मनाच्या आकाशवाणी केंद्रावरून !
मध्यमध्वनीलहरी ४२० कि.ह.
आम्ही मनाच्या आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत.
सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनिटे आणि तीन सेकंद झालेत.
आमच्या आज प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा...
सकाळच्या सभेत सुरुवातीला ऐकू या ‘भक्तीवंदना’!
यात ज्याच्यात्याच्या मनाचे श्लोक सादर होतील!
त्यानंतर ‘मनाची शेती’ कार्यक्रमात,
‘मनातल्या गाजर गवताला आळा कसा घालावा?’
याविषयी मार्गदर्शन केले जाईल.
दिवसभराच्या जगण्याच्या झेंगटाचा आढावा घेतला जाईल,
‘हवामनाचा अंदाज’ मध्ये!
विविध वाहिन्यांवरून प्रक्षेपित होणाऱ्या
भल्याबुऱ्या बातम्यांचे सहक्षेपण दरघटकेला होईलच!
गृहिणींसाठी ‘मनातल्या पाककृती आणि प्रत्यक्षातील रसनिष्पत्ती’
या विषयावर कोरडी चर्चा होईल.
दुपारच्या कामगार सभेत
‘कार्यालयीन मन:शैली’ या सदरात
‘रिकाम्या वेळेतील मनाचे उद्योग’ याविषयी
गभळक्षऋ यांची मुलाखत सादर होईल.
त्यानंतर ‘देश कि सुरिली धडकन’
मनाचे आकाशवाणी केंद्र पुनःपुनःप्रक्षेपित करेल!
संध्याकाळी सहा वाजता
‘आपले मन, आपली माणसं’ यात
जुन्या आठवणी, कातर वेळा,
हरवलेले क्षण, सापडलेल्या डायऱ्या
इत्यादींचा इमोसनल आढावा घेतला जाईल.
‘फोनइन’ मध्ये मनाच्या मनपसंत
गीतांचा कार्यक्रम सादर होईल!
रात्री साडेदहा वाजता ‘बेला के फूल’!
whatsapp, फेबुक, गुगल, स्काईप, तूनळी
इत्यादी कशावरूनही मन रेंगाळत राहील.
रात्री ठीक अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी
मनाच्या आकाशवाणी केंद्राचे बाह्य प्रसारण
आपोआप विराम पावेल!
वाचने
5302
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
छान लिहिले आहे...
मस्तच!
:-)
मन असा आयडी नाहीये का अजून.
In reply to मन असा आयडी नाहीये का अजून. by रातराणी
In reply to आहेत की... by सतिश गावडे
मनरंग असाही एक आयडी आहे भौतेक
आवडले स्फुट!
स्वाती
आवडले.
सहज सुंदर सालस.... :-)
मस्त आणि नर्मविनोदी..
मनातल्या पाककृती आणि प्रत्यक्षातील रसनिष्पत्ती हे अगदी गंमतीशीर...
मस्त... आवडले.
हही हही हही!
In reply to हही हही हही! by अत्रुप्त आत्मा
कसं जम्तं हो असं हसायला =))
In reply to कसं जम्तं हो असं हसायला =)) by टवाळ कार्टा
हह्ही हह्ही हह्ही
असं हसायचं असतं ते टक्कुमहाराज.
इतकं पण कळत नै? हुम्म!!!
दू दू दू टक्का!!!!
तुम्ही निरर्थक अत्मरंजनात गुंतल्याने वैश्विक मनोरंजनात चाललेल्या व्यक्तीगत स्वप्नरंजनाची तुम्हाला माहिती नाही हा सार्वत्रिक प्रश्णरंजन आहे....
दू दू दू....
In reply to हह्ही हह्ही हह्ही by मांत्रिक
हही हही हही! आणि हह्ही हह्ही हह्ही यात फरक आहे
बाकी
तुम्ही निरर्थक अत्मरंजनात गुंतल्याने वैश्विक मनोरंजनात चाललेल्या व्यक्तीगत स्वप्नरंजनाची तुम्हाला माहिती नाही हा सार्वत्रिक प्रश्णरंजन आहे....
हे भारीये =))
आवडलं
हेच मुक्तक पुरुष आयडी कडून आले असते, तर मिपाच्या आकाशवाणी केंद्रावरून काय काय प्रतिक्रिया प्रसारीत झाल्या असते बरे परा? ;)
In reply to हेच मुक्तक पुरुष आयडी कडून by परिकथेतील राजकुमार
कहर =))
आवडले.
छान लिहिले आहे...

छान लिहिलंय!
मस्त !!!
मस्त...