Skip to main content

गझल

रक्त आटते जनतेचे

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 13/05/2013 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
रक्त आटते जनतेचे

रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला
एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला

जे हुजरे पाळलेस तू, सर्व खाण्याचे पाईक
ढेकर देणे झाले की, ते बघतील सटकायला

सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला

निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला

टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 11/05/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
.

लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले

वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले

साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले

क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले

नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले

सन्मान

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 10/05/2013 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
लोक विचारती आम्हा, का दर्द आमच्या शायरीत आहे अहो व्यथांना सन्मानिण्याची, हीच आमची रीत आहे वाटते दु:खासही कधी,दिसावे सुंदर आपणही लेखणीत म्हणून ते आमच्या, यथेच्छ शृंगार करीत आहे ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे कधी करतो सलगी, बोचर्‍या जुन्या क्षणांशी वागणे जरासे आमचे, आमच्याच विपरीत आहे घेतला दगाही काही, ऐश्या सफाईने आम्ही दगाबाज अजून आमची, वाहवा करीत आहे
काव्यरस

माझी गझल निराळी

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 08/05/2013 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझी गझल निराळी

घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी

शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी

एकेका आरोपीची उला पकडतो गच्ची
सानीच्या लाथडण्यावर पिटती मिसरे टाळी

लढवैय्या आशय माझा करतो तांडव तेथे
जन्माला येते जेथे, ती काळरात्र काळी

युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी

गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही

मरणे कठीण झाले

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 30/04/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.

मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला

नाटकी बोलतात साले!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 25/04/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;

एवढासा

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 23/04/2013 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
भानावरी आज आलो जरासा माझाच मी भासलो एवढासा समजावुनी या मनाला पुन्हा मी दिधला नव्या कल्पनेला दिलासा रडू कधीचे स्मरून हसलो आणि टाकला भावनेने उसासा जशी रात्र आणि दिवस हा जसा कधी मी नकोसा कधी मी हवासा नको दूर शोधू सुखाला अपूर्व खेळच मुळी हा असे एवढासा २४-४-१३ १८:०१
काव्यरस

फिर्याद

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 22/04/2013 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
ही पुन्हा हवा आज, धुंदकुंद झाली ही पुन्हा मला आज, तुझी याद आली घनांचे पुरेपूर बरसून झाले आता कोण आसवांना, अवेळी साद घाली तु दिलास ना दगा, वाटते जगाला तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली मी न कधी घेतले, नाव तुझे कोणापुढे दोन शब्द लिहिले, हाय ती फिर्याद झाली लपविले सदा मी, पाय भेगाळले माझे वाटले जगास माझी, चाल सुखात झाली ईतक्यात त्यांना माझे, एवढे रडू आले आता कुठे सांगण्यास, माझी सुरुवात झाली
काव्यरस

त्यांचाच जीव घे तू ..

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 21/04/2013 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांचाच जीव घे तू ..... हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता मातीत राबताना इतके कळून आले फुकटात ठोस जखमा!

इर्फान-ए-गम

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 17/04/2013 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी लहानपणी महिन्यातून एकदा कटींग करायला न्हाव्याच्या दुकानात जायला लागायचेच. अर्थात हे वेळ सकाळची असायची. तेथे रेडिओ सिलोनवर जुन्या गीतांचा कार्यक्रम हमखास लागलेला असायचा व त्यात शेवटी स्व. सैगल साहेबांचे गाणे लागायचे. आता त्या कार्यक्रमाचे नाव आठवत नाही........त्यात पहिल्यांदी ही गज़ल स्व. सैगल यांच्या आवाजात ऐकलेली आठवते आहे आणि काहीतरी वेगळे ऐकल्याची भावना जी मनात आली ती आजही मनातून जात नाही. माझे आजोबा पखवाज उत्तम वाजवायचे व त्यांना संगिताची उत्तम जाण होती. मला वाटते त्यांना थोडेफार फारसीही यायचे.