मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नृत्य

चाललो मी आता टॅम्पोत बसुनी

जव्हेरगंज ·
लेखनविषय:
चाललो मी आता टॅम्पोत बसुनी खाऊनी मिसळ, आनंदाने वर्षाव फुलांचा होई तिन्ही लोकी टाकुन गियर, भक्तिभावे सांगा रे सांगा रे जाऊ कुठे आता फिरुनी गावे, दमला जीव काढुनी तलवार हे द्वंद्व माजे पेटवुनी दिले, रान सारे नाही रे नाही रे आता भिती कसली भिडलो मी साक्षात, यमराजाशी काढा रे टॅम्पो बसतो मी तयात जाऊद्या आता, काढीतो लक्तरं शोधिला मी स्वर्ग सुनासुना टाकितोय तेथे, आयटमबॉम्ब येईल परतोनी नव अवतार घेऊनी विरझन, कहर कहर -घंटेश

आला आला जिलबीवाला

स्वामी संकेतानंद ·
काव्यरस
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

तुमची शांताबाई आमचा राजाभाऊ!!

जव्हेरगंज ·
लेखनविषय:
(प्रेरणा- सांगायलाच पाहीजे का? https://m.youtube.com/watch?v=IYqGOsnSCJM ) राजाभाव की चलनेकी आवाज सुन ली तुम लोगोंने....... राजाभाव ऐसा गडी है जिसके आतेही महफिल का रंग ऊडकर आसमान छु जाता है. हवा ईधर ऊधर घुमने लगती है, मौसम कोई खबर नही देता... ....और उसकी चप्पल तो ऐसी बजती है, कि जैसे कडाम् कुडुम् ..... कडाम् कुडुम् ...... कडाम् कुडुम्.... राजाभाव .....राजाभाव.....राजाभाव..... गडी कसा अगदी हट्टाकट्टा, मिशीचा तोरा भलामोठा, इंग्लिश मारतो घटाघटा, भरुन बुकना ईकडुन तिकडं खातुय चखना. खातुय ... चखणा, भरुन ....

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

जुळयांचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

नाखु ·

जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

जुळे १: सासं नसूनही तबला तू सकल मिपाचा झमेला तू धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र अन्... सुप्त बोक्याची जागा तू मोकळाढाकळा रांगडा तू रे सुमडीत सोपान डोम ही तू ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू कधी फसलेली चारोळी तू मिपात असूनही..

मेपोल - एक आनंदोत्सव

माहितगार ·
लेखनप्रकार
नमस्कार, शीर्षक वाचून कुणी या धागा लेखास निवडणूक मतदान/राजकारणाचा विषय समजून उघडले तर तुर्तास तरी क्षमस्व :) पोल हा शब्द येथे खांब अथवा काठी या अर्थाने घ्यावयाचा आहे. मेपोल हा एक बर्‍याच युरोपीय देशांमधला १ मे ला ( अथवा पासून चालू) होणारा ख्रिश्चनपूर्व काळापासून चालत आलेला एक मोठा आनंदोत्सव आहे. ज्यात काठ्यांना सुशोभित करणे त्यांच्या भोवती सामुहीक फेरनृत्य, गाणी अथवा मिरवणूकींचा देशपरत्वे समावेश असू शकतो.

बैसलो होतो पानटपरीवर

भैड्या ·
बैसलो होतो पानटपरीवर उगाच फुंकित बिड्या, करीत खेळ आगिशी पेटविल्या अनंत काड्या ऊठुन बैसलो घेतला दगड टाकिला पत्र्यावरी आवाज जाहले शेजारचे कुत्रे पळता भुई थोडी. धाप लागिली घाम फुटला नरड्यात माझ्या कोरड. हाड कुत्र्या छौ साल्या बंद कर तुझी ती ओरड. झाड दिसले चढलो वरती बैसलोय मटकुळं करून. बैसलयं खाली बघतयं वरी कुत्रं खाकरून. एक थेरीडा बघुन प्रसंग गेलाय बावचळुन. हासडुनी शिव्या मजला गेला कुत्र्याला घेऊन. रोखुन मज दाखवा कुणी चालिलो मी अड्ड्यावर. चार शिपुरडे नेई मजला पुन्हा टपरीवर. क्रमश:

णवसदस्य आणि जगप्रसिद्ध संस्थळ

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा एका जगप्रसिध्द संस्थळावर, नव्याने आलेल्या एका स्वयंघोषित प्रेशिताच्या मागे इतर सदस्य लागलेले असतात. त्या प्रेशिताला त्या संस्थळाचे संपादकही सहानुभूतीने सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात. त्याला व इतरांना सबुरीने घ्यायचा सल्ला देतात. काही नाठाळ सदस्यांना कानपिचक्याही देतात. त्यामुळे इतर सदस्य निराश होउन या प्रेशिताडे दुर्लक्ष करु लागतात. थोड्या दिवसांनी तो स्वयंघोषित प्रेशित संपादकांवरच विखारी टिका करायला लागतो. त्यांच्यावरच कंपुबाजीचे व पक्षपाताचे आरोप करायला लागतो.