by प्रसाद गोडबोले

Permalink

किती प्रांजळ प्रतिसाद! आवडला.

किती प्रांजळ प्रतिसाद! आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 06/23/2020 - 20:01

Permalink

अहाहा !

क्लास ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 06/23/2020 - 20:18

Permalink

वा मस्तच

वा मस्तच पुन्हा वाचली.. अप्रतिम
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 06/23/2020 - 21:37

Permalink

सहज, सुंदर, मस्त!!

सहज, सुंदर, मस्त!!
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Wed, 06/24/2020 - 22:16

Permalink

सुंदर कविता !!

खूप छान ! चिंब पावसात हुरहूर लावणारी कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on गुरुवार, 06/25/2020 - 18:52

Permalink

धन्यवाद!!

धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 10006 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com