तर मित्रहो,
२०१२ हे वर्ष पृथ्वीच्या इतिहासातले शेवटचे वर्ष असणार आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. २०१२ साली जग नष्ट होणार, हे भाकित माया की अॅझ्टेक लोकांनी फार वर्षांपूर्वी करून ठेवले आहे, त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे. 'सॅंडी'ने चुणूक दाखवलीच आहे. त्याप्रमाणे 'बिगिनिंग ऑफ द एंड' सुरू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
या वर्षाच्या सुरूवातीला या विषयाचा फार गहजब झाला, पण प्रत्यक्षात हा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा त्या मानाने फारसा गवगवा होताना दिसत नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे!