माझी दिवाळी
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
कला — चित्रकला, संगीत, नाटक आणि इतर कलांवरील मराठी लेखन. कलादालनातील कलाकृती व कलाविषयक चर्चा येथे पाहा.
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
मिसळपाव कुटुंबातील सर्व कवी, लेखक, वाचक, समीक्षक मित्रांना नमस्कार आशा करतो कि तुम्ही सर्व मजेत आणि आनंदात असाल ! आज सुमारे नऊ वर्षानंतर (२०१७ नंतर) इथे मी तुम्हाला भेटायला आलोय खूप दिवसांपासून जेपी, अतिवास, पाषाणभेद, यशोधरा, सौंदाळा, पेठकर काका, प्यारे, आयुर्हित, पैसा, अतृप्त आत्मा, गवि, चौकटराजा, अर्धवटराव, मुक्त विहारी यांना मिसळपाव वर पुन्हा भेटायला उत्सुक होतो ; खास करून माझ्या सांगली जिल्ह्यातील गाववाले बलवडीचे कपिलमुनी, मिरजेचे बॅटमॅन हे अजून इथे सक्रिय आहेत का ? हे पण पहायचे होते.
मागच्या रविवारी आमच्या Art Kitty चे एक वर्कशॉप होते. Art kitty नावाप्रमाणेच गप्पा-गोष्टी, खाणं-पिणं आणि कला असं सगळं एकत्र असतं. तर तेव्हा काही तरी विषय निघाला आणि आमच्या मॅम म्हणाल्या की त्या पुण्यातील चित्रकारांच्या ग्रुपमध्ये आहेत आणि शुक्रवारी त्यांना पोर्ट्रेट drawing साठी एक मॉडेल हवा/हवी आहे. मी म्हटलं की तुम्हाला तर जरा सुरकुतलेला चेहरा असलेले लागतात ना? जेवढे जास्त बारकावे टिपायला तेवढे तुमच्यासाठी आव्हानात्मक. तर म्हणाल्या 'नाही, नाही असं काही नाही'. आणि मला विचारलं की तुम्ही येता का मॉडेल म्हणून? मी पण बिनधास्त लगेच हो म्हणाले.
आपल्या देशात अनेक आदिवायी आणि त्यांनी जोपासलेल्या कला आहेत. त्यांच्या कलाकृतींमधून निसर्गाशी जोडलेली घट्ट नाळ दिसून येते. त्याचबरोबरीने त्यांच्या समूहाचा एकत्रित अनुभव, आठवणी यांचं चित्रण असते.
मी काढलेले हे चित्र असेच एक उदाहरण आहे. एक आर्ट वर्कशॉप अशी सुरु झालेली सामूहिक क्रिया, मैत्रीण, घरची मंडळी अशा सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाची ही एक गोष्ट आहे.
नमस्कार मित्रहो.
नुक्ताच पॅरिसमधे दाखल झालेलो असून यावेळी दीर्घ मुक्काम करण्याचा विचार आहे. पॅरिस शहरात किंवा आसपास थोडेतरी मिपाकर असतील असे वाटते. तुम्ही जर यापैकी असाल किंवा तुमच्या माहितीत तसे कुणी असेल तर अवश्य कळवा.
पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच गोष्टी पटकन आठवतात. परंतु अनेक ऐतिहासिक जागा, संग्रहालये, उद्याने, लेखक - कलावंत - शास्त्रज्ञ - तत्वचिंतक, राजे-राण्या इत्यादिकांची स्मारके, इमारती, पूल, भुयारे, दफनभूमी, ग्रंथालये अशा अनेक रोचक गोष्टी या शहरात सर्वत्र विखुरलेल्या आहेत.
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:))
तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच... "चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो".अशाप्रकारे ज्ञान मिळवणं जीवनाच्या आनंदाचं झाड आहे.
सर्व रसिकांचे आणि फॅन्स चे कविता करावी या आग्रहासाठी अनेक आभार!
खूप काळापासून माझी कविता ओव्हरड्यु होती हे मी मान्य करतो. ही कविता जरा उशीराच टाकली गेली हे मान्य आहे.
आपण केलेल्या वारंवार आठवणीमुळे शेवटी ही कविता पाझरली आहे.
काव्याचा आनंद घ्यावा!
तांत्रिक विलोपन
स्पंदन संवेग विभव हे संचलन
स्थित्यंतर रोध प्रवेग प्रचालन
उत्सर्जन दाह जडत्व विलोपन
बीजकण न्यास संहती संरोपण
भूमिती रेख विन्यास परिमापन
वक्रीय भार का विरुपण मापन
पृष्ठभागावरी स्राव नि निक्षेपण
शृंखला सूत्र हे प्रगामी विलेपन
पोटाची खळगी भरणे कारणी
स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी
हसणे होईल पातक घोर
भवती मूर्खांचा वाढेल जोर
सत्य नित्य नको ओठी
वाचेत मुग्धतेची पराकोटी
आणि...
मती निकामी होय तेधवा
म्हणावे, नरो वा कुंजरो वा
- संदीप भानुदास चांदणे
मॅडम, त्या पोरींना घेऊन या. पोरी लंगडत आल्या.. थोड्या जखमा दिसत होत्या..
"हाच होता का तो?"
पोरींनी मान डोलावली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली.
आई, बाप ,नोकरी ते जेलमधला संडास सगळ गरगर फिरायला लागले
२.२
"जा मॅडम पोरींना घेऊन, मेडिकल झाली असाल तर वॉश करून येऊ दे."
मॅडम पोरींना घेऊन गेल्या.
"पोरींना ओळखता का या?" साहेबांचा प्रश्न .
"हो साहेब . काल सकाळचे मॅटर झाले त्यामधल्या वाटत आहेत.अशाच होत्या"
"अशाच की ह्याच ?"