Skip to main content

कला

सिनेमे पाहायचेत.

लेखक इनिगोय यांनी गुरुवार, 16/07/2015 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमे पाहायचेत. कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत काय पाहावं हा. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे. या वयाच्या मुलांना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मुलाचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे मोठ्यांनी पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही..

भंगलेले अभंग शशिचे

लेखक शशांक कोणो यांनी गुरुवार, 09/07/2015 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुकी रंगे पोस्टच्या संगे लाईक कमेंट रेलचेल !! फोटोंच्या डोळा लोक होती गोळा अन मुक्ताफळा उधळती !! एकटेच यावे गुज पोस्टावे लाईक ठोकावे इतरांना !! परी काय सांगू नशीब हे पंगू कोणी भिंतीवर फिरकेना !! पाहुनीया वाट लागलीय वाट अधिक काहीही बोलवेना !! शशि म्हणे देवा ऐसा मित्र ठेवा आम्हांला सदा अप्राप्य - जय जय फेसबुक समर्थ

मुझे तो हैरान कर गया वो...

लेखक गवि यांनी मंगळवार, 07/07/2015 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
नासिर काजमीने खूप गजला लिहील्या. भारतातल्या अंबाल्यात रचला गेलेला हा कवी पुढे पाकिस्तानात गेला. फाळणीवर त्याने पुष्कळ काही लिहीलं आहेच. पण अगदी "हंगामा", "चुपके चुपके" वगैरे ग्लॅमर लाभलेल्या चार गजलांवरच मैफिलीतून उठलेल्यांनीसुद्धा नासिरची "दिलमें एक लहेरसी उठी है अभी" ऐकलेली असते. "कुछतो नाजुकमिजाज है हमभी और ये चोटभी नयी है अभी" ही अवस्था नासिरच्या काही गजल्स पहिल्यांदाच ऐकल्यावर अन वाचल्यावर झालेली असते. पण ते सर्वांना नाही जाणवणार कदाचित.

प्रिय वपु,

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 26/06/2015 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वपु, लौकीकार्थाने तुला या नश्वर दुनियेतुन जाऊन 14 वर्ष झाली. मला खात्री आहे की तू आता जिथे असशील तिथे सुद्धा 'रंग मनाचे' लावून माणूस शोधत असशील. तुला सवयच होती म्हणा ती. वयाच्या कितव्या वर्षापासून तू दोस्त बनलास ते काही आठवत नाही, पण त्यामुळे कळत्या वयात जे काही कळल ते भन्नाटच होत. "लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तु हवा आहेस" अशी दोस्तीची एक नवीनच व्याख्या समोर ठेवून अंतरबाह्य बदलून टाकलस, 'सखी' मधून चतुर्थीचा अर्थ सांगितलास. कधी 'वपुर्झा'तुन खर्चाच गणित समजावलस तर कधी 'पार्टनर' मधून नरक म्हणजे काय याची अनुभूति दिलिस.

मला आवडलेले संगीतकार भाग ४ - सज्जाद हुसैन

लेखक शशांक कोणो यांनी गुरुवार, 18/06/2015 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र मला आवडलेले संगीतकार :- ३ अनिल बिश्वास sajjad hussain संगीत काही लोकांच्या शरीरातून रक्तासोबत मिसळून वाहत असते. त्यांचा प्रत्येक श्वास संगीताने भारलेला असतो. त्यांच्या प्रत्येक शब्दात, कृतीत संगीत वसते.

बीएमएम २०१५ - नावनोंदणीकरता शेवटचे ५ दिवस

लेखक बीएमएम२०१५ यांनी बुधवार, 17/06/2015 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, २४ वर्षानंतर दक्षीण कॅलीफोर्नियात भरणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १७ वं अधिवेशन काही दिवसांतच सुरू होईल. नावनोंदणीसाठीची अंतीम तारीख २१ जून आहे. तेव्हा त्वरा करा. अधिवेशनाच्या भोजन समितीने तुमच्यासाठी मेजवानीची तयारी केली आहे, ती तुम्ही या दुव्यावर पाहू शकता. तीनही दिवस भारतातील आणि उत्तर अमेरिकेतील कलाकारांचे अनेक उत्तम कार्यक्रम पहाण्याची संधी. कार्यक्रमाची यादी या दुव्यावर पहा.

मला आवडलेले संगीतकार :– 3 अनिल बिश्वास

लेखक शशांक कोणो यांनी सोमवार, 15/06/2015 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र बंगालचे नाव आले की डोळ्यासमोर येतात दोन गोष्टी , एक म्हणजे बंगाली मिठाई आणि रबिन्द्र संगीत. बंगाली माणसाच्या स्वभावातच गोडवा आणि संगीत असते. अशा मातीतून आलेल्या अनेक संगीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. पण त्यात सर्वप्रथम नाव येते अनिल बिश्वास यांचेच. हिंदी चित्रपटाला रबिन्द्र संगीताची ओळख करून देणारे पहिले संगीतकार असे जर त्यांना म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र

लेखक शशांक कोणो यांनी शुक्रवार, 12/06/2015 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेले संगीतकार :- १. मदनमोहन आज इतकी वर्षे झाली पण मला कधी झोप येत नसेल तर आठवते लोरी म्हणजे अंगाई गीत. लहानपणी आईने अनेकदा अंगाई म्हणून निजवले असले तरी जेव्हापासून हिंदी चित्रपट संगीताचा शौक जडला तेव्हापासून दोन लोरी गीतांनी माझ्यावर जबरदस्त मोहिनी घातली.