Skip to main content

एवढासा

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 23/04/2013 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
भानावरी आज आलो जरासा माझाच मी भासलो एवढासा समजावुनी या मनाला पुन्हा मी दिधला नव्या कल्पनेला दिलासा रडू कधीचे स्मरून हसलो आणि टाकला भावनेने उसासा जशी रात्र आणि दिवस हा जसा कधी मी नकोसा कधी मी हवासा नको दूर शोधू सुखाला अपूर्व खेळच मुळी हा असे एवढासा २४-४-१३ १८:०१
काव्यरस

फिर्याद

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 22/04/2013 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
ही पुन्हा हवा आज, धुंदकुंद झाली ही पुन्हा मला आज, तुझी याद आली घनांचे पुरेपूर बरसून झाले आता कोण आसवांना, अवेळी साद घाली तु दिलास ना दगा, वाटते जगाला तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली मी न कधी घेतले, नाव तुझे कोणापुढे दोन शब्द लिहिले, हाय ती फिर्याद झाली लपविले सदा मी, पाय भेगाळले माझे वाटले जगास माझी, चाल सुखात झाली ईतक्यात त्यांना माझे, एवढे रडू आले आता कुठे सांगण्यास, माझी सुरुवात झाली
काव्यरस

त्यांचाच जीव घे तू ..

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 21/04/2013 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांचाच जीव घे तू ..... हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता मातीत राबताना इतके कळून आले फुकटात ठोस जखमा!

इर्फान-ए-गम

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 17/04/2013 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी लहानपणी महिन्यातून एकदा कटींग करायला न्हाव्याच्या दुकानात जायला लागायचेच. अर्थात हे वेळ सकाळची असायची. तेथे रेडिओ सिलोनवर जुन्या गीतांचा कार्यक्रम हमखास लागलेला असायचा व त्यात शेवटी स्व. सैगल साहेबांचे गाणे लागायचे. आता त्या कार्यक्रमाचे नाव आठवत नाही........त्यात पहिल्यांदी ही गज़ल स्व. सैगल यांच्या आवाजात ऐकलेली आठवते आहे आणि काहीतरी वेगळे ऐकल्याची भावना जी मनात आली ती आजही मनातून जात नाही. माझे आजोबा पखवाज उत्तम वाजवायचे व त्यांना संगिताची उत्तम जाण होती. मला वाटते त्यांना थोडेफार फारसीही यायचे.

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

<नाव सुचले नाही>

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 02/04/2013 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता तु घाईत होतीस अन् , त्यांना वेळ पाहिजे होता तू गेलीस परंतु , हा वसंत ईथेच आहे मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता रोजचेच आहे, हे ही धुके परंतु सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होता एकटाच येत गेलो , हरेक मैफिलीतून मी ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
काव्यरस

दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 25/03/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला

कदाचित

लेखक जयवी यांनी शनिवार, 16/03/2013 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
सुखासीन आयुष्य अळणी कदाचित चवीला व्यथाही जरूरी कदाचित म्हणावे तशी ती न जगली कधीही जराही असोशी नसावी कदाचित पुन्हा चंद्र, तारे झगडले निशेशी पुन्हा अवस येण्याचि नांदी कदाचित अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी तुझी भेट झाली असावी कदाचित जरा लांबलेलीच ती रात्र होती दिशाहीन झाली असावी कदाचित नको आणखी कोणताही उतारा नशा वेदनांची पुरेशी कदाचित उभा जन्म गेला करूनी गुलामी हिशेबात अजुनी उधारी कदाचित पिते ताक फुंकून फुंकून अजुनी कुणी पोळलेली असावी कदाचित सुखालाच केले म्हणे जायबंदी बरळणे असावे खरेही कदाचित जयश्री अंबासकर
काव्यरस

हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 05/03/2013 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना एकास आवडे जे दुसऱ्यास का पटेना स्पर्धेत जीवनाच्या का ताळमेळ नाही कुठलाच मनपतंग कटता कसा कटेना उपदेश कायद्याचा करण्यात गुंततो जो सुधरावयास तोरा अपुलाच का झटेना भिक्कार आहे म्हणुनी धिक्कारतो कुणी तो किति छान आहे म्हणुनी हा दूर का हटेना माझ्याचसारखा मी समजे कुणी स्वत:ला गर्वात आत्मस्तुतिचा फुगता फुगा फुटेना .

निष्पर्ण जाहले तुझ्याविना

लेखक जयवी यांनी मंगळवार, 19/02/2013 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही मी जगत राहिले पुन्हा पुन्हा ऊन्मळले नाही आडास पोहरा जखडुन करतो वेठबिगारी पाण्यात अश्रु मिसळले कुणाला कळले नाही वाटेत हात सोडला कधी तू कळले नाही मी चाल बदलली जरा परी अडखळले नाही शाळेत रोजची चिडाचिडी अन भांडाभांडी का घट्ट आपुला लगाव मजला कळले नाही का पौर्णिमेस तारका नभी येण्या आतुरती रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही जयश्री अंबासकर
काव्यरस