मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कला

दोन वेडे -३

DEADPOOL ·
तो वेडा ब्रेड कापत होता. "हॅलो,मि.वेड विल्सन." मार्क म्हणाला. वेडा फक्त त्याकडे बघत होता. "१३ वर्षापूर्वी वाचलो मी. टॉमऐवजी तू मला मारायला हवं होतंस" वेडने क्षणात त्याच्याकडे चाकू फेकला. मार्कने तो शिताफीने चुकवला. "१०२२ लोकांच्या म्रुत्यूनंतर अजून एक जीव घेण्यास तू कमी करणार नाहीस. पण हॉल एकच जागा नाहीये, जिथे लॉझ बनत होतं! बारा वर्षांपूर्वी तू एका आजाराने मरायला टेकला होता.

कट्यार आणि चाबकाचा वार

पिशी अबोली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कट्यार बद्दल खूप काही वाचून, जुनं-नावं नाटक आणि त्यातील सगळे आदळलेले संदर्भ झेलून सिनेमा बघायला गेले. गेले, ती एकाच ओढीने, की हे सुवर्णयुग बघता आलं नाही, त्याचं नवं रूप तरी पाहू. पाहिला, आवडला, पण सगळ्या चर्चा, टीका या डोक्यात पिंगा घालत होत्या. पण त्याहीपलीकडे कुठेतरी हे वाटत होतं की फक्त जुनं नाटक, नवं नाटक आणि नवीन चित्रपट यापलीकडे जाऊन कुणी याचा फार विचार करत नाहीये. माध्यम कसंही आणि काहीही असलं, तरी ही कथा अगदी क्लासिक आहे आणि त्यातूनही कलावंताला स्पर्शून जाणारा अहंकार, आणि त्या अहंकाराचा त्याच्यातील कलाकाराशी होणारा लढा ही तर अगदी भौगोलिक मर्यादा ओलांडणारी आणि कालातीत अशी गोष्ट.

दोन वेडे - २

DEADPOOL ·
लेखनप्रकार
हॉल! लॉझ बनवायची जागा! अनेक कामगार येथे काम करत. जगातली सगळी सुरक्षा अमेरिका येथे पुरवत होती. १००० सैनिक येथे तैनात होते.

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

कट्यार - खरोखर काळजात घुसली

श्रीरंग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"सूर निरागस हो..." शंकर महादेवन यांच्या प्रसन्न स्वराने कट्यार चित्रपटाची सुरुवात होते.. आणि पुढील ३ तास ही सुरेल कथा अक्षरशः गुंतवून ठेवते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी पं. जीतेंद्र अभिषेकी, डॉ. वसंतराव देशपांडे, इत्यादी दिग्गजांनी अजरामर केलेल्या या कलाक्रुतीची मोहिनी आजही लोकांच्या मनावर कायम आहेच. सुबोध भावे सरख्या अत्यंत प्रतिभासंपन्न कलाकाराने, तितक्याच ताकदीच्या कलाकारांच्या साथीने, ही कथा चित्रपटरूपात आणून त्यांस अधिकच उंचावर नेऊन ठेवले आहे, असेच म्हणावे लागेल. ब्रिटिशांच्या अमलाखालिल हिंदुस्थानातील विश्रामपूर हे सर्व कलागुणांचा योग्य मानमरातब व कदर करण्यासाठी नावाजलेले संस्थान.

कवितांची गाणी

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
महराष्ट्र मंडळ (सिंगापूर) मध्ये कवी, गायक आणि संगीत तयार करू शकणारे असे बरेच उत्साही कलाकार आहेत. ह्या वर्षी सगळ्यांनी एक नवीन प्रयोग केला. आपल्या कवितांना आपण संगीतात रचून त्याची गाणी तयार करायची. "काव्यास्वरांजली २०१५" ह्या नावाने हा कार्यक्रम गणपती उत्सवात दणक्यात पार पडला. सगळ्या प्रेक्षकांना खूप आवडला. त्यात माझी "प्राजक्ताच्या बुंध्यापाशी " ही कविता होती. तिचा MP ३ ऑडियो इथे देत आहे. ऐकायला आवडेल अशी अशा आहे. prajaktachya bundhyapashi

किल्ला

भीमराव ·
सर्वांन्न दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळीच्या मुहुर्तावर आमचा पहिलावहीला लेख.कृपया चुकलं माकलं सांगा. दिवाळीमधे किल्ला बनवन्याची प्रथा नेमकी कधी सुरु झाली हे माहीत नाही, परंतु किल्ला हा प्रत्येक लहान मुलाची कल्पना शक्ती फुलवनारा नक्कीच आहे, दिवाळीची सुट्टी ही नवे कपडे, चिवडा, लाडु, फटाकडे या सर्वांपेक्षा या किल्ल्यामुळेच अधिक हवीहवी वाटायची. परीक्षा कधी संपतेय न कधी किल्ला बनवायला लागतोय असच होऊन जायचं. दिवाळीच्या आधीच बरेच दिवस साहित्याची जुळवाजुळव सुरु व्हायची.

थोडी गम्मत

मीउमेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे बर्याच मंडळीना रुचलेले दिसत नाहीत. आपण या आधी खूप सारे चित्रपट आणि नाटके पहिली असतील , अस बर्याच वेळी ;झाला असेल कि या भूमिकेत "क्ष" व्यक्ती असायला हवी होती. किंवा एखाद्या भूमेकेला एखाद्या नटाला काम जमलं नाही (न्याय देता आला नाही), असं बर्याच वेळी वाटत. फार गम्मत आहे ना, मला पर्सनली नाना पाटेकराना सखाराम बाईंडर किव्हा नथुराम च्या भूमिकेत बघायला आवडेल. थोडी गम्मत

द वॉक - एक अप्रतिम अनुभव

कोमल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जर मी तुम्हाला विचारलं कि तुमची आवड काय आहे? तर मला कैक उत्तरे मिळतील. स्वतःच्या आवडीचं काम कोण कोण करत आहे असं विचारलं तर बऱ्यापैकी कमी हात वर येतील. पण जर मी असा प्रश्न केला की, स्वतःच्या आवडीलाच ध्येय बनवून, एक स्वप्न बघून त्याच्यासाठी वेडं होणं कितीजणांना जमतं, तर फारच कमी उदाहरणं मिळतील. अशाच एका वेडयाची गोष्ट आहे "द वॉक". न्यूयॉर्क. ध्येयवेड्या लोकांचं शहर. आणि पॅरिस स्वप्नाळू आर्टिस्ट लोकांचं ठिकाण. आपल्या ध्येयवेड्या आर्टिस्ट चा प्रवास चालू झाला पॅरिस पासून न्यूयॉर्ककडे. गोष्ट काही फार नवीन नाही पण अगदीच जुनी पण नाही आणि अप्रचलित तर अगदीच नव्हे.