मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमकाव्य

रोमांचक भूल !

अविनाशकुलकर्णी ·
.. चकित किंचित चिंतित उभी तू उभी आहेस जणू चितारलेले चित्र तु मदिर मकरंद सदृश सौंदर्य कळी कोवळी नव उन्मीलित तू पयोधर पीन किन्तु कटि क्षीण विधात्या ची रोमांचक भूल ! बाहे आहेत कि चन्द्रिका पुंज चेहरा कि पौर्णीमाचा चन्द्र. कवी रचित सुरस श्रृंगारतू

एकदाच ओलांडून अंतर...

प्राची अश्विनी ·
एकदाच ओलांडून अंतर पोहोचले मी तव हृदयाशी, आठवते का तुला अजुनी घडले जे जे काही नंतर? उभी राहुनी टाचांवरती, ओठ भिडवले धिटपणाने. दात पकडती अलगद हल्लक ओठांमधली मधाळ साखर.. वितळून गेले सभोवतालच, विसरून गेले काळवेळ मी. हात शोधती अधीर काही स्पर्शही झाला हळवा कातर... नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर पण... मिठी अशी ती कातील होती अजून होते तनात थरथर...

एका उदास संध्याकाळी

पाषाणभेद ·
एका उदास संध्याकाळी कोणी गात होती विराणी || शब्दांत अशी आस नव्हती चाल नव्हती अशी कोणती धारही नव्हती त्या शब्दांना तरी काळीज जाय चिरूनी || संधीप्रकाश निळा जांभळा खालून गेला वर आभाळा कुंद हवा अन वारा पडला हवेत सूर राही भरूनी || धिरगंभीर सूर कवळूनी गीत हृदयीचे आळवूनी उलगडे आर्त सरगम भरूनी राहिली कानी || - पाषाणभेद ०५/०२/२०२०

दिल की बाते

अनाहूत ·
खुद को आईने में देखकर जरूर इतराना जिनके हम जैसे दिवाने होते है उनका खुदपर गुरूर करना लाजमी है और हाँ खुबसुरत तो तुम हो ही पर आज तो रोजसे ज़ादा हसीन दिख रही हो क्या करू प्यार ही इतना है के तुझे देखे बिना तेरा चेहरा पढ लेता हूँ इसका मतलब ये ना समझ लेना की तुझे देखे बिना ही खुश हूँ मेरी तो हर सुबह तेरा चेहरा देख कर ही शुरू होती है और तेरा चेहरा देख कर ही सो पाते है हम चैन से मेरा प्यार है तू हमेशा मुस्कुराती रहना तेरा मुस्कुराता चेहरा जीने की वजह है मेरी कभी तेरे चेहरे पे मायूसी ना आने देना मेरी जीने की वजह को मिटने ना देना हा तुझे गुस्सा देता रहूँगा बार बार क्या करू ऐसे ही बहुत हसीन हो पर

Whatsapp Romantic Shayari

तृप्ति २३ ·
Whatsapp Romantic Shayari
खामोश दिल हमारा सब कुछ सह लेता है…. तेरी याद मे शायद ये दिल युही रोये जाता है…
Whatsapp Romantic Shayari https://www.truptisshayari.com/whatsapp-romantic-shayari

जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...

प्रास ·
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात. कालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं. वर्ष 1960 मधला चित्रपट 'अनुराधा', दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी, गीतकार - शैलेन्द्र, संगीत दिग्दर्शक - पं. रविशंकर, गायिका - लता मंगेशकर. बघा, काय काॅम्बिनेशन आहे. अनेकदा दिग्गज एकत्र आले की सुसंवादाच्या अभावाने कार्यहानीच होताना दिसते पण इथेमात्र संगीतातलं जणू वरूळचं कैलास मंदिर उभं राहतं. पं.

(कपाळ)मोक्ष!! :-)

चलत मुसाफिर ·
सर्व व्यर्थता उमजत असते तरि चित्ताला थारा नसतो संदेशाची तिच्या प्रतीक्षा मी प्रतिचातक बनुनी करतो हस्तसंच मज गमे उपांगच क्षणिक दुरावा असह्य होतो 'अजुनी उत्तर का येईना?' प्रश्न मनाला कच्चा खातो सतरा कामांचा खोळंबा भार्या घोष ठणाणा करते तरी पालथी घागर माझी आंतरजालावर गडगडते शेवटची कधि 'दिसली' होती किती त्यावरी प्रहर लोटले मोजुन घटिका तिज गमनाच्या पंचप्राण कंठाशी रुतले अन्य पुरुष तर नसेल कोणी? भिवविति लाखो शंका हृदया 'निळ्या खुणे'ला विलंब होता चलबिचले मम अवघी काया कुठे वावगे, अधिक-उणे कधि चुकून बोलुन मी गेलो का, तपासतो ते पुनःपुन्हा मी तरी न होई निरसन शंका अखेर उगवे सूर्यासम ती हर्षवायु मज

अन रात झाली शाम्भवी

खिलजि ·
अलवार त्याचा अस्त झाला अन रात झाली शाम्भवी चांदवा घेऊन तारे जणू सूर छेडे भैरवी कोण या हृदयात आले ? वाट शोधून ती नवी प्रहर भासे वेगळा जणू अंतःपुरा उगवे रवी गुंजते सुमधुर कर्णी नाद लावे भार्गवी श्वास गेले लोपुनी अन चित्त झाले पाशवी भेट होता लोचनांची आत फुटली पालवी बहरला तो प्रेमवृक्ष दृष्टी सृष्टी हिरवी ======================= सिद्धेश्वर विलास पाटणकर

(सूरनळीचे उपयोग)

ज्ञानोबाचे पैजार ·
एका कोपर्‍यात अंग फुगवून बसली होती सूरनळी टोकावरल्या डोळ्यांनी मला पाहत होती || माझ्याशी बोलायला लागली ती जेव्हा खरे नाही वाटले मला तेव्हा तुम्हालाही माहित आहे ही आहे थापेची गोळी || " अनेक गोष्टीं मधे उपयोग माझे जळी स्थ्ळी तरी तुम्ही का बोलतात घालून घे रे सूरनळी हेअर पीन ने कान कोराल तर त्याने सूजेल कानाची पळी || पूर्वी आदेशांना होता मोठा बाजार भाव साहेबांच्या मागे धावायचे सगळे रंक आणि राव आता मात्र न्याय आहे बळी तो कान पिळी || कधीही मी कामी येई सुटता कानी खाज कोणत्याही कागदाचा तुकडा शोधा सोडून लाज मोठ्या निगुतीने मग त्याची गुंडाळी वळी || उपयोग संपल्यावर तुम्ही मला कचर्‍यात टाकता चोळामोळ

माहेर, सासर

पाषाणभेद ·
माहेर, सासर नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा अल्याड गाव माझे त्यात मी राहिले पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते त्याचाकडची वाट नजरेला खुणावते मनी लागली हुरहुर कसे असेल सासर कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर - पाषाणभेद ०८/१२/२०१९